PHP-and-MySQL/C2/Loops-For-Statement/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 for loopsचे मुख्य तत्त्व म्हणजे block of code ठराविक वेळा, पुन्हा पुन्हा कार्यान्वित करणे. त्यासाठी सुरूवातीला व्हेरिएबल initialize केला जातो, loopच्या शेवटी तो increment करून condition तपासली जाते.
00:18 त्यामुळे आपण व्हेरिएबल जितके वेळा increment करू तितके वेळा आपला व्हेरिएबल loop होईल.
00:30 हे लिहायला थोडेसे क्लिष्ट असले तरी ते दिसायला सुटसुटीत असून व्यवस्थित कार्य करते.
00:42 आता 'for' असे लिहा.
00:44 येथे आपल्या code चे हे तीन भाग आहेत. आणि हा आपला block आहे. आपल्याला एवढ्याचीच गरज आहे. आपले मुख्य घटक येथे असतील.
00:54 आपण येथे echoटाईप करूनnum हे व्हेरिएबल बनवू या. याचा अर्थ आपण num echoकरत आहोत.
01:04 येथे आपण num = 1लिहू. = = 1 नाही. कारण आपण येथे num या व्हेरिएबलची व्हॅल्यू 1अशी सेट करत आहोत.
01:15 आता आपली conditionलिहू या. उदाहरणार्थ num < = 10
01:23 आता येथे increment valueम्हणजे num ++ असे लिहू. अशा प्रकारे आपला loop पूर्ण झाला आहे.
01:32 येथे आपण Forटाईप केले आहे आणि num=1 ही व्हेरिएबल व्हॅल्यू सेट केली आहे.
01:38 मग आपल्याकडे num< =10 अशी condition आहे. अशा प्रकारे loop चालू राहिल आणि नंतर num ++ आहे.
01:48 num ++ हे येथे खालच्याऐवजी येथे चांगले दिसते.
01:53 व्हेरिएबल येथे वरती declare करण्याऐवजी
01:56 ते या कंसात declare करता येते.
02:00 मी येथे लाईन ब्रेक विसरले आहे.
02:03 आपण याच्या शेवटी लाईन ब्रेक समाविष्ट करू या.
02:09 आता रिफ्रेश करा.
02:11 आणि बघा.
02:15 loop दहा वेळा मिळाला आहे.
02:18 आता हे असे लिहिले की num 10 किंवा 10पेक्षा कमी असतानाच loop होईल.
02:26 यानंतर loop संपून प्रोग्रॅम पुढे कार्यान्वित होइल.
02:31 हे थोडे क्लिष्ट वाटत असले तरी तुम्ही याचे बेसिक समजून घेतल्यानंतर ते तुम्हाला अगदी सोपे वाटेल.
02:37 या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांनी दिला आहे. सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana