PHP-and-MySQL/C2/GET-Variable/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: GET Variable

Author: Manali Ranade

Keywords: PHP and MySQL


Time
Narration
00:00 get variable वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:09 get variable हे अतिशय उपयोगी व्हेरिएबल आहे.
00:16 याचा उपयोग बहुतांशी dynamic website मध्ये होतो. ज्यामध्ये click-able बटण असलेल्या फॉर्म्सचा समावेश असतो.
00:27 हे युजर बघूही शकतो. तुम्ही सुद्धा असे तुमच्या पेजवर पाहिलेले असेल.
00:32 येथे क्लिक करा. येथे तुम्हाला एक प्रश्न चिन्ह दिसेल.
00:38 येथे name equals to Alex असे टाईप करू या. तुम्हाला address bar मध्ये हे अशा प्रकारे दिसेल.
00:46 तुम्हाला आणखी काही गोष्टीही दिसल्या असतील. उदाहरणार्थ तुमचे name equals to Kyle
00:53 हे get variableआहे.
00:55 हे मुळात HTML फॉर्मद्वारे सबमिट केलेला डेटा घेऊन ते storage मध्ये ठेवते, तो डेटा पुढे आपण वापरणार असतो. हे केवळ तुम्हाला address barमध्ये दिसेल.
01:08 get variableच्या काही मर्यादा आहेत. हे केवळ 100 अक्षरे घेते. हे युजरला बघताही येते. त्यामुळे याचा पासवर्डसाठी वापर करता येत नाही.
01:20 याचा वापर करण्यासाठी इतर Php व्हेरिएबलप्रमाणे हे डिक्लेअर करण्याची आवश्यकता नसते.
01:28 आता टाईप करा. echo , dollar sign, underscore get.
01:33 नंतर पुढे square brackets मध्ये आपल्या व्हेरिएबलचे नाव. उदाहरणार्थ my name
01:40 स्क्रीनवर एको करण्यासाठी एवढे पुरेसे आहे, जे फॉर्मवर दिले गेले आहे. प्रत्यक्षात तिथे फॉर्म नसला तरी आपण त्याची नक्कल केली आहे.
01:51 त्यासाठी येथे प्रश्नचिन्ह देऊन पुढे my name is equals to Alex असे टाईप करून एंटर दाबा. आपल्याला हे दिसेल.
02:03 अशाच प्रकारे आपण येथे Kyle किंवा इतर कोणतेही name किंवा variable टाईप करू शकतो.
02:09 येथे अंक, अक्षरे किंवा स्ट्रिंग्ज असू शकतात.
02:14 आता आपण गेट मेथडच्या सहाय्याने फॉर्म कसा सबमिट करायचा ते बघू या.
02:22 त्यासाठी आपण HTML पेज बनवणार आहोत.
02:30 आपण इथे form लिहू आणि त्यातील action लिहू.
02:34 जर तुम्ही HTML शी परिचित नसाल तर त्यावर काम करण्यापूर्वी त्याबद्दल माहिती करून घ्या.
02:44 ही actionसुध्दा आपण जिथे काम करत आहोत त्याच ठिकाणी असेल. इथे आपण get ही मेथड लिहू . आपण form इथे संपवू.
02:57 आपल्याला एक input box लागेल आणि त्याचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे.
03:03 आपण त्याला 'my name' असे म्हणू. हा व्हेरिएबल आपल्याला दिसणार आहे.
03:11 तसेच आपल्याला एका submit buzzer ची गरज आहे. त्यासाठी input type समोर 'submit' असे टाईप करून पुढे व्हॅल्यू समोर 'click here' असे टाईप करा.
03:26 रिफ्रेश करा आणि बघा. आता हे असेच राहू दे.
03:33 येथे क्लिक करून 'Alex' टाईप करा. तुम्हाला येथे काही बदल झालेले दिसतील येथे my name असे लिहिलेले आहे. हे आपले input box चे नाव आहे. आणि पुढे आपण बॉक्समध्ये टाईप केलेली व्हॅल्यू दिसत आहे.
03:47 आता मला Php मध्ये ही व्हॅल्यू एको करायची आहे.
03:52 HTML कोडखाली Php चा कोड लिहू या. हे दोन्हीही कोड एकाच पानात समाविष्ट करता येतात. फक्त ते Php tags मध्ये असता कामा नयेत. अशा प्रकारे फक्त एको फंक्शनच चालू शकते.
04:07 आता टाईप करा name is equal to dollar sign, underscore, get.
04:14 पुढे my name असेच टाईप करणे आवश्यक आहे. नाहीतर आपल्याला काहीच रिस्पॉन्स मिळणार नाही.
04:20 नंतर एको टाईप करून पुढे Hello आणि नंतर name हे व्हेरिएबल टाईप करा.
04:31 आता हे काढून टाका आणि पुन्हा सुरूवात करा.
04:35 आपल्याला येथे Hello आधीच आलेले दिसेल.
04:39 आता येथे क्लिक करून Alex असे टाईप करा.
04:48 अशा प्रकारे येथे आपल्याला Alex असे आलेले दिसेल. परंतु येथे एक समस्या आहे येथे आपल्याला Hello आणि नंतर पुढे थोडी रिकामी जागा सोडून पूर्णविराम दिसत आहे. आपल्याला हे नको आहे.
05:06 आपल्याला फक्त 'if name' म्हणायचे आहे. ही एकच ओळ असल्याने महिरपी कंसाची गरज नाही. आणि name उपस्थित असल्यामुळे हे true आहे.
05:23 जेव्हा name व्हेरिएबलकडे कोणतीही व्हॅल्यू नसेल तेव्हा ती कंडिशन आपोआप false होईल. त्यामुळे हे कार्यान्वित होणार नाही.
05:33 आता रिफ्रेश करा. खाली काही दिसणार नाही.
05:39 आपण येथे व्हॅल्यू टाईप करून click here बटणावर क्लिक करू या.
05:42 येथे व्हॅल्यू उपस्थित असल्यामुळे हे एको करेल.
05:47 अशा प्रकारे आपण get variable पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
05:50 पुढील ट्युटोरियलमध्ये आपणpost variable आणि त्याच्या वापराबद्दल जाणून घेणार आहोत.या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana