PERL/C3/Perl-Module-Library-(CPAN)/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Perl Module Library म्हणजे CPAN कसे वापरणे ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:08 ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण PERL मध्ये नवीन मॉड्यूल्स तयार करणे आणि अस्तित्वात असलेले मॉड्यूल्स वापरणे शिकू.
00:16 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम, पर्ल 5.14.2 आणि gedit हा टेक्स्ट एडिटर
00:28 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:32 हे ट्यूटोरियल अनुसरण करण्यासाठी, तुम्हाला पर्ल प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:37 नसल्यास संबंधित पर्ल ट्यूटोरियल्ससाठी स्पोकन ट्यूटोरियल वेबसाईट वर जा.
00:43 मॉड्यूल्स: या सामान्य रूटिन्स असलेल्या कोड फायली आहेत. विविध लेखकांनी लिहिलेले आहेत. आणि एका वेळी अनेक कार्यक्रम द्वारे वापरली जाऊ शकते.
00:55 CPAN: पर्ल एक ओपन सोर्स भाषा आहे आणि कोणीही पर्लचे मानक CPAN लाइब्ररी मध्ये योगदान करू शकतो.
01:03 CPAN मध्ये हजारो मॉड्यूल्स वापरण्यास विविध लेखकांद्वारे तयार केले आहेत.
01:09 CPAN ची अधिकृत वेबसाइट www.cpan.org आहे.
01:17 आपण List colon colon Util उदाहरण म्हणून घेऊ आणि पाहु त्याचे वापर कसे करणे.
01:24 हे मला फंक्शनसाठी एक्सेस देते जी आधीच ह्या मॉड्यूल मध्ये लिहिलेली आहे.
01:30 टर्मिनल वर जाऊ.
01:32 टाइप करा: perldoc List colon colon Util.
01:38 तुम्हाला हा प्रोग्रॅम वापरण्यास 'पर्ल हाइफन डॉक' पॅकेज इनस्टॉल करावे लागेल अशी एरर मिळेल.
01:46 हे निर्देशीत करते की तुम्हाला 'पर्ल हाइफन डॉक' पॅकेज इनस्टॉल करवेच लागेल.
01:50 'सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर' वापरुन करा.
01:55 कृपया 'स्पोकन ट्यूटोरियल' वेबसाइट वर संबंधित 'लिनॅक्स' ट्यूटोरियल्स पहा.
02:01 तुम्ही जे इथे पाहत आहात ते List colon colon Util मॉड्यूल साठी डॉक्युमेंटेशन आहे.
02:08 लक्षात ठेवा की documentation मध्ये खालील समाविष्ट आहेत-मॉड्यूल चे वर्णन, ते कसे वापरावे ह्याचे उदाहरण आणि overview.
02:20 perldoc viewer मधून बाहेर पडण्यासाठी 'Q' की दाबा.
02:25 पुढे, आपण पर्ल प्रोग्राम मध्ये List colon colon Util मॉड्यूल कसे वापरावे हे पाहु.
02:33 मी आधीच सेव्ह केलेले exist underscore modules.pl सॅंपल प्रोग्राम उघडते.
02:40 तुमच्या exist underscore modules dot pl फाइल मध्ये, स्क्रीन वर दर्शवल्याप्रमाणे खालील कोड टाइप करा.
02:47 आता कोड समजून घेऊ.
02:50 use List colon colon Util हा पर्लला सांगतो की List colon colon Util मॉड्यूल शोधून लोड करा.
03:00 delimiter वापरुन qw() फंक्शन string च्या बाहेर शब्द एक्सट्रॅक्ट करतो आणि शब्दाला list म्हणून रिटर्न करतो.
03:09 array ला घोषित करण्यास हा एक जलद मार्ग आहे.
03:13 एक मॉड्यूल इम्पोर्ट करताना हे आपल्या प्रोग्रॅम मधील निर्देशित लिस्ट मध्ये फक्त subroutines ला इम्पोर्ट करते.
03:21 ह्यात subroutines चे जनरल यूटिलिटी सूची समाविष्ट आहे.
03:26 मॉड्यूल आपल्य प्रोग्राम मध्ये त्याचे subroutines आणि variables एक्सपोर्ट करेल.
03:32 List colon colon Util मध्ये उपलब्ध सर्वात लोकप्रिय subroutines आहेत जे list मध्ये प्रथम एलिमेंट रिटर्न करते.
03:42 max – हे यादीतील उच्चतम सांख्यिकीय वॅल्यू रिटर्न करते.
03:47 maxstr- हे यादीतील उच्चतम string रिटर्न करते.
03:52 min- हे सर्वात कमी सांख्यिकीय वॅल्यू रिटर्न करते.
03:57 minstr – हे यादीतील सर्वात कमी string रिटर्न करते.
04:02 shuffle – हे input ची वॅल्यू यादृच्छिक यादीत रिटर्न करते.
04:08 sum – हे यादीतील सर्व एलिमेंट्सना सांख्यिकीय बेरीज रिटर्न करते.
04:14 प्रत्येक function साठी वेगळे सोर्स कोड लिहिण्याची गरज नाही.
04:18 आपण उपलब्ध subroutines चे वापर आपल्या प्रोग्राम मध्ये करू शकतो.
04:23 हे inputs आहेत जे मी max, min, sum आणि shuffle फंक्शनला पास करत आहे.
04:30 आणि, हे print स्टेट्मेंट्स आहेत.
04:33 आता, फाइल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
04:37 आता प्रोग्राम कार्यान्वित करू.
04:40 आणि टर्मिनल वर जाऊन टाइप करा: perl exist underscore modules dot pl आणि एंटर दाबा.
04:49 आउटपुट बघा.
04:51 Random number मध्ये, तुम्हाला 0 आणि 51 दरम्यान कोणतेही वॅल्यू मिळू शकते.
04:58 पुढे, आपण एक नवीन Perl module कसे तयार करणे आणि त्याला CPAN वर कसे जोडणे हे पाहु.
05:04 मॉड्यूल तयार करण्यास स्टेप्स खाली दिले आहेत.
05:08 मॉड्यूल तयार करण्यास ठिकाण तयार करा.
05:11 मॉड्यूल साठी स्केलिटन फाइल तयार करा.
05:14 मॉड्यूल ला Document करा.
05:16 Perl code लिहा.
05:18 टेस्टिंग करण्यास कोड लिहा.
05:20 CPAN मध्ये मॉड्यूल वितरित करू.
05:24 h2xs प्रोग्राम सह वितरीत केले जाते जे नवीन मॉड्यूलसाठी फाइल तयार करण्यास वापरले जाते.
05:32 Math colon colon Simple आपले मॉड्यूल नाव निर्दिष्ट करते.
05:37 हा एक असा डाइरेक्टरी तयार करतो ज्याच्यात तो मॉड्यूल समाविष्ट आहे त्याला स्पष्टपणे ओळखतो.
05:43 मूलभूतपणे, हे मॉड्यूल साठी स्केलिटन फाइल तयार करते.hyphen PAX पर्याय आहेत जे autoload आणि autogenerate ला गाळते.
05:54 एक नवीन मॉड्यूल तयार करू- Math colon colon Simple
05:59 हे सोपे फंक्शन्स add, subtract, multiply आणि divide सह प्रदान केले जाईल.
06:06 आता h2xs फंक्शन्स कमांड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनल वर जाऊ.
06:12 टाइप करा: h2xs hyphen PAXn Math colon colon Simple.
06:20 h2xs प्रोग्राम हे मॉड्यूलला वितरीत करण्यासाठी आवश्यक ह्या सर्व फाइल्सना निर्माण करते.
06:27 आता डाइरेक्टरीला Math hyphen Simple ने बदलू.
06:33 तुमच्या मशीन वर directory path कडे लक्ष्य द्या. Math forward slash Simple म्हणून असू शकते.
06:41 डाइरेक्टरी मधील सर्व फाइल्स सूचीत दिसण्यासाठी "ls" टाइप करा . आपण खालील फाइल्स पाहु शकतो.
06:49 "Changes" च्या फाइल मध्ये, आपण मॉड्यूल मध्ये केलेले बदल आणि जेव्हा नवीन वर्जन्स लिहितो त्यांना ट्रॅक करू शकतो.
06:58 lib subdirectory मध्ये मॉड्यूल समाविष्ट आहे.
07:02 MANIFEST मध्ये या डाइरेक्टरीतील फाइल्सची सूची समाविष्ट आहे.
07:07 Makefile पर्ल प्रोग्रॅम आहे जे Unix Makefile तयार करण्यासाठी वापरले जाते.
07:12 आपण ह्या Makefile ला आपले मॉड्यूल टेस्ट आणि इनस्टॉल कारण्यसाठी वापरु.
07:18 Test scripts हे 't' subdirectory मध्ये असेल.
07:22 tests सामान्य Perl scripts आहेत, पण dot t extension सह unit testing साठी वापरले जाते.
07:30 Simple.pm हा आपला मॉड्यूल आहे.
07:34 जेव्हा आपण h2xs कमांड कार्यान्वित करतो तेव्हा या सर्व फाइल्स स्वयंचलितपणे निर्माण होतात.
07:41 आता simple.pm फाइल उघडू.
07:45 डाइरेक्टरीला lib forward slash Math मध्ये बदला.
07:51 आता, वर्तमान कॉंटेंट पाहण्यासाठी आपण simple.pm फाइल उघडूया.
07:57 टाइप करा: gedit Simple.pm.
08:02 आपण येथे जे पाहतो ते डॉक्युमेंटेड, फंक्शनल पर्ल मॉड्यूल आहे जे काही करू शकत नाही.
08:09 आपल्याला काहीतरी शक्य करण्यासाठी ह्या फाइल मध्ये आवश्यक फंक्शन लिहायचे आहे.
08:16 टेक्स्ट नंतर खालील कोड जोडा: "Preloaded methods go here".
08:22 येथे आपण चार सबरुटीन्स जोडुया add, subtract, multiply आणि divide.
08:29 आता, फाइल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा.
08:33 आता आपला कोड तपासण्यासाठी एक सॅंपल पर्ल प्रोग्रॅम तयार करू जे खात्री करते की हे योग्यप्रकारे कार्य करेल.
08:41 आता सबडाइरेक्टरी 't' मधील Math-Simple.t टेस्ट फाइल उघडू.
08:49 टाइप करा: gedit Math-Simple.t
08:55 वर्तमान कोड नंतर खालील कोड जोडा: “Insert your test code below..”.
09:02 Print स्टेट्मेंट आउटपुट प्रिंट करेल.
09:06 आता, फाइल सेव्ह कारण्यसाठी Ctrl+S दाबा.
09:10 आता test script रन करू.
09:13 टाइप करा: perl Math-simple.t आणि एंटर दाबा.
09:19 आपण हा एरर मेसेज पाहतो कारण की पर्ल स्क्रिप्ट त्याच्या डाइरेक्टरी मध्ये Simple.pm शोधू शकत नाही.
09:27 हे lib डाइरेक्टरी च्या आतमध्ये दिसले पाहिजे. आपण हा एरर कसे दुरुस्त करू शकतो?
09:33 ह्या साठी काही पर्याय पाहु.
09:37 At the rate INC हे विशेष वेरियबल आहे जे डाइरेक्टरीसची सूची ठेवते.
09:43 पर्ल मॉड्यूल आणि लाइब्ररी हे डाइरेक्टरीस मधून लोड केले जाऊ शकते.
09:48 ह्या लाइन चा कोड पर्ल प्रोग्रॅम ला हे सांगते की ह्या directory path ला at the rate INC सर्च डाइरेक्टरी मध्ये जोडा.
09:57 वैकल्पिकरित्या, आपण '-I' पर्याय वापरुन रन टाइम वर at the rate INC वर फाइल्स जोडू शकतो.
10:06 आता, टर्मिनल वर जाऊ.
10:10 -I' command line parameter वापरुन मी प्रोग्रॅम ला कार्यान्वित करेल.
10:16 तर, मी टाइप करेल: perl -Ilib t/Math-Simple.t
10:24 येथे अपेक्षित आउटपुट आहे.
10:27 आम्ही मॉड्यूल तपासले आहे आणि ते ठीक काम करीत आहे.
10:31 शेवटची स्टेप मॉड्यूल ला वितरती करण्याची आहे.
10:34 मॉड्यूल ला प्रतिष्ठापन करण्यासाठी सामान्य प्रक्रिया ह्या कमांड्स ना रन करायचे आहे.
10:40 प्रतिष्ठापन Perl library directory मध्ये फाइल्स ना कॉपी करणे यांचा समावेश आहे.
10:45 आपल्यापैकी बहुतेकांना या डिरेक्टरी मध्ये कॉपी करण्याची परवानगी नाही.
10:49 Math-Simple एक अतिशय उपयुक्त मॉड्यूल नाही, म्हणून मी प्रतिष्ठापनचे भाग प्रदर्शित करत नाही.
10:57 आपण ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात.
11:02 ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण: वर्तमान मॉड्यूल्स वापरणे नवीन मॉड्यूल्स तयार करणे. आणि पर्ल प्रोग्राम मध्ये कसे वापरणे हे शिकलो
11:11 तुमच्यासाठी इथे असाइनमेंट आहे.
11:13 Text colon colon Wrap मॉड्यूल वापरा.
11:17 Wrap() फंक्शन वापरुन, व्यवस्थित पॅरग्रॅफ तयार करण्यास इनपुट टेक्स्टला एकत्र करा.
11:24 Text colon colon Wrap मॉड्यूल मध्ये "columns" नावाचा वेरियबल आहे. columns ची वॅल्यू 30 करा.
11:31 फॉरमॅटेड आउटपुट पाहण्यासाठी टेक्स्ट प्रिंट करा.
11:35 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
11:42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते
11:51 अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
11:55 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
12:02 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:06 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana