PERL/C2/More-on-Hash/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: More-on-Hash

Author: Manali Ranade

Keywords: Perl


Time Narration
00.01 पर्लमधील Hash वरील पाठात आपले स्वागत.
00.05 यात शिकणार आहोत,
00.09 पर्लमधील Hash आणि
00.11 हॅशचे घटक ऍक्सेस करणे.
00.14 या पाठासाठी मी वापरत आहे,
00.16 उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टीम,
00.21 Perl 5.14.2 आणि
00.24 gedit हा टेक्स्ट एडिटर.
00.26 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00.30 या पाठासाठी पर्लमधील व्हेरिएबल्स आणि डेटा स्ट्रक्चर्सचे ज्ञान आवश्यक आहे.
00.38 कॉमेंटस, लूप्स, कंडिशनल स्टेटमेंटस आणि ऍरेजचे ज्ञान फायद्याचे ठरेल.
00.46 संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या.
00.52 हॅश हा अनियमीत डेटाचा संच असतो.
00.56 हे key/value अश्या जोडीचे डेटा स्ट्रक्चर आहे.
00.59 हॅशमधील की ही एकमेव असते.
01.01 परंतु हॅशमधील व्हॅल्यूज डुप्लिकेट असू शकतात.
01.05 हॅश असे घोषित केले जाते.
01.08 हॅशमधून की ची व्हॅल्यू कशी मिळवायची ते पाहू.
01.12 की ची व्हॅल्यू मिळवण्याचा सिंटॅक्स असा आहे.
01.17 dollar hashName महिरपी कंसातsingle quote keyName single quote महिरपी कंस पूर्ण
01.26 सँपल प्रोग्रॅमद्वारे हॅश समजून घेऊ.
01.31 मी geditमधील perlHash dot pl ह्या फाईलमध्ये कोड आधीच टाईप केला आहे.
01.37 येथे दाखवल्याप्रमाणे तुमच्या perlHash dot pl फाईलमधे कोड टाईप करा.
01.42 पर्लमधे हॅश percentage च्या चिन्हाने घोषित केले जाते.
01.47 ह्या हॅशच्या कीज आहेत.
01.49 आणि ह्या हॅशच्या व्हॅल्यूज आहेत.
01.53 हॅशची की, ऍक्सेस करण्यासाठी डॉलर चिन्हाचा उपयोग करावा लागतो.
01.59 Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा.
02.02 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
02.08 perl perlHash dot pl
02.11 आणि एंटर दाबा.
02.14 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
02.19 आता हॅश मधून कीज समाविष्ट आणि डिलिट करण्याबद्दल पाहू.
02.24 की समाविष्ट करण्याचा,
02.26 सिंटॅक्स असा आहे dollar hashName महिरपी कंसात
02.30 single quote KeyName single quote
02.34 महिरपी कंस पूर्णequal to value semicolon
02.40 की डिलिट करण्यासाठी delete dollar hashName महिरपी कंसात
02.46 single quote KeyName single quote महिरपी कंस पूर्णsemicolon
02.53 आता हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
02.58 मी hashKeyOperations dot pl ह्या फाईलमधे कोड आधीच लिहून ठेवला आहे.
03.05 येथे हॅश घोषित केले आहे.
03.08 आपण हॅश मधे कीज समाविष्ट करू आणि काढून टाकू.
03.13 येथे आधीच बनवलेल्या हॅशमधे की समाविष्ट करत आहोत.
03.18 हे व्हेरिएबलला व्हॅल्यू प्रदान करण्यासारखेच आहे.
03.23 की डिलिट करण्यासाठी delete हा कीवर्ड वापरला जातो.
03.27 त्याला डिलिट करण्यासाठी की सांगणे आवश्यक आहे.
03.31 Ctrl+S दाबून फाईल सेव्ह करा.
03.35 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
03.40 perl hashKeyOperations dot pl
03.44 आणि एंटर दाबा.
03.47 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
03.52 आता हॅश कीज आणि व्हॅल्यूज सॉर्ट कशा करायच्या ते पाहू.
03.57 कीज सॉर्ट करण्याचा सिंटॅक्स-
04.00 sort कंसातkeys percentage hashName कंस पूर्ण semicolon
04.07 तसेच हॅश व्हॅल्यूज सॉर्ट करण्यासाठी
04.11 sort कंसातvalues percentage hashName कंस पूर्ण semicolon
04.18 सॉर्टिंगची फंक्शनॅलिटी सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.
04.24 geditवरील sortHash dot pl ह्या फाईलवर जा.
04.30 स्क्रीनवर दाखवलेला कोड sortHash dot pl फाईलमधे टाईप करा.
04.36 येथे address चा हॅश घोषित केला आहे.
04.41 येथे कीज सॉर्ट करण्यासाठी कीज फंक्शनसोबत सॉर्ट हे इनबिल्ट फंक्शन वापरू.
04.49 हॅश कीज अक्षरांच्या क्रमानुसार सॉर्ट करेल.
04.54 तसेच हॅशच्या व्हॅल्यूजवरही सॉर्ट फंक्शन वापरू शकतो.
04.59 तसेच न्युमरीक कीज आणि/किंवा व्हॅल्यूजवर सॉर्टिंग करता येते.
05.05 फाईल सेव्ह करून टर्मिनलवर जा.
05.09 स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा perl sortHash dot pl आणि एंटर दाबा.
05.17 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
05.22 आता हॅशच्या सर्व कीज आणि व्हॅल्यूज कशा मिळवायच्या ते पाहू.
05.27 त्यासाठी पर्ल इनबिल्ट फंक्शन प्रदान करते.
05.34 हॅश च्या सर्व कीज मिळवण्यासाठी keysफंक्शन वापरले जाते.
05.40 values फंक्शन सर्व कीजच्या व्हॅल्यूज आपल्याला देते.
05.46 each फंक्शन हॅशवर आयटरेट करून सर्व की/व्हॅल्यूच्या जोड्या देते.
05.53 हे सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.
05.57 त्यासाठी perlHash dot pl ही स्क्रिप्ट वापरू जी पाठाच्या सुरूवातीला बनवली होती.
06.07 स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कोड टाईप करा.
06.12 आता कोड समजून घेऊ.
06.15 हॅशवरील keysफंक्शन हॅशच्या सर्व कीज असलेला ऍरे देईल .
06.22 हॅश वरील values फंक्शन हॅश च्या सर्व कीजच्या व्हॅल्यूजचा ऍरे देईल.
06.30 each फंक्शन key/value ची जोडी परत देईल.
06.34 येथे while loop वापरले आहे.
06.36 ते each फंक्शनने परत दिलेल्या हॅशमधील key/valueजोड्यांवर आयटरेट करेल .
06.43 Ctrl+S दाबून फाईल सेव्ह करा.
06.48 टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
06.53 perl perlHash dot pl
06.58 आणि एंटर दाबा.
07.01 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
07.05 आता हॅशमधे लूपिंग कसे करायचे ह्याचे इतर मार्ग पाहू .
07.10 हॅशमधील प्रत्येक की वर आयटरेट करण्यासाठी foreachलूप वापरू.
07.15 नंतर की च्या व्हॅल्यूवर काही विशिष्ट कार्य करू
07.20 ह्याचा सिंटॅक्स स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आहे .
07.24 येथे foreach loop च्या प्रत्येक आयटरेशनमधे हॅशची की $variable ला देण्यात येईल.
07.32 नंतर हा $variable व्हॅल्यू मिळवण्यासाठी किंवा इतर कार्य करण्यासाठी वापरला जाईल.
07.40 तसेच स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हॅश मधील व्हॅल्यूजवर लूप करू शकतो.
07.47 आता सँपल प्रोग्रॅम पाहू.
07.49 त्यासाठी मी gedit मधील loopingOverHash dot pl फाईलवर जात आहे.
07.55 दर्शवलेला कोड loopingOverHash dot pl मधे टाईप करा.
08.02 हा कोड हॅशची एकच की परत करेल.
08.07 आपल्या केसमधे,
08.09 पहिल्यावेळी डॉलर की ($key) मधे की म्हणून Department संचित करेल.
08.15 foreachच्या पुढच्या आयटरेशनमधे आपल्याला Name की मिळेल.
08.21 टीपः हॅश हा अनियमीत डेटाचा संच आहे.
08.26 त्यामुळे रिटर्नड कीहॅश तयार करताना घोषित केलेला अनुक्रम पाळणार नाहीत.
08.33 व्हॅल्यूज वर लूप करतानाही हेच होऊ शकेल.
08.38 Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा.
08.41 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
08.46 perl loopingOverHash dot pl
08.50 आणि एंटर दाबा.
08.53 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
08.58 थोडक्यात,
08.59 आपण,
09.01 पर्लमधील हॅश आणि
09.03 हॅशचे एलिमेंट ऍक्सेस करण्याबद्दल
09.05 सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो.
09.08 आता असाईनमेंट.
09.11 student nameही की असलेला आणि तिचे/त्याचे
09.15 percentage ही व्हॅल्यू असलेला हॅश घोषित करा.
09.18 keys, values आणि each फंक्शन वापरून हॅशवर लूप करा.
09.24 प्रत्येक विद्यार्थ्याचे परसेंटेज प्रिंट करा.
09.29 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09.32 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09.37 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09.42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.49 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09.53 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10.02 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10.06 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10.15 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.26 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
10.30 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
10.33 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana