OpenFOAM/C3/Turbulent-Flow-in-a-Lid-driven-Cavity/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या OpenFoam वापरून Turbulent flow in a Lid Driven Cavity च्या मॉडेलिंगवरील पाठात आपले स्वागत.
00:09 या पाठात जाणून घेणार आहोत: OpenFOAM मधे turbulent फ्लोची केस सोडवणे आणि Paraview मधे स्ट्रीमलाईन्स प्लॉट करणे.
00:20 या पाठासाठी मी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 12.04, ओपनफोम वर्जन 2.1.1, ParaView वर्जन 3.12.0 वापरत आहे.
00:33 या पाठाच्या सरावासाठी तुम्हाला Turbulence modelling चे प्राथमिक ज्ञान तसेच Lid driven cavity मधील फ्लोचा प्रॉब्लेम सोडवण्याची पध्दत माहित असावी.
00:43 नसल्यास वेबसाईटवरील संबंधित पाठ बघा.
00:50 हा प्रॉब्लेम 'Lid Driven Cavity' या प्रॉब्लेममधील जॉमेट्री आणि बाऊंडरी कंडिशन्सशी तंतोतंत जुळणारा आहे, जे आपण प्राथमिक स्तरांवरील पाठात पाहिले.
00:59 लक्षात घ्या, OpenFoam डिरेक्टरीमधे 'pisoFoam' सॉल्व्हर, ह्या प्रॉब्लेमसाठी आधीच सेटअप केलेला आहे.
01:07 Lid velocity U =1 m/s ही बाउंडरी कंडिशन आहे. आपण हे Reynolds number Re =10000 साठी सोडवणार आहोत.
01:20 pisoFoam नावाचा Newtonian fluidचा in-compressible, turbulent flow साठीचा ट्रान्झियंट सॉल्व्हर वापरत आहोत.
01:29 आता Ctrl+Atl+t ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडू.
01:37 टर्मिनल विंडोमधे "run" टाईप करून एंटर दाबा. आता cd space tutorials टाईप करून एंटर दाबा. आता cd space incompressible टाईप करून एंटर दाबा.
01:59 आता cd space pisoFoam टाईप करून एंटर दाबा. (लक्षात घ्या येथे F कॅपिटल आहे)
02:10 आता "ls" टाईप करून एंटर दाबा. यामधे "les" आणि "ras" हे दोन फोल्डर्स दिसतील.

आपला प्रॉब्लेमचा सेटअप "ras" फोल्डर म्हणजेच reynolds average stress मधे आहे.

02:26 आपल्या फोल्डरचे नाव cavity आहे. आता cd space ras टाईप करून एंटर दाबा. आता "ls" टाईप करून एंटर दाबा.
02:39 आपल्याला cavity फोल्डर दिसेल. मी हे क्लियर करून घेत आहे. आता cd space cavity टाईप करून एंटर दाबा. आता "ls" टाईप करून एंटर दाबा.
02:57 आपल्याला 0, constant आणि system हे तीन फोल्डर्स दिसतील. initial conditions नमूद केलेल्या फाईल्स '0' (zero) डिरेक्टरीमधे आहेत.
03:08 '0' डिरेक्टरी मधील फाईल्स पाहू.
03:12 त्यासाठी कमांड टर्मिनलमधे cd space 0 टाईप करून एंटर दाबा. आता "ls" टाईप करून एंटर दाबा.
03:22 आपल्याला epsilon, k, nut, nutilda, p, R आणि U या नावाच्या फाईल्स दिसतील.
03:30 जोपर्यंत इनलेट पॅरामीटर्स बदलत नाहीत तोपर्यंत या फाईल्स डिफॉल्ट म्हणून ठेवा. जर काही बदल करायचे असतील,
03:41 तर त्यांची गणना करण्यासाठी Simulating flow in a channel using OpenFoam हा पाठ पहा.
03:47 आता cd space dot dot (..) टाईप करून एंटर दाबा. मी हे क्लियर करून घेत आहे. आता constant फोल्डर उघडू. त्यासाठी cd space constant टाईप करून एंटर दाबा. आता "ls" टाईप करून एंटर दाबा.
04:08 यामधे polyMesh फोल्डर, ज्यामधे आपल्या केसची जॉमेट्री असलेली blockMeshDict आणि fluid properties या फाईल्स बघू शकतो.
04:19 या केसमधे transportProperties व्यतिरिक्त RASProperties आणि turbulenceProperties नावाच्या आणखी दोन फाईल्स बघू शकतो.
04:29 आता या दोन फाईल्स उघडू.
04:32 टर्मिनलमधे gedit (space) RASProperties टाईप करून एंटर दाबा. मी हे capture एरियामधे ड्रॅग करून घेत आहे.
04:49 खाली स्क्रॉल करा. RASProperties मधे या केसच्या Reynolds average stress model चा समावेश आहे जे kepsilon म्हणून ठेवण्यात आले आहे. हे बंद करा.
05:03 आता कमांड टर्मिनलवर gedit (space) turbulentproperties टाईप करून एंटर दाबा.
05:15 खाली स्क्रॉल करा. या केससाठी simulation Type मॉडेल म्हणून RASModel ठेवण्यात आले आहे. हे बंद करा.
05:25 आता transportProperties मॉडेल उघडू. त्यासाठी टर्मिनलवर gedit space transportProperties टाईप करून एंटर दाबा.
05:36 येथे Newtonian हे transportModel वापरत आहोत आणि Viscosity ची व्हॅल्यू 1 e चा वजा चौथा घात अशी ठेवली आहे. हे बंद करा.
05:46 या केसमधे आपण जॉमेट्रीत बदल करणार नाही. त्यामुळे polyMesh फोल्डरमधे जाण्याची आणि blockMeshDict फाईल बघण्याची आवश्यकता नाही.
05:54 ती अशीच ठेवता येऊ शकते. टर्मिनलवर cd space (dot dot) .. टाईप करून एंटर दाबा. आपण system फोल्डर आहे तसाच ठेवणार आहोत कारण त्यामधे कोणतेही बदल झालेले नाहीत.
06:08 आता सेटअप पूर्ण झाला आहे. आपण जॉमेट्री मेश करू शकतो. त्यासाठी टर्मिनल विंडोवर "blockMesh" टाईप करून एंटर दाबा. मेशिंग पूर्ण झाले आहे.
06:22 आता सॉल्व्हर कार्यान्वित करू शकतो. त्यासाठी टर्मिनलवर "pisoFoam" टाईप करून एंटर दाबा. टर्मिनल विंडोमधे iterations कार्यान्वित होताना बघू.
06:34 iterations थांबण्यासाठी काही वेळ लागू शकतो.
06:40 दिलेली वेळ संपल्यावर Iterations थांबतील. रिझल्टस बघण्यासाठी paraView विंडो उघडू. तसे करण्यासाठी टर्मिनलवर "paraFoam" टाईप करून एंटर दाबा. हे paraView विंडो उघडेल.
06:57 ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूमधे डावीकडे असलेल्या Apply वर क्लिक करा. आपण lid driven cavity ची जॉमेट्री बघू शकतो. सरफेस प्लॉटस हे कॉमन व्हिज्युअलायझेशन आहे.
07:09 कॉलममधे डिस्प्लेचा पर्याय बदलून Surface करा आणि ड्रॉपडाऊन मेनूमधे solid color हा पर्याय बदलून 'U' पर्याय निवडा. आपण वेगाची प्रारंभिक स्थिती पाहू शकतो.
07:22 आता paraView विंडोच्या वरच्या भागात VCR control दिसेल. play बटणावर क्लिक करा.

cavity च्या आतील फ्लुईडची हालचाल बघू शकतो.

07:34 paraView ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या वरील भागात डावीकडे असलेल्या color legend वर टॉगल करू शकता. त्यावर क्लिक करा. आपल्याला color legend दिसतील.
07:46 आता स्ट्रीम लाईन्स बघण्यासाठी paraView च्या वरच्या भागात मेनूबारमधे Filters खालील Common मधील Stream Tracers पर्यायावर क्लिक करा.
07:58 ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूच्या डाव्या बाजूला असलेल्या Apply वर क्लिक करा. lid driven cavity च्या मध्यभागी आपल्याला stream lines दिसतील.
08:10 आपण ओरिएंटेशन देखील बदलू शकतो ज्यामधे स्ट्रीम लाईन्स बघता येतील. त्यासाठी खाली स्क्रॉल करा. Seed Type हा पर्याय दिसेल.
08:21 उजवीकडे स्क्रॉल करा. पॉईंट सोर्स हा पर्याय बदलून लाईन सोर्स निवडा.
08:27 आपल्याला X, Y आणि Z अक्ष दिसतील. आपल्याला अक्षावर स्ट्रीम लाईन्स बघायच्या आहेत, त्यासाठी दिलेल्या पर्यायांतून एक अक्ष निवडा.
08:36 मी Y अक्ष निवडून Apply वर क्लिक करत आहे. आपण Y अक्षावर स्ट्रीम लाईन्स बघू शकतो.
08:44 अशाचप्रकारे आपण X अक्ष निवडून X अक्षावर स्ट्रीमलाईन्स प्लॉट करू शकतो. आता हे डिलिट करा.
08:53 plot over line च्या सहाय्याने x आणि y अक्षावर वेग देखील प्लॉट करता येतो. त्यासाठी Filters खालील Data Analysis मधील Plot over line पर्याय निवडा.
09:06 डेटा .(dot) csv फाईल म्हणून सेव्ह करा. फाईल मेनूतील Save Data वर क्लिक करा.
09:13 आपण हा डेटा LibreOffice spreadsheet मधे किंवा इतर कुठल्याही प्लॉटिंग सॉफ्टवेअरमधे प्लॉट करू शकतो. आता मी स्लाईडसवर परत जात आहे.
09:23 मिळालेले रिझल्टस Reynolds Number Re = 10000 साठीच्या Ghia et.al च्या रिझल्टसच्या सहाय्याने प्रमाणित करता येऊ शकतात.
09:32 हा पाठ पूर्ण झाला. यात आपण शिकलो ते थोडक्यात,
09:34 Lid Driven Cavity मधील Turbulent फ्लोबद्दल, तसेच paraView मधे स्ट्रीमलाईन्स प्लॉट करणे. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:44 असाईनमेंट म्हणून - cavity च्या grid size मधे बदल करा. व्हॅल्यूज बदलून त्या (100 100 1) करा आणि paraview मधे streamlines च्या सहाय्याने रिझल्टस बघा.
09:55 http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.

यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

10:05 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:

स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. अधिक माहितीसाठी कृपया लिहा: contact@spoken-tutorial.org

10:20 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:30 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे : http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
10:34 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana