OpenFOAM/C3/Simulating-Hagen-Poiseuille-flow/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:02 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या OpenFoam वापरून Simulating Hagen-Poiseuille flow वरील पाठात आपले स्वागत.
00:09 या पाठात जाणून घेणार आहोत:

3D cylindrical pipe तयार करणे व मेश करणे स्थिर pressure ratio असलेल्या सर्व बाऊंडरीजसाठी Hagen-Poiseuille फ्लो सिम्युलेट करणे आणि ParaView मधे velocity contour बघणे.

00:25 या पाठासाठी मी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 12.04, ओपनफोम वर्जन 2.1.1, ParaView वर्जन 3.12.0 वापरत आहे.
00:38 या पाठाच्या सरावासाठी आपल्याला Fluid Dynamics आणि Hagen-Poiseuille flow चे प्राथमिक ज्ञान असावे.
00:46 येथे ही Hagen-Poiseuille फ्लोची आकृती आहे. आपण पाईपची डायमेन्शन्स आणि बाऊंडरीज बघू शकतो.
00:52 येथे वापरलेल्या फ्लुईडची म्हणजेच पाण्याची Viscosity दिली आहे. इनलेटवरील दाब 20 Pascals आणि आऊटलेटवरील दाब 0 Pascals आहे.
01:04 हा in compressible फ्लो असल्यामुळे केवळ दाबातील फरक महत्वाचा आहे.
01:10 सूत्रे आणि ऍनॅलिटिकल सोल्युशन अशाप्रकारे आहेत:

Hagen-Poiseuille फ्लोसाठी Pressure drop along the pipe = P1 वजा P2 = 32 mew U ऍव्हरेज L भागिले D चा वर्ग.

01:25 आधीच्या आकृतीतील व्हॅल्यूज भरून आपल्याला U ऍव्हरेजची 0.208 मीटर्स प्रति सेकंद ही व्हॅल्यू मिळाली आहे. अधिकतम वेग हा सरासरी वेगाच्या दुप्पट आहे. म्हणजेच तो 0.416 मीटर्स प्रति सेकंद एवढा मिळेल.
01:44 फ्लोचा Reynolds नंबर बरोबर U ऍव्हरेज गुणिले D भागिले nu ज्याची व्हॅल्यू 2080 मिळेल. त्यामुळे हा transient फ्लो आहे.
01:56 येथे IcoFOAM हा सॉल्व्हर वापरणार आहोत.
02:01 हा Transient सॉल्व्हर आहे. ह्याचा उपयोग न्यूटोनियन फ्लुईडसच्या in-compressible, laminar फ्लोसाठी केला जातो.
02:08 वापरलेल्या प्रेशर बाऊंडरी कंडिशन्स अशाप्रकारे आहेत-

इनलेटवर: fixed Pressure, आउटलेटवर: fixed Pressure, वॉल्सवर: Zero Gradient.

02:19 वापरलेल्या व्हेलॉसिटी बाऊंडरी कंडिशन्स अशाप्रकारे आहेत -

इनलेटवर: pressure Inlet Velocity, आउटलेटवर: zero Gradient वॉल्सवर: fixed Value.

02:28 ही केस कार्यान्वित करण्यासाठी प्रथम 'icoFoam' फोल्डरमधे केस डिरेक्टरी बनवा आणि त्याला एक नाव द्या. मी त्याला '3dpipe' असे नाव देत आहे.
02:41 या फोल्डरचे स्थान जाणून घेण्यासाठी, Lid driven cavity वरील पाठ बघा. lid driven cavity या प्रॉब्लेममधील '0' (zero), 'constant' आणि 'system' हे फोल्डर्स नवीन बनवलेल्या फोल्डर्समधे कॉपी करा.
02:54 '3dpipe' फोल्डरमधे जाऊ.
02:58 मी हे फोल्डर्स आधीच माझ्या 3dpipe फोल्डरमधे कॉपी केले आहेत. तसेच त्यातील फाईल्समधे बदल केले आहेत.
03:05 आता '0' फोल्डरमधे जाऊन 'P' फाईल उघडा. ही प्रेशर बाऊंडरी कंडिशन फाईल आहे.
03:14 लक्षात घ्या ही डायमेन्शन्स मीटर वर्ग प्रति सेकंद वर्गमधे (m2/s2) आहेत.
03:20 म्हणून पास्कल्समधील दाबाच्या किंमतीला घनतेने म्हणजेच 1000 Kg/m3 (Kg per meter cube) ने भागून लिहिली आहे.
03:29 ही फाईल बंद करू.
03:32 व्हेलॉसिटी बाऊंडरी कंडिशन्स असलेली फाईल दिसेल. ती फाईल उघडू. आपण इनलेट, आऊटलेट आणि फिक्स्ड वॉल्ससाठीची व्हेलॉसिटी बाऊंडरी कंडिशन्स बघू शकतो.

.

03:43 ही फाईल बंद करा आणि '0' फोल्डरमधून बाहेर या.
03:48 ब्लॉकिंग स्ट्रॅटेजी बघण्यासाठी स्लाईडसवर परत जाऊ.
03:54 पाईपची 3D जॉमेट्री तयार करण्यासाठी मी 2D वर्तुळाकार जॉमेट्री तयार केली आहे आणि z डायरेक्शननी त्याची लांबी वाढवली आहे.
04:03 नंबरिंग पॅटर्न येथे दाखवल्याप्रमाणे आहे. आपण मेशची डायमेन्शन्स देखील पाहू शकतो.
04:11 blockMeshDict फाईल बघण्यासाठी मी स्लाईडस मिनीमाईज करून घेत आहे.
04:16 'constant' फोल्डरमधे जाऊन नंतर 'polyMesh' फोल्डरमधे जा. आता 'blockMeshDict' फाईल उघडा. आपल्याला इनलेट व आऊटलेटचे vertices, logs, edges आणि boundaries तसेच फिक्स्ड वॉल्स बघायला मिळतील.
04:37 ही फाईल बंद करा आणि polyMesh फोल्डरमधून बाहेर या.
04:42 आपल्याला 'transportProperties' ही फाईल दिसेल. ती उघडू. लक्षात घ्या येथे dynamic viscosity ची व्हॅल्यू 1 e-06 आहे.
04:53 ही फाईल बंद करा आणि 'constant' फोल्डरमधून बाहेर या.
04:59 आता 'system' फोल्डरमधे जाऊ आणि 'controlDict' फाईल पाहू.
05:07 18 सेकंदांनी हे सोल्युशन converges झाले. म्हणून शेवटची time step 19 ठेवली आहे. time step 1e-03 ला सेट केली आहे.
05:20 ही फाईल बंद करा. 'Home' फोल्डरमधून बाहेर या.
05:26 आता ही केस कार्यान्वित करण्यासाठी प्रथम टर्मिनलच्या माध्यमातून '3dpipe' फोल्डरमधे जाऊ. टर्मिनल उघडण्यासाठी control, alt आणि t ही बटणे एकत्रितपणे दाबा.
05:40 "run" टाईप करून एंटर दाबा.
05:44 cd (space) tutorials टाईप करून एंटर दाबा.
05:50 cd (space) incompressible टाईप करून एंटर दाबा.
05:55 cd (space) icoFoam टाईप करून एंटर दाबा.
05:59 cd (space) 3Dpipe टाईप करून एंटर दाबा.
06:05 आता मेश तयार करण्यासाठी "blockMesh" टाईप करून एंटर दाबा. मेशिंग पूर्ण झाले आहे.
06:16 iterations सुरू करण्यासाठी "icoFoam" टाईप करून एंटर दाबा. iterations कार्यान्वित होताना दिसतील.
06:27 Iterations पूर्ण झाली आहेत. iterations संपल्यावर रिझल्टस पोस्टप्रोसेस करण्यासाठी "paraFoam" टाईप करून एंटर दाबा. हे "paraview" उघडेल. हे " paraview" आहे.
06:41 जॉमेट्री बघण्यासाठी ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूच्या डावीकडे असलेल्या Apply बटणावर क्लिक करा.
06:49 अधिक चांगल्या व्ह्यूसाठी जॉमेट्री रोटेट करून घेऊ.
06:52 ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोलवर क्लिक करून ड्रॉपडाऊन मेनूमधे U पर्याय निवडा.
07:01 वरच्या भागात VCR toolbar मधे Play वर क्लिक करा.
07:06 ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूमधे Display वर जा आणि Rescale to data range वर क्लिक करा.
07:16 अर्धा भाग बघण्यासाठी common नावाच्या टूलबारवर जाऊन Clips वर क्लिक करा. नंतर ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूमधे properties वर क्लिक करून Apply वर क्लिक करा. हे झूम करून घेऊ.
07:35 आता color legend उघडू.
07:38 अधिकतम वेग हा ख-या अधिकतम वेगाच्या म्हणजेच 0.4 मीटर्स प्रति सेकंदच्या जवळपास आहे.
07:46 ग्राफ बघण्यासाठी वरच्या भागातील Filters मेनूमधील Data Analysis खालील Plot Over Line पर्यायावर क्लिक करा.
07:56 Y अक्षावर क्लिक करून Apply वर क्लिक करा.
08:00 आपण Hagen-Poiseuille flow ची पॅराबोलिक प्रोफाईल बघू शकतो.
08:05 graph बंद करून ParaView बंद करा आणि स्लाईडसवर परत जा.
08:12 या पाठात आपण शिकलो:

3D pipe जॉमेट्री तयार करणे व मेश करणे स्थिर pressure ratio असलेल्या सर्व बाऊंडरीजसाठी Hagen-Poiseuille फ्लो सिम्युलेट करणे आणि Parafoam मधे velocity रिझल्टस बघणे.

08:30 असाईनमेंट म्हणून -

लांबी आणि व्यास यासारखे जॉमेट्री पॅरामीटर्स बदला. संबंधित दाबाचे गुणोत्तर बदला आणि वेगळी viscosity असलेली फ्लुईड वापरा.

08:43 http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.

यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

08:54 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:

स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. अधिक माहितीसाठी कृपया लिहा: contact@spoken-tutorial.org

09:11 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे: spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana