OpenFOAM/C3/Introduction-to-SnappyHexMesh/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या OpenFOAM वापरून Introduction to snappyHexMesh या पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत-

snappyHexMesh मधील पॅरामीटर्स OpenFOAM मधे मेश तयार करणे.

00:14 यासाठी युजरकडे case डिरेक्टरीच्या constant/trisurface या सब डिरेक्टरीमधे STL फॉरमॅटमधील सरफेस डेटा फाईल्स असणे गरजेचे आहे.

hex मेश असलेले डोमेन तसेच case डिरेक्टरीच्या system या सबडिरेक्टरीमधे snappyHexMeshDict ही डिक्शनरी असणे गरजेचे आहे.

00:35 या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 12.04

OpenFOAM वर्जन 2.2.2 ParaView वर्जन 3.12.0 वापरत आहे.

00:50 snappyHexMesh या युटिलिटीच्या सहाय्याने मेशची कृती शिकू.
00:55 याच्या स्टेप्स अशाप्रकारे आहेत-

स्टेप 1 : blockMesh युटिलिटीच्या सहाय्याने base mesh तयार करणे स्टेप 2 : base mesh रिफाईन करणे स्टेप 3 : न वापरलेल्या cells काढून टाकणे स्टेप 4 : सरफेसवर Snap mesh करणे स्टेप 5 : layers समाविष्ट करणे.

01:18 आता आपण टर्मिनल उघडून येथे दाखवल्याप्रमाणे flange चा पाथ येथे देणार आहोत. cd space OpenFOAM-2.2.2/tutorials/mesh/snappyHexMesh/flange टाईप करून एंटर दाबा.
01:40 "ls" टाईप करून एंटर दाबा. येथे constant आणि system हे दोन फोल्डर्स आहेत.
01:50 cd space system टाईप करून एंटर दाबा.
01:55 ls टाईप करून एंटर दाबा. आपल्याला snappyHexMeshDict फाईल दिसेल.
02:04 फाईलमधील घटक बघण्यासाठी -gedit space snappyHexMeshDict टाईप करून एंटर दाबा. (लक्षात घ्या येथे H, M आणि D कॅपिटलमधे आहेत.)
02:19 हे snappyHexMeshDict फाईल उघडेल.
02:23 snappyHexMeshDict फाईलमधे सर्व सूचनांचा समावेश असून संपूर्ण प्रक्रिया या फाईलभोवती फिरते.
02:32 snappyHexMeshDict च्या पहिल्या काही rows वापरून प्रक्रियेचे भाग ऍक्टिव्हेट किंवा स्किप करू शकतो.
02:40 जॉमेट्री विभागात snappy प्रक्रियेत सहभागी होणारी सर्व ऍक्टिव्ह क्षेत्र निश्चित करता येतात.
02:50 सेल स्प्लिटींगची प्रक्रिया नियंत्रित करणा-या पॅरामीटर्सची माहिती castellatedMeshControls विभागात दिली आहे.
02:58 खाली सूचीबध्द केलेले पॅरामीटर्स snappyHexMeshDict फाईलमधे चांगल्या पध्दतीने स्पष्ट केले आहेत. nCellsBetweenLevels हे प्रत्येक रिफाईनमेंट लेव्हलच्या सेल्सची संख्या निश्चित करते.
03:12 ती संख्या जितकी जास्त मेश अधिक ग्रॅज्युअल असेल.
03:17 Explicit feature edge refinement या विभागात जॉमेट्रीच्या फीचर एजेससाठी विशिष्ट रिफाईनमेंट लेव्हल सेट करता येते. surfaceFeatureExtract ह्या युटिलिटीच्या सहाय्याने ".eMesh" फाईल मिळवता येते.
03:34 surface-based refinement विभागात आपण जॉमेट्री फाईलमधे निश्चित केलेल्या सर्व सरफेसेसच्या रिफाईनमेंट लेव्हल्स सेट करू शकतो.
03:45 मेश सिलेक्शन हे अतिशय महत्वाचे पॅरामीटर आहे. निवडलेला बिंदू हा जॉमेट्री फाईलमधे वर्णन केलेल्या सरफेसच्या आतमधील असल्यास snappyHexMesh इंटरनल मेश तयार करेल.
03:59 अन्यथा बाहेरील भाग (म्हणजेच ब्लॉकमेशच्या आतील भाग) मेश केला जाईल.
04:04 पुढील स्टेपमधे सरफेस जॉमेट्रीवर cell शिरोबिंदू स्थानांतरित करण्याचा समावेश होतो.
04:12 snapping ची प्रक्रिया या चार पॅरामीटर्स द्वारे केली जाते:

nSmoothPatch tolerance nSolveIter nRelaxIter.

04:23 हे पॅरामीटर्स mesh आणि STL सरफेस यामधील iterations आणि tolerance यांची संख्या नियंत्रित करतात.
04:32 nSmoothPatch हा पर्याय एक्स्टिरियर (म्हणजेच बाऊंडरी वॉल) किती वेळा iterate केली गेली पाहिजे याची संख्या निर्देशित करतो. iterations ची संख्या अधिक असल्यास मेश स्मूथ दिसेल.
04:46 Tolerance हा पर्याय स्नॅप केला जाणारा बिंदू किती अंतरावर असेल ते अंतर सांगतो. tolerance मधे हे अंतर अंकात सांगितले जाते.
04:58 nSolveIter हा पर्याय snappyHexMesh चा snapping हा भाग किती वेळा कार्यान्वित झाला पाहिजे याची संख्या निर्देशित करतो.
05:07 nRelaxIter हा पर्याय रिलॅक्सिंग स्क्रिप्ट किती वेळा कार्यान्वित झाली पाहिजे याची संख्या निर्देशित करतो ज्यात खराब मेश पॉईंटस काढून टाकतात.
05:19 mesh layer addition ही प्रक्रिया विद्यमान मेश, बाऊंडरीकडून आक्रसून cells चा लेयर समाविष्ट करते.
05:27 लेयर्स आणि सरफेसेस ज्यावर जोडले जाणार आहेत त्यांची डायमेन्शन्स पॅरामीटर्सचा पहिला गट निश्चित करतो.
05:36 RelativeSizes पर्याय (म्हणजे true किंवा false आहे) तो पुढे दिले गेलेले पॅरामीटर्स वाचण्याची पध्दत बदलतो.

true: पुढील पॅरामीटर्स हे पॅरामीटर्स म्हणून लेयर्सची डायमेन्शन्स निश्चित करतात. false: पुढील पॅरामीटर्स लेयर्सची डायमेन्शन्स थेट निश्चित करतात.

05:55 layers पर्यायात लेयर्सची संख्या आणि ज्यावर लेयर्स जोडले जातील त्या पॅचेसची संख्या निश्चित करू शकतो. हा जॉमेट्री सब-मेनूमधील STL (बोल्ड टेक्स्ट) पॅच असला पाहिजे आणि युजरने निश्चित केलेले क्षेत्र नव्हे.
06:10 ExpansionRatio पॅरामीटर्स लेयर्सचा ग्रोथ फॅक्टर सेट करतात. (म्हणजेच दोन पाठोपाठच्या लेयर्समधील रेशो)
06:19 finalLayerThickness पॅरामीटर शेवटच्या लेयरची जाडी सेट करतो. minThickness पॅरामीटर लेयरच्या जाडीची किमान मर्यादा सेट करतो.
06:34 Advanced settings हा पॅरामीटर्सचा दुसरा गट आहे. यामधे अधिक विशिष्ट कंट्रोलचा समावेश आहे जे लेयर तयार करण्यासाठी मदत करतात.
06:45 FeatureAngle हा असा कोन आहे की ज्यापेक्षा जास्त सरफेस वाढवता येणार नाही.
06:52 nRelaxIter हा पर्याय मेश किती वेळा रिलॅक्सिंग स्क्रिप्ट कार्यान्वित करेल याची संख्या निर्देशित करतो.
07:00 maxFaceThicknessRatio हा पर्याय aspect ratio ची कमाल मर्यादा मूल्य निर्देशित करतो.
07:10 meshQualityControls पॅरामीटर snap आणि add-layers पार्टसमधे मेश तयार करण्यासाठी किमान मर्यादा सेट करतो.
07:18 99% केसेसमधे डिफॉल्ट व्हॅल्यूज ठेवणे उत्तम. परंतु काहीवेळा सक्तीने मेश बनवण्यासाठी एक किंवा अधिक कंट्रोल्स डिऍक्टिव्हेट करू शकता.
07:30 हे snappyHexMeshDict मधील वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. snappyHexMesh युटिलिटीच्या सहाय्याने मेश जनरेट करण्यासाठी हे पॅरामीटर्स महत्वपूर्ण आहेत.
07:40 थोडक्यात,
07:42 या पाठात OpenFoam मधे मेश बनवण्यासाठी snappyHexMesh मधील विविध पॅरामीटर्स जाणून घेतले.
07:50 http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.

यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

08:03 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:

स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. अधिक माहितीसाठी कृपया लिहा: contact@spoken-tutorial.org

08:21 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे:
http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
08:37 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana