OpenFOAM/C2/Supersonic-flow-over-a-wedge/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या openFoam वापरून Supersonic flow over a wedge वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात आपण जाणून घेणार आहोत- * सुपरसॉनिक फ्लो ओव्हर ए वेजचा काँप्रेसिबल फ्लो प्रॉब्लेम सोडवणे तसेच paraView मधे रिझल्टस पोस्ट प्रोसेस करणे.
00:18 या पाठासाठी मी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 10.04, ओपनफोम वर्जन 2.1.0, ParaView वर्जन 3.12.0 वापरत आहे.
00:30 या पाठाच्या सरावासाठी तुम्हाला काँप्रेसिबल फ्लोज आणि गॅस डायनॅमिक्सचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:38 आता OpenFOAM वापरून सुपरसॉनिक फ्लो ओव्हर ए वेज सॉल्व्ह करून तयार झालेले शॉक स्ट्रक्चर paraview द्वारे पाहू.
00:47 या प्रॉब्लेममधे 15 डिग्रीजचा semi-angle असलेली वेज एकसमान सुपरसॉनिक फ्लोमधे ठेवली आहे.
00:55 इनलेट व्हेलॉसिटी 5 मीटर्स प्रति सेकंद आहे.
01:00 बाऊंडरी कंडिशन्स आकृतीत दाखवल्याप्रमाणे सेट केल्या आहेत.
01:05 येथे मी rhoCentralFoam हा सॉल्व्हर वापरणार आहे.
01:10 हे Density वर आधारित काँप्रेसिबल फ्लो सॉल्व्हर आहे. हे central- upwind स्कीम्स ऑफ Kurganov अँड Tadmor वर आधारित आहे.
01:21 कमांड टर्मिनल उघडा. त्यासाठी तुमच्या की बोर्डवरील ctrl +alt+ t ही बटणे एकत्रितपणे दाबा.
01:28 कमांड टर्मिनलमधे सुपरसॉनिक फ्लो ओव्हर ए वेज साठीचा पाथ टाईप करा.
01:35 टर्मिनलमधे "run" टाईप करून एंटर दाबा.
01:40 cd space tutorials टाईप करून एंटर दाबा.cd space compressible टाईप करून एंटर दाबा.cd space rhoCentralFoam टाईप करून एंटर दाबा.
02:02 cd space wedge15Ma5
02:13 हे rhoCentralFoam मधील सुपरसॉनिक फ्लो ओव्हर द वेजच्या फोल्डरचे नाव आहे. एंटर दाबा.
02:21 आता "ls" टाईप करून एंटर दाबा.
02:24 आपल्याला 0, constant आणि system हे फोल्डर्स दिसतील.
02:29 आता blockMeshDict फाईल उघडा. त्यासाठी,
02:34 cd space constant टाईप करून एंटर दाबा.
02:41 cd space polyMesh टाईप करून एंटर दाबा. लक्षात घ्या, येथे 'M' कॅपिटल आहे.
02:49 आता "ls" टाईप करून एंटर दाबा. आपल्याला blockMeshDict ही फाईल दिसेल.
02:54 blockMeshDict फाईल बघण्यासाठी टाईप करा gedit space blockMeshDict. एंटर दाबा. लक्षात घ्या येथे 'M' आणि 'D' कॅपिटल आहेत.
03:08 मी हे capture area मधे ड्रॅग करून खाली स्क्रॉल करत आहे.
03:14 यामधे आपल्याला वेजसाठी को ऑर्डिनेटस काढणे गरजेचे आहे.
03:20 याचे मोजमाप आधीच करून ते प्रॉब्लेममधे सेट केले आहे.
03:23 उर्वरित डेटा तसाच राहिल.
03:29 बाऊंडरी पॅचेसमधे, बाऊंड्रीज आकृतीत दाखवल्याप्रमाणे सेट केल्या आहेत.
03:33 blockMeshDict फाईल बंद करा.
03:36 कमांड टर्मिनलमधे cd space ..(dot dot) असे दोन वेळा टाईप करून वेज फोल्डरवर परत जा.
03:45 आता 0 (zero) फोल्डर उघडू.
03:51 त्यासाठी cd space 0 टाईप करून एंटर दाबा.
03:58 "ls" टाईप करून एंटर दाबा.
04:02 यामधे दाब, वेग आणि तापमान यांच्या प्रारंभिक बाऊंडरी कंडिशन्सचा समावेश आहे.
04:10 cd space .. (dot dot) टाईप करून एंटर दाबा. आता जॉमेट्री मेश करणे गरजेचे आहे.
04:19 त्यासाठी कमांड टर्मिनलवर "blockMesh" टाईप करून एंटर दाबा. मेशिंग पूर्ण झाले आहे.
04:32 आता ही जॉमेट्री बघण्यासाठी कमांड टर्मिनलवर "paraFoam" टाईप करून एंटर दाबा. हे paraview विंडोमधे उघडेल.
04:45 ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूच्या डावीकडील APPLY बटणावर क्लिक करा.
04:53 यामधे आपण जॉमेट्री बघू शकतो. ज्यामधे आयताकृती सेक्शन अपस्ट्रीम बदलून वेज डाऊनस्ट्रीम झाला आहे. paraview विंडो बंद करा.
05:05 आता rhoCentralFoam सॉल्व्हर कार्यान्वित करू.
05:11 त्यासाठी कमांड टर्मिनलमधे "rhoCentralFoam" टाईप करून एंटर दाबा.
05:20 टर्मिनल विंडोमधे iterations कार्यान्वित होताना बघू शकतो.
05:24 व्हॅल्यू कॉन्व्हर्ज झाल्यावर अथवा दिलेली वेळ संपल्यावर Iterations थांबतील. आता सॉल्व्हिंग पूर्ण झाले आहे.
05:34 हे रिझल्ट बघण्यासाठी paraview विंडो पुन्हा एकदा उघडू.
05:40 कमांड टर्मिनलमधे “paraFoam” टाईप करून एंटर दाबा.
05:49 पुन्हा ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूच्या डावीकडील APPLY बटणावर क्लिक करा.
05:56 डावीकडे वरती ऍक्टीव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूमधे solid color हा पर्याय दाखवणारा ड्रॉपडाऊन दिसेल. आता त्यावर क्लिक करून solid color हा पर्याय बदलून कॅपिटल 'U' निवडा.
06:14 आता color legend ऑन करण्यासाठी डाव्या बाजूला वरती असलेल्या ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूवर क्लिक करून color legend ऑन करा. त्यावर क्लिक करा.
06:28 Paraview विंडोच्या वरील भागात VCR कंट्रोल आहेत. PLAY वर क्लिक करा.
06:37 आपण U वेगाचे अंतिम रिझल्टस बघू शकतो.
06:42 डावीकडे असलेल्या ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनू मधील प्रॉपर्टीजखाली स्क्रॉल करा. आता प्रॉपर्टीज शेजारील Display वर क्लिक करा.
06:56 खाली स्क्रॉल करून Rescale to Size वर क्लिक करा. आपण वेगाच्या परिमाणाची अंतिम व्हॅल्यू बघू शकतो.
07:05 तसेच आपण दाब सिलेक्ट करू शकतो. आपल्याला दाबाचा अंतिम रिझल्ट बघायला मिळेल. आता paraView विंडो बंद करा.
07:16 तसेच आपण फ्लोचा Mach नंबर देखील मिळवू शकतो. त्यासाठी Openfoam युटिलिटीचा उपयोग करून कमांड टर्मिनलवर "Mach" टाईप करू शकतो.
07:26 Mach टाईप करा.
07:29 येथे 'M' कॅपिटल आहे. एंटर दाबा. Mach नंबरची गणना प्रत्येक टाईम स्टेपसाठी केली जात असल्याचे दिसेल.
07:36 पुन्हा कमांड टर्मिनलवर "paraFoam" टाईप करून एंटर दाबा. paraview विंडो उघडा.
07:48 APPLY वर क्लिक करा. खाली स्क्रॉल करून व्हॉल्युम फिल्डसमधील 'Ma' चा चेकबॉक्स निवडा आणि पुन्हा APPLY वर क्लिक करा.
08:04 ऍक्टीव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या वरती Solid Color वर क्लिक करून ड्रॉपडाऊनमधून 'Ma' पर्याय निवडा.
08:11 VCR कंट्रोल मेनूमधे पुन्हा PLAY वर क्लिक करा आणि color legend ऑन करा.
08:21 आपण color legend मधील Mach नंबर आणि संबंधित रंग बघू शकतो.
08:29 आपल्याला दिसेल की, जेव्हा वेज सुपरसॉनिक फ्लोमधे ठेवली जाते, त्यामुळे shock तयार होऊन फ्लोच्या प्रॉपर्टीज जसे की, तापमान, दाब आणि घनता यात मोठे बदल होतात.
08:43 आता स्लाईडसवर परत जाऊ. सोडवलेल्या पाठाचे रिझल्टस John D Anderson च्या Aerodynamics वरील प्राथमिक पुस्तकांमधील नेमक्या उत्तरांबरोबर प्रमाणित करता येतात.
08:55 या पाठात आपण शिकलो: वेजसाठी * Solving a compressible flow problem Velocity and pressure contour आणि Mach number काढण्यासाठी OpenFOAM utility.
09:06 असाईनमेंट म्हणून फ्लोचे shock characteristic बघण्यासाठी वेज अँगल 10 ° ते 15 ° मधे बदला.
09:14 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:21 यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
09:28 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम: स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09:41 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे: http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
09:56 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana