Moodle-Learning-Management-System/C2/Quiz-in-Moodle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Moodle मध्ये Quiz वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत:

Moodleमध्ये Quiz कसे तयार करणे आणि Quiz मधील Question bank च्या प्रश्नांचा उपयोग कसा करणे.

00:16 ह्या ट्युटोरिअलच्या रेकॉर्डिंगसाठी वापरले आहे:

Ubuntu Linux OS 16.04 XAMPP 5.6.30 माध्यमातून प्राप्तApache, MariaDB आणि PHP Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राऊझर तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता. .

00:40 तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे, कारण यामुळे काही डिसप्ले विसंगती उद्भवतात.
00:48 हे ट्युटोरिअल गृहीत धरते की,

तुमच्या site administrator ने तुमची teacher म्हणून नोंदणी केली आहे आणि तुम्हांला किमान एक कोर्स असाईन केला आहे.

00:59 हे देखील मानले जाते की, तुम्ही तुमच्या course साठी काही प्रश्न question bank ला जोडले आहेत. नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल्स पहा.
01:12 ब्राऊझरवर जा आणि तुमच्या Moodle site वर लॉगिन करा.
01:18 डाव्या navigation menu मध्ये Calculus course वर क्लिक करा.
01:22 वरील उजवीकडे, gear icon वर क्लिक करा आणि नंतर Turn Editing On वर क्लिक करा.
01:29 Basic Calculus सेक्शनच्या तळाशी उजवीकडे Add an activity or resource वर क्लिक करा.
01:37 खाली स्क्रोल करा आणि activity chooser मध्ये Quiz निवडा.
01:42 activity chooser च्या तळाशी Add बटणावर क्लिक करा.
01:47 Name फिल्डमध्ये, मी टाईप करेन Quiz 1 - Evolutes and involutes.
01:54 नंतर Description field मध्ये, दर्शविल्याप्रमाणे मी टेक्स्ट टाईप करेन.
02:00 Display description on course page चेकबॉक्स चेक करा. यानंतर, आपण Timing सेक्शन विस्तृत करू.
02:09 आणि Open the quiz, Close the quiz आणि Time limit साठी चेक-बॉक्सेस सक्षम करा.
02:17 हे दिलेल्या तारखांवर आणि विशिष्ट कालावधीसाठी क्विझ उघडेल आणि बंद करेल.
02:25 तुमच्या गरजेनुसार तारीख आणि वेळ निश्चित करा. येथे प्रदर्शित केल्याप्रमाणे मी सेट केले आहे.
02:32 मग मी वेळेची मर्यादा 10 मिनिटांपर्यंत सेट करेन.
02:37 When time expires field कडे 3 पर्याय आहेत. तुमच्या quiz साठी योग्य असलेले एक निवडा.
02:47 मी निवडेन Open attempts are submitted automatically. म्हणून जर विद्यार्थी सबमिट करण्यास अपयशी ठरला तर quiz 10 मिनिटांनंतर आपोआप सबमिट होईल.
03:01 आता Grade सेक्शन विस्तृत करू.
03:05 Grade to pass field मध्ये मी passing gradeम्हणून 2 टाईप करेन. ह्याचा अर्थ हा quiz उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला कमीतकमी 2 गुणांची आवश्यकता आहे.
03:18 Attempts allowed फिल्डमध्ये, मी 1 निवडेन. जर आपण उच्चसंख्या निवडली, तर विद्यार्थी अनेक वेळा त्याच क्विझचा वापर करण्यास सक्षम असेल.
03:32 लक्षात घ्या की,Grading method ड्रॉपडाऊन अक्षम आहे.
03:37 जेव्हा एकापेक्षा जास्त प्रयत्नांची अनुमती असते तेव्हा हे केवळ एकदाच सक्षम केले जाते. मग शिक्षक ग्रेडसाठी कोणता अटेम करावा ह्याची निवड करू शकतो.
03:47 आता Layout सेक्शन विस्तृत करा. येथे quizचे लेआऊट निर्दिष्ट करण्यासाठी पर्याय आहेत.
03:56 डीफॉल्टपणे, New page field ड्रॉपडाऊनमध्ये, Every questionपर्याय निवडला आहे.
04:04 सर्व पर्याय पाहण्यासाठी New page field ड्रॉपडाऊनवर क्लिक करा.
04:09 मी Every 2 questions पर्याय निवडेन. तुम्ही तुमच्या निवडीनुसार कोणताही पर्याय निवडू शकता.
04:17 पुढे आपण Question behaviour सेक्शन विस्तृत करू.
04:22 Shuffle within questionsड्रॉपडाऊनसाठी Yes निवडा.
04:27 असे केल्याने, प्रत्येक प्रश्नातील सर्व पर्याय शफल होतील.
04:33 तर, प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या quizमध्ये प्रश्नांची आणि पर्यायांची भिन्न व्यवस्था दिसेल.
04:40 How questions behave ड्रॉपडाऊनसाठी हेल्प आयकॉनवर क्लिक करा आणि तपशील वाचा.
04:47 मी येथे Deferred feedback पर्याय राहू देते. म्हणूनच माझे विद्यार्थी त्यांचा अटेम सबमिट केल्यानंतरच अभिप्राय पाहतील.
04:57 पुढे, विस्तृत करण्यासाठी Overall feedback सेक्शनवर क्लिक करा.
05:02 Overall feedback क्विझ सबमिट केल्यानंतर आणि स्वयं-श्रेणीनंतर विद्यार्थ्यांना टेक्स्ट दर्शविला आहे.
05:10 विद्यार्थ्याने मिळविलेल्या grade च्या आधारावर शिक्षक भिन्न feedback देऊ शकतात.
05:17 grade boundary 100%साठी मी Excellent performance अभिप्राय म्हणून टाईप करेन.
05:25 50% आणि 100% दरम्यान स्कोर करणाऱ्या विद्यार्थ्यांना "Excellent performance" मेसेज दिसेल.
05:33 आणि grade boundary 50%. साठी अभिप्राय म्हणून You need to work harder
05:40 0%आणि 49.99% दरम्यान स्कोर करणाऱ्या विद्यार्थ्यांना "You need to work harder" दिसेल.
05:49 आता, खाली स्क्रोल करा आणि Activity completion सेक्शनवर क्लिक करा.
05:54 Completion Tracking fieldसाठी ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. Show activity as complete when conditions are met पर्याय सिलेक्ट करा.
06:05 Require grade आणि Require passing grade साठी चेकबॉक्सेस चेक करा.
06:13 शेवटी, पृष्ठाच्या तळाशी Save and display बटणावर क्लिक करा.
06:20 आपण दिलेल्याquiz शीर्षकासह नवीन पृष्ठावर आलो आहोत. वाचा आणि सत्यापित करा की पूर्वी दिलेले सर्व तपशील येथे प्रदर्शित केले आहेत.
06:31 येथे आपण मुख्यतः प्रदर्शित केलेला मेसेज पाहू शकता - No questions have been added yet.
06:38 quiz ला प्रश्न जोडण्यासाठी, Edit quiz बटणावर क्लिक करा.
06:44 वरील उजवीकडे, Maximum grade म्हणून 4 टाईप करा.
06:50 quiz सेक्शनच्या डावीकडील पेन्सिल आयकॉन आपल्याला ह्या quiz चे शीर्षक एडिट करण्यास अनुमती देतो.

हे तेव्हा उपयुक्त आहे जेव्हा quiz कडे एकाधिक सेक्शन्स आहेत.

07:03 मी Section 1 लिहिते आणि Enter दाबते.
07:08 मग उजवीकडे Shuffle चेकबॉक्स चेक करा. हे सुनिश्चित करते की प्रत्येक वेळी quiz अटेम केल्यावर प्रश्न शफल होतात.
07:20 Shuffle चेकबॉक्स खाली Add लिंकवर क्लिक करा.
07:25 येथे 3 पर्याय आहेत:

a new question from question bank a random question

07:34 ज्याप्रमाणे नावावरून कळते, a new question लिंक आपल्याला नवीन प्रश्न जोडण्यास सक्षम करते. तर मी हा पर्याय निवडणार नाही.
07:44 from question bank लिंकवर क्लिक करा.
07:48 एक पॉप-अप विंडो उघडते. हा पर्याय तेव्हा वापरला जातो जेव्हा तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रश्नांचा संच निश्चित करू इच्छिता.
07:58 निवडलेली category त्या course साठी डिफॉल्ट category असेल.
08:04 पर्यायAlso show questions from subcategories डीफॉल्टपणे निवडला आहे.
08:12 Also show old questions मागील quizzes मध्ये वापरलेले प्रश्न दर्शवितो.
08:19 तुम्ही जोडू इच्छित असलेले प्रश्न तुम्ही निवडू शकता, जसे मी आता करत आहे. आणि नंतर तळाशी Add selected questions to the quizबटणावर क्लिक करा.
08:32 तथापि, मी ते करणार नाही. वरील उजवीकडे X आयकॉनवर क्लिक करून मी ही विंडो बंद करेन.
08:40 पुन्हा एकदा Shuffle खालील Add लिंकवर क्लिक करा. a random question लिंकवर क्लिक करा.

दुसरी पॉप-अप विंडो उघडली.

08:51 या पर्यायासह, प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रश्नांचा संच पाहिल. आणि quiz अटेम करताना त्यांना प्रश्नांची चर्चा करणे कठीण होईल.
09:03 Random question from an existing categoryअंतर्गत, मी Evolutes म्हणून category निवडेन.
09:11 Number of random questions मध्ये, मी 2 निवडेन.
09:16 त्यानंतर ह्या ड्रॉपडाऊन खाली Add random question वर क्लिक करा.
09:23 Evolutes category मधून, 2 यादृच्छिक प्रश्न quizमध्ये जोडले गेले आहेत.
09:29 एकदा पुन्हा तळाशी उजवीकडे Add लिंकवर क्लिक करा.
09:34 a random question' लिंकवर क्लिक करा. Involutes म्हणून category आणि Number of random questions म्हणून 2 निवडा.
09:44 मग Add random question बटणावर क्लिक करा.
09:48 quiz ला आणखी 2 प्रश्न जोडले गेले आहेत, दोन्ही Involutes मधून आहेत.
09:55 लक्षात घ्या की quiz आपोआप दोन पेजेसमध्ये विभाजित झाला आहे. याचे कारण असे की आपण पूर्वी हा पर्याय Quiz Settings मध्ये दिला होता.
10:07 अगदी उजवीकडे, दुसऱ्या प्रश्नाच्या खाली add लिंकवर क्लिक करा.
10:13 a new section heading लिंकवर क्लिक करा.
10:18 heading चे नाव एडिट करण्यासाठी पेन्सिल आयकॉनवर क्लिक करा.
10:23 मी टाईप करेन Section 2 आणि Enter दाबेन.
10:27 quiz सेव्ह करण्यासाठी, वरील उजव्या बाजूस Save button' वर क्लिक करा.
10:32 प्रत्येक quiz प्रश्नाच्या उजवीकडे दोन आयकॉन्स आहेत: Preview question आणि Delete.

हे स्वत: स्पष्टीकरणात्मक आहेत.

10:43 Delete question हा quiz मधून प्रश्न डिलीट करेल. परंतू question bank मध्ये प्रश्न तरीही अस्तित्वात राहील.
10:51 breadcrumbs मध्ये quiz च्या नावावर क्लिक करा.
10:56 उजवीकडे gear menu मध्ये Preview quiz बटणावर क्लिक करा.
11:02 ही एक कन्फरमेशन विंडो उघडते. ही विद्यार्थ्यांना सूचित करते की, quiz कालबद्ध आहे आणि त्यांच्याकडे एकतर Start किंवा Cancel करण्याचा पर्याय आहे.
11:14 मी Start attempt बटणावर क्लिक करेन.
11:18 स्क्रीनच्या उजवीकडे, Quiz navigation block आहे.
11:23 हे टायमरसह सेक्शनवाईज प्रश्न दर्शविते.
11:29 तसेच ह्या फिल्डमधून थेट प्रश्न एडिट करण्याचा पर्यायदेखील आहे.
11:35 navigation block मध्ये मी Finish attempt लिंकवर क्लिक करते.
11:40 प्रत्येक प्रश्नाची स्थिती प्रश्नाच्या नावापुढे दर्शविली जाते.
11:45 पृष्ठाच्या तळाशी Submit all and finish बटणावर क्लिक करा.
11:51 कन्फरमेशन पॉप-अपमध्ये Submit all and finish बटणावर पुन्हा क्लिक करा.
11:58 लक्षात घ्या की, grade, overall feedback आणि प्रश्न विशिष्ट feedback सर्व येथे दर्शविले आहेत.
12:06 खाली स्क्रोल करा आणि Finish review लिंकवर क्लिक करा.
12:11 आपण Quiz summary पृष्ठावर परत आलो आहोत.
12:15 पृष्ठाच्या शीर्षस्थानी उजवीकडे gear icon वर क्लिक करा. Edit quiz लिंकवर क्लिक करा. तुम्ही quiz मधून प्रश्न जोडू किंवा काढून टाकू शकता.
12:28 तथापि, कोणत्याही विद्यार्थ्याने quiz अटेम्प करण्यापूर्वी केवळ हे केले जाऊ शकते.
12:35 जरी एखाद्या विद्यार्थ्याने quiz अटेम्प केला आहे, quiz लॉक केलेला आहे. तथापि, आवश्यक असलेले प्रश्न एडिट किंवा जोडले जाऊ शकतात.
12:47 ह्या सह आपण अंतिम टप्प्यात आलो आहोत. थोडक्यात.
12:53 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो :

Moodle मध्ये Quiz कसे तयार करणे आणि Quiz मधील Question bank च्या प्रश्नांचा उपयोग कसा करणे.

13:03 येथे तुमच्यासाठी एक लहान असाइनमेंट आहे.

इव्हॅल्यूट्ससाठी एक नवीन क्विझ जोडा अधिक माहितीसाठी ह्या ट्युटोरिअलच्या Assignment लिंकचा संदर्भ घ्या.

13:16 खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाऊनलोड करा आणि पहा.
13:25 Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.
13:34 कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
13:38 Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
13:52 आय.आय.टी. बॉम्बेतर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.
14:03 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana