Moodle-Learning-Management-System/C2/Formatting-Course-material-in-Moodle/Marathi
Time | Narration |
00:01 | Moodle मधील Formatting course material वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत:
Moodle मध्ये Resources अतिरिक्त course material जोडणे डिफॉल्ट text editor मध्ये Formatting पर्याय |
00:21 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे:
Ubuntu Linux OS 16.04 XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता. |
00:48 | तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात. |
00:56 | हे ट्युटोरिअल गृहीत धरते कि तुमच्या site administrator ने Moodle website सेटअप केली आहे आणि तुम्हाला teacher म्हणून रजिस्टर केली आहे. |
01:06 | या ट्युटोरियलच्या शिकणाऱ्यांकडे Moodle वर teacher login असावा.
कमीतकमी एक course त्यांना administrator द्वारे असाइन करणे आवश्यक आहे. काही कोर्स सामग्री त्यांच्या संबंधित course साठी अपलोड केली आहे. |
01:21 | नसल्यास, कृपया या वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल्स पहा. |
01:27 | ब्राउजर वर जा आणि तुमचे moodle site उघडा. |
01:31 | तुमच्या teacher username आणि password तपशिलासह लॉगिन करा. |
01:36 | आपण आता teacher dashboard मध्ये आहोत. |
01:39 | डावीकडील navigation menu मध्ये लक्षात ठेवा My Courses अंतर्गत Calculus. |
01:45 | Calculus course वर क्लिक करा. |
01:48 | आपण आधीच announcements आणि काही सामान्य course तपशील पूर्वीच जोडला आहे. |
01:54 | आता आपण काही अतिरिक्त course material जोडूया. |
01:58 | Moodle मधील सर्व course material ला Resources म्हणतात.
हे material आहेत जे शिक्षक शिकणाऱ्यांना समर्थन देण्यासाठी वापरतात. |
02:09 | Resources आंतरिक असू शकते जसे लेक्चर नोट्स, बुक्स किंवा बाह्य जसे Wikipedia links |
02:19 | चला सुरवात करू.
पेजच्या वरती उजवीकडे gear आयकॉन वर क्लिक करा आणि नंतर Turn Editing On वर क्लिक करा. |
02:29 | लक्षात ठेवा course मध्ये कोणतेही बदल करण्यासाठी editing on चालू ठेवणे आवश्यक आहे. |
02:36 | Basic Calculus section च्या तळाशी उजवीकडील Add an activity or resource लिंकवर क्लिक करा. |
02:44 | resources च्या यादी सह एक पॉप-अप उघडतो. |
02:48 | खाली स्क्रोल करा आणि यादी मधून Page निवडा. जेव्हा तुम्ही कोणताही resource निवडता उजवीकडे resource विषयी तपशीलवार वर्णन वाचा. |
03:01 | पॉप-अप स्क्रीनच्या तळाशी Add बटणावर क्लिक करा. |
03:06 | Name फील्डमध्ये, मी टाईप करेल Lecture 1 Notes. |
03:12 | नंतर Description बॉक्समध्ये, टाईप करा “Involutes and construction of Involute of circle”. |
03:22 | Display description on course page पर्याय चेक करा. |
03:27 | Page Content बॉक्स पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. BasicCalculus-Involutes.odt फाईल मधून टेक्स्ट कॉपी आणि पेस्ट करा. |
03:40 | आपण नंतरच्या स्तरावर प्रतिमा अपलोड करणार आहोत. ही फाईल या ट्युटोरिअलच्या Code Files लिंकमध्ये उपलब्ध आहे. |
03:51 | आता आपण हा टेक्स्ट format करू. menu widgets विस्तृत करण्यासाठी editor च्या वरती डाव्या बाजूला डाउन-एरोवर क्लिक करा. |
04:03 | दर्शविल्याप्रमाणे, मी हेडिंग्ज अधिक प्रमुख बनवेल. |
04:07 | text editor मधील पर्याय इतर कोणत्याही मानक text editor सारखेच आहेत. येथे आपण पर्याय पाहू शकतो जसे Bold, Italics, Unordered आणि Ordered lists. |
04:24 | आपण टेक्स्ट hyperlink आणि unlink करण्यासाठी पर्याय देखील पाहू शकतो. |
04:30 | येथे इमेज जोडण्यासाठी एक पर्याय देखील आहे. टेक्स्ट “Figure 1 shows the involute of a circle” च्या नंतर इमेज जोडू. |
04:41 | इमेजसाठी जागा तयार करण्यासाठी एंटर दाबा. नंतर Image icon वर क्लिक करा. |
04:48 | Image properties विंडो दिसते. जर तुम्हाला external image समाविष्ट करायचे असेल तर तुम्ही येथे image ची URL प्रविष्ट करू शकता. |
04:58 | मी image अपलोड करण्यासाठी Browse Repositories बटणवर क्लिक करते. |
05:04 | शीर्षक File Picker सह एक पॉप-अप विंडो उघडते. |
05:09 | Upload a file वर क्लिक करा. नंतर Choose File किंवा Browse बटणवर क्लिक करा आणि तुमच्या मशीनमधून फाईल निवडा. |
05:19 | ही image Code Files लिंकमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही डाउनलोड करून ते वापरा. |
05:26 | Upload this file बटणवर क्लिक करा. |
05:29 | आपण वर्णन म्हणून टाईप करू “This is the involute of a circle” . |
05:36 | शेवटी इमेज समाविष्ट करण्यासाठी Save image बटणवर क्लिक करा. |
05:42 | पुढील पर्याय media जोडायचे आहे. ही एक URL, video किंवा audio फाईल असू शकते.
पुन्हा, ही एक external URL असू शकते किंवा आपल्या मशीनवरून अपलोड केली जाऊ शकते. |
05:58 | पुढील पर्याय आहे Manage Files . त्यावर क्लिक करू. |
06:04 | Manage Files पर्याय म्हणजे आपण संग्रहित आणि प्रदर्शित करू इच्छित असलेल्या फाइल्सचा संच असावा. यात assignment submissions, resource files, इत्यादींचा समावेश असू शकतो. |
06:17 | ते या course मधील कोणत्याही अन्य resource द्वारे वापरले जाऊ शकतात. लक्षात घ्या की image आत्ताच आपण अपलोड केले आहे, येथे देखील आहे. |
06:27 | या पॉप-अप बॉक्सच्या डाव्या बाजूला 3 icons आहेत. |
06:32 | प्रथम आहे File picker. त्यावर क्लिक करू. |
06:37 | त्यात server files', recent files, इत्यादी पाहण्याचे पर्याय आहेत. Server files ही फाईल्स एकतर वापरली जाणारी आहेत आणि पुन्हा वापरली जाऊ शकतात. |
06:52 | मी आता X icon वर क्लिक करून हे बंद करेल. |
06:57 | पुढे आपण Create Folder icon वर क्लिक करू, जो दुसरा icon आहे. |
07:04 | New folder name फील्डमध्ये, टाईप करा Assignments. |
07:10 | नंतर ते उघडण्यासाठी Assignments फोल्डरवर क्लिक करा. |
07:15 | मी माझ्या फाईलला Assignments फोल्डर अंतर्गत ड्रॅग करते. |
07:20 | आता फक्त अपलोड केलेल्या फाइलवर क्लिक करा. |
07:24 | या पॉप-अपमध्ये फाइलचे नाव आणि लेखक सुधारित करण्याचा पर्याय आहे. आणि फाइल डाउनलोड किंवा डिलीट करण्याचे देखील पर्याय आहे. |
07:34 | मी काहीही बदलू इच्छित नाही. तर पॉप-अपच्या खाली Cancel बटणावर क्लिक करा. |
07:41 | आता, ट्यूटोरियल थांबवा आणि ही लहान असाईनमेंट करा.
Reference Material फोल्डर तयार करा. खात्री करा कि फोल्डर Files फोल्डरच्या आता आहे आणि सबफोल्डरच्याAssignments च्या आता नाही. |
07:57 | 3 फाईल्स अपलोड करा. तुम्हाला ते या ट्यूटोरियलच्या Code files लिंकमध्ये मिळतील. |
08:05 | आपण ही असाइनमेंट पूर्ण केल्यानंतर हा ट्यूटोरियल पुन्हा सुरु करा. |
08:10 | आता तुमच्या File manager मध्ये Assignments आणि Reference Material नामक 2 फोल्डर असले पाहिजे. |
08:18 | आणि अन्य फाईलचे नाव involutes-img1.png |
08:26 | वरती उजवीकडे X icon वर क्लिक करून पॉप-अप विंडो बंद करा. |
08:33 | पुढील फॉरमॅटिंग पर्यायांचा संच आहे
Underline, Strikethrough, Subscript आणि Superscript. |
08:45 | Align आणि indent पर्याय हे अनुसरण करा. हे इतर कोणत्याही text editor मध्ये कार्य करते. |
08:53 | आता पुढच्या पर्यायाचा उपयोग कसा करायचा ते पाहू, जे equation editor आहे. |
08:59 | मला हा वाक्य त्या समीकरणात जोडायचा आहे. तर मी equation editor आयकॉन वर क्लिक करेल. त्यानंतर समीकरण टाईप करण्यासाठी equation editor चा वापर करा. |
09:14 | समीकरण टाइप करण्यासाठी LaTeX कसे वापरावे याविषयी तपशील Additional Reading Material लिंकमध्ये उपलब्द आहे. जेव्हा तुम्ही समाप्त करता तेव्हा Save equation बटणवर क्लिक करा. |
09:29 | Insert character, insert table आणि clear formatting पर्याय अन्य कोणत्याही text editor प्रमाणे कार्य करते. |
09:40 | पुढील दोन पर्याय जे आहेत Undo आणि Redo. हे फक्त तेव्हाच सक्षम होते जेव्हा काही सेव्ह न केलेले टेक्स्ट असेल. |
09:51 | या नंतर, आपल्याकडे accessibility साठी 2 पर्याय आहेत. हे प्रथम आयकॉन आहे ज्याला Accessibility checker म्हटले जाते. आणि दुसऱ्याला screen reader helper म्हटले जाते. |
10:05 | accessible websites आणि या पर्यायांबद्दलचे तपशील या Additional Reading Material लिंकमध्ये आहे. |
10:14 | शेवटचा पर्याय editor view मधून HTML code व्ह्यूमध्ये टॉगल करणे आहे. याचा वापर प्रतिमा, व्हिडिओ, पीपीटी, इंटरॅक्टिव्ह कॉन्टेन्ट इत्यादी मध्ये एम्बेड करण्यासाठी केला जाऊ शकतो. |
10:30 | toggle HTML वर पुन्हा क्लिक करा. हे आपल्याला परत editor view वर आणेल. |
10:39 | प्रदर्शनासाठी मी bold, italics आणि list पर्याय वापरून टेक्स्ट फॉरमॅट केले आहे. तुमच्या कॉन्टेन्ट साठी त्याप्रमाणेच करा. |
10:52 | जेव्हा तुम्ही फॉरमॅटिंग समाप्त करता तेव्हा तुम्ही खाली स्क्रोल करा आणि Save and display बटणावर क्लिक करा. |
11:01 | आता आपण Moodle मधून लॉगआउट करू शकतो. |
11:05 | अशाप्रकारे ही Priya Sinha विद्यार्थी हे पृष्ठ बघेल. |
11:11 | यासह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
11:19 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो:
Moodle मध्ये Resources course material जोडणे डिफॉल्ट text editor मध्ये Formatting पर्याय |
11:34 | येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे.
Basic Calculus मध्ये एक नवीन फोल्डर resource जोडा. File Manager मधून reference files जोडणे. अधिक माहितीसाठी या ट्यूटोरियल च्या Assignment या लिंकचा संदर्भ घ्या. |
11:51 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
12:00 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
12:10 | कृपया ह्या फोरममध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
12:14 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India. यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
12:27 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. |
12:38 | सहभागासाठी धन्यवाद. |