Moodle-Learning-Management-System/C2/Blocks-in-Admin-Dashboard/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Blocks in Admin's Dashboard वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:08 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत :

blocks कसे जोडणे आणि डिलीट करणे आणि Front page कसे सेट करणे.

00:18 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:

Ubuntu Linux OS 16.04

00:26 XAMPP 5.6.30 तून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP
00:35 Moodle 3.3आणि Firefox वेब ब्राऊजर.
00:41 तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता.

तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात.

00:54 हे ट्युटोरिअल शिकणाऱ्यांना Admin’s dashboard चे मूलभूत ज्ञान असावे.

नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल्स पहा.

01:08 ब्राऊजरवर जा आणि आपली Moodle site उघडा.

XAMPP service चालू आहे ह्याची खात्री करा.

01:17 आपल्या admin username आणि password तपशीलासह लॉगिन करा.
01:22 आपण आता Admin’s dashboard मध्ये आहोत.
01:26 पुन्हा लक्षात ठेवा: Blocks एक विशिष्ट हेतू किंवा माहिती पुरवतात.

आणि Moodle च्या सर्व पेजेसवर आढळतात.

01:38 आता Moodle Blocks च्या सहाय्याने आपण कसे कार्य करू शकतो ते समजून घेऊ.
01:44 वापरलेल्या theme आधारित blocks उजव्या बाजूला किंवा दोन्ही बाजूंवर असू शकतात.
01:52 Blocks मध्ये आपल्याला हवी असलेली माहिती असते जी लोकांनी केव्हाही लॉगइन केले असता ते पाहू शकतात.
01:58 Moodle मध्ये बऱ्याच प्रकारचे blocks उपलब्ध आहेत.

आणि ते आपल्या प्राधान्यांनुसार सहजपणे हलवले जाऊ शकतात किंवा व्यवस्थित केले जाऊ शकतात.

02:09 आता आपण आपल्या dashboardला काही blocks जोडू.
02:14 पेजच्या डाव्या बाजूला navigation menu वर क्लिक करा.
02:19 dashboardच्या उजव्या बाजूस Customise this page वर क्लिक करा.
02:26 लक्षात घ्या की, नवीन मेनू आयटम Add a block आता दृश्यमान आहे.

Add a block वर क्लिक करा.

02:35 एक नवीन पॉप-अप विंडो उघडते.

आपल्याला block चा प्रकार निवडण्याची गरज आहे जो आपल्याला जोडायचा आहे.

02:43 उदाहरणार्थ, Messages वर क्लिक करा.

तुम्ही पाहू शकता की,Messages block आता dashboard मध्ये प्रदर्शित होतो.

02:53 सध्या तिथे कोणतेही मेसेजेस नाहीत.
02:56 डीफॉल्टपणे, सर्व नवीन blocks उजवीकडील कॉलममध्ये जोडले गेले आहेत.
03:02 आता आणखी एक block जोडू.

डाव्या बाजूस Add a block वर क्लिक करा.

03:09 menu types च्या सूचीमधून HTML निवडा.

HTML block हा एक block आहे जिथे एखादा कस्टम HTMLलिहू शकतो.

03:19 हे वापरून, आपणwidgets एम्बेड करू शकतो, जसे Library widgets, News feeds, Twitter, Facebook इत्यादी.
03:30 आता लक्षात घ्या की,NEW HTML BLOCK हा Messages block खाली जोडला गेला आहे.
03:37 HTML blockमध्ये गिअर आयकॉनवर क्लिक करा.

नंतर Configure (NEW HTML BLOCK) blockवर क्लिक करा.

03:46 Configure HTML block मध्ये 3sectionsआहेत :

Block settings , Where this block appears आणि On this page

03:57 डीफॉल्टपणे, पहिला section विस्तृत केला आहे.
04:02 सर्व sections विस्तृत करण्यासाठी Expand all वर क्लिक करा.
04:07 block टायटलमध्ये,टाईप करू “Things to do”.
04:12 ह्याadmin user साठीContent area मध्ये काही कार्ये(टास्क्स) समाविष्ट करू.
04:19 खालील टाईप करा: Create a new course, Create new users, Add users to the course
04:30 editor हे एक HTML editor आहे आणि इतर कोणत्याही word processor किंवा editorसारखे वापरले जाऊ शकते.
04:39 Where this block appears अंतर्गत पर्याय पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
04:45 Default region अंतर्गत Contentनिवडा.

Default weight मध्ये, -10निवडा.

04:54 block चे कमी वजन(वेट), त्या रिजनमध्ये ते त्यापेक्षा जास्त दिसून येईल.

-10 सर्वात कमी आहे.

05:03 -10 निवडून, मी हे सुनिश्चित करीत आहे की ते content रिजनच्या शीर्षस्थानी आहे.
05:12 block हा Admin’s dashboard वर दिसेल.
05:17 आता “On this page” सेक्शन येते.

जिथे तुम्ही हे block जोडलेला होता तिथे पेजसाठी कॉन्फिगरेशन परिभाषित करू शकता.

05:28 आमच्या बाबतीत, हे dashboard आहे.

हे कॉन्फिगरेशन, वरील सेक्शनमध्ये परिभाषित डीफॉल्ट कॉन्फिगरेशन अधिलिखित करेल.

05:40 हे आहेWhere this block appears सेक्शन.

ह्या सेक्शनमध्येRegion मध्ये Content आणि Weight मध्ये -10 निवडा.

05:53 कृपया लक्षात घ्या की,block प्रकारावर अवलंबून, कॉन्फिगरेशन सेटिंग्ज भिन्न असतील.
06:01 बदल सेव्ह करण्यासाठी Save Changes वर क्लिक करा आणि dashboard वर परत जा.
06:07 हे पहा की, Things to do शीर्षकासह नवीन HTML block आता दिसत आहे.

आणि content विभागामध्ये हा सर्वात वरचा block आहे.

06:18 Move आयकॉन वापरून, आपणblock ची स्थिती ड्रॅग करून बदलू देखील शकतो.
06:25 ड्रॅग आणि ड्रॉप करून Things to do block Course Overview block च्या खाली हलवू.
06:34 आपण काही मिनिटांपूर्वी सेट केलेल्या कॉन्फिगरेशनमध्ये हे कसे बदलते ते पाहू.
06:40 गिअर आयकॉन वर क्लिक करा आणि नंतर Configure Things to do block वर

नंतर Expand All वर क्लिक करा.

06:49 “On this page” पहाण्यासाठी खाली स्क्रोल करा. 'Weight -2 मध्ये बदलले आहे.

default weightतरीही समान राहते.

07:03 dashboard वर परत जाण्यासाठी Cancel वर क्लिक करा.
07:07 आपल्याला ह्या Learning Plans block ची गरज नाही. तर आपण ते डिलीट करू.

गिअर आयकॉन वर क्लिक करा आणि नंतर Delete Learning plans blockवर क्लिक करा.

07:19 कन्फम पॉप अप विंडो प्रदर्शित होते आणि ही डिलीट करण्याची खात्री करण्यास आपल्याला सूचित करते.

Yes बटणावर क्लिक करा.

07:29 लक्षात घ्या की,Learning Plans block यापुढे उपलब्ध नाही.

आवश्यक असल्यास,आपण हे block नेहमी जोडू शकतो.

07:40 आता आपण आपल्याMoodle इन्स्टॉलेशनचेfront page सानुकूलित(कस्टमाईज) करू.
07:46 डाव्या मेनूवरील Site Administration वर क्लिक करा.
07:51 Front page सेक्शनमध्ये, Front Page settings शोधण्यासाठी खाली स्क्रोल करा. त्यावर क्लिक करा.
08:00 आता Full Site Name Digital India Learning Management System मध्ये बदलू.
08:08 हा टेक्स्ट आहे जो breadcrumbs वर प्रत्येक पेजच्या शीर्षस्थानी दिसतो.
08:15 Short name हे टेक्स्ट आहे जे पेजच्या शीर्षकात दिसतो.
08:20 लक्षात घ्या की, आपण ज्या पेजमध्ये आहोत त्या पेजच्या नावानंतर ह्या पेजचे टायटल Digital India LMS आहे.
08:29 आपण कोणताही लोगो इमेज दिला नाही तरी, Short name लोगो टेक्स्ट म्हणूनदेखील वापरला गेला आहे. आपण ते सोडून देऊ.
08:40 Front page आयटम्ससाठी, ड्रॉपडाऊन्स पाहण्यास खाली स्क्रोल करा.

ही आयटम्सची सूची आहे जी फ्रंटपेजवर दर्शविली जाऊ शकते.

08:50 सर्व व्हिजिटर्स(अभ्यागत ), ते लॉगिन असले किंवा नसले तरीही हे आयटम्स पाहू शकतात.
08:57 ऑर्डर कॉम्बिनेशन बॉक्सद्वारे निर्धारित केली आहे.

आपण ते आहे तसे सोडून देऊ.

09:05 म्हणून सर्व युजर्स कोर्सेसची सूची उपलब्ध असल्यास पाहू शकतील आणि इतर काहीच नाही.
09:13 पुढील आहे Front page items when logged in.

ही अशी सूची आहे जी लॉगिन केलेल्या युजर्सना दर्शविली जाऊ शकते.

09:24 पहिल्या ड्रॉप-डाऊनमध्येEnrolled courses निवडा.
09:29 आपण उर्वरित पर्यायांना त्यांच्या डिफॉल्ट व्हॅल्यूसह सोडू.
09:35 खाली स्क्रोल करा आणि Save Changesवर क्लिक करा.
09:40 आता सारांशित करूया.
09:43 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो :

“Things to do” नावाचे HTML block जोडणे आणि पेजवर ते कुठे प्रदर्शित व्हावे ते निर्दिष्ट केले.

09:54 आपण गेस्ट्स आणि लॉगिन केलेल्या युजर्ससाठी frontpage देखील सेटअप केले.
10:00 येथे आपल्यासाठी असाईनमेंट आहे  :

Private files block डिलीट करणे Code files लिंकमधील गाईडलाईन्स वापरून एक नवीन HTML block जोडणे

10:14 खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देते.

कृपया ते डाऊनलोड करून पहा.

10:23 Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.
10:33 कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध क्वेरी पोस्ट करा.
10:37 Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:51 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.

Contributors and Content Editors

Ranjana