Linux-AWK/C2/Basics-of-Single-Dimensional-Array-in-awk/Marathi
|
|
00:01 | awk मध्ये Basics of single dimensional array वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - awk मध्ये Arrays |
00:12 | array elements असाईन करणे |
00:15 | इतर प्रोग्रामिंग लॅंग्वेजेसमधील arrays पेक्षा हे वेगळे कसे आहेत आणि array चे elements संदर्भित करणे. |
00:23 | आपण हे काही उदाहरणांद्वारे करू. |
00:26 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 16.04 Operating System आणि gedit text editor 3.20.1 वापरत आहे. |
00:38 | आपण आपल्या पसंतीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
00:42 | ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, आपण आपल्या वेबसाईटवरील मागील awk ट्युटोरिअल्स पहा. |
00:49 | आपण C किंवा C++ सारख्या कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजशी परिचित असावे. |
00:56 | नसल्यास, कृपया आपल्या वेबसाईटवरील संबंधित ट्युटोरिअल्स पहा. |
01:02 | ह्या ट्युटोरिअलमध्ये वापरल्या गेलेल्या फाईल्स, ह्या ट्युटोरिअल पेजवरील Code Files मध्ये उपलब्ध आहेत. कृपया डाऊनलोड करा आणि एक्सट्रॅक्ट करा. |
01:11 | awk मध्ये array काय आहे?
awk संबंधित एलिमेंट्स संग्रहित करण्यासाठी array सहाय्य करते. |
01:18 | एलिमेंट्स हे number किंवा string असू शकतात. |
01:21 | awk मध्ये Arrays सहयोगी आहेत. |
01:24 | ह्याचा अर्थ असा की प्रत्येक अॅरे एलिमेंट हा एक index-value pair आहे. |
01:29 | इतर कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ते अगदी arrays सारखे दिसतात. |
01:33 | पण तिथे काही महत्वाचे फरक आहेत. |
01:36 | प्रथम, ते वापरण्यापूर्वी array घोषित करणे गरजेचे नाही. |
01:41 | तसेच array मध्ये किती एलिमेंट्स असतील ते निर्दिष्ट करण्याची आवश्यकता नाही. |
01:47 | प्रोग्रामिंग लँग्वेजेमध्ये, array index हा एक सामान्यतः पॉझिटिव्ह पूर्णांक असतो. |
01:52 | सहसा index 0 पासून सुरू होतो, नंतर 1, नंतर 2 आणि पुढे. |
01:58 | पण awk मध्ये, index काहीही असू शकतो - कोणत्याही नंबर किंवा स्ट्रिंग. |
02:03 | awk मध्ये array element असाईन करणे हे सिंटॅक्स आहे.
Array name कोणतेही वैध व्हेरिएबल नाव असू शकते. |
02:11 | येथे index हे इंटिजर किंवा स्ट्रिंग असू शकतो. |
02:16 | Strings डबल कोट्समध्ये लिहिले पाहिजे, मग ते इंडेक्स नेम असो किंवा व्हॅल्यू. |
02:23 | हे उदाहरणासह समजून घेऊ. |
02:27 | मी आधीच कोड लिहिला आहे आणि त्यास array_intro.awk म्हणून सेव्ह केले आहे. |
02:34 | ही फाईल, प्लेअरच्या खालील Code Files लिंकमध्ये उपलब्ध आहे.
कृपया डाऊनलोड करा आणि वापरा. |
02:41 | येथे मी आठवड्याचे दिवस उदाहरण म्हणून घेतले आहेत आणि ते BEGIN section च्या आत लिहिले आहे. |
02:48 | येथे, अॅरेचे नाव day आहे. |
02:52 | मी इंडेक्स 1 आणि व्हॅल्यू Sunday म्हणून सेट केले आहे. |
02:57 | ह्या अॅरे एलिमेंटमध्ये मी स्ट्रिंग इंडेक्स म्हणून वापरली आहे.
तर index first साठी व्हॅल्यू Sunday आहे. |
03:06 | संपूर्ण अॅरे तशाचप्रकारे तयार केले आहे. |
03:10 | येथे लक्ष द्या, अॅरे एलिमेंट अनुक्रमेत नाहीत.
मी day three आधी day four घोषित (डिक्लेअर) केले आहे. |
03:18 | awk मध्ये अॅरे, इंडेक्स अनुक्रमिक पद्धतीने असणे आवश्यक नाही. |
03:23 | associative array चे फायदे म्हणजे नवीन जोड्या (पेअर्स) कोणत्याही वेळी जोडल्या जाऊ शकतात. |
03:29 | मी अॅरेमध्ये day 6 जोडते. |
03:33 | कर्सर शेवटच्या ओळीच्या शेवटी ठेवा आणि एंटर दाबा.
नंतर खाली टाईप करा. |
03:42 | फाईल सेव्ह करा. |
03:44 | आपण अॅरे घोषित (डिक्लेअर) केले आहे.
परंतु आपण array element चा संदर्भ कसा दिला पाहिजे? |
03:49 | एका विशिष्ट इंडेक्सवर एलिमेटचा संदर्भ घेण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये arrayname आणि index लिहा. आता हे करून पाहू. |
03:58 | पुन्हा एकदा कोडवर जा. |
04:01 | कर्सर क्लोजिंग कर्ली ब्रेसच्या समोर ठेवा. |
04:05 | एंटर दाबा आणि टाईप करा print space day स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 6 |
04:13 | कोड सेव्ह करा. |
04:15 | Ctrl, Alt आणि T कीज दाबून टर्मिनल उघडा. |
04:20 | आपण cd command वापरून Code Files डाऊनलोड आणि एक्सट्रॅक्ट केलेल्या फोल्डरवर जा. |
04:27 | टाईप करा awk space hyphen small f space array_intro.awk
एंटर दाबा. |
04:38 | पहा, आपल्याला आऊटपुट म्हणून Friday मिळेल. |
04:42 | पुढे आपण, एका विशिष्ट इंडेक्सच्या ठिकाणी अॅरेमध्ये एखादा element अस्तित्वात आहे की नाही हे तपासणार आहोत. |
04:48 | ह्यासाठी आपल्याला in operator वापरणे आवश्यक आहे. मी हे उदाहरणासह स्पष्ट करते. |
04:55 | एडिटर विंडोमधील कोडवर जा. |
04:59 | print statement च्या शेवटी कर्सर ठेवा आणि एंटर दाबा.
नंतर दर्शविल्याप्रमाणे टाईप करा. |
05:09 | कोड सेव्ह करा. |
05:11 | आता मी दोन if conditions जोडल्या आहेत. |
05:15 | पहिली if condition ही day मध्ये index two उपस्थित आहे की नाही हे तपासते. |
05:21 | जर होय, तर संबंधित print statement कार्यान्वित होईल. |
05:26 | मग दुसरी condition ही day मध्ये index seven उपस्थित आहे की नाही हे तपासते.
जर ते true (ट्रू) असेल तर print statement कार्यान्वित होईल. |
05:35 | जसे आपण पाहू शकतो, अॅरेमध्ये index two आहे आणि seven नाही.
आऊटपुट सत्यापित करण्यासाठी ही फाईल कार्यान्वित करू. |
05:44 | terminal वर जा. पूर्वी कार्यान्वित केलेली कमांड परत मिळविण्यासाठी अप अॅरो की दाबा. |
05:51 | कार्यान्वित करण्यासाठी एंटर दाबा. |
05:54 | आपल्याला अपेक्षित आऊटपुट मिळते. |
05:57 | आपण आता कोडमध्ये काही अधिक बदल करू.
येथे दर्शविल्याप्रमाणे कोड अपडेट करा. |
06:04 | day condition मध्ये, 7 खाली मी आणखी एक condition जोडली आहे. |
06:09 | हे index seven ची व्हॅल्यू शून्य आहे की नाही हे तपासेल. |
06:14 | जर true असेल, तर ते प्रिंट करेल Index 7 is not null |
06:18 | आपल्याला आधीच माहित आहे की आपल्याकडे 7 सह कोणताही index नाही, त्यामुळे तो काहीही प्रिंट करणार नाही. |
06:24 | पुढे, day मध्ये condition 7 ची print statement आपण बदलली आहे. |
06:30 | कोड सेव्ह करा.
आपण कोड कार्यान्वित करतो तेव्हा काय होते ते पाहू. |
06:35 | terminal वर जा.
पूर्वी कार्यान्वित केलेले कमांड मिळविण्यासाठी अप अॅरो की दाबा. |
06:43 | कार्यान्वित करण्यासाठी एंटर दाबा. |
06:46 | आपल्याला अनपेक्षित आऊटपुट मिळाला. |
06:49 | स्टेटमेंट '"Index 7 is present after null comparison प्रिंट केले आहे.
हे कसे शक्य आहे? |
06:57 | जेव्हा आपण लिहितो, day[7] not equal to null
तेव्हा आपण index 7 वर element एक्सेस करण्याचा प्रयत्न करीत आहोत. |
07:04 | ही ऍक्सेस स्वतः प्रथम index 7 वर एक एलिमेंट तयार करेल आणि null व्हॅल्यूसह ते आरंभ करेल. |
07:12 | पुढे, index 7 वर कोणताही एलिमेंट खरोखर अस्तित्वात आहे की नाही हे तपासण्याचा प्रयत्न करीत आहोत. |
07:18 | जरी null element आधीच तयार झाला आहे, आऊटपुट दर्शवितो की Index 7 हा null कम्पॅरिजननंतर उपस्थित आहे. |
07:26 | तर हे लक्षात ठेवा.
day at index 7 not equal to null हा एलिमेंटची उपस्थिती तपासण्याचा एक चुकीचा मार्ग आहे. |
07:34 | हे index 7 वर null element तयार करेल. |
07:38 | त्याऐवजी आपल्याला in operator वापरावे लागेल. |
07:41 | हे अॅरेमधील कोणतेही अतिरिक्त एलिमेंट तयार करणार नाही.
आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
07:50 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो - awk मध्ये Arrays |
07:54 | array elements असाईन करणे |
07:56 | इतर प्रोग्रामिंग लॅंग्वेजेसमध्ये हे arrays पेक्षा वेगळे कसे आहेत |
08:00 | array चे elements संदर्भित करणे. |
08:03 | असाईनमेंट म्हणून- array flowerColor परिभाषित करा. |
08:07 | इंडेक्समध्ये फुलांची नावे असतील. |
08:10 | फुलांच्या संबंधित रंगांचे व्हॅल्यू असतील. |
08:14 | आपल्या आवडीच्या कोणत्याही पाच फुलांची इन्ट्री प्रविष्ट करा. |
08:18 | चौथ्या फुलाचा रंग प्रिंट करा
अॅरेमधे “Lotus” फूल उपस्थित आहे का ते तपासा. |
08:25 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते.
कृपया ते डाऊनलोड करून पहा. |
08:33 | Spoken Tutorial Project टीम स्पोकन ट्युटोरिअलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
आणि ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:42 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा. |
08:46 | कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
08:50 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
09:01 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |