LibreOffice-Suite-Writer/C3/Using-search-replace-auto-correct/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 लिबर ऑफिस रायटरच्या Find and Replace आणि AutoCorrect पर्यायांवरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:09 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत.
00:12 Find and Replace
00:14 Spellcheck, AutoCorrect
00:17 येथे आपण उबंटू लिनक्स 10.04 ही operating system आणि LibreOffice Suite चे version 3.3.4 वापरणार आहोत.
00:26 आता आपण रायटर मधील Find and Replace पासून सुरूवात करू या.
00:32 हे संपूर्ण डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट शोधते आणि/किंवा त्या टेक्स्टला रिप्लेस करते.
00:36 उदाहरणाच्या सहाय्याने त्याबद्दल अधिक जाणून घेऊ.
00:40 त्यासाठी प्रथम आपली resume.odt ही फाईल उघडा.
00:44 आता Editया पर्यायावर क्लिक करा आणि नंतर Find and Replace वर क्लिक करा.
00:51 किंवा standard tool bar वरील बटणावर क्लिक करा.
00:56 Search forआणि Replace with अशी field असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
01:01 आपल्याला शोधायचे असलेले टेक्स्ट Search for या field मध्ये टाईप करा.
01:06 उदाहरणार्थ आपल्याला आपल्या डॉक्युमेंटमधील असे प्रत्येक स्थान शोधायचे आहे, येथे Ramesh असे लिहिले आहे.
01:12 मगSearch For या आपल्या field मध्ये Ramesh टाईप करा.
01:15 आता Find All वर क्लिक करा.
01:19 Ramesh असे लिहिलेली प्रत्येक जागा हायलाईट झालेली दिसेल.
01:25 आपण शोधलेला शब्द ज्या टेक्स्टने रिप्लेस करायचा आहे तो रिप्लेस फिल्डमध्ये टाईप करा.
01:31 उदाहरणार्थ आपल्याला आपल्या डॉक्युमेंटमध्ये Ramesh हे टेक्स्ट MANISH ने रिप्लेस करायचे आहे.
01:37 मग Replace with tab मध्ये MANISH टाईप करा.
01:41 आता Replace All वर क्लिक करा.
01:44 आपल्या डॉक्युमेंटमधील Ramesh हे टेक्स्ट प्रत्येक ठिकाणी Manish ने रिप्लेस झालेले दिसेल.
01:51 डायलॉग बॉक्समध्ये खाली More Options असे बटण दिसेल. त्यावर क्लिक करा.
01:57 More Options या बटणामध्ये Find and Replace साठी इतर पर्याय दाखवले गेले आहेत.
02:03 यामध्ये Backwards हा पर्याय आहे. जो टेक्स्टला खालून वरच्या दिशेला शोधतो. तसेच Current selection only हा पर्याय आपण निवडलेल्या भागातच टेक्स्ट शोधतो.
02:15 यात इतर advanced पर्यायही आहेत. जसे की Regular expressions, Search for Stylesआणि इतर.
02:26 डायलॉग बॉक्सच्या उजवीकडे अजून तीन पर्याय आहेत.
02:31 ते म्हणजे Attributes, Format आणि No Format.
02:36 हे युजरला find and replace चे विविध प्रकारचे advanced पर्याय प्रदान करतात.
02:41 हे बंद करा.
02:44 आपण त्याबद्दल अधिक माहिती advanced ट्युटोरियल्स मध्ये जाणून घेऊ.
02:48 find and replace बद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण रायटरमध्ये Spellcheck च्या सहाय्याने स्पेलिंग कसे तपासायचे ते पाहू.
02:57 Spellcheck चा उपयोग संपूर्ण डॉक्युमेंटमधील किंवा टेक्स्टच्या निवडलेल्या भागातील स्पेलिंगच्या चुका तपासण्यासाठी होतो.
03:05 Spellcheck ची सुरूवात कर्सरच्या सध्याच्या जागेपासून संपूर्ण डॉक्युमेंटच्या किंवा निवडलेल्या भागाच्या शेवटपर्यंत होते.
03:12 नंतर आपण डॉक्युमेंटच्या सुरूवातीपासूनच Spellcheck सुरू करण्याचा पर्याय निवडू शकतो.
03:17 Spellcheck हे शब्दातील स्पेलिंगच्या चुका शोधते. आणि user dictionary मध्ये आधी नसलेले शब्द समाविष्ट करण्याचा पर्याय उपलब्ध करते.
03:26 ते कसे लागू होते ते पाहू.
03:29 spell check हे फीचर प्रत्येक भाषेसाठी वेगळे असते.
03:33 उदाहरणार्थ मेनूबारवरील Tools पर्यायावर क्लिक करून मगOptions वर क्लिक करा.
03:39 उघडलेल्या डायलॉग बॉक्समध्ये Language Settingsवर क्लिक करा. आणि नंतर Languages वर क्लिक करा.
03:47 User interface या पर्यायाखाली English USA हा पर्याय सेट असल्याची खात्री करून घ्या.
03:56 त्याच्या खाली Locale setting या फिल्डच्या down arrow वर क्लिक करून नंतरEnglish USAया पर्यायावर क्लिक करा.
04:03 Default languages for documentsया शीर्षकाखाली, Western या फिल्डमध्ये English India ही भाषा default रूपात सेट आहे.
04:12 spell check साठी आवश्यक असलेली dictionary, English India मध्ये नसण्याच्या शक्यतेमुळे आपण ही भाषा बदलून ती English USA करू या.
04:21 त्यासाठी Western फिल्डच्या down arrow वर क्लिक करून English USAहा पर्याय निवडा.
04:27 शेवटी OK बटणावर क्लिक करा.
04:31 अशा प्रकारे आपणEnglish USA या भाषेसाठी स्पेल चेक कसे कार्य करते हे बघण्यासाठी तयार आहोत.
04:38 Spelling and Grammarहे feature वापरण्यासाठी AutoSpellCheckहा पर्याय enable झाल्याची खात्री करून घ्या.
04:45 ते enable नसल्यास टूलबारवरील AutoSpellCheckच्या बटणावर क्लिक करा.
04:52 आपल्या resume.odtया फाईलमध्ये Mothers Occupation, खाली housewifeचे चुकीचे स्पेलिंग husewifeअसे टाईप करा आणि spacebar दाबा.
05:05 चुकीच्या शब्दाखाली लाल रंगाची रेघ आलेली दिसेल.
05:10 आता husewifeया शब्दावर कर्सर नेऊन ठेवा आणि standard tool barवर वरील Spelling and Grammarच्या आयकॉनवर क्लिक करा.
05:18 आपल्याला हा शब्द Not in dictionary या फिल्डमध्ये दिसेल.
05:22 चुकीचे स्पेलिंग असलेल्या शब्द लाल रंगाने हायलाईट केला जातो आणि Suggestions या बॉक्समध्ये योग्य शब्दासाठी अनेक शब्द दिले जातात. ज्यातून आपल्याला योग्य शब्द निवडायचा असतो.
05:34 Suggestion या बॉक्समध्ये housewifeया शब्दावर क्लिक करा आणि मगChangeया बटणावर क्लिक करा.
05:40 या उघडलेल्या छोट्या डायलॉग बॉक्समध्ये OK वर क्लिक करा.
05:44 आता आपल्या डॉक्युमेंटमध्ये बरोबर स्पेलिंग आलेले दिसेल.
05:48 आपण केलेले बदल undo करू.
05:50 आता आपण AutoCorrect हा standard tool barचा अजून एक पर्याय शिकू.
05:56 AutoCorrect हे स्पेल चेकचे extension आहे.
06:00 AutoCorrect हा पर्याय आपल्याला मेनूबार मधील Format च्या ड्रॉप डाऊन मध्ये दिसेल.
06:06 AutoCorrect हा आपण चेक केलेल्या पर्यायानुसार आपोआप फाईलचे फॉरमॅटिंग करतो.
06:12 AutoCorrect ऑप्शनवर क्लिक करून हा पर्याय निवडता येतो.
06:18 AutoCorrectनामक डायलॉग बॉक्स उघडेल.
06:21 AutoCorrect हा पर्याय आपण लिहू ते टेक्स्ट आपोआप दुरूस्त करून घेईल.
06:26 Options या टॅबमध्ये आपण जो पर्याय निवडतो त्यानुसार ही दुरूस्ती केली जाते.
06:32 येथे अनेक AutoCorrectचे पर्याय आहेत. जसे की Delete spaces at the end and beginning of paragraph, Ignore double spaces आणि इतर अनेक.
06:44 उदाहरणाच्या सहाय्याने ते कसे कार्य करते ते पाहू.
06:48 आपल्या resume file मध्ये टेक्स्ट टाईप करू. शब्दांमध्ये कधी एक, दोन किंवा तीन स्पेसेस सोडू.
07:02 आता संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा.
07:05 मेनूबारवरील Format वर क्लिक करा.
07:09 ड्रॉप डाऊन मधील AutoCorrect वर क्लिक करा. आणि शेवटी सब मेनूमधील AutoCorrect ऑप्शनवर क्लिक करा.
07:17 Options टॅबवर क्लिक करा.
07:20 आता Ignore double spacesवर क्लिक करा आणि OKवर क्लिक करा.
07:26 यापुढे टाईप केलेल्या टेक्स्टमध्ये तुम्हाला दोन शब्दांमध्ये डबल स्पेस टाईप करता येणार नाही.
07:34 MANISH नावापुढे कर्सर नेऊन ठेवा. आता की बोर्डवरील स्पेस बार दोन वेळा दाबा.
07:41 आपल्याला दिसेल की कर्सर केवळ एकच घर पुढे सरकला आहे आणि टेक्स्टमध्ये दोन स्पेसेसची परवानगी देत नाही.
07:48 एका स्पेस नंतर KUMAR हे आडनाव टाईप करा.
07:53 AutoCorrect पर्याय संक्षिप्त रूपात लिहिलेला शब्द किंवा त्याचा भाग पूर्ण शब्दात रूपांतरित करू शकतो.
08:02 याद्वारे आपण मोठ्या शब्दांचे shortcuts बनवून आपले टायपिंगचे कष्ट वाचवू शकतो.
08:09 उदाहरणार्थ आपल्या resume.odt या फाईलमध्ये एखादा शब्द किंवा काही शब्दांचा समूह असू शकतो, जो डॉक्युमेंटमध्ये वारंवार वापरला गेला आहे.
08:19 ही वाक्ये किंवा शब्द परत परत लिहिणे कंटाळवाणे होऊ शकते.
08:24 समजा आपल्या डॉक्युमेंटमध्ये This is a Spoken Tutorial Project हे वारंवार टाईप करायचे आहे.
08:31 याचे आपण संक्षिप्त रूप बनवून ते संपूर्ण वाक्य किंवा शब्दसमूहात बदलू शकतो.
08:38 तर आता आपण बघू की stpहे संक्षिप्त रूप, आपणautomatically Spoken Tutorial Project मध्ये कसे बदलू शकतो.
08:46 आता मेनूबारवरील Format वर क्लिक करूनAutoCorrectया पर्यायावर जा आणि नंतरAutoCorrect Optionsवर क्लिक करा.
08:57 डायलॉग बॉक्समधील Replace टॅबवर क्लिक करा.
09:02 English USA ही भाषा निवडली असल्याची खात्री करा.
09:06 आता Replace फिल्डमध्ये आपल्याला ज्या टेक्स्टला Replace करायचे आहे ते stp असे टाईप करा.
09:14 Withफिल्डमध्ये ज्या टेक्स्टने replace करायचे आहे ते Spoken Tutorial Projectहे टेक्स्ट टाईप करा.
09:20 डायलॉग बॉक्समधील New बटणावर क्लिक करा.
09:24 replacement table मध्ये आपल्याला नवी entry झालेली दिसेल.
09:28 आता OK बटणावर क्लिक करा.
09:31 आता This is a stpहे टेक्स्ट टाईप करा आणि स्पेसबार दाबा. आपल्याला stpहे बदलून तेथे Spoken Tutorial Project झालेले दिसेल.
09:43 जेव्हा आपल्याला डॉक्युमेंटमध्ये एकच text अनेक वेळा टाईप करायचे असते तेव्हा हा पर्याय अतिशय उपयोगी पडतो.
09:49 बदल undo करून घेऊ.
09:52 अशा प्रकारे आपण ह्या स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:57 आपण जे शिकलो ते थोडक्यात.
10:00 Find and Replace, Spell check, AutoCorrect
10:04 आता ASSIGNMENT करू.
10:06 Writer मध्ये This is a new document.The document deals with find and replace हे टेक्स्ट टाईप करा.
10:15 आता Find and Replaceवापरून तुमच्या documentमधील fileहा शब्द शोधा.
10:21 आपल्या डॉक्युमेंटमध्ये text हा शब्द t x t ने रिप्लेस करा.
10:27 हे स्पेलिंग दुरूस्त करून text करण्यासाठी स्पेल चेक या फीचर चा वापर करा.
10:31 default रूपात English(USA) ही भाषा वापरा.
10:36 AutoCorrect फीचरच्या सहाय्याने This is LibreOffice Writerया टेक्स्टसाठी TLW हे abbreviation बनवा आणि त्याचा वापर करून बघा.
10:48 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
10:55 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:59 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम.Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:09 अधिक माहितीसाठी कृपया या संकेतस्थळाला भेट द्या.
11:15 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:19 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे.
11:27 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:38 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana