LibreOffice-Suite-Writer-6.3/C2/Typing-text-and-basic-formatting-in-Writer/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Typing text and basic formatting वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात आपण शिकणार आहोत: |
00:10 | टेक्स्ट Align करणे. |
00:12 | Bullets आणि Numbering यांचा वापर |
00:15 | Cut, Copy आणि Paste या पर्यायांचा वापर
|
00:19 | Bold, Underline आणि Italic या पर्यायांचा वापर |
00:24 | Writer मधील Font name, Font size, Font color या पर्यायांचा वापर |
00:30 | फॉरमॅटिंग फीचर्स: या सुविधा वापरल्याने आपली डॉक्युमेंटस अधिक आकर्षक करता येतात. |
00:37 | साध्या टेक्स्टमधील डॉक्युमेंट्सपेक्षा तुलनेने ही वाचण्यास सुलभ आणि सुवाच्य असतात. |
00:43 | या पाठासाठी मी वापरत आहे- |
00:46 | Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5 |
00:55 | मागील पाठात बनवलेली resume.odt ही फाईल उघडू. |
01:01 | या पानाची फाईल पाठाच्या Code files च्या लिंकमधे दिलेली आहे. |
01:07 | कृपया फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा. |
01:11 | त्या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी तिचा वापर करा. |
01:16 | प्रथम Writer मधे टेक्स्ट कसे अलाईन करायचे ते जाणून घेऊ. |
01:20 | आपण या आधी RESUME हा शब्द लिहून पानाच्या मध्यभागी आणला होता. |
01:26 | आता RESUME हा शब्द पुन्हा सिलेक्ट करा. |
01:31 | आपण LibreOffice विंडोचा आकार बदललेला असल्यास काही icon कदाचित दिसणार नाहीत. |
01:37 | असे लपलेले icons बघण्यासाठी toolbars च्या शेवटी डबल ऍरो आयकॉन क्लिक करा. |
01:44 | Formatting toolbar मधील Align Left आयकॉन क्लिक करा. |
01:49 | RESUME हा शब्द पानाच्या डावीकडे गेलेला दिसेल. |
01:54 | Align Right आयकॉन क्लिक करा.
RESUME हा शब्द पानाच्या उजवीकडे जाईल. |
02:01 | आता Justify आयकॉनवर क्लिक करा. |
02:05 | 'RESUME' तील अक्षरे पानाच्या उजव्या आणि डाव्या मार्जिनच्या मध्ये एकसमान अंतरावर लिहिली जातील. |
02:11 | आपल्याकडे टेक्स्टची पूर्ण ओळ किंवा परिच्छेद असल्यास हे पर्याय अधिक स्पष्ट होतील. |
02:17 | आपण केलेले बदल Resume हे टेक्स्ट मध्यभागी अलाईन केलेले असेपर्यंत undo करा. |
02:23 | Writer मधे undo करण्यासाठी कीबोर्डवरील Ctrl + Z बटणे दाबा.
RESUME हा शब्द डिसिलेक्ट करा. |
02:32 | आता पुढील ओळीवर जाण्यासाठी कीबोर्डवरील Enter दाबा. |
02:37 | आणखी एक ओळ तयार करण्यासाठी पुन्हा एकदा Enter दाबा. |
02:42 | टुलबारवरील Align Left या आयकॉनवर क्लिक करा. |
02:46 | नंतर Bold हा पर्याय डिसेबल करण्यासाठी toolbar वरील bold आयकॉन क्लिक करा. |
02:52 | आता bullets आणि numbering बद्दल जाणून घेऊ. |
02:57 | डॉक्युमेंटमधे स्वतंत्र मुद्दे लिहायचे असल्यास Bullets आणि Numbering वापरतात. |
03:03 | प्रत्येक मुद्द्याची सुरूवात bullet किंवा number ने होते. |
03:07 | Bullets अक्रमित सूचीसाठी वापरतात. |
03:10 | Numbering क्रमित यादीसाठी वापरले जाते. |
03:14 | Formatting toolbar मधे Bullets आणि Numbering हे स्वतंत्र आयकॉन दिसतील. |
03:20 | आता Bullets आयकॉनवर क्लिक करा. |
03:23 | लगेच dot किंवा bullet हे चिन्ह डॉक्युमेंटवर आलेले दिसेल. |
03:28 | a हे अक्षर टाईप करून एंटर दाबा. |
03:32 | आता b हे अक्षर टाईप करून एंटर दाबा. |
03:36 | Numbering आयकॉनवर क्लिक करा. |
03:40 | लगेच bullet चिन्ह बदलून तिथे 1 हा अंक झालेला दिसेल. |
03:45 | c हे अक्षर टाईप करून एंटर दाबा. |
03:49 | d हे अक्षर टाईप करून एंटर दाबा. |
03:53 | यामुळे bullets आणि numbering मधील फरक स्पष्ट होईल. |
03:59 | हे सर्व टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी माऊसचे डावे बटण क्लिक करून ड्रॅग करा. |
04:04 | आता Bullets आणि Numbering ऍक्सेस करण्याची आणखी एक पध्दत पाहू. |
04:09 | प्रथम मेनूबार मधील Format मेनूवर क्लिक करून नंतर Bullets and Numbering पर्यायावर क्लिक करा. |
04:16 | Bullets and Numbering चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:20 | डॉक्युमेंटमधे वापरण्यायोग्य विविध styles वेगवेगळ्या टॅब्जच्या खाली दिलेल्या आहेत. |
04:27 | आधी सिलेक्ट केला नसल्यास Bullets टॅब सिलेक्ट करा. |
04:31 | अनेक bullets styles येथे दिसतील. |
04:34 | मोठे चौरसाकृती bullets निवडा. |
04:37 | आता डायलॉग बॉक्सच्या उजव्या खालील कोपऱ्यातील OK बटण दाबा. |
04:43 | bullet च्या चिन्हात झालेला बदल बघा. |
04:47 | आता Bullets and Numbering डायलॉग बॉक्स पुन्हा उघडून Numbering टॅबवर क्लिक करा. |
04:53 | अनेक numbering styles येथे दिसतील. |
04:57 | आता Roman numerals ही स्टाईल निवडू. |
05:01 | डायलॉग बॉक्सच्या उजव्या खालील कोपऱ्यातील OK बटण क्लिक करा. |
05:07 | numbering मधील बदलांकडे बघा. ते आता Roman numerals रूपात दिसतील. |
05:13 | अशाप्रकारे आपल्या पसंतीची कोणतीही bullets किंवा numbering style वापरू शकतो. |
05:18 | आता कीबोर्डवरील Delete बटण दाबा. |
05:22 | नंतर उर्वरित numbering देखील काढून टाकण्यासाठी कीबोर्डवरील Backspace बटण दाबा. |
05:28 | आता Bullets and Numbering चा डायलॉग बॉक्स पुन्हा उघडू. Numbering टॅबवर क्लिक करा. |
05:34 | आता दुसऱ्या style वर क्लिक करून
OK बटणावर क्लिक करा. |
05:40 | आता पहिला मुद्दा लिहिण्यासाठी तयार आहोत. |
05:44 | टाईप करू NAME colon space RAMESH आणि Enter दाबा. |
05:51 | यापुढे प्रत्येक मुद्द्यानंतर Enter दाबा. |
05:56 | पुढील bullet point हा पुढचा नवा number दर्शवेल. |
06:00 | आता Resume मधील दुसरा मुद्दा म्हणून “FATHER’S NAME” colon MAHESH असे टाईप करा. |
06:06 | तिसरा मुद्दा म्हणून MOTHER’S NAME colon SHWETAअसे टाईप करा. |
06:10 | येथे दाखवल्याप्रमाणे पुढील दोन मुद्दे टाईप करा. |
06:15 | Ctrl + S बटणे एकत्रितपणे दाबून फाईल सेव्ह करा. |
06:20 | काम करत असताना फाईल वारंवार सेव्ह करणे ही चांगली सवय आहे. |
06:25 | सूचीमधे bullets किंवा numbers चे अनेक स्तर असू शकतात. |
06:30 | ते आपण निवडलेल्या फॉरमॅटवर अवलंबून असते. |
06:33 | त्याचे प्रात्यक्षिक पाहू. |
06:36 | FATHERS OCCUPATION या चौथ्या मुद्द्यावर जा. |
06:40 | colon च्या पुढे माऊसचा कर्सर ठेवा आणि Enter दाबा. |
06:45 | एकदा Tab हे बटण दाबा. |
06:48 | लगेच 5 हा क्रमांक नवीन Bullet list मधे रूपांतरित होईल आणि तो क्रमांक 4 खाली इंडेंट होईल. |
06:55 | bullet point च्या शेवटी कर्सर नेऊन Enter दाबा. |
07:00 | SELF EMPLOYED टाईप करून Enter दाबा. |
07:05 | Indentation कमी करण्यासाठी Shift + Tab ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
07:10 | पुढचा मुद्दा एक ओळ वर येईपर्यंत Delete की दाबा. |
07:15 | पाचव्या क्रमांकाच्या मुद्द्याच्या शेवटी कर्सर नेऊन Enter दाबा.
सूचीत No. 6 आलेला दिसेल. |
07:23 | Bullets and Numbering काढण्यासाठी Bullets and Numbering चा डायलॉग बॉक्स पुन्हा उघडा. |
07:28 | खाली असलेले Remove बटण क्लिक करा. |
07:32 | नवीन ओळीवरील टेक्स्टसाठी आता bullet and numbering style आली नसल्याचे दिसेल. |
07:38 | formatting toolbar मधील bullets आणि numbering चे क्विक ऍक्सेस आयकॉन तुम्ही स्वतः वापरून बघा. |
07:45 | डॉक्युमेंटमधे NAME हा शब्द आपण तीन वेळा टाईप केला आहे. |
07:50 | एकच टेक्स्ट वारंवार टाईप करण्याऐवजी Writer मधील Copy आणि Paste हे पर्याय वापरू शकतो. |
07:57 | आता हे कसे करायचे ते जाणून घेऊ. |
08:00 | प्रथम MOTHER’S NAME या टेक्स्टमधील NAME शब्द डिलीट करा. |
08:05 | FATHER’S NAME मधील NAME शब्द सिलेक्ट करा. |
08:09 | mouse चे उजवे बटण दाबून Copy पर्याय निवडा. |
08:13 | MOTHER’S हे टेक्स्ट आणि colon हे चिन्ह यामधे माऊसचा कर्सर ठेवा. |
08:18 | mouse चे उजवे बटण दाबून Paste पर्याय क्लिक करा. |
08:22 | NAME शब्द आपोआप पेस्ट झालेला दिसेल. |
08:27 | copy साठी Ctrl+C आणि paste साठी Ctrl+V या shortcut keys वापरल्या जातात. |
08:35 | डॉक्युमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात टेक्स्टची पुनरावृत्ती करायची असल्यास ही पध्दत खूप उपयोगी होते. |
08:40 | अशा वेळी पूर्ण टेक्स्ट वारंवार लिहिण्याची गरज नाही. आपण केवळ कॉपी आणि पेस्ट करू शकतो. |
08:47 | Writer मधे Copy सारखेच Cut हे फीचर आहे. |
08:52 | त्याचे प्रात्यक्षिक पाहू. |
08:55 | प्रथम MOTHER’S NAME या टेक्स्टमधून NAME हा शब्द डिलीट करा. |
09:00 | आता FATHER'S NAME मधून NAME हा शब्द सिलेक्ट करा. |
09:04 | राईट क्लिक करून Cut पर्याय निवडा. |
09:07 | FATHER’S या शब्दाच्या पुढे NAME हा शब्द राहिलेला नसल्याचे दिसेल. |
09:13 | म्हणजेच तो शब्द कट किंवा डिलीट झालेला आहे. |
09:17 | MOTHER’S या टेक्स्टच्या आणि colon या चिन्हाच्या मधे माऊसचा कर्सर ठेवा. |
09:21 | mouse चे उजवे बटण दाबा आणि Paste पर्याय निवडा. |
09:26 | MOTHER’S या शब्दापुढे आता NAME शब्द पेस्ट झालेला दिसेल. |
09:32 | Ctrl+X ही cut करण्याची शॉर्टकट की आहे. |
09:36 | अशाचप्रकारे FATHER’S नंतर देखील हा शब्द पेस्ट करता येतो. |
09:41 | Cut आणि Paste फीचर डॉक्युमटेमधे, टेक्स्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी सोयीचे आहे. |
09:48 | टेक्स्ट कॉपी आणि कट करण्याच्या क्रियांमध्ये एकच फरक असतो. तो म्हणजे कॉपी करताना शब्द मूळ जागेवर तसाच राहतो तर कट करताना शब्द मूळ जागेवरून पूर्णपणे काढून टाकला जातो. |
10:03 | माऊसचा कर्सर document च्या शेवटपर्यंत न्या.
दोन वेळा Enter दाबा. |
10:09 | आता EDUCATION DETAILS हे नवे heading टाईप करा. |
10:14 | आता कुठल्याही टेक्स्टचे Font name आणि Font size बदलणे किंवा वापरणे याविषयी जाणून घेऊ. |
10:20 | आधी आपण UnDotum हे font name निवडले होते. |
10:25 | त्यामुळे Font name फिल्डमधे UnDotum दिसेल. |
10:29 | आता EDUCATION DETAILS या heading साठी वेगळा Font आणि Size वापरू. |
10:34 | प्रथम EDUCATION DETAILS हे टेक्स्ट सिलेक्ट करून मग Font Name या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. |
10:43 | Liberation Sans शोधून त्यावर क्लिक करा. |
10:47 | सध्या Font Size फिल्ड 14 दर्शवत आहे. |
10:51 | तो बदलून 11 करू. |
10:54 | टेक्स्टचा Font size कमी झाला आहे. |
10:58 | आता Font Color बद्दल जाणून घेऊ. |
11:01 | टेक्स्ट अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा. |
11:05 | Font Color च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करून green रंग निवडा. |
11:11 | आता heading चा रंग green झालेला दिसेल. |
11:16 | Bold, Italic आणि Underline आयकॉन्सवर क्लिक करा. |
11:22 | आपल्या टेक्स्टसाठी आवश्यकतेनुसार या टेक्स्ट फॉरमॅटचे कोणतेही काँबिनेशन वापरू शकतो. |
11:29 | फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl + S दाबा.
नंतर उजव्या कोपऱ्यात वरती X या आयकॉनवर क्लिक करून फाईल बंद करा. |
11:36 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
11:42 | या पाठात आपण शिकलो: |
11:45 | टेक्स्ट Align करणे. |
11:47 | Bullets आणि Numbering यांचा वापर
Cut, Copy आणि Paste या पर्यायांचा वापर |
11:53 | Bold, Underline आणि Italic या पर्यायांचा वापर |
11:57 | Writer मधील Font name, Font size, Font color या पर्यायांचा वापर |
12:02 | असाईनमेंट म्हणून:
practice.odt फाईल उघडा. |
12:07 | Bullets and Numbering ऍक्टिव्हेट करा. |
12:10 | कोणतीही style निवडा आणि काही ओळी टाईप करा. |
12:14 | काही टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचे Font name बदलून ते "Free Sans” करा. |
12:18 | त्याचा Font size 16 करा. |
12:22 | टेक्स्ट Italic करा. |
12:25 | Font color बदलून तो red करा. |
12:28 | फाईल सेव्ह करून बंद करा. |
12:31 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
12:38 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
12:47 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
12:51 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
12:56 | DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.
|
13:02 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |