LibreOffice-Suite-Writer-6.3/C2/Tables-and-table-properties-in-Writer/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Table and table properties वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोतः
00:12 Writer डॉक्युमेंटमधे table समाविष्ट करणे.
00:15 rows आणि columns समाविष्ट करून त्यात बदल करणे.
00:18 आपल्या आवडीनुसार table properties समायोजित करणे.
00:23 या पाठासाठी मी वापरत आहे-

Ubuntu Linux OS 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5

00:36 या पाठाच्या पानावर Code files लिंकमधे दोन फाईल्स दिलेल्या आहेत.

कृपया फाईल्स डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.

00:46 त्या फाईल्सची कॉपी बनवून सरावासाठी त्यांचा वापर करा.
00:50 पूर्वी तयार केलेली Resume.odt ही फाईल उघडा.
00:56 Writer डॉक्युमेंटमधे Tables कशी समाविष्ट करायची हे जाणून घेऊ.
01:02 EDUCATION DETAILS च्या शेवटी कर्सर ठेवून Enter दाबा.
01:08 डॉक्युमेंटमधे table समाविष्ट करण्यासाठी Standard toolbar वरील Insert table आयकॉनवर क्लिक करा.
01:15 आता table चा आकार म्हणजेच तुम्हाला हव्या असलेल्या rows आणि columns ची संख्या निवडा.
01:22 2X4 (2 by 4) हा पर्याय निवडू जो 4 rows आणि 2 columns देईल.
01:30 आता Writer डॉक्युमेंटमधे table समाविष्ट करण्याची दुसरी पध्दत पाहू.
01:36 त्यापूर्वी केलेले बदल undo करण्यासाठी Ctrl + Z दाबा.
01:43 menu bar मधील Table menu वर क्लिक करून नंतर Insert table पर्यायावर क्लिक करा.
01:51 विविध fields असलेला Insert Table चा डायलॉग बॉक्स उघडेल.
01:56 Name फिल्डमधे Resumetable असे table चे नाव टाईप करा.
02:02 Columns ची संख्या आपण 2 ठेवत आहोत.
02:06 Rows फिल्डमधे Plus या बटणावर क्लिक करून rows ची संख्या वाढवा.
02:13 Minus बटणाच्या सहाय्याने ती संख्या कमी करा.

ही संख्या परत 3 वर आणू.

02:20 त्याखाली Styles ची सूची दिसेल.
02:24 आपल्याला हवे असल्यास या सूचीतून table साठी style निवडू शकतो.
02:30 आता Default Style पर्यायावर क्लिक करू.
02:35 नंतर उजवीकडे खाली असलेल्या Insert बटणावर क्लिक करा.
02:40 EDUCATION DETAILS खाली दोन columns आणि तीन rows असलेले table समाविष्ट होईल.
02:47 आता टेबलमधे tabular म्हणजेच सारणी स्वरूपात कोणतीही माहिती टाईप करू शकतो.
02:53 खालील नव्या toolbar चे निरीक्षण करा.
02:57 येथे table फीचर्ससाठी नेहमी वापरले जाणारे शॉर्टकटस आहेत.
03:02 आता table च्या पहिल्या column आणि पहिल्या row मधील cell मधे क्लिक करा.
03:08 येथे Secondary School Examination असे टाईप करा.
03:13 आता त्याच्या शेजारील cell वर क्लिक करून त्यात 93 % टाईप करा.
03:19 येथे दाखवल्याप्रमाणे table मधे इतर शैक्षणिक तपशील टाईप करा.
03:25 नवी row समाविष्ट करण्यासाठी खालील table toolbar मधील Rows below आयकॉन वापरा.
03:33 आपण table च्या शेवटच्या row मधे असताना कीबोर्डवरील Tab की दाबा.

यामुळे table मधे आणखी एक row समाविष्ट होईल.

03:43 पहिल्या column मधील दुसऱ्या row वर क्लिक करा.
03:47 एका cell मधून पुढील cell मधे जाण्यासाठी Tab बटण दाबा.
03:52 cell मधून मागील cell मधे जाण्यासाठी Shift + Tab कीज दाबा.
03:57 शेवटच्या row मधील पहिल्या column मधे PhD CSE आणि दुसऱ्या column मधे 2015 असे टाईप करा.
04:07 tables चे एक महत्त्वाचे फीचर म्हणजे rows आणि columns चे आकार बदलता येणे.
04:13 अनेक पध्दतीने table मधील rows आणि columns ची उंची आणि रुंदी समायोजित करता येते.
04:21 cursor च्या सहाय्याने बॉर्डर ड्रॅग करून column ची रुंदी आपण वाढवू शकतो.

तसेच ती कमी देखील करू शकतो.

04:32 हेच row च्या उंचीसाठी देखील करता येते.
04:36 आता दुसऱ्या column मधील कुठल्याही row मधे cursor ठेवून क्लिक करा.
04:42 नंतर Menu toolbar मधील Table menu वर क्लिक करून Size पर्यायावर क्लिक करा.
04:49 आता Minimize Column Width हा उपपर्याय निवडूया.
04:54 column ची रुंदी आपोआप समायोजित होईल.
04:59 निवडलेल्या column च्या cells मधील मजकूराशी रुंदी जुळवून घेतली जाते.
05:04 आता tables शी संबंधित काही सोप्या युक्त्या शिकू या.
05:08 या प्रात्यक्षिकासाठी Table-demo.odt ही फाईल वापरणार आहे.
05:16 Writer मधे पूर्वी डाऊनलोड केलेली Table-demo.odt ही फाईल उघडा.
05:24 आपल्याकडे दोन columns आणि पाच rows असलेले table आहे.
05:29 संपूर्ण column सिलेक्ट करण्यासाठी table मधील column च्या वरच्या भागात cursor न्या.
05:35 आता cursor खालची दिशा दाखवणाऱ्या बाणात बदलेल.
05:39 आता माऊसचे डावे बटण दाबा. संपूर्ण column सिलेक्ट होईल.
05:45 आता Centre Align या आयकॉनवर क्लिक करून टेक्स्ट मध्यभागी align करा.
05:51 या column मधील संपूर्ण टेक्स्ट मध्यभागी align होईल.
05:55 आता column डिसिलेक्ट करण्यासाठी डॉक्युमेंटवर कुठेही क्लिक करा.
05:59 आता table च्या डाव्या कोपऱ्यात वरती cursor न्या.
06:04 आता cursor खालची दिशा दाखवणाऱ्या तिरप्या बाणात बदलेल.
06:08 माऊसचे डावे बटण क्लिक करा.

संपूर्ण table सिलेक्ट होईल.

06:14 टेबल डिसिलेक्ट करण्यासाठी डॉक्युमेंटवर कुठेही क्लिक करा.
06:18 table मधे कोणत्याही cell मधे क्लिक करा.
06:22 आता toolbar मधील Select Table आयकॉनवर क्लिक करून संपूर्ण table सिलेक्ट करा.
06:29 menu bar मधील Table menu वर क्लिक करून Properties पर्याय निवडा.
06:35 किंवा table toolbar मधील Table Properties आयकॉनवर क्लिक करा.
06:41 कोणत्याही पध्दतीने Table Properties चा डायलॉग बॉक्स उघडेल.

येथे अनेक टॅब्ज आणि अनेक पर्याय दिसतील.

06:50 सर्वात उजवीकडे Alignment हा पर्याय Automatic वर सेट केलेला आहे.
06:55 प्रथम तो बदलून Left पर्याय निवडू.
06:58 असे केल्यावर डायलॉग बॉक्समधील इतर डिसेबल असलेले पर्याय एनेबल झाले आहेत.
07:04 आता या table ला MyTable1 असे नाव देऊन त्याचे Width फिल्ड 12cm करू या.
07:12 डायलॉग बॉक्सच्या खालील भागातील OK बटण दाबा.
07:17 columns चा आकार बदललेला दिसेल.
07:21 पुन्हा table च्या कोणत्याही cell मधे क्लिक करा.
07:26 पुन्हा table toolbar मधील Table Properties आयकॉनवर क्लिक करा.
07:31 Column टॅबवर क्लिक करा.
07:34 Column Width भागात खाली फक्त 1 आणि 2 हे पर्याय एनेबल झालेले आहेत.

कारण आपल्या table मधे केवळ दोन columns आहेत.

07:46 येथे column 2 ची व्हॅल्यू बदलून 10cm करा.
07:52 Adjust columns proportionally या चेकबॉक्सवर क्लिक करा.
07:57 उजव्या कोपऱ्यातील खालील OK बटण क्लिक करा.
08:02 column 2 चा आकारात झालेला बदल पहा.
08:06 table toolbar मधील Select Table आयकॉनवर क्लिक करा.
08:11 table toolbar मधील Optimize Size वर क्लिक करा.
08:16 rows आणि columns ची रुंदी समायोजित करण्यासाठी हा शॉर्टकट आयकॉन आहे.
08:21 Distribute Columns Evenly पर्याय सिलेक्ट करा.
08:25 आता columns सारख्याच रुंदीचे झाले आहेत.
08:29 cursor च्या सहाय्याने बॉर्डर ड्रॅग करून आपण column ची रुंदी वाढवू शकतो.

तसेच रुंदी कमी देखील करू शकतो.

08:40 आपण हे row च्या उंचीसाठी देखील करू शकतो.
08:44 आता table मधील cells वर कार्य कसे करायचे ते पाहू.
08:49 दुसऱ्या column आणि तिसऱ्या row मधील cell च्या मधे क्लिक करा.
08:54 आता Shift आणि Ctrl दाबून ठेवून cursor ला column च्या डावीकडील बॉर्डरवर न्या.
09:01 येथे दाखवल्याप्रमाणे माऊसच्या सहाय्याने बॉर्डर डावीकडे ड्रॅग करा.

विशिष्ट cell चीच बॉर्डर सरकेल.

09:11 आता cells विभाजन आणि एकत्रीकरण याबद्दल जाणून घेऊ.
09:16 दुसरा column आणि तिसऱ्या row मधील cell च्या मधे क्लिक करा.
09:21 table toolbar मधील Split Cells आयकॉनवर क्लिक करा.
09:26 काही पर्याय असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
09:30 Split cell into या फिल्डमधे 3 ही व्हॅल्यू निवडणार आहोत.
09:35 Direction फिल्डमधे Vertically हा पर्याय निवडून OK वर क्लिक करा.
09:42 ही cell तीन समान cells मधे विभागली गेली आहे.
09:46 आता तीन cells सिलेक्ट करू आणि table toolbar मधील Merge Cells आयकॉन क्लिक करू.

तीन cells एकत्र झाल्या आहेत.

09:56 Writer च्या table मधील cells चे विभाजन आणि एकत्रीकरण असे करता येते.
10:01 column 2 आणि row 3 या cell मधे परत एकदा क्लिक करा.
10:07 table toolbar च्या Split Table आयकॉनवर क्लिक करून आपण table चे दोन भागही करू शकतो.
10:14 उघडलेल्या डायलॉग बॉक्समधे काही पर्याय दिलेले आहेत.
10:18 आपण निवडलेल्या पर्यायांप्रमाणे table चे विभाजन होईल.
10:23 प्रथम No heading निवडून OK बटण क्लिक करू.
10:28 table दोन tables मधे विभागले जाईल.

ही कृती Undo करण्यासाठी Ctrl + Z की दाबा.

10:35 परत एकदा column 2 आणि row 3 या cell मधे क्लिक करा.
10:41 table toolbar मधील Split Table आयकॉन क्लिक करा.
10:45 Copy heading पर्याय निवडून OK बटण क्लिक करू.
10:50 table दोन tables मधे विभागली जाऊन column ची headings तीच राहतील.
10:55 आता alignment चे आणखी काही पर्याय पाहू.
10:59 तत्पूर्वी दुसऱ्या table’s heading row ची खालील row border खाली ड्रॅग करा.
11:05 येथे दाखवल्याप्रमाणे संपूर्ण header row सिलेक्ट करा.
11:09 आता table toolbar मधील cell चे alignment पर्याय बघा.
11:15 डिफॉल्ट रूपात Align Top हा पर्याय निवडलेला आहे.
11:18 Align Bottom आणि Centre Vertically वर क्लिक करून cell मधील टेक्स्टची alignment बघा.
11:25 cell च्या पार्शवभूमीला रंग देण्यासाठी प्रथम cell मधे क्लिक करा.
11:30 table toolbar, मधे Table Cell Background Color आयकॉन क्लिक करा.
11:35 हायलाईट करण्यासाठी Yellow हा डिफॉल्ट रंग आहे.
11:38 पूर्ण कलर पॅलेट उघडण्यासाठी आयकॉनच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा.

येथे तुम्ही इतर रंग निवडू शकता.

11:48 Background Color आयकॉनच्या पुढे Autoformat Styles चा आयकॉन दिसेल.
11:54 AutoFormat चा डायलॉग बॉक्स उघडेल.
11:57 येथे styles चे विविध पर्याय दिसतील जे आपल्या table ला लागू करू शकतो.
12:03 Cancel बटण क्लिक करा.
12:06 table toolbar मधे,

Borders, Border styles, Border colours निवडण्यासाठी विविध आयकॉन्स दिसतील.

12:15 table toolbar मधे numerical formats च्या शॉर्टकटचे आयकॉन्स देखील आहेत.
12:21 हे सर्व पर्याय स्वतः वापरून बघा.
12:24 Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा.

नंतर वरती उजव्या कोपऱ्यात X आयकॉन क्लिक करून फाईल बंद करा.

12:32 अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
12:36 या पाठात शिकलो:

Writer डॉक्युमेंटमधे table समाविष्ट करणे.

12:42 rows आणि columns समाविष्ट करून त्यात बदल करणे.
12:46 आपल्या आवडीनुसार table properties समायोजित करणे.
12:50 असाईनमेंट म्हणून,

practice.odt फाईल उघडा.

12:54 3 rows आणि 2 columns असलेले table समाविष्ट करा.
12:58 columns मधे Column One आणि Column Two अशी हेडिंग्ज समाविष्ट करा.
13:03 table च्या सर्व cells मधे काही टेक्स्ट टाईप करा.

फाईल सेव्ह करून बंद करा.

13:10 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

13:18 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

13:27 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
13:31 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13:36 या पाठाचे स्क्रिप्ट तयार करण्यात IIT Bombay च्या Nancy Varkey यांचे योगदान आहे.

ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali