LibreOffice-Suite-Math/C2/Using-Greek-characters-Brackets-Steps-to-Solve-Quadratic-Equation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 लिबर ऑफीस Math वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
00:04 या ट्यूटोरियल मध्ये आपण खालील विषय पाहु:
00:08 ग्रीक चिन्हांचा वापर करणे जसे की alpha, beta, theta आणि pi.
00:15 कंस वापरुन वर्ग समीकरण सोडविण्याच्या पायऱ्या लिहिणे.
00:21 Math चा वापर करून ग्रीक चिन्ह लिहीणे शिकू.
00:26 या साठी, चला सर्व प्रथम आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले राइटर डॉक्युमेंट उदाहरण MathExample1.odt उघडू .
00:41 Gray बॉक्स वर ज्यामध्ये आपण सूत्र लिहिले होते त्यावर डबल क्लिक करा
00:47 हे Math Formula Editor आणि Elements window उघडेल.
00:54 Formula Editorविंडो च्या किनार वर क्‍लिक करून त्यास बरोबर ठिकाणी ड्रॅग आणि ड्रॉप करू.
01:02 हे अधिक चांगल्या दृश्यतेसाठी राइटर विंडो वाढविते.
01:07 आता, ग्रीक चिन्ह उदाहरणार्थ- alpha, beta, theta आणि pi गणितीय सूत्रा मध्ये समान आहेत.
01:16 परंतु आपल्याला हे चिन्ह Elements विंडो मध्ये आढळणार नाही.
01:21 आपण (percentage)% चिन्हाच्या पुढे इंग्रजी मधील शब्द लिहून त्यास प्रत्यक्षात लिहु शकतो.
01:30 उदाहरणार्थ pi लिहिण्यासाठी केवळ Formula Editorमध्ये  %pi टाइप करा.
01:40 लहान कॅरक्टर मध्ये लिहिण्यासाठी, कॅरक्टर चे नाव लहान अक्षरात लिहा.
01:47 उदाहरणार्थ- alpha लहान अक्षरात लिहिण्यासाठी,  %alpha किंवा  %beta टाइप करा.
01:59 मोठ्या कॅरक्टर मध्ये लिहिण्यासाठी, कॅरक्टर चे नाव मोठ्या अक्षरात लिहा.
02:06 उदाहरणार्थ- gamma मोठ्या अक्षरात लिहिण्यासाठी, %GAMMA किंवा %THETA टाइप करा.
02:17 ग्रीक चिन्ह एंटर करण्याची इतर पद्धत म्हणजे, Tools मेन्यू वरुन Catalog चा वापर करणे होय.
02:26 Symbol set खाली Greek निवडा.
02:31 आणि सूची मधून Greek अक्षरावर डबल क्लिक करा.
02:35 लक्ष द्या ग्रीक अक्षरासाठी मार्कअप alphaआहे, जे सूची खाली दर्शित आहे.
02:43 तर अशा प्रकारे, सूत्रा मध्ये ग्रीक अक्षरांचा परिचय करून देऊ शकतो.
02:49 इतर ग्रीक अक्षरांकरिता मार्कअप जाणून घेण्यासाठी Symbols कॅटलोग चा शोध घ्या.
02:56 आता आपल्या सूत्रा मध्ये कंसा (Brackets) चा वापर करणे शिकू.
03:02 Math ला सूत्रा च्या क्रियांच्या अनुक्रमाबद्दल माहिती नसते.
03:07 आपल्याला क्रियांच्या अनुक्रमास नमूद करण्यासाठी कंसाचा वापर कारवा लागेल.
03:13 उदाहरणार्थ, ‘प्रथम x आणि y जोडा, नंतर उत्तरास 5 ने भागा , यास आपण कसे लिहु?
03:22 आपण ‘ 5 over x + y 'टाइप करू शकतो .
03:28 आपल्याला खरोखर हेच लिहायचे होते का?
03:32 नाही, प्रथम आपल्यास xआणि y जोडायचा होता, आता हे आपण xआणि yच्या आजूबाजूस कर्ली कंस लावून करू शकतो.
03:44 आणि आता मार्कअप कर्ली कंसा मध्ये अशा प्रकारे दिसेल : ‘5 over x+y'
03:52 तर, कंसाचा वापर करणे, हे सूत्रा मध्ये क्रियांच्या अनुक्रमास सेट करण्यास मदत करते.
03:58 चला सर्वात वर असलेल्या File मेन्यू चा वापर करून आणि Save निवडून आपण केलेले कार्य सेव करू.
04:08 चला आता वर्गसमीकरण सोडविण्या करीता पायऱ्या लिहु.
04:13 आपण Control + Enter दाबून Writerडॉक्युमेंट मधील नवीन पेज वर जाउया.
04:21 : ‘Solving a Quadratic Equation’ टाइप करू.
04:25 Insert>Object>Formulaमेन्यू वरुन Math घेऊ.
04:33 वेळेची बचत करण्यासाठी, मी अगोदरच वर्गसमीकरण टाइप केले आहे, मी त्यास कट आणि पेस्ट करते.
04:42 तर हे आहे वर्गसमीकरण ज्यास आपण सोडवू , x squared - 7 x + 3 = 0
04:53 यास सोडविण्यासाठी, स्क्रीन वर दर्शविलेल्या वर्गसमीकरण सूत्राचा वापर करू शकतो.
04:59 येथे, ‘a’ x squred शब्दाचा गुणांक आहे , ‘b’ x शब्दाचा गुणांक आहे आणि ‘c’ कॉन्स्टेंट(constant) आहे.
05:11 आणि आपण सूत्रा मध्ये aसाठी 1 , bसाठी 7 , आणि c साठी 3 ठेवून समीकरण सोडवू शकतो.
05:23 सर्व प्रथम वर्गसमीकरण, जे आपल्याला सोडवायचे आहे त्यासाठी मार्कअप लिहु.
05:30 प्रथम आपण Insert>Object>Formulaमेन्यू वरुन Math घेऊ.
05:39 Format Editor विंडो मध्ये, खालील मार्कअप टाइप करू:
05:46 x squared minus 7 x plus 3 = 0
05:53 अधिक चांगल्या वाचनियतेसाठी रिकामी लाइन एंटर करण्यासाठी दोन newlines लिहु.
06:01 Enter दाबा आणि ‘Quadratic Formula: टाइप करा ‘. Enterदाबा.
06:07 किचकट सूत्रास सोडविण्याची एक चांगली पद्धत ही आहे की, सूत्रा च्या सर्वात अंतर्गत एलिमेंट्स पासून सुरवात करणे.
06:16 आणि नंतर आपण या Elementsच्या आजूबाजूस आपल्या पद्धतीने कार्य करू शकतो.
06:21 आपण सर्व प्रथम अंतर्गत अधिक स्क्वेर रूट फंक्शन लिहुया.
06:27 आणि मार्कअप आहे- कर्ली कंसात ‘square root of b squared - 4ac’
06:37 नंतर आपण वरील पदावली मध्ये ‘minus b plus or minus’ जोडू आणि त्यास कर्ली कंसात ठेवू.
06:48 मी इतर कर्ली कंसाचा सेट जोडुन वरील पदावलीस अंश बनविते.
06:57 आणि पदावलीत ‘over 2a’ जोडा.
07:02 आणि अखेर सुरवातीस ‘x equals’ जोडा.
07:08 ‘equal to’ सिंबल च्या आजूबाजूस दोन मोठ्या अंतर सहित.
07:13 आणि हे आहे वर्ग( quadratic) सूत्र.
07:16 अशा प्रकारे आपण किचकट सूत्रा चे विघटन करून त्यास भागा-भागां मध्ये ठेवू शकतो.
07:22 चला उरलेल्या टेक्स्ट ला Formula Editor विंडो मध्ये खालील प्रमाणे लिहुया.
07:29 ‘Where ‘a’ is the coefficient of the x squared term, b is the coefficient of the x term, c is the constant.’ त्या नंतर newline.
07:43 आणि टाइप करा : ‘We can solve the equation by substituting 1 for a, -7 for b, 3 for c’ त्या नंतर दोन newline.
07:59 प्रतियोजन नंतरचा मार्कअप स्क्रीन वर अशा प्रकारे दिसेल.
08:05 समीकरणा मध्ये वाटोळे कंसाचा वापर करून आपण क्रमांकास प्रतीयोजित केले आहे.
08:12 तुमच्या साठी assignmentआहे.
08:15 वर्गसमीकरण सोडविण्यासाठी उरलेल्या स्टेप्स पूर्ण करा.
08:20 दोन निष्कर्ष वेग-वेगळे दर्शवा.
08:23 alignments आणि spacing बदलून स्टेप्स फॉरमॅट करा.
08:28 जेथे आवश्यक आहे तेथे, मोठे अंतर आणि newlineजोडा.
08:33 खालील सूत्र लिहा: 'pi is similar or equal to 3.14159’
08:43 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
08:52 संक्षिप्त रूपात आपण खालील विषय शिकलो.
08:56 ग्रीक चिन्हांचा वापर करणे जसे की alpha, beta, theta आणि pi.
09:01 कंस वापरुन वर्गसमीकरण सोडविण्याच्या पायऱ्या लिहिणे.
09:07 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
09:12 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
09:19 हा प्रॉजेक्ट contact@spoken-tutorial.org द्वारे समन्वित आहे.
09:24 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
09:29 या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya