LibreOffice-Suite-Calc/C3/Images-and-Graphics/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 लिबर ऑफीस कॅल्क मध्ये इमेजस निविष्ट करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण खालील बाबी शिकू.
00:09 डॉक्युमेंट्स मध्ये इमेज फाइल निविष्ट करणे.
00:13 उदाहरणार्थ jpeg, png किंवा bmp.
00:19 येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरत आहोत.
00:28 स्प्रेडशीट मध्ये इमेजस खालील प्रमाणे जोडू शकतो.

इमेज फाइल प्रत्यक्षात निविष्ट करणे. ग्रॅफिक्स प्रोग्रॅम, द्वारे क्लिपबोर्ड च्या मदतीने किंवा, गॅलरी द्वारे.

00:39 प्रत्येका बद्दल विस्तारीत चर्चा करूया.
00:43 चला आपली “Personal-Finance-Tracker.ods” स्प्रेडशीट उघडुया.
00:48 प्रथम, sheet 2 निवडू.
00:51 आपण या शीट मध्ये इमेजस निविष्ट करूया.
00:54 अगोदर सेल निवडून नंतर पिक्चर निविष्ट करणे हा चांगला सराव आहे.
00:59 तुमच्या कंप्यूटर मध्ये इमेजस अगोदरच संग्रहीत आहेत तर, प्रथम “Insert” वर क्लिक करून,
01:06 नंतर “Picture” आणि “From File” निवडून निविष्ट करू शकता.
01:10 आता इमेज शोधा जी तुम्हाला निविष्ट करायची आहे.
01:14 मी अगोदरच डेस्कटॉप वर “Images” नावाच्या फोल्डर मध्ये काही इमेजस संग्रहीत केल्या आहेत.
01:20 “Image1” निवडते.
01:24 आपण “Location” फील्ड मध्ये इमेज चे नाव पाहु.
01:28 “Open” बटना वर क्लिक करूया.
01:31 स्प्रेडशीट मध्ये दिसणारी इमेज पहा. <pause>
01:38 यास जोडुन आणखीन एक पिक्चर निविष्ट करू.
01:42 प्रथम नवीन सेल निवडू.
01:45 आता, “Insert” आणि “Picture” वर क्लिक करा आणि “From File” निवडा. आणखीन इमेज निवडू.
01:55 आता, “Image 2” वर क्लिक करा.
01:58 डॉक्युमेंट्स मध्ये इमेज जोडण्यासाठी, “Link” पर्याय तपसा आणि “Open” वर क्लिक करा.
02:05 डायलॉग बॉक्स मध्ये, “Keep Link” बटना वर क्लिक करा.
02:11 पिक्चर आता फाइल मध्ये जोडला आहे.
02:15 लिंकिंग (जोडणे)....
02:17 जेव्हा आपण फाइल लिंक करतो प्रथम हे स्प्रेडशीट चा आकार कमी करते, जेव्हा ही सेव होते.
02:23 त्यापासून आपली स्प्रेडशीट इमेज समाविष्ट करत नाही.
02:27 दुसरे, हे प्रयोगकर्ता ला दोन्ही फाइल्स स्वतंत्र पणे बदल करण्यास सक्षम बनविते.
02:32 इमेज फाइल मध्ये केलेला कोणताही बदल,स्प्रेडशीट मधील लिंक्ड इमेज वर प्रदर्शित होईल.
02:39 आता, Image 2,चा रंग बदलू, जी ग्रेस्केल मधून फाइल ला जोडली आहे.
02:46 मी हा पिक्चर एडिट करण्यासाठी GIMP पिक्चर एडिटर वापरत आहे.
02:50 तुम्ही तुमच्या मशीन वर प्रतिष्ठापित केलेला कोणताही एडिटर वापरु शकता.
02:54 प्रथम, "Personal-Finance-Tracker.ods" सेव करून बंद करू.
03:01 नंतर इमेज फोल्डर वर जा.
03:04 "Image 2" निवडा.
03:06 आता राइट-क्लिक करून Open with GIMP निवडा.
03:10 GIMP मध्ये Image 2 उघडेल.
03:13 आता इमेज ला color वरुन greyscale मध्ये करूया.
03:18 आता हि इमेज सेव करून बंद करूया.
03:22 आता Personal-Finance-Tracker.ods उघडू.
03:26 ग्रेस्केल मध्ये Image 2 प्रदर्शित आहे.
03:30 तरीही, फाइल लिंक करण्याचा एक मोठा तोटा असा आहे की,जेव्हाही ही स्प्रेडशीट इतर कंप्यूटर किंवा प्रयोगकर्ता ला पाठवायची असेल तर,
03:40 तुम्हाला स्प्रेडशीट आणि इमेज फाइल दोन्ही सोबत पाठवावी लागेल.
03:44 याचा अर्थ, तुम्हाला नेहेमी त्या स्थानाची माहीत असायाला हवी जेथे तुम्ही दोन्ही फाइल्स संग्रहीत केल्या आहेत.
03:52 या इमेज ला स्प्रेडशीट च्या उजव्या बाजूस हलवू.
03:58 स्प्रेडशीट मध्ये इमेज निविष्ट करण्याची आणखीन एक पद्धत म्हणजे, फोल्डर वरुन ड्रॅग करणे,
04:05 जेथे तुम्ही इमेज संग्रहीत केली आहे आणि त्यास तुमच्या स्प्रेडशीट वर ड्रॉप करून.
04:09 चला इमेज ड्रॅग आणि ड्रॉप करू.
04:12 आता इमेज फाइल ला तुमच्या स्प्रेडशीट मध्ये प्रत्यक्षात ड्रॅग आणि ड्रॉप करा, जेथे तुम्हाला ठेवायची आहे तेथे.
04:19 तुम्ही पहाल की, इमेज तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये निविष्ट आहे झाली.
04:23 या बदलास CTRLआणि Z दाबून अंडू करू.
04:29 आता ड्रॅग आणि ड्रॉप पद्धत वापरुन इमेज लिंक करूया.
04:34 हे सुद्धा सोपे आहे, स्प्रेडशीट मध्ये इमेज ड्रॅग करत असल्यास,
04:40 केवळ “Control” आणि “Shift” कीज़ दाबून पकडून ठेवा.
04:44 इमेज फाइल आता डॉक्युमेंट्स सह जोडली आहे.
04:48 ही कॅल्क फाइल CTRL आणि S कीज़ सोबत दाबून सेव करू.
04:54 आता ही फाइल बंद करूया.
04:58 आता फोल्डर वर जाऊ जेथे इमेज स्थित आहे.
05:02 “Image 3.jpg”, इमेज ला “Image4.jpg” नाव देऊ, जी आपण फाइल मध्ये निविष्ट केली आहे.
05:12 आता पुन्हा “Personal Finance Tracker.ods” फाइल उघडा.
05:18 तुम्ही पाहत की जोडलेली इमेज आता दिसत नाही.
05:22 लिंक पाथ एरर दर्शवित आहे.
05:25 ही लिंक डिलीट करूया.
05:28 ट्यूटोरियल थांबवून असाइनमेंट करा.
05:32 कॅल्क शीट मध्ये लिंक स्वरुपात इमेज निविष्ट करून , सेव आणि बंद करा.
05:38 ज्या फोल्डर मध्ये इमेज संग्रहीत आहेत त्या वर जा आणि इमेज डिलीट करा.
05:43 इमेज आताही कॅल्क फाइल मध्ये दर्शित आहे का, उघडून तपसा.
05:49 आता पुन्हा इमेज ला इमेज फोल्डर मध्ये पेस्ट करा.
05:53 कॅल्क फाइल मध्ये इमेज दर्शित आहे का ते तपासा.
05:57 “Standard” टूलबार च्या खाली असलेला नवीन टूलबार पहा.
06:02 हा “Picture” टूलबार आहे.
06:04 “Picture” टूलबार च्या वर डाव्या बाजूचे “Filter” बटन इमेज चे स्वरुप बदलण्यास काही पर्याय सुचविता.
06:13 CTRL आणि Z दाबून यास अंडू करू.
06:18 “Graphics mode” बटन मध्ये इमेज ला ग्रेस्केल, ब्लैक-एंड-व्हाइट किंवा वॉटरमार्क मध्ये बदलण्याचे पर्याय असतात.
06:26 “Picture” टूलबार मध्ये इतर पर्याय आहेत, जे आपण नंतर पाहुया.
06:32 आता क्लिपबोर्ड वरुन इमेज निविष्ट करणे शिकुया.
06:37 कीबोर्ड वरील संग्रहीत इमेजस ला तुम्ही, एका लिबर ऑफीस स्प्रेडशीट मधून दुसऱ्या मध्ये कॉपी करू शकता.
06:44 एक नवीन स्प्रेडशीट बनवून त्यास “abc.ods” नाव देऊया.
06:50 हे आपले टार्गेट डॉक्युमेंट्स आहेत.
06:53 आपल्याकडे अगोदरच “Personal-Finance-Tracker.ods” फाइल मध्ये एक इमेज आहे.
06:59 हे आपले सोर्स डॉक्युमेंट्स आहेत.
07:02 आता सोर्स फाइल वरुन इमेज निवडा जी कॉपी करायची आहे.
07:06 इमेज कॉपी करण्यास “CTRL” आणि “C” कीज सोबत दाबा.
07:11 इमेज आता क्लिपबोर्ड वर सेव झाली आहे.
07:15 आता टार्गेट डॉक्युमेंट वर जा, जे “abc.ods” आहे.
07:21 तुम्हाला तुमचे सेव केलेले इमेज“abc.ods” मध्ये कोणत्या स्थानी ठेवायचे आहेत ते स्थान निवडा.
07:28 इमेज डॉक्युमेंट मध्ये निविष्ट करण्यासाठी “CTRL” आणि “V” कीज सोबत दाबा.
07:35 आपण पाहतो की इमेज आपल्या टार्गेट फाइल मध्ये निविष्ट झाले आहेत.
07:42 आता आपण, कॅल्क गॅलरी वरुन प्रत्यक्ष इमेज निविष्ट करणे शिकू.
07:48 “Gallery” मध्ये इमेज आणि ध्वनी आहेत जे तुम्ही तुमच्या स्प्रेडशीट मध्ये निविष्ट करू शकता.
07:54 हे कसे करायचे पाहु.
07:57 स्टॅंडर्ड टूल बार मधील “Gallery” आयकॉन वर क्लिक करा.
08:01 एकांतरीत, मेन मेन्यु बार मधील “Tools” पर्याया वर क्लिक करा आणि नंतर “Gallery” उघडण्यास त्यावर क्लिक करा.
08:09 आता “Gallery” जे इमेज सूचीत करते त्यावर जा आणि डॉक्युमेंट मध्ये जी इमेज निविष्ट करायची आहे त्यावर क्लिक करा.
08:18 “Gallery” वरुन इमेज ड्रॅग करा,आणि त्यास स्प्रेडशीट मध्ये ड्रॉप करून हवे तेथे निविष्ट करा.
08:26 तुम्ही पाहता की, इमेजस आपल्या “Personal-Finance-Tracker.ods” फाइल मध्ये निविष्ट झाले आहेत.
08:34 हा पाठ येथे संपत आहे.
08:39 सारांश, आपण विविध पद्धतीने स्प्रेडशीट मध्ये इमेज फाइल निविष्ट करणे शिकलो.
08:46 जसे,फाइल वरुन क्लिपबोर्ड वरुन किंवा गॅलरी वरुन
08:52 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:55 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
08:58 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
09:03 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:08 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
09:12 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09:19 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
09:23 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
09:31 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
09:41 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble