LibreOffice-Suite-Base/C4/Indexes-Table-Filter-SQL-Command-window/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 LibreOffice Base वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:03 ह्या पाठात आपण शिकणार आहोत,

Indexes Table Filter आणि SQL कमांड विंडो

00:14 प्रथम Indexes जाणून घेऊ.
00:16 Index म्हणजे काय?
00:18 Index म्हणजे डेटाबेस टेबलमध्ये records जलद शोधण्याची आणि sort करण्याची पध्दत.
00:26 रेकॉर्डस index करण्यासाठी त्या टेबलमधील एक किंवा अनेक fields आपण निवडू शकतो .
00:36 Index, निवडलेल्या field किंवा fields नुसार records चे लोकेशन संचित करते.
00:43 Base, डेटा मिळवण्यासाठी, indexवापरून डेटाच्या location ला थेट जाऊ शकतो.
00:51 ही क्रिया सर्व रेकॉर्डस scan करून डेटा शोधण्यापेक्षा खूपच जलद होते.
00:59 टेबलची primary key आपोआपindex झालेली असते.
01:03 आता Library database मध्ये index बनवू.
01:09 Books table मधील Title कॉलम वर index बनवू. यामुळे पुस्तकांचे शीर्षक जलद शोधता येईल.
01:18 आधीपासूनच उघडलेला नसल्यास प्रथम Library database उघडू.
01:34 Books table एडिट मोडमध्ये उघडा.
01:39 table design विंडोमध्ये Tools मेनूवर जाऊन Index Design निवडा.
01:48 Indexes विंडोमध्ये Base ने Primary Key ही unique Index म्हणून आधीच समाविष्ट केली आहे.
01:57 index बनवण्यासाठी सर्वात डावीकडील आयकॉन New Index वर क्लिक करा.
02:05 आणि उजवीकडील Index field खालील drop down मधीलTitle निवडा.
02:14 येथे आपणAscending किंवा Descending निवडू शकतो.
02:19 डावीकडील तिस-या आयकॉनवर क्लिक करून index चे नाव बदलून ते ‘IDX_underscoreTitle’ करा आणि त्याच्या पुढील Save आयकॉनवर क्लिक करून फाईल सेव्ह करा.
02:37 हा आपल्या title field चा index आहे.
02:42 असे आपण टेबल्ससाठी, बेस वापरुन indexesबनवणे, डिलिट करणे, त्यात बदल करणे किंवा rename ह्या क्रिया करू शकतो.
02:51 असाईनमेंट,
02:54 Members table मधे names वरindex बनवा आणि ‘IDX_MemberName’ हे नाव द्या.
03:03 Table Filter म्हणजे काय ते पाहू.
03:07 Table Filter मुळे इतर applications पासून Base database टेबल्स लपवता येतात.
03:15 उदाहरणार्थ Library database मधील Books table व्यतिरिक्त इतर सर्व टेबल लपवू .
03:22 Toolsमेनू खाली Table Filter पर्याय आहे.
03:27 येथे ‘All Views’ आणि Books table चेक करा.
03:33 म्हणजे इतर applications मधे दिसण्यासाठी केवळ Books table निवडले आहे.
03:39 Ok वर क्लिक करा.
03:43 नंतर View मेनू, पुढे Refresh Tablesवर क्लिक करा.
03:50 येथे केवळ Books table दिसत आहे.
03:54 तसेच LibreOffice Writer किंवा Calcमधून हा डेटाबेस accessकरताना केवळ तेथे Books table हे टेबल दिसेल.
04:04 आणखी एक असाईनमेंट,
04:06 1. LibreOffice Writer उघडून Library डेटाबेस access करा. तेथील उपलब्ध tables बघा.
04:14 2. Base मध्ये सर्व टेबल्स दिसतील अशा स्थितीत आणा.
04:19 3. LibreOffice Writer पुन्हा उघडून tables ची उपलब्धता तपासा.
04:26 शेवटी SQL कमांड विंडोबद्दल जाणून घेऊ.
04:31 Tools मेनूतील SQL निवडल्यावर SQL कमांड विंडो access करू शकतो.
04:41 databaseला SQL स्टेटमेंटस देण्यासाठी ही विंडो वापरू शकतो.
04:47 SQL queriesकार्यान्वित करण्यासाठी Queries वापरू शकतो. पण ह्याद्वारे डेटाबेसमधून केवळ डेटा मिळवता येतो.
04:59 म्हणजे केवळ SELECT स्टेटमेंटस देऊ शकतो.
05:04 परंतु डेटा आणि टेबलच्या रचना बदलणारे SQL स्टेटमेंट देता येत नाही किंवा नवी टेबल्स बनवू शकत नाही.
05:14 आणि SQL कमांड विंडो, डेटा manipulation आणि डेटा definition स्टेटमेंट किंवा language वापरण्यास मदत करते.
05:24 Data Manipulation Languageकिंवा DML ची उदाहरणे म्हणजे
05:31 INSERT, UPDATE आणि DELETE डेटा.
05:37 आणि ही काही Data Definition Languageम्हणजेच DDLची उदाहरणे आहेत.
05:45 CREATE TABLE, DROP TABLE आणि ALTER स्टेटमेंटस.
05:51 प्रथम DML चे उदाहरण पाहू.
05:55 Base विंडोमध्ये Tools मेनूतून SQL कमांड विंडो उघडू.
06:02 Books table मधे नवे record समाविष्ट करण्यासाठी “Command to execute” ह्या भागात टाईप करा,
06:12 INSERT INTO दुहेरी अवतरण चिन्हात "Books" कंस उघडा दुहेरी अवतरण चिन्हात ( "Title",comma "Author", "PublishYear", "Publisher", "Price") कंस बंद करा

VALUES कंस उघडा अवतरण चिन्हात('The Hobbit', 'J.R.R Tolkien', 2002, 'Oxford', 500);

06:45 Execute बटणावर क्लिक करण्यापूर्वी ही कमांड नीट समजून घेऊ.
06:52 INSERT स्टेटमेंटमधे table चे नाव आणि field ची नावे आहेत. तसेच नव्या recordमध्ये भरायच्या Values लिहिल्या आहेत.
07:03 लक्षात घ्या की table चे नाव आणि field ची नावे double quotes मध्ये लिहिली आहेत.
07:11 Base हे case sensitive आहे. double quotes असल्यामुळे आपण जशी नावे बनवली आहेत ती Base समाविष्ट करेल.
07:22 जर quotes वापरले नाही तर Base सर्व नावे आपोआप upper caseमधे रूपांतर करून घेईल.
07:31 ज्या व्हॅल्यूजचा डेटा टाईप TEXT आहे त्यासाठी single quotes वापरणे आवश्यक आहे.
07:37 NUMERIC fields साठी कुठल्याही quotes ची आवश्यकता नाही.
07:43 तसेच BookId field हे AutoNumber field असल्यामुळे ते समाविष्ट करण्याची गरज नाही.
07:51 Base ते क्रमांक auto-generate करेल.
07:56 आता SQLकार्यान्वित करू. ‘Command successfully executed’ हा मेसेज दिसेल.
08:05 आपण लिहिलेल्या SQL मधे जर काही चुका असतील तर Base त्या दाखवेल .
08:12 Books table वर double click करून समाविष्ट केलेले नवे record बघा.
08:18 हे शेवटच्या row मध्ये समाविष्ट झाले आहे.
08:23 आता DDL चे उदाहरण पाहू.
08:27 AuthorId, Author आणि Country ही फिल्डस असलेले Authors नावाचे नवीन टेबल बनवू .
08:36 SQL कमांड विंडोमधे screenवर दाखवल्याप्रमाणे टाईप करा.
08:43 आणि कार्यान्वित करा.
08:47 Tables ची यादी Viewमेनूतून Refresh करा.
08:54 आपण बनवलेले नवे Authors table दिसेल.
08:59 DMLबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी screenवर दाखवलेल्या वेबसाईटवर जा.
09:06 DDL वरील माहितीसाठी screenवर दाखविलेली Wikipedia वेबसाईट बघा.
09:13 आणखी एक असाईनमेंट,
09:16 1. BookId 3 असलेल्या पुस्तकाची किंमत 300 रूपये करण्यासाठी UPDATE स्टेटमेंट वापरा.
09:26 2. ‘'The Hobbit' ह्या titleचे पुस्तक डिलिट करा.
09:30 3. Authors table मधे नवे record समाविष्ट करा. Authorचे नाव ‘J.R.R. Tolkienआणि country ‘England’
09:41 4. DROP स्टेटमेंट द्वारे डेटाबेसमधून Authors table काढून टाका .
09:47 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:52 आपण शिकलो ते थोडक्यात

Indexes Table Filter आणि SQL कमांड विंडो

10:01 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:13 ह्या प्रॉजेक्टचे संयोजन http://spoken-tutorial.org ने केले आहे.
10:18 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:22 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana