LibreOffice-Suite-Base/C4/Design-Refine-Database-Design-and-Normalization-Rules/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:02 LibreOffice Base वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत.
00:06 हा पाठ Database Design वरील आधीच्या पाठांचा पुढील भाग आहे.
00:11 यात आपण शिकणार आहोत,
00:15 7. database design सुधारणे.
00:18 8. normalization rules लागू करणे.
00:21 9. database design तपासणे.
00:25 मागील पाठात आपण primary आणि foreign keys घोषित करून त्याद्वारे table मधील संबंध प्रस्थापित केले.
00:34 आता database design ची प्रक्रिया पुढे नेऊ.
00:38 प्रथम database design मधे सुधारणा करू.
00:42 आपल्याकडे प्राथमिक design तयार आहे. त्यातील टेबल्समधे sample data भरू या.
00:50 sample queries, forms आणि reports बनवून आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात का ते पाहू.
00:59 डेटाची अनावश्यक पुनरावृत्ती टाळण्यासाठी गरजेनुसार design बदलू.
01:06 आपण विसरलेले कॉलम्स समाविष्ट करू.
01:10 डेटाबेसची Integrity राखण्यासाठी लायब्ररीच्या कार्याचे नियम Library databaseला लावू .
01:19 उदाहरणार्थ Books table मधील Price कॉलम numeric करू.
01:24 दुसरा नियमः पुस्तकाची Return Date ही date of issue पासून एक महिन्यानी असेल.
01:32 एखादी क्रिया झाल्यावर त्यावर आधारित दुसरी क्रिया सुरू करणे.
01:39 पुस्तक परतीची तारीख उलटून गेल्यास डेटाबेसने member ला reminder email पाठवणे.
01:50 अशाप्रकारे डिझाईन सुधारताना नवीन tables, columns, rules किंवा constraints समाविष्ट करू.
01:58 हे सर्व करताना पूर्वीच्या सर्व पाय-या तपासून डेटा Integrity ची खात्री करून घेऊ.
02:07 आता आपण normalization rules लावून बघू.
02:13 ह्यांचा उपयोग करून खात्री करू की tables
02:17 a) योग्य रचनेची आहेत आणि
02:20 b) त्यात आधी उल्लेख केलेल्या बदलाच्या anomalies नाहीत.
02:25 normalization म्हणजे normal forms चे नियम डेटाबेस डिझाईनमधे वापरणे.
02:33 या पाठात Normal forms चे पहिले तीन नियम पाहू.
02:38 आधी First Normal Form म्हणजेच 1NF सांगतो की सर्व कॉलमच्या व्हॅल्यूज atomic असल्या पाहिजेत.
02:51 उदाहरणार्थ Books table च्या Price column मधील प्रत्येक cell मधे एकच व्हॅल्यू असेल.
02:59 म्हणजेच एका पुस्तकाला त्याच्या price column मधे फक्त एकच किंमत असेल, आणखी नाहीत.
03:07 तसेचAuthors table च्या प्रत्येक First Name cell मधे एकाच लेखकाचे पहिले नाव असेल.
03:16 First Normal form असेही म्हणतो की कॉलम्समधे पुनरावृत्त झालेले समूह नसतील.
03:23 उदाहरणार्थ समजा एका प्रकाशकाची आपल्याकडे तीन पुस्तके आहेत.
03:29 आणि Publishers table रचनेत पुढील कॉलम्स आहेत.
03:34 Publisher Id, Publisher, Book1, Author 1, Book 2, Author 2, Book 3, Author 3
03:47 लक्षात घ्या की Book आणि Author तीन वेळा आले आहेत.
03:52 असे repeating groups असल्यास डिझाईन बदलावे लागेल.
03:58 आता जर प्रकाशकाने आणखी दहा पुस्तके प्रकाशित केली तर आपल्याला टेबलमधे वीस कॉलम्स वाढवावे लागतील.
04:08 डेटामधील बदलानुसारtable design सतत बदलत राहील.
04:14 तसेच पुस्तक किंवा त्याच्या लेखकानुसार टेबल सॉर्ट किंवा सर्च करणे त्रासदायक होईल.
04:23 ही चूक आपल्याला हे टेबल दोन किंवा तीन टेबल्समधे विभागून दुरूस्त करता येईल.
04:30 screen वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे या उदाहरणातील टेबल Publishers, Books आणि Authors मधे विभागू.
04:41 हे design वापरून टेबल First Normal Form मधे येईल,
04:47 आणि प्रकाशक आणि पुस्तकांचा डेटा बदलला तरी टेबलच्या रचना स्थिर राहतील.
04:56 आता Second Normal Form पाहू.
05:00 टेबल Second Normal Form म्हणजेच 2NF मधे आहे असे म्हणतात जेव्हा ते 1NF मधे असते
05:07 आणि प्रत्येक non-key कॉलम पूर्ण primary key वर अवलंबून असतो.
05:14 जेव्हा primary key मधे एकापेक्षा जास्त कॉलम असतात तेव्हा हा नियम लागू होतो.
05:22 उदाहरणार्थ BooksIssued table मधील कॉलम्स.
05:29 BookId, MemberId, BookTitle आणि IssueDate. यातील BookId आणि MemberId मिळून टेबलची primary key बनते.
05:42 आता BookTitle कॉलम पाहा.
05:45 Books table मधील BookId वापरून आपल्याला BookTitle मिळू शकते.
05:52 म्हणजेच BookTitle हे फक्त Book ID वरच अवलंबून आहे Member ID वर नाही.
06:00 म्हणजेच ते संपूर्ण primary key वर अवलंबून नाही.
06:06 हे टेबल Second Normal Form मधे आणण्यासाठी टेबलमधून BookTitle काढावे लागेल.
06:14 आणि असेच कॉलम ठेवू की जे पूर्णपणे primary key आणि columns वर अवलंबून आहेत.
06:23 IssueDate कॉलम येथे ठेवू कारण तो पूर्णपणे दोन्ही primary key फिल्डसवर अवलंबून आहे.
06:31 आता Third Normal Form पाहू.
06:35 टेबल Third Normal Form (3NF) मधे आहे असे म्हणतात जेव्हा ते 2NF मधे असते,
06:42 आणि सर्व non-key कॉलम्स हे एकमेकांवर अवलंबून नसतात.
06:48 उदाहरणार्थ, समजा BooksIssued table मधील कॉलम्स
06:54 BookIssueId (जो primary key आहे),

BookTitle, Member, IssueDate, And ReturnDate.

07:03 आणि समजा लायब्ररीच्या नियमानुसार return date ही Issue Date पासून एक महिना आहे.
07:11 आता Return Date हा non-keyकॉलम आहे जो बेसला IssueDate कॉलमवरून मोजता येतो.
07:19 म्हणजेच ReturnDate ही फक्त IssueDate कॉलमवर अवलंबून आहे. इतर कॉलमवर नाही.
07:26 जर आपण Return Date fieldमधे दुसरी तारीख भरली तर लायब्ररीचा नियमभंग होईल.
07:37 म्हणून टेबल Third Normal Form मधे ठेवण्यासाठी त्यातीलReturnDate कॉलम काढून टाकू.
07:44 आपल्याला पहिले तीन Normal forms कसे वापरायचे ते समजले.
07:49 सामान्यतः डेटाबेस डिझाईनमधे 3NF ला थांबतात.
07:55 Normal forms आणि database design वरील अधिक माहितीसाठी screen वर दाखवलेल्या वेबसाईटला भेट द्या.
08:05 डेटाबेस डिझाईन प्रक्रियेतून गेल्यावर शेवटी ते डिझाईन परत एकदा तपासू.
08:12 database structure तयार करू.
08:16 यात Tables, Relationships, Rules किंवा Constraints, Forms, Queries आणि Reports बनवू.
08:24 प्रत्यक्ष डेटा आणि युजर्स यांच्या द्वारे डेटाबेस तपासू.
08:29 डेटा भरणे, अपडेट करणे, डिलिट करणे यासाठी forms वापरू.
08:36 reports कार्यान्वित करून ते अचूक आणि योग्य आऊटपुट देतात हे पाहू.
08:42 डेटाबेस वापरण्यास तयार झाल्यावर त्याच्या कामाचा वेग तपासू.
08:50 डेटा जलद मिळवण्यासाठी टेबल्सना Indexes करू.
08:55 database application यशस्वीपणे चालण्यासाठी डेटाबेसला ठराविक काळाने मेनटेन करू.
09:03 पाठाच्या शेवटी असाईनमेंट पहा.
09:08 Library database डिझाईन मधे Media हा घटक समाविष्ट करा .
09:14 Media मधे DVDs आणि CDsअसू शकतात. त्या audio किंवा videoअसतील.
09:21 पुस्तकांप्रमाणेच DVDs आणि CDs लायब्ररी सदस्यांना issue केल्या जातील.
09:28 database डिझाईन प्रक्रिया अंमलात आणा.
09:31 डिझाईनला पहिले तीन Normal forms लागू करा.
09:37 बेसमधील डेटाबेस डिझाईनचा तिसरा पाठ येथे संपतो.
09:45 database design मध्ये आपण शिकलो ते थोडक्यात,
09:50 7. database design सुधारणे.
09:52 8. normalization rules लागू करणे.
09:55 9. database design तपासणे.
09:58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:10 ह्या प्रॉजेक्टचे संयोजन http://spoken-tutorial.org ने केले आहे.
10:15 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:20 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Ranjana