LibreOffice-Suite-Base/C2/Modify-a-Report/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: Modify a report

Author: Manali Ranade

Keywords: Base


Time Narration
00:02 बेसच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत.
00:09 Report ची रूपरेखा बदलणे व Reportमध्ये परिवर्तन करणे.
00:16 त्यासाठी आपण आपले Library database चे उदाहरण वापरू या.
00:23 मागील ट्युटोरियलमध्ये आपण Report कसा बनवायचा ते शिकलो.
00:28 आपण Books Issued to Members: Report History शीर्षक असलेला Report बनवला आहे. आता त्यामध्ये बदल कसे करायचे ते शिकू या.
00:40 Library database मध्ये
00:42 डाव्या पॅनेलवरील Report या आयकॉनवर क्लिक करा.
00:47 उजव्या पॅनेलमध्ये Reportच्या सूचीतBooks Issued to Members: Report History हा Report दिसेल.
00:57 या Reportमध्ये बदल करण्यासाठी त्यावर राईट क्लिक करून मग Edit वर क्लिक करून तो उघडा.
01:08 आता आपल्याला Report Builder विंडो ही नवी विंडो दिसेल.
01:14 हा स्क्रीन तीन मुख्य भागांनी बनलेला आहे.
01:19 वरच्या आणि खालच्या भागातील Page Header आणि Footer
01:26 Header चा भाग.
01:29 आणि Detail चा भाग
01:34 याशिवाय आपण record header आणि footer हा भाग देखील रिपोर्टमधे समाविष्ट करू शकतो.
01:40 त्यासाठी मुख्य स्क्रीनवरील पांढ-या भागात राईट क्लिक करा. आणि Insert Report Header/Footer वर क्लिक करा.
01:51 स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या orange भागावर डबल क्लिक करून या भागांचे आकार कमी जास्त करता येतात.
02:00 पुढे जाण्यापूर्वी येथे Report design विंडोचा screenshot बघा.
02:06 आपला Report अशा प्रकारचा बनवण्यासाठी आपण त्यात बदल करू या.
02:11 आपण विविध विभागांमध्ये text labels घालू या. तसेच fonts, formatting आणि spacing आपल्याला हवे तसे करून घेऊ.
02:20 प्रथम काही report headers आणि footers समाविष्ट करू या.
02:27 त्यासाठी Label field च्या आयकॉनवर क्लिक करा.
02:31 हा आयकॉन report मध्ये मेनूबारखालील Controls toolbar मध्ये दिसेल.
02:40 आधी दाखवल्याप्रमाणे हे Report Header भागात draw करा.
02:48 आणि त्यावर डबल क्लिक करा ज्यामुळे उजवीकडे प्रॉपर्टीज विंडो उघडेल.
02:55 येथे लेबलसमोर टाईप करा. Books Issued to Members:Report History
03:00 आणि एंटर दाबा.
03:07 तसेच आपण याची font style बदलू या. आणि Arial Black, Bold आणि आकार12 निवडा.
03:17 आणि Ok बटणावर क्लिक करा.
03:21 पुढे स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे report Header मध्ये अजून एक लेबल समाविष्ट करा.
03:31 उदाहरणार्थ टाईप करा Report Prepared by Assistant Librarian
03:42 आणि नंतर font style बदलून ती Arial, Bold Italic आणि आकार 8 करा.
03:51 Report Footer च्या भागात लेबल समाविष्ट करण्यासाठी या सर्वsteps पुन्हा करा.
03:59 आता लेबल समोर Nehru Library, New Delhi असे टाईप करा.
04:09 आणि नंतर font style बदलून ती Arial, Bold Italic आणि आकार 8 करा.
04:20 आता आपण spacing मध्ये थोडे बदल करा.
04:24 प्रथम Page Headerआणि Report Header मधील ग्रे लाईनवर डबल क्लिक करून Page Header चा भाग लहान करा.
04:37 आणि click, drag आणि drop पध्दतीचा वापर करून हे वरच्या बाजूला न्या.
04:47 पुढे Report header च्या भागाचा आकार लहान करा.
04:52 त्यासाठी report header आणि header मधील ग्रे लाईनवर डबल क्लिक करा.
05:01 Report footer आणि Page footer मधील spacing कमी करण्यासाठी सर्वsteps पुन्हा करा.
05:13 पुढे Header labels मध्यभागी आणू या.
05:18 त्यासाठी सर्व लेबल्स सिलेक्ट करताना प्रथम बुक टायटलवर क्लिक करा.
05:26 आणि मग Shift चे बटण दाबा आणि दाखवल्याप्रमाणे उरलेल्या लेबल्सवर क्लिक करा.
05:35 आता ते मध्यभागी आणण्यासाठी up arrow बटणाचा वापर करा.
05:41 आता आपण header ची background फिकट निळी करू या.
05:47 त्यासाठी प्रॉपर्टीजमध्ये जा. आणि background transparent बदलून No करा.
05:55 आणि नंतर background कलरच्या सूचीतूनBlue 8 निवडा.
06:03 Detail या भागासाठी आपण हेच करणार आहोत.
06:09 त्यासाठी प्रथम आपणDetail चा भाग आणि report footer भाग यामधील spacing वाढवू या.
06:20 आणि नंतर fields मध्यभागी आणू या.
06:24 दाखविल्याप्रमाणे Detail या भागाच्या background साठी आपण फिकटgray रंग निवडू या.
06:32 पुढे आपण Checked In field साठी data formatting मध्ये बदल करू.
06:39 ह्याची एक किंवा शून्य ही Boolean value असल्यामुळे ते आपल्याला True किंवा False ही किंमत दाखवते.
06:47 आपण ते बदलून Yes किंवा No असे पर्याय दाखवू.
06:53 त्यासाठी Detail sectionमध्ये उजवीकडे असलेल्या CheckedIn field वर डबल क्लिक करा.
07:01 आता उजवीकडे असलेल्या प्रॉपर्टीज मध्ये Data tab वर प्रथम क्लिक करा.
07:08 Data field च्या पुढील CheckedIn च्या बटणावर क्लिक करा.
07:15 Function wizard नामक नवी popup विंडो उघडेल.
07:20 येथे प्रथम उजवीकडे खाली असलेल्या Formula text box रिकामा करा.
07:27 नंतर Category च्या dropdownवर क्लिक करा. आणि नंतरIFवर डबल क्लिक करा.
07:35 आता उजवीकडे आपल्याला नवे controls दिसतील.
07:40 पहिल्या text boxच्या पुढे उजवीकडील Select आयकॉनवर क्लिक करा.
07:49 येथे CheckIn डबल क्लिक करा.
07:53 पुढे दुस-या text boxमध्ये आपण double-quotes मध्ये Yes टाईप करा.
08:01 आणि नंतर तिस-या text box मध्ये No टाईप करा.
08:12 आता आपण प्रॉपर्टीज मधील General tab वर जाणार आहोत.
08:18 खाली Formatting समोरील बटणावर क्लिक करा.
08:24 येथे Category list मधील Text वर क्लिक करा.
08:28 आणि मग OK बटणावर क्लिक करा.
08:32 आता report सेव्ह करा.
08:36 आता आपण बदल केलेला हा report उघडून बघा.
08:41 त्यासाठी वरील Edit मेनूवर क्लिक करून मग Execute Report वर क्लिक करा.
08:50 आणि हा आपला लायब्ररीच्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती दाखविणारा report आहे.
08:57 spacing, headers, footers, fonts कडे
09:01 तसेच Yes किंवा No सांगणा-या CheckedIn field कडे लक्ष द्या.
09:06 आता आपल्या report मध्ये बदल झाला आहे.
09:11 अशा प्रकारे आपण Modifying a Report वरील स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:17 आपण काय शिकलो ते थोडक्यात.
09:20 Report ची रूपरेखा बदलणे व Reportमध्ये परिवर्तन करणे.
09:26 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे. यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे.
09:48 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pravin1389, Sneha