LibreOffice-Suite-Base/C2/Create-reports/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 LibreOffice Base च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:03 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत.
00:07 reportतयार करणे. report मधील fields Select, Label आणि Sort करणे.
00:12 report चा layout ठरवणे, तसेच static किंवा dynamic ह्यापैकी report चा प्रकार निवडणे.
00:19 ह्यासाठी आपण Library database चा वापर करणार आहोत.
00:27 आपण Library database मध्ये पुस्तके आणि सभासदांची माहिती संचित केली आहे.
00:36 तसेच आपल्याकडे सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती संचित केलेले टेबल आहे.
00:42 मागील ट्युटोरियलमध्ये आपण forms आणि queries कशा बनवायच्या ते शिकलो.
00:48 reportकसा बनवायचा हे शिकण्यापूर्वी report म्हणजे काय हे प्रथम जाणून घेऊ या.
00:56 query प्रमाणेचdatabase मधून माहिती मिळवण्याची अजून एक पध्दत म्हणजे report होय.
01:05 आपण report आपल्या आवडीनुसार डिझाईन करू शकतो ज्यामुळे तो आपल्याला वाचणे किंवा कागदावर छापणे सोयीचे होते.
01:14 database मधील टेबल्स किंवा queries पासून Reports तयार करता येतात.
01:21 table किंवा query मधील सर्व किंवा काही निवडक फिल्डस report मध्ये घेता येतात.
01:32 static आणि dynamic हे Reportsचे दोन प्रकार आहेत.
01:38 जेव्हा Static report बघण्यासाठी उघडला जातो,
01:42 त्यावेळी report बनवताना त्यात असलेला dataच आपल्याला दाखवला जातो.
01:48 ह्याला snapshot असेही म्हणतात.
01:52 परंतु dynamic report बघण्यासाठी उघडल्यावर आपल्याला database मधून current data दाखवला जाईल.
02:00 आता आपण sample report बनवू या.
02:05 Library database मध्ये,
02:08 डाव्या पॅनेलमधील Reports ह्या आयकॉनवर क्लिक करा.
02:12 उजव्या पॅनेलमधील Use Wizard to create report वर क्लिक करा.
02:18 Reportsतयार करण्याचा हा सगळ्यात सोपा आणि जलद पर्याय आहे.
02:24 आता आपल्याला नवी विंडो दिसेल ज्याला Report Builder विंडो असेही म्हणतात.
02:31 तसेच आपल्याला डाव्या बाजूला सहा steps ची सूची असलेला Wizard दिसेल.
02:39 मागील ट्युटोरियल मध्ये बनवलेल्या query वर आधारित Report बनवण्यासाठी आपण हा Wizard वापरणार आहोत.
02:47 History of books issued to the Library members
02:51 आपण Field Selection ह्या पहिल्या step वर आहोत.
02:56 आपण टेबल किंवा query यापैकी एक report चा source म्हणून निवडणार आहोत.
03:05 वरील drop down सूचीतून History of Books Issued to Members ही query निवडू या.
03:14 आता आपल्याला डाव्या बाजूला query मधील उपलब्ध fields ची सूची दिसेल.
03:21 आपल्या report मध्ये ही सर्व fields हवी असल्यामुळे उजवीकडे दर्शवणा-या double arrow बटणावर क्लिक करा.
03:30 आता पुढील step वर जाण्यासाठी Next बटणावर क्लिक करा.
03:35 दुसरी step. Labelling Fields.
03:39 image मध्ये दाखविल्याप्रमाणे लेबलच्या text box मध्ये पुढील लेबल्स टाईप करा.
03:50 आता Next बटणावर क्लिक करा.
03:55 आता आपण Grouping ह्या तिस-या stepवर आहोत.
03:59 ह्याचा वापर एखाद्या फिल्डनुसार data गटांमध्ये विभागून दाखवण्यासाठी करतात.
04:05 उदाहरणार्थ आपण आपल्या reportमध्ये बुक टायटलनुसार ग्रुप बनवू शकतो.
04:12 जर आपण तसे केले तर reportमध्ये आपल्याला प्रथम बुक टायटल आणि नंतर ज्यांना हे पुस्तक दिले गेले आहे त्या सर्व सभासदांची नावे दिसतील.
04:22 त्यानंतर पुढील बुक टायटल दाखवले जाईल.
04:27 आत्तासाठी आपण आपला report साधाच ठेवूया.
04:31 त्यासाठी Next बटणावर क्लिक करा.
04:36 आता आपण Sorting Options ह्या चौथ्या Step वर आहोत.
04:41 आपण घटनांच्या क्रमानुसार data सॉर्ट करू या.
04:46 आणि नंतर ते चढत्या क्रमाने Book title प्रमाणे सॉर्ट करू या.
04:52 त्यासाठी आपण Sort by ह्या dropdown box वर क्लिक करू या.
04:58 नंतर Issue Date वर क्लिक करू या.
05:03 नंतर दुस-या dropdown box वर क्लिक करू या.
05:08 नंतर Book Title वर क्लिक करू या.
05:12 आता Next बटणावर क्लिक करा.
05:16 आता पाचवी Step. Choose Layout.
05:20 आपण आपल्या आवश्यकतेप्रमाणे report ची रूपरेषा बदलू शकतो.
05:25 सूचीतील Columnar, single-column ह्या layout वर क्लिक करा.
05:31 आपल्या लक्षात येईल की मागे Report Builder रिफ्रेश झाला आहे.
05:36 येथे सर्व लेबल्स डावीकडे आणि संबंधित fields उजवीकडे दर्शविली आहेत.
05:43 आता Columnar, two columns वर क्लिक करा.
05:48 पुन्हा विंडो रिफ्रेश झाली असून दोन column चा layout दर्शवत आहे.
05:54 अशा प्रकारे आपण Base Wizard ने प्रदान केलेल्या layouts पैकी कोणताही एक निवडू शकतो.
06:02 आवश्यकतेप्रमाणे आपण त्यात नंतर बदलही करू शकतो.
06:07 आत्तापुरते आपण, पहिला घटक, Tabular वर क्लिक करू.
06:12 नंतर Next बटणावर क्लिक करा.
06:16 आता शेवटची step. Create Report .
06:20 येथे आपण आपल्या report ला अर्थपूर्ण शीर्षक देऊ या. Books Issued to Members: Report History
06:30 आता आपण आपला report तयार करू या. जो आपल्याला नेहमी database मधून latest data दर्शवेल.
06:38 त्यासाठी Dynamic Report या पर्यायावर क्लिक करा.
06:45 त्यामुळे जेव्हा आपण बघण्यासाठी report उघडू तेव्हा आपल्याला latest data बघायला मिळेल.
06:52 आपले report चे काम झाले आहे. आता Create Report now या पर्यायावर क्लिक करा.
06:59 आणि शेवटी Finish या बटणावर क्लिक करा.
07:05 आता आपल्याला एक नवीन विंडो दिसेल.
07:12 यात वरती field labels बोल्ड फाँट मध्ये आहेत आणि मुख्य data, टेबल स्वरूपात आहे.
07:24 तसेच आपल्याला दिसेल की ते Issue Date field वर चढत्या क्रमाने म्हणजेच घटनाक्रमानुसार सॉर्ट केलेले आहे आणि नंतर बुक टायटल प्रमाणे सॉर्ट केले आहे.
07:38 अशा प्रकारे आपण लायब्ररीच्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांचा घटनाक्रमानुसार report बनवला आहे.
07:46 पुढील ट्युटोरियलमध्ये आपल्या report मध्ये बदल कसे करायचे ते पाहू.
07:52 आता assignment करू.
07:54 Publishers प्रमाणे ग्रुप केलेला लायब्ररीमधील सर्व पुस्तकांचा report तयार करा.
08:01 Publishers आणि Book titles दोन्ही चढत्या क्रमात असले पाहिजेत.
08:07 Columnar, Single-column हा layout वापरा.
08:11 अशाप्रकारे आपण report वरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
08:17 आपण जे शिकलो ते थोडक्यात.
08:21 report बनवणे. report मधील फिल्डस Select, Label आणि Sort करणे.
08:25 report चा लेआऊट निवडणे. static किंवा dynamic पैकी report चा टाईप निवडणे.
08:31 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
08:42 सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे.
08:48 *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे.
08:51 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Pratik kamble, Pravin1389, Sneha