LibreOffice-Suite-Base/C2/Add-List-Box-form-control-to-a-form/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: Add List Box form control

Author: Manali Ranade

Keywords: Base


Time Narration
00:03 LibreOffice Base च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण form मध्ये List Box form control समाविष्ट करण्याबद्दल शिकणार आहोत.
00:14 मागील ट्युटोरियलमध्ये आपण LibreOffice Base च्या सहाय्याने form मध्ये बदल कसे करायचे ते शिकलो.
00:20 आपण मागील ट्युटोरियलमध्ये बनवलेल्या आणि बदल केलेल्या या formची इमेज देखील बघितलेली आहे.
00:34 आपले डिझाईनचे काम पूर्ण झाले की आपला form अशा प्रकारे दिसेल.
00:45 येथे आपल्याला Books Issued Table चे पहिले record दिसत आहे.
00:52 आणि तसेच book Ids आणि member Ids ऐवजी आपल्याला पुस्तकांची मूळ शीर्षके आणि सभासदांच्या नावांसहित लिस्ट बॉक्सेस दिसत आहेत.
01:01 येथे खाली record सेव्ह करणे, केलेले बदल undo करणे इत्यादी कार्य करणारी काही बटणे आहेत.
01:11 या ट्युटोरियलमध्ये आपण form मध्ये List Box form control कसा समाविष्ट करावा ते जाणून घेणार आहोत.
01:20 LibreOffice Base हा प्रोग्रॅम सुरू नसल्यास तो प्रथम आपण सुरू करू या.
01:32 आणि आपला Library database उघडू या.
01:35 बेस आधीपासूनच सुरू असल्यास आपण File menu मधीलOpen वर क्लिक करून Library database उघडू शकतो.
01:45 किंवा File menu मधील Recent Documents वरही क्लिक करू शकतो.
01:50 आता आपण Library database मध्ये आहोत.
01:54 मागील ट्युटोरियलमध्ये बनवलेला Books Issued to Members हा form उघडू या.
02:01 त्यासाठी डावीकडील पॅनेलमधील formवर क्लिक करा.
02:07 आणि उजव्या बाजूच्या पॅनेलमधील Books Issued to Members या form वर राईट क्लिक करून मग edit वर क्लिक करा.
02:17 आता आपण form design विंडोमध्ये आहोत.
02:21 प्रथम आपण Book Title या लेबलचा विचार करू या.
02:25 आपल्याला दिसेल की येथे text boxमध्ये BookId numbers दर्शवले आहेत ते आपल्या ओळखीचे नाहीत.
02:33 आपल्याला पुस्तकांची शीर्षके जास्त परिचित आहेत.
02:37 आणि म्हणून ही शीर्षके दर्शवण्यासाठी बेसमध्ये काही पध्दती आहेत. त्यापैकी एक म्हणजे List box form control चा वापर .
02:48 तो कसा करायचा ते पाहू.
02:51 त्यासाठी प्रथम Book Title या लेबलशी संबंधित text box काढून टाकू.
02:59 त्यासाठी text box वर क्लिक करू. ज्यामुळे तो सिलेक्ट होऊन त्याच्या भोवती हिरव्या रंगाच्या चौकटी दिसतील.
03:09 आणि नंतर राईट क्लिक करून Cut वर क्लिक करा.
03:16 अशा प्रकारे आपण text box काढून टाकला आहे.
03:20 आता आपण येथे List box form control समाविष्ट करू या.
03:26 हे आपणासForm Controls toolbar मधून करता येते.
03:31 आपण तो टूलबार View menu च्या सहाय्याने Form Controls वर क्लिक करून आणू शकतो.
03:39 बेसने अनेक form controls प्रदान केल्याचे आपल्याला दिसेल. या आयकॉन्सवर कर्सर नेऊन त्याच्या tool tips वाचू या. <pause>
04:01 त्यातील List boxचा आयकॉन शोधा .
04:04 व त्यावर एकदा क्लिक करा.
04:11 आणि माऊसचा पॉईंटर form वर घेऊन जा. आपल्या लक्षात येईल की तो लहान आकाराच्या अधिकच्या चिन्हात बदलला आहे.
04:21 आता आपण आपल्या form मध्ये list box form control आणू शकतो.
04:26 त्यासाठी केवळ आपल्याला form वर क्लिक करून ते drag आणि नंतर drop करायचे आहे.
04:34 आपण पूर्वी काढून टाकलेल्या text box च्या जागी हा आणू या.
04:39 Form design विंडोवर List Box Wizard नामक नवा wizard उघडल्याचे दिसेल.
04:48 आता हा wizard आपल्याला Book title या लेबलला list box जोडण्यास मदत करेल.
04:56 कसे ते आता पाहू.
04:58 आपण या wizard मध्ये पुस्तकांची शीर्षके असणारे टेबल निवडू या.
05:07 आपण सूचीतून Books हे टेबल निवडून Next या बटणावर क्लिक करू या.
05:15 आता या विंडोमध्ये आपल्याला list boxमध्ये दर्शवले जाणारे field निवडणे आवश्यक आहे.
05:24 आपण जाणतोच की title या field मध्ये पुस्तकांची शीर्षके आहेत.
05:29 आपण पुढील step वर जाऊ या.
05:32 ही शेवटची विंडो आहे जेथे आपण एक जादू करणार आहोत.
05:37 आपण संबंधित tables आणि fields एकमेकांना जोडणार आहोत.
05:41 fields ची नावे बघा. डावीकडीलFields in the Value table मध्ये Books Issued table मधील fields ची नावे आहेत.
05:52 आणि उजवीकडील Fields in the list table मध्ये Books table मधल्या fields ची नावे आहेत.
05:59 आपल्याला माहित आहे की book id हे books table मधील key field असून ते Books Issued table मध्ये दर्शवले आहे.
06:10 डावीकडील Field from the value table नामक सूचीतील book id वर क्लिक करू या.
06:19 पुढे आपण उजवीकडील Field from the list table नामक सूचीतील book id वर क्लिक करू या.
06:29 हा wizard बंद करण्यासाठी Finish या बटणावर क्लिक करा.
06:34 येथे आपण संबंधित tables and fields एकमेकांना जोडले आहेत.
06:40 आता बेस आपोआप सर्व Book titles या List box मध्ये दर्शवेल.
06:46 आपणform सेव्ह करू या.
06:49 ही विंडो बंद करू .
06:52 बेस ट्युटोरियलच्या पुढील भागातही आपण आपल्या formमध्ये उरलेल्या form controls चा समावेश करणार आहोत.
07:00 आणि ते झाले की आपला form असा दिसणार आहे.
07:06 आता assignment करा.
07:08 अपरिचित member Ids ऐवजी मेंबर्सच्या नावांची सूची दर्शविणारा दुसरा list box समाविष्ट करा.
07:17 list box कुठे समाविष्ट करायचा याची सध्या चिंता करू नका. मेंबर नेम या लेबलच्या डावीकडे तो ठेवा.
07:27 आपण पुढील ट्युटोरियलमध्ये मेंबर नेम या लेबलसमोर तो योग्य प्रकारे समाविष्ट करू.
07:34 आपण आता Base च्या List Box Control वरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
07:40 थोडक्यात आपण form मध्ये List Box form control समाविष्ट करण्याबद्दल शिकलो.
07:47 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
07:58 सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे.
08:04 *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे.
08:08 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Sneha