LibreOffice-Impress-on-BOSS-Linux/C3/Slide-Creation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 लिबरऑफिस इम्प्रेस मधील स्लाइड निर्माण करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण, : स्लाईड शोज, स्लाईड ट्रान्सिशन, ऑटोमेटिक शोज शिकणार आहोत या बदद्ल.
00:16 तुम्ही स्लाईड शोज चा वापर प्रेक्षकांसमोर स्लाईड्स सादर करण्याकरिता करता.
00:21 स्लाईड शोज संगणकावर किंवा प्रक्षेपकावर दाखविले जाऊ शकतात.
00:25 स्लाईड शोज संगणकाची संपूर्ण screen व्यापतो.
00:30 स्लाईड शो मोड मध्ये प्रेझेन्टेशन्स संपादित करता येत नाहीत.
00:34 स्लाईड शो फक्त प्रदर्शित करण्या करिता आहेत.
00:38 प्रेझेन्टेशन Sample-Impress.odp. उघडा.
00:43 आता हे प्रेझेन्टेशन Slide Show म्हणून पाहू.
00:47 Main मेन्यू वरुन Slide Show वर क्लीक करा आणि नंतर Slide Show वर क्लीक करा.
00:53 एकांतरित रीतीने, स्लाईड शो सुरु करण्याकरिता तुम्ही फाक्शण की F5 वापरू शकता.
01:00 प्रेझेन्टेशन स्लाईड शो च्या रुपात प्रदर्शित होईल.
01:04 तुमच्या कीबोर्ड वरील एरो बटनाचा वापर करून तुम्ही स्लाईड्स मध्ये मार्गनिर्देशन ( navigate) करू शकता.
01:10 एकांतरित, कॉंटेक्स्ट मेन्यू साठी माउस चे राइट क्लिक करा आणि Next निवडा.
01:16 हे तुम्हाला पुढील स्लाईड वर घेऊन जाईल.
01:20 स्लाईड शो च्या बाहेर येण्यास कॉंटेक्स्ट मेन्यू साठी माउस चे राइट क्लिक करा. येथे End Show निवडा.
01:28 बाहेर येण्याची दुसरी पद्धत Escape बटन दाबा.
01:33 Mouse pointer as pen पर्याया चा वापर करून सुद्धा तुम्ही तुमच्या प्रेक्षकांशी संवाद साधू शकता.
01:40 आता हा पर्याय सक्षम करून तो कसा काम करतो ते पाहु.
01:45 Main मेन्यू वरुन Slide Show आणि 'Slide Show Settingsवर क्लीक करा.
01:51 Slide Show डायलॉग बॉक्स दिसेल.
01:54 Options खाली , Mouse Pointer visible आणिMouse Pointer as Pen बॉक्स तपासा.
02:02 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी OK वर क्लीक करा.
02:06 पुन्हा, Main मेन्यू वरुन Slide Show वर आणि नंतर Slide Show वर क्लीक करा.
02:13 लक्ष द्या, कर्सर आता लेखणीत (pen) रुपांतरीत झाला आहे.
02:17 हा पर्याय तुम्हाला प्रेझेन्टेशन वर लिहिण्याची किंवा रेखाटण्याची अनुमती देतो, जेव्हा ते स्लाईड शो मोड मध्ये असते.
02:24 जेव्हा तुम्ही माऊस चे लेफ्ट बटन दाबाल, तेव्हा तुम्ही लेखणीने आरेखन करू शकता.
02:29 पहिल्या पॉइण्ट पुढे टिक मार्क करा.
02:34 assignment साठी ट्यूटोरियल थांबवा.
02:38 इम्प्रेस स्लाईड वर लहान आराखडा काढण्यासाठी स्केच पेन चा वापर करा.
02:47 आता माऊस बटना वर लेफ्ट क्लिक करा. पुढील स्लाईड प्रदर्शित होईल.
02:52 तुम्ही पुढील स्लाईड वर सुद्धा जाऊ शकता, जेव्हा तुम्ही Space bar दाबाल.
02:57 आता स्लाईड शो च्या बाहेर येऊ . कॉंटेक्स्ट मे न्यू साठी राइट क्लिक करा आणि End Show वर क्लीक करा.
03:05 आता Slide Transitions बद्दल शिकूया.
03:09 Slide Transitions काय आहे?
03:12 ट्रान्झिशन्स हे परिणाम आहेत जे स्लाईड वर होतात जेव्हा आपण प्रेझेन्टेशन मध्ये एका स्लाईड वरून पुढे सरकतो.
03:22 Main पेन वरुन Slide Sorter टॅब वर क्लीक करा.
03:26 प्रेझेन्टेशन मधील सर्व स्लाईडस येथे प्रदर्शित होतील.
03:31 तुम्ही प्रेझेन्टेशन मध्ये, सहज स्लाईडस चा क्रम बदलू शकता, ह्या दृश्यात.
03:37 आता पहिली स्लाईड निवडू.
03:40 आता, डावे बटन दाबा. स्लाईड ला तीन आणि चार या स्लाइड मध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा.
03:48 स्लाईडसची पुनर्मांडणी होईल.
03:52 या क्रियेस अंडू करण्यासाठी CTRL+Z की दाबा.
03:57 तुम्ही एकाचवेळी प्रत्येक स्लाईड मध्ये विविध संक्रमण जोडू शकता.
04:02 Slide Sorter व्यू वरुन, पहिली स्लाईड निवडा.
04:06 आता, Task पेन वरुन , Slide Transitions वर क्लीक करा.
04:13 Apply to selected slides खाली स्क्रोल करा आणि Wipe Up निवडा.
04:19 लक्ष द्या, संक्रमण (transition) परिणाम Main pane प्रदर्शित झाला आहे.
04:24 Speed drop down मेनू मधून पर्याय निवडून, तुम्ही संक्रमण गती नियंत्रित करू शकता.
04:31 Modify Transitions खाली , Speed ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. Medium वर क्लीक करा.
04:39 आता, संक्रमणास आवाज बसवूया.
04:43 Modify Transitions खाली, Sound ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा.. beam निवडा.
04:52 त्याच प्रमाणे, दुसरी स्लाईड निवडू.
04:56 Task पेन मध्ये Slide Transitions वर क्लीक करा.
05:00 Apply to selected slides' खाली, wheel clockwise, 4 spokes निवडा.
05:08 आता Speed ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. Medium निवडा.
05:13 पुढे, Sound ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा.. Applause निवडा.
05:21 आता, आपण बनविलेल्या संक्रमण परिणामाचे पुर्वविलोकन (preview)करू.
05:25 Play वर क्लिक करा.
05:28 आपण, स्लाईड संक्रमणास कसे एनीमेट करावे आणि आवाज परिणाम कसा जोडावा शिकलो.
05:35 आता , प्रेझेन्टेशन कसे बनवावे जे आपोआप पुढे जाईल हे शिकूया.
05:42 Tasks पेन वरुन , Slide Transitions वर क्लीक करा.
05:46 Transition type"' मध्ये, Checkerboard Down निवडा.
05:50 Speed drop-down मध्ये, Medium निवडा.
05:55 Sound drop-down वरुन , Gong' निवडा.
06:00 Loop Until Next Sound तपासा.
06:04 Automatically After रेडिओ बटनावर क्लीक करा.
06:09 1sec वेळ निवडा.
06:14 Apply to all Slides वर क्लीक करा.
06:18 लक्ष असुद्या कि Apply to all Slides बटनावर क्लीक करणे, हे संक्रमण सर्व स्लाईडना सारखे लागू होते.
06:25 ह्या मार्गाने आपल्याला प्रत्येक स्लाईडसाठी स्वतंत्रपणे संक्रमण जोडावे लागत नाही.
06:31 Main मेनू वरुन , Slide Show वर क्लिक करा आणि मग Slide Show निवडा.
06:38 लक्ष द्या कि, स्लाईड आपोआप प्रदर्शित होईल.
06:49 प्रेझेन्टेशन च्या बाहेर येण्यास Escape की दाबा.
06:54 आता आपण शिकूया प्रेझेन्टेशन, जे स्वयंचलितपणे प्रदर्शित होईल पण प्रत्येक स्लाईडच्या विविध प्रदर्शन वेळेनुसार.
07:03 हे उपयुक्त आहे जेव्हा प्रेझेन्टेशन मधील काही स्लाईडसचा आशय अधिक लांब किंवा किचकट असतो.
07:13 Main पेन वरुन , प्रथम Slide Sorter Tab वर क्लिक करा.
07:18 दुसरी स्लाईड निवडा.
07:21 Task पेन वर जा.
07:24 Slide Transitions खाली Advance slide पर्याया वर जा.
07:29 Automatically after फील्ड मध्ये वेळ २ सेकंद एंटर करा.
07:37 Main , पेन वरुन तिसरी स्लाईड निवडा.
07:42 Task पेन वर जा.
07:44 Slide Transitions खाली Advance slide वर जा.
07:49 Automatically after फील्ड मध्ये वेळ 3 सेकंद एंटर करा.
07:57 आता चौथी स्लाईड निवडा आणि मागील स्लाईडस प्रमाणे, पायऱ्या अवलंबुन वेळ ४ सेकंद मध्ये बदला.
08:08 Main मेनू वरुन Slide Show वर आणि मग 'Slide Show वर क्लीक करा.
08:13 लक्ष द्या, कि प्रत्येक स्लाईड वेळेच्या ठराविक अंतराने प्रदर्शित होईल.
08:19 प्रेझेन्टेशन च्या बाहेर येण्यास Escape की दाबा.
08:24 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे, या ट्यूटोरियल मध्ये आपण स्लाईड शोज, स्लाईड ट्रान्सिशन, ऑटोमेटिक शोज बदद्ल शिकलो.
08:37 येथे तुमच्यासाठी assignment आहे.
08:40 नवीन प्रेझेन्टेशन बनवा.
08:42 wheel clockwise 2 spoke संक्रमण,
08:46 2 spoke transition at medium speed, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्लाईडकरिता, gong ध्वनी साहित जोडा.
08:54 स्वयंचलित स्लाईड शो बनवा.
08:58 प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
09:04 जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल, तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता.
09:09 स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते .
09:18 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
09:25 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
09:37 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
09:48 या टयूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana