LaTeX-Old-Version/C2/Letter-Writing/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार, ला टेक वापरून पत्रलेखन कसे करावे या प्रशिक्षणात आपले स्वागत. तुम्ही आता तीन विंडोज बघू शकता ः या ला टेक वापरून टाईपसेटींग करण्याच्या तीन स्वतंत्र पायऱ्या आहेत.
00:13 सोर्स फाईल ची निर्मिती, पी डी एफ फाईल बनविणारे कंपाइलेशन आणि पी डी एफ फाईल वाचक.
00:23 मी मॅक ओ एस एक्स मधील स्किम हा विनामूल्य पी डी एफ वाचक वापरीत आहे कारण तो प्रत्येक कंपाइलेशन नंतर आपोआप नवीन आवृत्ती दाखवितो.
00:37 लिनक्स तसेच विंडोज मध्ये अशा प्रकारची सुविधा असणारे अनेक पी डी एफ वाचक आहेत.
00:44 आपण आता सोर्स फाइल मधील प्रत्येक आज्ञा काय करते ते पाहू.
00:50 पहिली ओळ असे दर्शविते की हे डॉक्युमेंट म्हणजे पत्र आहे.
00:55 अक्षरांचा आकार १२ पॉइंट आहे. यातला पहिला भाग पाठविणाऱ्याचा पत्ता आहे. हा येथे महिरपी कंसात दिसतो आहे. याचा परिणाम निर्मित फाईल मध्ये उजव्या बाजूला वरती दिसतो आहे.
01:13 दोन तिरक्या रेघांनी नवीन ओळ सुरु होते. मी इथल्या दोन रेघा काढून टाकतो- सेव्ह करतो, पी डी एफ ला टेक वापरून जुळवतो- दोन ओळींची एक ओळ झाली हे तुम्ही पाहू शकता.
01:40 या आधी दोन तिरक्या रेघांनी ही ओळ तोडण्याचे आपण ला टेक ला सांगितले होते. आता या तिरक्या रेघा तिथे नाहीत, त्यामुळे ला टेक ही ओळ तोडणार नाही.
01:52 मी या तिरप्या रेघा परत देतो. सेव्ह व कंपाईल करतो. कंपाईल करण्यापूर्वी प्रत्येक बदल सेव्ह करणे जरूरी आहे हे लक्षात ठेवा.
02:08 आपण आता पत्ता रिकामा ठेवल्यास काय होते ते पाहू.
02:14 मी येथे येऊन हे शेवटपर्यंत निवडते, डिलीट करते, सेव्ह करते, कंपाईल करते.
02:34 तुम्ही बघू शकता की पाठवणाऱ्याचा पत्ता दिसेनासा झाला आहे.
02:40 आजचा दिनांक आपोआप अमेरिकन पद्धतीत दिसत आहे ः महिना, दिनांक आणि वर्ष.
02:51 हे तिरपी रेघ डेट तिरपी रेघ टुडे या आज्ञे मुळे मिळते. आपण आता ही जागा रिकामी ठेवून हे आपोआप दिसणे कसे थांबवावे ते पाहू. सेव्ह, कंपाईल.
03:16 दिनांक दिसेनासा झाला.
03:21 आपल्याला आपण स्वतः ठरवलेला दिनांक दाखवायचा असेल तर, आधी हा दिनांक लिहू. ९ जुलै २००७, सेव्ह, कंपाईल. दिनांक दिसला.
03:43 या दिवशी हे प्रशिक्षण पहिल्यांदा बनविण्यात आले.
03:47 हे कंपाईल केल्यावर आपल्याला निर्मित फाईल मधे भारतीय पद्धतीने दिनांक दिसेल.
03:57 आता आपण पत्ता पुन्हा लिहू आणि कंपाईल करून डॉक्युमेंट मूळ स्थितीत आणू.
04:11 सहीची आज्ञावली पत्राच्या शेवटी दिसेल. आपण आधी डॉक्युमेंटची सुरुवात केली आणि मग पत्राची.
04:20 पाठवण्याचा पत्ता सर्वप्रथम येतो. तो निर्मित पत्रात सर्वात वर डावीकडे दिसतो. मी हे श्री. एन. के. सिन्हा यांना पाठवत आहे.
04:34 स्लॅश ओपनिंग ही आज्ञा मायना लिहिण्यास उपयोगी आहे. तुमच्या एव्हाना लक्षात आलेच असेल की सर्व ला टेक आज्ञा या तिरक्या रेघेनी सुरू होतात.
04:50 पत्रातील मजकूर यानंतर येतो. ला टेक मधे नवीन परिच्छेदाची सुरूवात आता दाखवणार आहे तशी रिकामी ओळ वापरून करतात. मी येथे जाते. आता हे वाक्य वुई आर ने सुरू होते आहे. हे आपण पुढल्या ओळीवर नेऊ. मी हे सेव्ह करते. कंपाईल करते.
05:20 हे पुढल्या परिच्छेदात गेलेले दिसते.नविन परिच्छेदामुळे पत्र दोन पानांचे झाले आहे.
05:30 अक्षरांचा आकार दहा केला तर हे पत्र एका पानात बसते का हे आपण पाहू. मी हे करते. सेव्ह करून कंपाईल करते. पत्र एका पानात बसते हे तुम्ही पाहू शकता.
05:54 मी पुन्हा अक्षरांचा आकार बारा करते आणि हा परिच्छेद काढून टाकते. मी हे कंपाईल करते. ठीक झाले.
06:18 बिगिन आणि एण्ड आयटेमाइझ आज्ञा वापरून तयार होणाऱ्या यादी बद्दल मी आता समजावून सांगते.
06:27 स्लॅश आयटम ने सुरू होणारी प्रत्येक ओळ चिन्हांकित दिसते.
06:34 मला त्या जागी अंक हवे असतील तर ते जमेल काय ?
06:40 तुम्हाला यासाठी फक्त मी जसे आयटेमाइझ ऐवजी एन्युमरेट वापरले तसे वापरावे लागेल.
06:49 मी हे एन्युमरेट करते. सेव्ह करते. अर्थात शक्य तितक्या अधिक वेळा सेव्ह करणे हे चांगले असते. मी पुन्हा कंपाइल करते.
07:05 तुम्हाला चिन्हांऐवजी अाता अंक दिसतील.
07:14 अखेरीस, मी युवर्स सिन्सिअरली लिहिले आहे ते येथे येते.
07:20 आपण अगोदरच स्वाक्षरीबद्दल बोललो आहोत.
07:24 शेवटी सी सी ही आज्ञा या पत्राची प्रत कोणाला पाठवायची हे ठरविण्यास मदतीची ठरते. मी हे पत्र एण्ड लेटर वापरून आणि हे डॉक्युमेंट एण्ड डॉक्युमेंट या आज्ञा वापरून संपविले.
07:43 यातील गोष्टी हव्या तशा बदलून पहा. तुम्हाला आत्मविश्वास वाटेपर्यंत एका वेळी एकच बदल करा आणि प्रत्येक बदला नंतर कंपाइल करून तुम्ही केलेला बदल योग्य होता का हे तपासा.
07:59 मी आत्ता जरी मॅक मधील पत्रलेखन पद्धत समजावली असली तरी हीच सोर्स फाइल लिनक्स आणि विंडोज मधील ला टेक मधे चालेल.
08:10 याच बरोबर आपले हे प्रशिक्षण संपले. मी चैत्राली सी डीप आय आय टी मुंबई आपली रजा घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey