LaTeX-Old-Version/C2/Inside-story-of-Bibliography/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार, संदर्भ सूची तयार करण्यासंबंधीच्या या प्रशिक्षणात आपले स्वागत.
00:06 मी याकरता BibTeX (बीबटेक) वापरणार आहे.
00:09 BibTeX ही लेटेक पेक्षा वेगळी स्वतंत्र अशी सुविधा आहे.
00:13 या प्रशिक्षणात आपण आता तुम्ही पाहत असलेली pdf फाईल कशी बनवावी हे पाहुया .
00:19 पहिले पान शीर्षक दाखवत आहे.
00:23 आता दुसरे पान पाहुया.
00:28 इथे मजकूर आहे, संदर्भांना एक ते सहा क्रमांक दिलेले आहेत.
00:33 आणि पुढल्या पानावर अकरा पर्यंत क्रमांक आहेत.
00:37 तुम्ही हे लक्ष्यात घ्या, की हे संदर्भ अद्यक्षरानुसार दिलेले आहे.
00:45 तुम्ही हे इथे पाहू शकता.
00:49 आता आपण याकरता वापरलेली मूळ फाईल पाहू.
00:52 ही नीट पाहुया.
00:55 हे स्पष्ट दिसतय की त्यामध्ये हे संदर्भ दिलेले नाही.
01:02 ही माहिती मूळ फाईलमध्ये अस्तित्वात नाही.
01:05 मग हे संदर्भ कुठे आहेत.
01:08 ते ‘ref’. या फाईलमध्ये आहेत.
01:12 या फाईल चे नाव ‘ref.bib’ असे आहे.
01:19 बिब्लीयोग्राफी या अज्ञेकरता हे सामान्य आहे.
01:27 ही पाहा
01:31 ‘ref.bib’.
01:35 आपण या ref.bib मध्ये काय आहे ते पाहुया.
01:47 यातील संदर्भांची माहिती ही विविध प्रकारची आहे.
01:53 उदाहरणार्थ हे पुस्तक आहे.
01:57 तंत्रज्ञान – अहवाल, प्रोसीडिंग्स, किरकोळ तसेच लेख.
02:05 आपण थोड्या काळा नंतर ही फाईल पुन्हा पाहू आणि समजून घेऊया.
02:12 आता आपण निर्मितीमध्ये संदर्भांची यादी कशी तयार करायची या कार्य पद्धती वर लक्ष केंद्रित करू.
02:23 आपण references.tex ही मूळ फाईल पुन्हा पाहू.
02:29 या पानाच्या सुरवातीला जाऊया.
02:33 रेफरेन्सस हा प्रीफिक्स अश्नार्‍या सर्व फाईल्सशी आधी आपण प्रथम पाहू.
02:45 ह्या पाहा references.tex सोडून बाकी फाईल्स काढून टाकू.
02:56 ह्याला हो म्हणू.
02:59 आता आपल्याकडे फक्त references.tex आहे. मी ही संकलित करते.
03:06 संकलित केल्यावर सावधगीरीची सूचना आली, की काही संदर्भ पारिभाषित नाहीत काही गोष्टी सापडत नाही.
03:13 आपण पाहू शकतो की pdf.tex ह्या अज्ञेमूळे काही नवीन फाईलशी निर्मिती झाली.
03:22 references.pdf बरोबर आपल्याकडे references.log आणि references.aux या फाईल्स आहेत.
03:39 या फाईल इथे दिसत आहे.
03:50 या पाहा या त्या फाईल्स आहेत.
03:53 आधी आपण references.log ही फाईल उघडू.
04:13 त्यामध्ये बरीच माहिती आहे.
04:15 किंभवन् इथे आलेल्या सर्व सूचना त्यामध्ये आहे.
04:19 आपण आता थोडे खाली जाऊन पाहू
04:22 इथे बरीच माहिती आहे आणि या सवदगीरीच्या सूचनापण इथे दिसत आहेत.
04:26 त्याचबरोबर, काही अक्षर प्रकार सापडत नाहीत, ही सूचना देखील दिसतेय.
04:32 परंतु आपण त्यावाचून आपले काम चालुवू शकतो.
04:36 काही संदर्भ व साइटेशन सापडत नाहीत ही सूचना मात्र आपल्या दृष्टीने महत्वाची आहे.
04:42 आपण आता या सूचनेवर काही मार्ग काढू
04:46 आता आपण ही दुसरी फाईल references.aux ही उघडूया.
04:58 references.aux
05:02 यामध्ये अनेक साइटेशन आज्ञा आहेत. या इथे कुठून आल्या आहेत.
05:07 साइटेशनची सर्व विधाने मूळ फाईल मधील 'cite' या अज्ञेमध्ये आलेली आहेत.
05:12 आपण आता पाहू शकतो.
05:16 हे मी इथे उघडते.
05:21 आता खाली जाऊ त्यासाठी हे वापरु मूळ फाईल.
05:25 उदाहरणासाठी हे पाहा.
05:29 हे इथे ‘cite vk 79’.
05:32 ते vk79 इथे येते.
05:39 ‘cite tk 80’ हे इथे येते.
05:47 तसेच ही bibstyle-plain ही सुद्धा मूळ फाईल मध्ये इथे येते.
05:54 तुम्ही वर पाहा, bibliography style – plain हे इथे दिसून येईल.
06:01 ही aux फाईल चलांची नवे देखील साठवते.
06:06 उदाहार्णकरता मी ह्या विभागा करता लेबल देते.
06:11 मी इथे जाते.
06:18 नाही तर मी असा करते की लेबल शिवाय हे करून दाखवते.
06:22 म्हणजे आपण हे खोडून टाकू.
06:30 मी आता हे संकलित करते.
06:33 मी ही फाईल पुन्हा उघडते.
06:39 आणि आता पाहा त्यामध्ये हे दिसत नाही.
06:49 मी इथे ‘label – sec arya’ हे लिहिले.
06:56 ‘label – sec arya’ रक्षित केले.
07:01 संकलित केले.
07:06 हे उघडू.
07:09 मग तुम्ही या फाईल पर्यंत आलात की पुन्हा उघडू.
07:13 हे पाहा इथे new label sec arya ही अज्ञे दिसायला लागली.
07:20 ही पाहा
07:23 हे तेच लेबल आहे की जे आपण इथे पहिले होते.
07:28 आणि हे म्हणते सेकशन 1(एक) हा इथे दिसतोय.
07:34 आणि हे दोन पान क्रमांक दाखवतात.
07:38 या दस्ताएवजात दोन पान आहेत.
07:42 पुढल्या संकलना दरम्यान लेटेक ही aux फाईल वाचते आणि लेबल विषयची माहिती दाखवते.
07:48 यामूळे लेबल वेवस्थित दिसण्यासाठी दोन वेळा संकलन करणे गरजेचे असते.
07:53 मी आता तुम्हाला संदर्भ सूची कशी बनते हे समजावून सांगते.
07:58 त्यासाठी आपण आता BibTeX वापरायची वेळ आली आहे.
08:01 आपण आता BibTeX references ही आज्ञा इथे देऊ.
08:06 ही पाहा अशी bibtex references.
08:12 ही आज्ञा इथे दिल्याप्रमाणे, references.aux मधून आवश्यक बावे घेते.
08:19 हे पाहा हे सांगते.
08:21 references.aux वापरली हे सांगते की त्याने plain.bst हे स्टाइल फाईल वापरली आहे.
08:30 हे या प्लेन या अज्ञेमूळे झाले.
08:34 आणि ref.bibची तारीख हे आपण आधी समजावलेले आहे.
08:39 ref.bib ही डेटा बेस फाईल क्रमांक एक आहे.
08:44 हे आठवा की आपण प्लेन स्टाइल आणि ref bib(रफ बीब) या मूळ फाईल मध्ये वापरलेले आहे.
08:50 आता आपण कोणत्या फाईल्स निर्माण झाल्या ते पाहुया.
08:54 म्हणजे BibTeX.references या अज्ञेमूळे कोणत्या नवीन फाईल्स बनल्यात ते पाहू.
09:02 त्यांची यादी करू.
09:09 तुम्ही पाहू शकता की आपण पुर्वी पाहिलेल्या फाईल्स व्यतिरिक्त आपल्याकडे references.blg व references.bbl या दोन नवीन फाईल्स आहेत.
09:19 यापैकी references.blg मध्ये फॉरमॅटिंगची माहिती आहे, ती आपण पाहुया.
09:32 तुम्हाला या ठिकाणी काही फॉरमॅटिंग ची माहिती दिसेल.
09:38 मी यातून बाहेर पडते.
09:42 आणि या bblफाईल मध्ये काय आहे ते पाहते.
09:47 References . bbl या फाईल मध्ये आपण पुर्वी पाहिलेले संदर्भ आहेत.
09:52 References . bbl ने या संदर्भांची यादी pdf फाईल मध्ये ते जसे दिसतात तशीच केली आहे.
09:59 परंतु सर्व सामान्यपणे या फाईल्समध्ये आपणहून बदल करणे किंवा त्या पाहणे गरजेचे नाही.
10:07 या अखेरच्या संकलनामध्ये आपल्याला अशीही सूचना मिळाली होती की References.bbl सापडत नाही.
10:13 ही सूचना आपल्याला references.log येथे दिसू शकेल.
10:20 ही फाईल इथे उघडू.
10:29 हे पाहा हे इथे सांगितलेले आहे.
10:34 की No file references.bbl.
10:42 हे आपल्या पूर्वीच्या संकलनात झाले होते.
10:45 परंतु आता BibTeX वापरुन आपण references.bbl ही फाईल बनवली आहे.
10:53 आता आपण पुन्हा एकदा संकलित करू.
11:05 आता येणार्‍या सूचना वेगळ्या आहेत, हे सांगते की ‘label’s may have changed’.
11:10 प्रतेक्षात आपण जेव्हा संकलित करतो तेव्हा तात्काळ references.bbl वाचली जाते आणि तेथील संदर्भ इथे आणले जातात.
11:19 आणि हा अनुक्रम आपण references.bbl मध्ये पाहिलेल्या अनुक्रमाप्रमाणेच असतो.
11:25 उदाहरणार्थ तुम्ही हे पाहू शकता की हा पहिला संदर्भ Chang आणि Pearson हा इथे पण तोच आहे.
11:34 परंतु अजुन सुद्धा ही माहिती बरोबर नाही
11:37 आपण हे सुयोग्यपणे दिलेले नाहीत.
11:40 आता आपण हे संकलित करू.
11:42 हे मी अगोदर सांगितलेले आहे त्यानुसार पुन्हा एकदा संकलित करू म्हणजे हे ठीक होईल.
11:51 आपण हे कसे समजून घेयच तर आपण references. aux ही फाईल पाहू.
12:04 references. aux आणि लक्ष्यात घेऊ की साइटेशन संदेशाखेरीस आपण इथे एक अधिक संदर्भ आहे.
12:16 हे सांगते bibcite cp82 आणि इतर बरेच काही
12:22 हे सांगते की संदर्भामधील लेबलcp82 हा पहिला संदर्भ आहे.
12:29 आता हे आपण उदाहरणादाखल पाहुया.
12:35 हे उघडूया
12:41 मूळ फाईल पुन्हा पाहू.
12:45 हे उघडू मूळ फाईल पुन्हा पाहू.
12:48 त्यात cp82 शोधू.
12:55 हा पाहा हा इथे आहे आणि त्याच्याशी जोडलेला संदर्भ इथे आहे.
13:03 आणि हे इथे ह्या सूचीत दिसत आहे.
13:11 आता ही माहिती म्हणजे cp82 हा संदर्भ
13:16 references.aux या फाईल मध्ये उपलब्ध अश्नार्‍या संदर्भ सूचीमध्ये पहिल्या क्रमांकावर येतो.
13:28 मी हे पुन्हा संकलित केले.
13:32 आता ही माहिती आपोआप इथे येते.
13:36 आता आपण पाहू शकतो की इथे येणारे सारे संदेशही नाहीसे झाले.
13:45 लेटेक ने असे केले की ही references.aux मधली संदर्भ क्रमांकाची माहिती घेतली.
13:52 आणि ती मूळ फाईल मधील cite या अज्ञेच्या लेबल्स ला दिली.
14:03 आता आपण ref.bib ही सारे संदर्भ अश्नारी फाईल पाहू
14:13 इथे येऊ ref.bib
14:18 या पानाच्या सुरवातीला जाऊ.
14:21 इमेक संपदकामध्ये आपल्याला द्याचा असलेला संदर्भ आपण त्याच प्रकारे देण्याची सुविधा उपलब्ध आहे.
14:28 उदाहरणार्थ असे समजा की काहीतरी प्रविष्टी म्हणून उपलब्ध आहे.
14:32 तर इमेक संपदकामध्ये हे बनवणे शक्य आहे.
14:36 जेव्हा तुम्ही हा ‘article in journal’ प्रकार निवडाल तेव्हा तुम्हाला एक रिकामा राकना मिळेल.
14:46 हा पाहा.
14:51 तो तुम्ही भरू शकता. तुमच्या संपदकामध्ये हे उपलब्ध नसेल तर चिंता करण्याचे काहीच कारण नाही.
14:58 कारण तुम्ही हे नुसते टंकित करून सुद्धा बनवू शकता.
15:04 सध्यापुरते मी हे अंडू करते, कारण मला हे नको आहे.
15:11 तुम्ही काही कळीचे शब्द पारिभाषित करून ते ref.bib या फाईलमध्ये चल म्हणून वापरु शकता.
15:21 उदाहरणार्थ हे 'JWC' म्हणजे John Wiley & Songs Limited, Chichester जे काही संदर्भामध्ये वापरलेले आहे.
15:37 उदाहरणार्थ या संदर्भात, प्रत्येक संदर्भात एक कळीचा शब्द असतो आणि तो त्याच्या सुरवातीला येतो.
15:45 हे पाहा हा या इथला संदर्भ, याचा शब्द आहे KMM07 आणि तो इथे पण दिसत आहे.
15:56 खारतर मी हा संदर्भ या कळीच्या शब्दाने तिथे आणला आहे.
16:05 आता मी तुम्हाला समजावून सांगते की BibTeX वापरुन विविध प्रकारचे संदर्भ देणे, तसे सुविदजनक ठरते.
16:13 आपण बदल करण्यापूर्वी हे आठवू कि इथे दिलेले संदर्भ हे अद्याक्षरांच्या अनुक्रमाने आहेत.
16:20 उदाहरणार्थ,
16:23 B. C. Chang आणि Pearson
16:27 क्रमांक एक हा इथे दिसत आहे.
16:35 इथला पहिला संदर्भ ३ दाखवलेला आहे, मग २ मग ११ आणि मग इतर.
16:43 कारण इथले संदर्भ हे अद्याक्षरांच्या अनुक्रमाने दिलेले आहेत.
16:48 आता आपण बिब्लियोग्राफी स्टाईल हि बदलून पाहू.
16:52 मी हे करते.
16:54 मी हि स्टाईल u-n-s-r-t अशी बदलते.
17:03 u-n-s-r-t त्यामुळे IEEE जर्नल्स मधल्या सारखी म्हणजे वर्गीकरण न केलेली यादी येईल.
17:15 एकदा संकलित केल्यावर references.aux स्टाईल माहिती करता अद्ध्ययावत होईल.
17:24 आता त्यात u-n-s-r-t दिसू लागेल.
17:31 BibTeX.references वापरून BibTeX चालवल्यानंतर references.bbl या फाईल मध्ये संदर्भांची यादी तयार झाली.
17:42 लक्ष्यात घ्या कि त्याने references.bbl निर्माण केली असेल.
17:47 परंतु ती आपण ठरवलेल्या u-n-s-r-t या नवीन प्रमाणानुसार
17:52 आता आपण references.tex संकलित करू.
18:03 आता अनुक्रम बदलला हे लक्ष्यात घ्या.
18:06 संदर्भ आता अद्द्याक्षराणप्रमाणे नाही पण एक तक्रार दिसतीये कि लेबल्स बदललेली असावीत.
18:12 त्यामुळे ते ठीक करण्यासाठी पुन्हा एकदा चालवा.
18:15 आपण हे पुन्हा चालवू.
18:21 हि तक्रार आता निघून गेली.
18:28 आता हे पाहा कि हे संदर्भ त्यांच्या मूळ जागेच्या अनुक्रमाने होते.
18:34 त्याच अनुक्रमाने इथे दिसत आहे.
18:37 उदाहरणार्थ हे पाहा संदर्भ एक हा संदर्भ सूची मध्ये सर्वप्रथम दिसत आहे.
18:43 दुसरा संदर्भ हा दुसर्या क्रमांकावर दिसत आहे, तिसरा, चौथा, पाचाव, साहवा याप्रमाणे.
18:55 आता आपण संगणक विज्ञानातील जर्नल्सना आवश्यक असतात त्याप्रमाणे संदर्भ तयार करू.
19:02 आता आपण इथे येऊ आणि ह्याला ‘alpha’ म्हणू.
19:08 मी हे एकदा संकलित करते.
19:11 मी BibTeX करते.
19:14 पुन्हा एकदा संकलित करते.
19:17 आता हे बदललेले आहे पण इथले संदर्भ मात्र बदललेले नाही.
19:22 इथे अशी तक्रार आहे कि लेबल्स बदललेली आहेत.
19:26 मी हे पुन्हा संकलित केले तरी हे असच आहे.
19:30 म्हणजेच CP82 अश्णारा संदर्भ B C Chang आणि Pearson हा इथे आहे.
19:38 आता या प्रविष्ट्यांचे संदर्भ इथे पण आहे.
19:42 इंटरनेट वर संदर्भ देण्याचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत.
19:51 मी आता तुम्हाला ifac आणि केमिकल इंजिनियरिंगच्या जर्नल मधील पद्धत दाखवते.
19:58 प्रथम आपण इथे येऊया.
20:10 आणि use-packages अज्ञेमध्ये Harvard लिहा.
20:15 मी हे दाखवते.
20:19 आता पद्धत ifac अशी बदला.
20:28 हे दोन फाईल मधून कार्यान्वित होते.
20:34 Harvard.sty आणि ifac.bst.
20:41 या फाईल्स इंटरनेटवर आहेत आणि त्या तुम्ही उतरवू शकता.
20:47 हे संकलित करू
20:50 pdf-LaTeX-references
20:57 BibTeX चालवू.
21:00 दोन वेळा संकलित करू.
21:05 इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला संदर्भांची यादी मिळते.
21:10 हे संदर्भ अनुक्रमंकाविना अध्याक्षरांप्रमाणे वर्गीकृत आहेत.
21:17 अनुक्रमांक दिसे नासे झाले आहेत.
21:20 संदर्भांची पद्धत लेखकाच्या नावाप्रमाणे आहे.
21:26 म्हणजे इथे पाहा
21:30 हे सांगते विद्यासागर 1985 आणि वर्ष.
21:38 आपण ह्या पुढल्या पानावरपण काही संदर्भ पाहू शकतो.
21:41 हे पाहा हे अद्याक्षराणप्रमाणे आहेत.
21:45 जेव्हा संदर्भ देण्याची हि पद्धत वापरली जाते तेव्हा 'cite' हि आज्ञा हा संपूर्ण संदर्भ एका कंसात देते.
21:52 उदाहरणासाठी हि मूळ फाईल पाहा.
21:56 हे पाहा
21:59 या इथे येऊ.
22:06 cite KMM07
22:15 cite KMM07
22:22 यामुळे दिसणार आहे क्रमिक पुस्तक.
22:25 ‘the textbook by (Moudgalya, 2007b)’ असे दिसते.
22:30 इथे मौद्गल्य हे नाव कंसात दिसायला नको तर फक्त वर्ष कंसात दिसले पाहिजे.
22:36 हे cite-as-noun या अज्ञेमूळे ठीक करता येते.
22:42 आपण या आज्ञा देऊ.
22:44 मी हे रक्षित करते संकलित करते
22:50 हे पाहा.
22:53 हे पाहा आता मौद्गल्य हे नाव कंसाच्या बाहेर आले आहे.
22:57 हे cite-as-noun या समस्येवर तोडगा आहे.
23:01 आपण हे लक्ष्यात ठेवणे म्हत्वाचे आहे हि cite-as-noun हि आज्ञा फक्त आपण आता वापरत असलेल्या संदर्भ पद्धतीतच उपयोगी आहे.
23:09 हि इतर संदर्भ पद्दतीन मध्ये उपयोगी पडेलच असे नाही.
23:13 आधी सांगितल्याप्रमाणे संदर्भ देण्याच्या अनेक पद्धती आहेत.
23:18 फक्त त्याकरता योग्य अश्या sty आणि bst फाईल्स तुम्ही उतरवून घेणे गरजेचे आहे.
23:24 मी दिलेल्या या उदाहरणामध्ये मी Harvard.sty आणि ifac.bst या फाईल्स वापरल्या आहेत.
23:33 तुम्ही निट विचार केला तर तुमच्या लक्ष्यात येईल कि आपण संदर्भांच्या मूळ यादीत म्हणजेच ref.bib या फाईल मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
23:42 हि BibTeX ची विशेष क्षमता आहे.
23:45 आपण हे संदर्भ सूची कशी बनवावी हे समजावून घेण्यासाठी बराच वेळ दिला असला तरी प्रत्येक्ष वापर करणाऱ्यांसाठी हे फारच सोपं आहे.
23:56 प्रथम सगळे संदर्भ अश्णारी .bib फाईल बनवा
24:00 .sty आणि .bst या फाईल्स मिळवा.
24:04 त्यापैकी बर्याचश्या कदाचित तुमच्या इन्स्टलेशनमध्ये अगोदर पासून उपलब्ध असतील.
24:09 मूळ फाईल एकदा संकलित करा, pdf LaTeX चालवा.
24:13 आता मूळ फाईल दोन वेळा संकलित करा.
24:16 तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल कि हे फारच सोपं आहे.
24:20 तुम्ही नक्कीच Bibtex व Latex बद्दल समाधानी व्हाल व ते पुन्हा पुन्हा वापराल.
24:25 याच बरोबर आपले हे प्रशिक्षण संपले. मी चैत्राली आय आय टी मुंबई आपली रजा घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana