Koha-Library-Management-System/C3/Installation-of-MarcEditor/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Windows वर Installation of MarcEditor वरील Spoken Tutorial मध्ये आपले स्वागत आहे.
00:08 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - 64-bit Windows मशीनवर MarcEditor इन्स्टॉल करणे.
00:16 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहेः

Windows 10 Pro Operating System आणि Firefox web browser.

00:27 हे ट्युटोरिअल लायब्ररी कर्मचाऱ्यांसाठी(स्टाफसाठी) सर्वात योग्य आहे.
00:32 पुढे जाण्यापूर्वी, कृपया आपल्या मशीनवर खालील गोष्टी आहेत हे सुनिश्चित करा -

Windows 10, 8 किंवा 7,

00:43 कोणतेही वेब ब्राऊजर. उदा. Internet Explorer, Firefox किंवा Google Chrome.
00:51 आपल्या विद्यमान लायब्ररीमध्ये, आपल्याकडे Excel spreadsheet मध्ये लायब्ररी रेकॉर्ड्स असू शकतात.
00:58 आणि, आपली लायब्ररी आता Koha Library Management System मध्ये स्थलांतरित(मायग्रेट) केली जात आहे.
01:05 म्हणून, सर्व रेकॉर्ड्स Excel मधून MARC format मध्ये रुपांतरित(कनवर्ट) करणे आवश्यक आहे.
01:12 हे माहित असणे महत्त्वाचे आहे की, Excel spreadsheet मधील रेकॉर्ड्स प्रथम MARC फॉर्मेटमध्ये रूपांतरित(कनवर्ट) करावे लागेल आणि नंतर Koha मध्ये इम्पोर्ट करावे लागेल.
01:26 हे असे आहे कारण Koha मध्ये Excel format मधील डेटा थेट इम्पोर्ट करण्याची तरतूद नाही.
01:35 सुरवात करू.
01:37 Excel data MARC फाईलमध्ये, म्हणजेच - (dot) mrc फॉर्मेटमध्ये, रुपांतरित(कनवर्ट) करण्यासाठी, आपण MarcEdit software वापरणार आहोत.
01:48 हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी ब्राऊझरवर जा आणि URL टाईप करा.
01:55 शीर्षक Downloads सह एक नवीन पृष्ठ उघडते.
02:00 Current Development, अंतर्गत MarcEdit 7.0.x/MacOS 3.0.x वर जा Windows 64-bit download शोधा.
02:17 तथापि, आपल्याकडे 32-bit मशीन असेल तर आपण Windows 32-bit download लिंकवर क्लिक केले पाहिज.
02:26 तुमची मशीन 32-bit किंवा 64-bit, आहे की नाही हे तपासण्यासाठी, मशीनच्या तळाशी डाव्या कोपऱ्यात जा.
02:35 Start आयकॉनवर क्लिक करा.
02:38 वर स्क्रोल करा आणि Settings वर क्लिक करा.
02:43 ह्या आयकॉन्सवरून, System- Display, notifications, apps, power वर क्लिक करा.
02:51 हे काही पर्यायांसह दुसरी डावीकडे विंडो उघडते.
02:56 About टॅब शोधा आणि त्यावर क्लिक करा.
03:00 त्याच पृष्ठावर, उजव्या बाजूच्या दिशेने PC सेक्शनच्या अंतर्गत System type वर जा.
03:08 आपल्या मशीनच्या operating system चे तपशील प्रदर्शित केले जातील.
03:13 माझ्या मशीनसाठी -64-bit operating system, x64-based processor आहे.
03:21 तपशील वाचल्यानंतर window बंद करा.
03:25 असे करण्यासाठी, वरच्या उजव्या कोपऱ्यात जा आणि क्रॉस चिह्नावर क्लिक करा.
03:31 आपण परत त्याच पेजवर, Downloads वर परत येऊ.
03:36 जसे की माझे मशीन 64-bit, आहे, मी 64-bit download वर क्लिक करेन.
03:42 64-bit download shirshak असलेली दुसरी नवीन विंडो दोन सेक्शन्ससह उघडेल- Non-Administrator आणि Administrator.
03:53 पुढे, मी Administrator च्या सेक्शनच्या तळाशी Download MarcEdit 7 लिंकवर क्लिक करेन.
04:02 कारण मी माझ्या लायब्ररीचा नामित Koha administrator आहे.
04:09 एक डायलॉग-बॉक्स MacrEdit_Setup64Admin.msi प्रदर्शित होतो.
04:16 आपण येथे दोन पर्याय पाहू शकतो- Save File आणि Cancel.
04:22 तळाशी Save File बटणावर क्लिक करा.
04:26 असे केल्यानंतर, आपल्या मशीनच्या Downloads फोल्डर वर जा.
04:31 येथे आपण पाहू शकता की, MacrEdit_Setup64Admin.msi फाईल सेव्ह झाली आहे.
04:40 आता सेव्ह केलेल्या फाईलवर राईट क्लिक करून प्रदर्शत होणाऱ्या पर्यायांमधून Install वर क्लिक करा.
04:48 User Account Control डायलॉग बॉक्समध्ये, Yes वर क्लिक करा.
04:56 Welcome to the MarcEdit 7 Setup Wizard नावाची आणखी एक विंडो प्रदर्शित होते.
05:04 पृष्ठाच्या तळाशी असलेल्या Next बटणावर क्लिक करा.
05:08 License Agreement शीर्षकासह आणखी एक नवीन विंडो उघडते.
05:14 License Agreement काळजीपूर्वक वाचा.
05:18 आणि 2 पर्यायांमधून, I do not agree आणि I Agree madhun, I Agree रेडिओ बटणावर क्लिक करा.
05:28 नंतर, विंडोच्या तळाशी असलेल्या Next बटणावर क्लिक करा.
05:33 Select Installation Folder नामक एक नवीन विंडो उघडते.
05:39 हे फोल्डरचा पाथ दर्शविते जिथे इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर सेव्ह केले जाईल.
05:45 वैकल्पिकरित्या, आपण हे सॉफ्टवेअर आपल्या पसंतीच्या एका वेगळ्या फोल्डरमध्ये इन्स्टॉल करू शकता.

Folder फिल्डमध्ये आवश्यक पाथ टाईप करून तसे करा.

05:56 आपण टॅब Browse वरदेखील क्लिक करून इच्छित path निवडू शकता.
06:03 तथापि, मी Folder फिल्डमध्ये फोल्डर पाथ आहे तसाच ठेवते.
06:09 आता विंडोच्या तळाशी असलेल्या Next बटणावर क्लिक करा.
06:14 आणखी एक नवीन Confirm Installation विंडो उघडेल.
06:19 आता त्याच विंडोच्या तळाशी असलेल्या Next बटणावर क्लिक करा.
06:25 Installing MarcEdit 7 विंडो उघडते.
06:30 ह्यानंतर, आपण एक सक्सेस मेसेज विंडो पाहतो. हे दर्शवते कि -

Installation Complete. MarcEdit 7 has been successfully installed.

06:42 ह्या विंडोमधून बाहेर पडण्यासाठी Close बटणावर क्लिक करा.
06:47 MarcEdit 7.0.250 By Terry Reese शीर्षकासह विंडो उघडते.
06:56 आता उघडलेल्या सर्व विंडोज मिनिमाईज करा.
07:01 आपण पाहाल की डेस्कटॉपवर ek shortcut तयार झाला आहे.
07:06 यासह, आपण 64-bit Windows मशीनच्या Desktop वर MarcEditor यशस्वीरित्या इन्स्टॉल केला आहे.
07:14 खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देतो.

कृपया तो डाऊनलोड करून पहा.

07:22 Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
07:32 ह्या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
07:36 "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट" साठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे.

ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.

07:48 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana