Koha-Library-Management-System/C3/Import-MARC-to-Koha/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Import MARC file into Koha वरील Spoken Tutorial मध्ये आपले स्वागत आहे.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत : KOHA मध्ये MARC file इम्पोर्ट करणे आणि OPAC मध्ये महत्त्वाचा डेटा शोधणे.
00:20 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहेः Ubuntu Linux OS 16.04
00:28 Koha version 16.05 आणि Firefox Web browser.
00:36 आपण आपल्या पसंतीचा इतर कोणताही वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:41 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी, विद्यार्थ्यांना लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे.
00:47 ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, तुमच्याकडे तुमच्या सिस्टमवर Koha इन्स्टॉल असावा.

आणि तुमच्याकडे Koha मध्ये Admin ऍक्सेस असणेदेखील आवश्यक आहे.

00:58 नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील Koha Spoken Tutorial सीरीज पहा.
01:05 records ला Koha मध्ये इम्पोर्ट दोन पद्धतींमध्ये केले आहे :

Stage MARC records for import आणि Manage staged records.

01:18 सुरवात करण्यास, आपल्या Superlibrarian एक्सेससह Koha मध्ये लॉग इन करू.
01:24 Home page वर, Tools वर क्लिक करा.
01:28 एक नवीन पृष्ठ उघडते. Catalog सेक्शन अंतर्गत Stage MARC records for import वर क्लिक करा.
01:40 Stage MARC records for import शीर्षकासह एक नवीन पृष्ठ उघडते.
01:46 Stage records into the reservoir सेक्शनवर जा.
01:51 येथे, Select the file to stage च्या समीप Browse... वर क्लिक करा.
01:58 File Upload विंडो उघडेल. मग Downloads फोल्डर वर जा.
02:06 येथे TestData.mrc नावाची फाईल शोधा.
02:12 लक्षात घ्या, आपण TestData.mrc फाईल आधीच्या ट्युटोरिअलमध्ये तयार केली होती.
02:20 TestData.mrc फाईल निवडा, जर आधीच निवडलेली नसेल तर.

आणि, पृष्ठाच्या तळाशी Open बटणावर क्लिक करा.

02:32 त्याच पृष्ठावर, तुम्हांला Browse टॅबच्या समीप, फाईलचे नाव म्हणून TestData.mrc दिसेल.
02:43 आता, पृष्ठाच्या तळाशी Upload file बटणावर क्लिक करा.
02:49 तुम्हांला तपकिरी(ब्राऊन) रंगात Upload progress bar दिसेल.
02:55 अपलोड 100% पर्यंत पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला काही तपशील भरण्यास सांगितले जाते.
03:03 प्रथम, Comments about this file साठी field भरा.
03:09 KOHA मध्ये अपलोड केलेली फाईल ओळखण्यासाठी हे उपयुक्त आहे.
03:14 मी Book Data प्रविष्ट करेन.
03:18 पुढील आहे Record type . येथे, Koha डीफॉल्टनुसार Bibliographic निवडतो.
03:26 त्याचप्रमाणे, Character encoding साठी Koha, डीफॉल्टनुसार UTF-8 (Default) निवडतो.
03:35 पुढे, Look for existing records in catalog? सेक्शन वर जा.
03:41 ह्या सेक्शनअंतर्गत, Record matching rule: वर जा.

Koha डीफॉल्टनुसार, Do not look for matching records निवडतो.

03:51 विद्यमान रेकॉर्ड जुळावा असे तुम्हांला वाटत असल्यास, ड्रॉप डाऊनमधून दुसरा पर्याय निवडा जो आहे ISBN/ISSN number.
04:04 आता आपण Action if matching record found वर येऊ.
04:09 Koha डीफॉल्टनुसार, Replace existing record with incoming record निवडतो.
04:16 मग Action if no match is found आहे. Koha डीफॉल्टनुसार, Add incoming record निवडतो.
04:25 पुढे, आपण Check for embedded item record data? सेक्शनवर येतो.

येथे दोन पर्याय आहेत, Yes आणि No.

04:37 Koha डिफॉल्टपणे Yes निवडतो.
04:41 How to process items साठी कोहा डिफॉल्टपणे Always add items निवडतो.
04:48 तसेच तिथे इतर पर्याय आहेत. आपण आपल्या पसंतीनुसार यांपैकी कोणतेही पर्याय निवडू शकता.
04:56 पृष्ठाच्या तळाशी Stage for import बटणावर क्लिक करा.

निळ्या रंगीत बारमध्ये आपण “Job progress” पहाल.

05:06 जेव्हा प्रोग्रेस 100% पर्यंत पूर्ण होते, तेव्हा Stage MARC records for import शीर्षकासह एक नवीन पृष्ठ उघडते.
05:17 लक्षात घ्या की, आता आपण आपल्या Excel sheet मध्ये असलेल्या डेटाचे यशस्वीरित्या इम्पोर्ट केले आहे.
05:25 ह्यात खालील तपशील आहेत.
05:28 लक्षात ठेवा की, तुमच्या .mrc डेटानुसार तुम्हांला Koha interface वर एक भिन्न व्हॅल्यू दिसेल.
05:36 ह्या पृष्ठावर, शीर्षकाच्या वर, आपण दोन पर्याय पहाल:

Stage MARC records आणि Manage staged records.

05:48 लक्षात घ्या की, मी Stage MARC records वर क्लिक करणार नाही कारण मी आधीच Excel फाईल इम्पोर्ट केली आहे ती म्हणजे TestData.
06:00 जर तुम्हांला एखादी दुसरी फाईल इम्पोर्ट करणे आवश्यक असेल तर Stage MARC records वर क्लिक करा आणि आधी उल्लेखिलेल्याप्रमाणे पायऱ्यांचे अनुसरण करा.
06:11 पुढे, आपल्याला KOHA Catalog मध्ये इम्पोर्ट केलेले records व्यवस्थापित करणे आवश्यक आहे.

तर, Manage staged records वर क्लिक करा.

06:22 नवीन विंडो Manage staged MARC records › Batch 6 उघडते.
06:30 या पृष्ठावर, Koha येथे दर्शविलेल्या व्हॅल्यूजसह खालील fields भरते.
06:37 आणि खालील fields साठी, Koha डीफॉल्टनुसार, ड्रॉप डाऊनमधून ह्या नोंदी(इन्ट्रीज) निवडतो.
06:45 परंतु, तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही ह्या नोंदी(इन्ट्रीज) त्यांच्या संबंधित ड्रॉप-डाऊनमधून बदलू शकता.
06:52 पुढे Apply different matching rules नामक बटण आहे.
06:57 डेटाबेसमधील रेकॉर्डची दुप्पटता(डुप्लिकेशन) टाळण्यासाठी, तुम्ही ह्या बटणावर क्लिक करू शकता.

मी हे बटण वगळेन आणि पुढे जाईन.

07:09 आता, Add new bibliographic records into this framework. वर जा.

आणि ड्रॉपडाऊनमधून मी BOOKS निवडेन.

07:20 पुन्हा, तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता.
07:25 आता मी Import this batch into the catalog टॅबवर क्लिक करेन.
07:32 तथापि, क्लिक करण्यापूर्वी आपण Citation सेक्शनमधून जाऊ.
07:37 कृपया विशिष्ट नंबर्स लक्षात ठेवा.

लक्षात घ्या की, आपण Excel वरून इम्पोर्ट केलेल्या तपशीलांसह तुम्हांला एक भिन्न नंबर दिसेल.

07:48 आता, आपण Import this batch into the catalog नामक बटणावर क्लिक करणार आहोत.
07:55 जेव्हा आपण असे करतो, तेव्हा Job progress bar प्रदर्शित होते.
08:00 जेव्हा प्रोग्रेस 100% पर्यंत पूर्ण होते, तेव्हा एक नवीन पृष्ठ उघडते.
08:06 शीर्षक Manage staged MARC records › Batch 6 सह आणि खालील तपशील, जे पूर्वी प्रविष्ट केले गेले होते.
08:16 तुमचे import undo करणे शक्य आहे. जर तुम्हाला इम्पोर्ट केलेल्या डेटामध्ये एखादी चूक आढळली तर, ती दुरुस्त करण्यासाठी खालील गोष्टी करा.
08:27 सेक्शनच्या तळाशी Undo import into catalog टॅबवर क्लिक करा.
08:34 मी येथे क्लिक करणार नाही.
08:37 पुढील आहे Completed import of records.
08:42 येथे, आपण records added, updated चे तपशील पहाल आणि इतर बऱ्याच गोष्टींचा.
08:49 मग तुम्ही इम्पोर्ट केलेल्या तपशीलांसह Citation सेक्शन पहाल.
08:56 एकदा इम्पोर्ट पूर्ण झाल्यानंतर, नवीन Record साठी लिंक प्रदर्शित होईल.
09:02 इम्पोर्ट केलेल्या प्रत्येक Citation च्या उजव्या बाजूला हे दृश्यमान आहे.
09:08 आता, Catalog मधील शीर्षके जोडली आहेत की नाहीत, हे आपण निश्चित करू.
09:15 असे करण्यासाठी, त्याच पृष्ठाच्या शीर्षस्थानी, Search the catalog साठी फिल्ड वर जा.
09:22 Koha मध्ये records च्या इम्पोर्ट्सची पुष्टी करण्यासाठी मी आता एक लहान चाचणी(टेस्ट) करेन.
09:29 तर, मी Citation सेक्शनमध्ये इम्पोर्ट केलेल्या record मधील शीर्षकांपैकी एक शीर्षक टाईप करेन.
09:37 नंतर, field च्या उजवीकडील Submit बटणावर क्लिक करा.
09:43 एक नवीन पृष्ठ उघडते - Inorganic chemistry Housecroft, Catherine E.
09:50 Koha शोधलेले Title रिझल्ट(परिणाम) दर्शविते, जे सिद्ध करते की records योग्यरित्या इम्पोर्ट झाले आहेत.
09:58 यासह, आपण Koha मध्ये MARC चे इम्पोर्ट करणे पूर्ण केले आहे.
10:04 सारांशित करू.

ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो - MARC file KOHA मध्ये इम्पोर्ट करणे आणि OPAC मध्ये इम्पोर्ट केलेला डेटा शोधणे.

10:17 असाईनमेंटसाठी-

MARC चे 10 records वापरा जे मागील ट्युटोरिअलमध्ये रूपांतरित केले होते आणि त्यांना KOHA मध्ये इम्पोर्ट करा.

10:29 सूचना : कृपया Conversion of Excel data to Marc 21 format ट्युटोरिअल पहा.
10:37 खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial project चा सारांश देतो.

कृपया तो डाऊनलोड करून पहा.

10:45 Spoken Tutorial Project टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही देते.

अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.

10:56 ह्या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
10:59 Spoken Tutorial project साठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे.

ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.

11:10 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana