Koha-Library-Management-System/C2/OPAC/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 How to use OPAC वरील Spoken Tutorial आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत : Search वापरून item कसे शोधायचे.
00:13 आणि Advance Search वापरून item शोधणे.
00:18 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे :

Ubuntu Linux OS 16.04 आणि Koha version 16.05

00:32 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी तुम्हांला लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे.
00:38 ह्या ट्युटोरिलचा सराव करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर Koha इन्स्टॉल असावा.
00:44 आणि आपल्याकडे कोहामध्ये Admin एक्सेस असणे देखील आवश्यक आहे.
00:49 नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील Koha Spoken Tutorial सीरीज़ पहा.
00:56 ह्यासह सुरवात करण्यासाठी, मी Microbiology वर आणखी २ पुस्तके जोडली आहेत.
01:02 पहिला लेखक Powar and Daginawala' आणि दुसरे Heritage लेखकासह.
01:12 ह्यामुळे माझ्या लायब्ररीत एकूण 3 पुस्तके आहेत.
01:17 पुढे जाण्यापूर्वी, कृपया आपल्या लायब्ररीमध्ये आपल्या आवडीची आणखी २ पुस्तके जोडा जसे पूर्वीच्या ट्यूटोरिअलमध्ये स्पष्ट केले आहे.
01:27 आपले Web Browser उघडा आणि टाईप करा : 127.0.1.1/8000
01:39 हे URL, port number आणि domain च्या नावावर आधारित आहे ज्याचे नाव इंस्टॉलेशनच्या वेळेस दिले गेले आहे.
01:47 कृपया आपण सांगितलेल्याप्रमाणे टाईप करा. आता Enter दाबा.
01:54 Welcome to Spoken Tutorial Library होमपेज उघडते.
02:00 Library catalog, च्या डाव्या बाजूला, ड्रॉप डाउन मधून आपण खालील पर्यायांद्वारे शोधू शकतो :
02:09 Title, Author , Subject, ISBN , Series आणि Call number.
02:22 आणि फिल्डच्या उजव्या बाजूस मी Microbiology टाईप करेन आणि फिल्डच्या उजव्या बाजूस Go वर क्लिक करेन.
02:33 Microbiology शब्द असणा-या सर्व Library items या रिझल्टमध्ये सूचीबद्ध आहेत.
02:40 सूचीतील items शोध शब्दासह, वापरकर्त्याच्या (युजरच्या) आवडीनुसार क्रमवारी लावता येते.
02:47 असे करण्यासाठी, सूचीच्या उजवीकडील बाजूवर जा आणि Relevance टॅबवर क्लिक करा.
02:54 ड्रॉप-डाऊनमधून मी Author (A-Z) निवडेन.
03:00 आपण आपल्या आवश्यकतेनुसार कोणताही इतर संबंधित पर्याय निवडू शकता.
03:06 Author (A-Z) निवडल्यावर, Authors सूची वर्णानुक्रमानुसार प्रदर्शित केली जाते.
03:14 सूचीबद्ध items च्या शीर्षकाखाली पहा. येथे, आपण सर्व लायब्ररींमध्ये त्या विशिष्ट आयटमची उपलब्धता पाहू शकतो.
03:26 तर, अधिक चांगल्या परिणामासाठी (रिझल्टसाठी) आपण आपला शोध कसा सुधारू शकतो?
03:31 आपण अगदी डावीकडील ‘Refine Your Search' टॅबवर क्लिक करून असे करू शकतो.
03:39 नंतर सेक्शनखालील विविध टॅबवर जा :Availability, Authors, Item Types आणि Topics.
03:52 आता सामान्य शोधात आवश्यक सामग्री न सापडल्यास काय करावे ते पाहू.
04:01 Search Catalog पृष्ठावर,Advanced Search वर क्लिक करा.
04:07 Search for शीर्षकासह एक नवीन पृष्ठ उघडते.
04:13 एकाधिक ड्रॉप-डाऊन पर्यायांचा वापर करून, आपण आपल्या आवश्यक सामग्रीसाठी आपला शोध रिफाईन करू शकतो.
04:21 डाव्या बाजूवरील पहिल्या ड्रॉप-डाऊनमधून, योग्य पर्याय निवडा जसे :

Keyword, Subject , Title , Author , Publisher, Publisher Location, ISBN आणि Barcode.

04:40 मी Subject निवडेन आणि उजव्या बाजूच्या फिल्डमध्ये, डाव्या बाजूच्या ड्रॉप-डाऊनमधून निवडलेल्या पर्यायांचा तपशील टाईप करा.
04:51 मी येथे Microbiology टाईप करेन.
04:55 दुसरा ड्रॉप-डाऊन पर्याय वापरून मी Author म्हणून Patel निवडेन.
05:03 तिसऱ्या ड्रॉप-डाऊन पर्यायाचा वापर करून, मी Pearson' म्हणूनPublisher निवडेन.
05:11 त्याच पृष्ठावर, Item Type सेक्शनमध्ये इतर पर्याय पहा. -
05:18 Book, Reference आणि Serial
05:23 ह्या पर्यायानंतर जसे - Publication date range, Language आणि Sorting
05:34 तर, Item Type सेक्शन खाली Books साठी मी रेडिओ बटणावर क्लिक करेन.
05:41 मी Publication date range रिक्त (ब्लँक) सोडेन.
05:46 Language साठी ड्रॉप-डाऊनमधून English निवडा.
05:52 Sorting सेक्शनखाली Sort by साठी मी Author (A-Z) निवडेन.
06:00 सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Search वर क्लिक करा.
06:07 ह्या पृष्ठामध्ये खालील items ची सूची असेल ज्यात खालील गोष्टी असतील :

Subjectम्हणून Microbiology

06:16 Author म्हणून Patel Arvind H.,
06:20 Publisher म्हणून Pearson.
06:23 आता पुन्हा Advanced Search पृष्ठावर जा आणि More Options सेक्शनच्या तळाशी More Options वर क्लिक करा.
06:36 असे केल्याने, Advanced search पृष्ठाचा लेआऊट बदलतो.
06:42 पुन्हा एकदा, पहिल्या ड्रॉप-डाऊनमध्ये मी Subject निवडेन.
06:48 मग मी टाईप करेन Microbiology.
06:52 आता पर्यायांच्या दुसऱ्या ओळीवर (रोवर) या.
06:56 पहिल्या ड्रॉप-डाऊनमध्ये मी “and” हा पर्याय जसा आहे तसाच ठेवेन.
07:03 आणि, ड्रॉप-डाऊनच्या उजवीकडे, मी “Author” निवडेन.
07:08 मग त्याच्या उजवीकडे मी “Patel” टाईप करेन.
07:13 पुढे, पर्यायांच्या तिसऱ्या ओळीवर (रोवर) या.

पहिल्या ड्रॉप-डाऊनमध्ये मी पर्याय “or” निवडेन.

07:22 आणि, उजवीकडील ड्रॉप-डाउन मधून, मी "Author" निवडेन.
07:28 मग ह्याच्या उजवीकडे, मी टाईप करेन “Heritage”.
07:33 आवश्यक असल्यास, आपण Item type किंवा उर्वरित पर्यायांच्या सेक्शनअंतर्गत search पर्यायाचा वापर करून शोध अधिक विस्तृत करू शकता.
07:45 सर्व तपशील भरल्यानंतर, सेक्शनच्या तळाशी Search बटणावर क्लिक करा.
07:52 अशाप्रकारे आपण OPAC वापरून लायब्ररीमधील आयटम्स शोधू शकतो.
07:58 ह्या ट्युटोरिअलसह, आपण आता लायब्ररी आयटमसाठी युजर सहज कसे शोधू शकतो हे शिकलात.
08:05 आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
08:08 थोडक्यात -

ह्या ट्युटोरिअलमध्ये, Search चा वापर करून आयटम शोधण्यास शिकलो .

08:17 आणि Advance Search चा वापर करून आयटम शोधण्यास शिकलो.
08:22 असाईनमेंटसाठी –

Biology कीवर्ड म्हणून वापरून, OPAC मध्ये Journals ची सूची शोधा.

08:30 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरिअल' प्रोजेक्टचा सारांश देतो.

कृपया तो डाऊनलोड करून पहा.

08:37 Spoken Tutorial Project टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.
08:47 ह्या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
08:51 "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट" साठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे.

ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.

09:03 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana