Koha-Library-Management-System/C2/Add-an-Item-type/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Koha interface मध्ये Item type कसे जोडायचे यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
00:08 या ट्युटोरिअलमध्ये, आपण Item types विषयी आणि Item type कसे जोडणे हे शिकू.
00:17 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे.

Ubuntu Linux Operating System 16.04 आणि Koha व्हर्जन 16.05.

00:30 हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी, विद्यार्थ्यांना लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे.
00:36 या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर Koha इन्स्टॉल असले पाहिजे.
00:42 आणि तुम्हाला Koha मध्ये Admin एक्सेस देखील असले पाहिजे, जर नसेल तर या वेबसाईटवरील स्पोकन ट्युटोरिअलची सिरीज पहा.
00:52 आता सुरुवात करू. मी Koha इंटरफेस वर जाते.
00:58 लक्षात घ्या की आपण एक Superlibrarian Bella तयार केले आहे.
01:03 आता आपण username Bella आणि त्याच्या password शी लॉगिन करू.
01:08 आता आपण Koha interface, Superlibrarian Bella मध्ये आहे.
01:14 पुढे जाण्यापूर्वी, प्रथम Item Types काय आहे ते समजून घेऊ या.
01:20 Item types सामान्यतः लायब्ररीतील सामग्रीचा संदर्भ देते, जसे कि

Books, Journals, CDs/DVDs इत्यादी.

01:31 Koha मध्ये प्रत्येक Item type ला Collection code दिले आहेत.
01:37 हा code विशिष्ट रूपात Item type ची ओळख करून देईल.
01:42 एक नवीन item type जोडूया.
01:46 Koha Home page वर Koha Administration वर क्लिक करा.
01:52 Basic parameters सेक्शनवर जा आणि Item Types वर क्लिक करा.
01:59 Item types administration पृष्टच्या वरती New Item Type बटणवर क्लिक करा.
02:06 Item type फील्डमध्ये, नवीन item type साठी कोड प्रविष्ट करा, जे तुम्हाला जोडायचे आहे.
02:13 मी REF टाईप करेल.
02:17 Description फील्ड item type चे वर्णन आहे.
02:22 तर येथे, मी टाईप करेल "Reference". मी Search category फील्ड वगळेल.
02:30 पुढे Choose an icon: आहे.
02:33 bridge टॅबवर क्लिक करा.
02:37 येथे, खाली दिलेल्या पर्यायांमधून, आयकॉन वर क्लिक करा, जे item type शी जुडले आहेत.
02:45 मी ह्या Reference आयकॉनवर क्लिक करेल.
02:49 पुढे, आपण Hide in OPAC: कशी मदत करते ते शिकू.
02:54 समजा, एखादे पुस्तक खराब झाले आहे आणि / किंवा बाइंडिंग हेतूसाठी परत ठेवले असावे.
03:02 अशा परिस्थितीत, पर्याय Hide in OPAC, सर्व वापरकर्त्यांना पुस्तक अदृश्य करेल.
03:11 आपल्या आवश्यकतेनुसार, Hide in OPAC साठी चेकबॉक्स चेक किंवा अनचेक करा: मी चेकबॉक्स रिक्त सोडेन.
03:21 अशा items साठी, 'Not for loan पर्यायचा वापर करा, जी लायब्ररीमध्ये ठेवली जातात परंतु circulated केली जात नाही.
03:29 उदाहरणसाठी: Reference books, Rare books , Dictionary इत्यादी.
03:36 मी हे चेक-बॉक्स रिक्त सोडेन.
03:40 तुम्ही इच्छित असल्यास Rental charge field मध्ये चार्ज होणारी रक्कम प्रविष्ट करू शकता.

लायब्ररीमधील विशेष items साठी किमान भाड्याने शुल्क असू शकते.

03:51 मी कोणतीही शुल्क भरणार नाही कारण बहुतेक items वर भाड्याने शुल्क घेण्याची गरज नाही.
04:00 जर तुम्हाला शुल्क भरायचे असेल, तर केवळ वैध नंबर प्रविष्ट करणे लक्षात ठेवा.
04:07 पुढे Checkin message: टेक्स्ट फील्ड आहे.
04:11 Checkin message विशेष item च्या प्रकारावर अवलंबून असतो.
04:16 पर्याय असे असू शकते- Book , Serial, Cds/DVDs, Bound Volume, Microfilm इत्यादी.
04:26 Checkin message: फील्ड मध्ये, मी Bound Volume टाईप करेल.
04:32 या नंतर Checkin message type: आहे.
04:36 item type, च्या आधारावर, item साठी एक मेसेज किंवा अलर्ट निवडा.
04:42 लक्षात ठेवा, निवडलेल्या पर्यायानुसार मेसेज किंवा अलर्ट तेव्हा प्रदर्शित केला जाईल जेव्हा या विशेष item साठी चेक-इन केले जातात.
04:53 मी message निवडेन.
04:56 पुढे SIP media type आहे.

SIP media type केवळ तेव्हाच लागू होते जेव्हा तुमच्या लायब्ररीमध्ये सॉर्टर किंवा लॉकर सुविधाचा वापर केला जात आहे.

05:07 तर मी येथे SIP media type सोडत (स्किप) आहे.
05:11 Summary फील्डमध्ये, तुम्ही इच्छित असल्यास संबंधित item चे सारांश लिहा.
05:18 मी टाईप करेल-

Item type- Reference

Facilitate- Self check out/return.

05:25 शेवटी, Save changes बटणवर क्लिक करा.
05:30 एक नवीन पृष्ठ Item types administration उघडते.
05:35 नवीन item type साठी भरलेले सर्व तपशील Item types administration पृष्ठावरील सारण्या(टॅब्यूलर फॉर्म) स्वरूपात प्रदर्शित होतात.
05:45 लक्षात घेण्यासारख्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत-
05:49 item types साठी असाइन केलेले Collection codes संपादित केले जाऊ शकत नाही.
05:54 item type चे विवरण संपादित केले जाऊ शकते. एकदा लायब्ररीमधील items द्वारे item type चा वापर केला जातो. तर हे डिलीट केले जाऊ शकत नाही.
06:05 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:08 थोडक्यात.

या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकलो - Item types विषयी आणि Item type कसे जोडणे.

06:18 असाइन्मेंट म्हणून- आपल्या लायब्ररीसाठी एक नवीन item Book आणि Serial जोडा.
06:25 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
06:33 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

06:43 कृपया या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
06:47 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

06:59 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana