KTurtle/C3/Special-Commands-in-KTurtle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 सर्वाना नमस्कार. Kturtle. मध्ये Special Commands वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:08 या ट्यूटोरियल मध्ये आपण,

“learn” command आणि

“random” Command या बद्दल शिकू.

00:15 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, Ubuntu Linux OS version. 12.04. KTurtle version. 0.8.1 beta चा वापर करीत आहे.
00:28 आम्ही असे गृहीत धरतो की, तुम्हाला KTturtleचे मूलभूत ज्ञान आहे.
00:33 जर नसेल तर, संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया आमची वेबसाइट http://spoken-tutorial.org ला भेट द्या.
00:39 चला नवीन KTturtleअप्लिकेशन उघडू.
00:42 Dash home. वर क्लिक करा.
00:44 Search बार मध्ये Kturtle टाइप करा.
00:47 KTurtle आयकॉन वर क्लिक करा.
00:50 सर्वप्रथम “learn” कमांड पाहु.
00:53 learn ही एक विशेष कमांड आहे, ज्याचा वापर स्वतः ची कमांड तयार करण्यास करता येतो.
01:01 'learn' कमांड इनपुट घेते आणि आउटपुट देते.
01:05 चला आता पाहु की, नवीन कमांड कशी तयार होते.
01:10 स्पष्ट दिसण्यासाठी मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते.
01:14 चौकोन काढण्यासाठी एडिटर मध्ये कोड टाइप करू.
01:19 repeat 4 कर्ली ब्रॅकेट्स मध्ये,

{ forward 10

turnleft 90

}

01:31 येथे संख्या 10 , चौकोनच्या बाजूची लांबी निस्चित करते.
01:37 learn कमांड चा वापर करून, चौकोन काढण्यासाठी समाविष्ट असलेले कमांड शिकू.
01:45 चौकोन काढण्यासाठी, या कमांड च्या सेट्स ला आपण square असे नाव देऊ .
01:50 जी कमांड शिकायची आहे त्या कमांड च्या नावा नंतर ही 'learn' कमांड आहे, याबाबतीत ती square. आहे.
01:59 चला, खालील कोड टाइप करू.
02:02 learn space square space $x
02:10 कर्ली ब्रॅकेट्स समाविष्ट करू.
02:13 10 च्या जागी $x ठेऊ .
02:19 आपण ठरविलेली नवीन कमांड square. आहे.
02:23 चौकोना चा आकार सेट करण्यासाठी, square एक इनपुट आर्ग्युमेंट $x घेते.
02:31 लक्षात घ्या जेव्हा तुम्ही हा कोड run कराल square कोणताही आउटपुट देणार नाही .
02:37 learn कमांड हे केवळ square कमांड ला शिकवत आहे, ज्याचा तो नंतर वापर करेल.
02:43 square कमांड उरलेल्या कोड मध्ये, सामान्य कमांड प्रमाणे वपारला जाऊ शकतो.
02:51 मी येथे आणखीन काही लाइन्स जोडते.
02:54 चला टाइप करू,

go 200,200

square 100

03:04 square 100 कमांड चा वापर करून, टर्टल 100 मितीचा चौकोन काढतो.
03:11 चाल आता कोड run करू.
03:13 Turtle कॅन्वस वर चौकोन काढतो.
03:17 चला आता 100च्या जागी 50 ठेवू.
03:22 पुन्हा run करू. Turtle आणखीन एक 50 मितीचा चौकोन काढतो.
03:28 कृपया लक्ष असु द्या या कमांड चा उपयोग या प्रोग्राम पुरताच मर्यादित आहे.
03:35 मी सध्याचा कोड एडिटर मधून काढून टाकते.
03:38 “clear” कमांड टाइप करा आणि कॅन्वस क्लीन करण्यासाठी Run करा.
03:44 पुढे आपण “random” कमांड विषयी शिकू.
03:48 random कमांड इनपुट घेते आणि आउटपुट देते.
03:52 random कमांड साठी सिंटॅक्स “random X,Y” आहे.
03:57 जेथे Xआणि Y हे दोन इनपुट्स आहेत.
04:01 X कमीतकमी आणि Yजास्तीतजास्त आउटपुट सेट करते.
04:07 आउटपुट Xआणि Y मध्ये रॅंडम्ली निवडलेली संख्या आहे.
04:13 अप्लिकेशन मध्ये वापरण्या साठी चला “random” कमांड टाकु.
04:18 माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक कोड आहे.
04:22 मी कोड समजावून सांगते.
04:24 “reset” कमांड टर्टल ला त्याच्या default स्थानावर सेट करते.
04:29 येथे कमांड random 1,20 रॅंडम संख्याची निवड करते जी, 1 च्या समान किंवा त्यापेक्षा अधिक आहे आणि 20 च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे आणि त्यास वेरियबल xसाठी नेमलेले आहे.
04:44 repeat कमांड आणि कमांड ज्याची सुरवात कर्ली ब्रॅकेट्स ने होते ते वर्तुळ काढतात.
04:51 मी टेक्स्ट एडिटर मधून कोड कॉपी करते आणि त्यास KTurtle's एडिटर मध्ये पेस्ट करते.
04:58 ट्यूटोरियल थांबवा आणि प्रोग्राम Kturtle एडिटर मध्ये टाइप करा.
05:03 प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरू करा.
05:08 जेव्हा आपण हा कोड run करू,
05:10 Turtle कॅन्वस वर, 1आणि 20च्या दरम्यान त्रिज्ये सहित वर्तुळ काढते.
05:16 चला हा कोड काही वेळा निष्पादीत करू.
05:20 तुम्ही पाहु शकता की, प्रत्येक वेळा विविध आकाराचे वर्तुळ तयार झाले आहेत.
05:26 प्रत्येक वेळी हा कोड निष्पादीत करताना, कॅन्वस वर विविध त्रिज्ये सहित वर्तुळ रेखाटला जाईल.
05:33 आता आपल्या उदाहरणा मध्ये दोन्ही learn आणि random कमांड चा वापर करू.
05:39 मी सध्याचा कोड एडिटर मधून काढून टाकते. clear कमांड टाइप करा आणि कॅन्वस क्लीन करण्यासाठी 'Run करा.
05:48 माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे.
05:52 मी आता कोड समजावून सांगते.
05:55 “reset” कमांड टर्टल ला त्याच्या default स्थानावर सेट करते.
06:00 canvassize 300,300 कॅन्वस ची रुंदी आणि लांबी प्रत्येकी 300 pixel मध्ये सेट करते.
06:09 $R, $G, आणि $B हे तीन वेरियबल्स आहे ज्या मध्ये मी, 0 आणि 255 च्या मध्ये रॅंडम वॅल्यू नेमून देत आहे.
06:19 canvascolor $R,$G, आणि $B , कमांड मध्ये.
06:23 Red-Green-Blue एकत्रीकरण, मागील स्टेप मध्ये वेरियबल मध्ये नेमून दिलेल्या वॅल्यू R,Gआणि Bदवारे रीप्लेस झाल्या आहेत.
06:34 ही कमांड निष्पादीत होताना कॅन्वस चा रंग रॅंडम्ली सेट होतो.
06:41 $red, $blue, $green वेरियबल्स चे इतर सेट्स आहेत,
06:45 ज्या मध्ये रॅंडम वॅल्यू 0 आणि 255 मध्ये रॅंडम्ली नेमून दिली आहे.
06:53 pencolor $red, $blue आणि $green Red-Blue -Greenमिश्रित वॅल्यूस, वेरियबल द्वारे बदलल्या आहेत.
07:02 $red, $green आणि $blue ज्या रॅंडम वॅल्यूस मागील स्टेप्स मध्ये नियुक्त केल्या होत्या.
07:10 कमांड निष्पादीत होताना, पेनाचा रंग सुद्धा रॅंडम्ली सेट करता येतो.
07:18 penwidth 2 पेनाची रुंदी 2 pixelsमध्ये सेट करते.
07:25 नंतर, वर्तुळ काढणे शिकण्यासाठी मी कोड निविष्ट केला आहे.
07:30 येथे $x वर्तुळा चा आकार दर्शिवितो.
07:35 repeat कमांड च्या नंतर कर्ली ब्रॅकेट्स मधील कोड वर्तुळ रेखाटते.
07:43 पुढील कमांड चा सेट go कमांड च्या नंतर, circle कमांड चा सेट आहे, जो निस्चित अकाराचा वर्तुळ रेखाटेल.
07:54 उदाहरणार्थ: circle 5,
08:01 go कमांड मध्ये निस्चित केलेले x आणि y निर्देशकावर 5 आकार असलेला वर्तुळ काढतो.
08:09 प्रत्येक वर्तुळा साठी, कॅन्वस वर मी विविध पोज़िशन्स निश्चित केल्या आहेत.
08:16 मी टेक्स्ट एडिटर मधून कोड कॉपी करते आणि त्यास KTurtle's एडिटर मध्ये पेस्ट करते.
08:23 ट्यूटोरियल थांबवा आणि प्रोग्राम Kturtle एडिटर मध्ये टाइप करा.
08:29 प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरू करा.
08:33 मी हा कोड Fullspeed मध्ये निष्पादीत करते.
08:37 Run पर्याया मध्ये निश्चित केलेल्या कोणत्याही गतीत तुम्ही हा कोड निष्पादीत करू शकता .
08:43 आपण काही वेळा हा कोड run करूया.
08:46 तुम्ही रॅंडम्ली सेट केलेले वॅल्यूस, pen colorआणि canvas color मधील फरक पाहु शकता.
08:54 प्रत्येक निष्पादन मध्ये पेन आणि कॅन्वस च्या रंगा मध्ये होणारा बदल पहा.
09:01 तुम्ही हव्या तेवढ्या वेळा कोड निष्पादीत करू शकता आणि रॅंडम्ली सेट केलेले वॅल्यूस, pen आणि canvas मधील फरक पाहु शकता.
09:15 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
09:20 संक्षिप्त रूपात,
09:22 या ट्यूटोरियल मध्ये आपण,

“learn” command आणि

“random” command या बदद्ल शिकलो.

09:30 तुमच्या साठी Assignment आहे.
09:32 learn कमांड चा वापर करून, तुमच्या कॅन्वस च्या चारीही बाजूला,पंचकोन, चौकोन, आयत, षटकोन काढा.
09:45 आणि कॅन्वस च्या मध्यभागी वर्तुळ काढा.
09:49 “random” कमांड चा वापर करून विविध रंग तयार करा आणि,
09:55 तुमचे भूमितीय आकार आणि कॅन्वस कस्टमाइज़ करा.
10:00 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:04 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
10:08 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता .
10:13 स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम.
10:15 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:19 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
10:22 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:29 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हा 'talk to teacher 'या प्रोजेक्ट चा भाग आहे.
10:33 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळाले आहे.
10:40 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
10:46 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते,
10:50 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble