Jmol-Application/C4/Animation-using-Script-Commands/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Animation using Script Commands वरील पठात आपले स्वागत.
00:06 ह्या ट्यूटोरियलमध्ये, आपण Jmol स्क्रिप्ट कमांड्स वापरुन एनिमेशन दाखवणे शिकू.
00:12 प्रात्यक्षिकेसाठी उदाहरण म्हणून आपण ethane आणि hemoglobin चा वापर करू.
00:19 Jmol स्क्रिप्ट कमांड्स सह एनिमेशन्ससाठी वापरले जाणारे खालील कीवर्ड्स जसे,
00:24 Move, delay, slab, loop आणि capture.
00:30 ह्या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास तुम्हाला उच्च माध्यमिक शाळेचे रसायनशास्त्र आणि Jmol विंडोचे ऑपरेशन्स ह्याचे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे.
00:39 नसल्यास, संबंधित ट्यूटोरियलसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या.
00:44 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे '"उबंटू"' ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.10
00:51 Jmol वर्जन 14.1.11 आणि Java वर्जन 7
00:58 तपशीलमध्ये ही स्लाइड प्रत्येक एनिमेशन कमांडची फंक्शन दाखवते.
01:03 move कमांड ही वेळेच्या विशिष्ट मुदतीत मॉडेलला रोटेट, जुम आणि अनुवादित करण्यास परवानगी देते.
01:11 delay कमांड ही काही विशिष्ट सेकंदांसाठी स्क्रिप्टला पॉज़ करण्यास वापरले जाते.
01:17 Slab कमांडचा वापर रेणूचे टक्के पॅनेलवर प्रदर्शित करण्यास नियंत्रित केले जाते.
01:23 loop कमांड हे एखाद्या पर्यायी वेळ विलंब सह, स्क्रिप्टला सुरूवातीला पुन्हा सुरू करण्यासाठी कारणीभूत ठरवते.
01:30 capture कमांड हे एनिमेट केलेली GIF फाइल्स म्हणून एनिमेशन्स कॅप्चर केले जाते.
01:36 Jmol स्क्रिप्ट कमांड वरील अधिक माहितीसाठी: Jmol इंटरैक्टिव स्क्रिप्ट डॉक्युमेंटेशन साठी ह्या वेब पेजला भेट द्या.
01:44 आपण Jmol विंडो उघडून move कमांड वापरून एनिमेशन दाखवू.
01:50 मी उदाहरण महणून ethane वापरून एक साधी move कमांड सह सुरवात करेल.
01:55 modelkit मेनू वापरून ethane चा मॉडेल तयार करा.
01:59 modelkit आइकन वर क्‍लिक करा, स्क्रीनवर methane चा मॉडेल दिसेल.
02:06 hydrogen वर क्‍लिक करा. आता आपल्याकडे स्क्रीनवर ethane चा मॉडेल आहे.
02:13 फाईल मेनू वापरून console उघडा.
02:17 प्रॉंप्टवर खालील कमांड टाईप करा.
02:21 move शब्दासह कमांड लाइन सुरू होते.
02:24 एनिमेशन पॅरमीटर्सच्या संचाला नंबर्स द्वारे मोजणी केले जाते.
02:29 move कमांड बद्दल अधिक माहिती. move कमांडमध्ये नऊ पॅरमीटर्स आहेत.
02:36 पहिल्या तीन पॅरमीटर्स X, Y आणि Z अक्षाच्या आजूबाजूला फिरत आहेत. चौथा जुम मॉडिफायर आहे, पॉज़िटिव किंवा नेगेटिव संख्येने व्यक्त केली जाते.
02:48 जुम इन साठी पॉज़िटिव आणि जुम आऊट साठी नेगेटिव.
02:52 पुढील तीन पॅरमीटर्स तीन अक्षाच्या बाजूने ट्रॅन्स्लेशनसह दिले जाते.
02:57 8 (आठवा) slab पॅरमीटर आहे. स्लॅब रेणूला कापतो.
03:03 हे अणुंना निर्दिष्ट सखोलता पर्यंत काढून टाकते जेणेकरून आतील वैशिष्ट्ये सहज बघता येतील.
03:10 9 (नव्वा) पॅरमीटर हे वेळेचे प्रमाण सेकंदांमध्ये आहे, move कमांडला करतांना वापरले जाते.
03:17 Jmol पॅनेल वर परत जा.
03:20 एंटर दाबून पॅनेल बघा.
03:25 आपण अस्तित्वातील कमांड्समध्ये अधिक कमांडस जोडून अधिक रूचीपूर्ण एनिमेशन तयार करू शकतो.
03:31 आधीच्या कमांडसाठी कीबोर्ड वरील अप एरो की दाबा.
03:36 सेमिकॉलन नंतर delay स्पेस 2 टाईप करा.
03:41 पुढील कमांड कार्यान्वित करण्याअगोदर, येथे delay कमांड स्क्रिप्टला 2 सेकंदसाठी थांबावतो.
03:48 delay कमांड नंतर आणखी एक move कमांड टाईप करा.
03:52 प्रत्येक कीवर्ड कमांडच्या शेवटी semicolon जोडण्यास विसरू नका. एंटर दाबा. पॅनेलला बघा.
04:06 आपण एनिमेशनच्या दरम्यान अणूंचे रंग बदलू शकतो.
04:10 पुन्हा आधीच्या कमांडसाठी कीबोर्ड वरील अप एरो की दाबा.
04:15 मी येथे कॉन्सोल वर दाखवल्याप्रमाणे कमांड एडिट करा.
04:19 हायड्रोजन्स आणि कार्बन्सचे रंग बदलण्यास select की वर्डचा वापर करा. एंटर दाबा.
04:27 पुन्हा पॅनलला बघा.
04:34 रेणूच्या काही भागांना अदृश्य आणि दृश्य करण्यास slab कमांड जोडा.
04:41 कॉन्सोल वर दाखवल्याप्रमाणे पुन्हा अप एरो की दाबून आधीच्या कमांडला संपादित करा.
04:47 select कमांडच्या नंतर slab on टाईप करा.
04:51 कमांडच्या शेवटी slab off टाईप करा.
04:55 एंटर दाबून पॅनेलला बघा.
05:01 तुम्ही पुन्हा रेणूच्या भागांना अदृश्य आणि दृश्य होतंना पाहू शकता.
05:06 capture की वर्ड वापरुन ह्या एनिमेशनला GIF फाईल म्हणून सेव्ह करू शकता.
05:11 आधीच्या कमांडसाठी कीबोर्ड वरील अप एरो की दाबा.
05:15 capture कमांड टाईप करून कमांडच्या सुरवातीला फाईलचे नाव आणि पाथ निर्देशीत करा.
05:21 GIF फाईल सेव्ह करण्यास तुम्ही तुमच्या होम फोल्डरचे नाव टाईप करू शकता.
05:26 मी डेस्कटॉप वर “sneha” फाईल म्हणून हे एनिमेशन सेव्ह करत आहे. एंटर दाबा.
05:36 आता एनिमेशन माझ्या डेस्कटॉपवर GIF फाईल म्हणून सेव्ह केले जातील.
05:41 GIF फाईलच्या स्थानावर जा.
05:44 इमेज व्यूवर सॉफ्टवेअर ने सेव्ह केलेली GIF फाईल उघडा.
05:50 Jmol पॅनेल वर परत जा.
05:54 तसेच कोणत्याही मॅक्रोमॉलिक्यूलची pdb फाईल उघडा; उदाहरणार्थ pdb code 2DN1 ने oxygenated hemoglobin.
06:06 फाईल मेनू वापरून pdb डेटाबेस मधून थेट स्ट्रक्चर डाउनलोड करा.
06:11 टेक्स्ट बॉक्समध्ये pdb कोड टाईप करा, 2DN1. Ok दाबा.
06:19 पॅनेल वर hemoglobin चे मॉडेल दाखवले जाते.
06:23 Console मध्ये खालील कमांड टाइप करा.
06:26 आपण प्रोटीनचे विविध यूनिट्सचे रंग बदलण्यास select कीवर्ड कमांड वापरले आहेत.
06:32 आपण move कमांड देखील वापरले आहेत.
06:35 हे कमांड प्रोटिन्सला लाल रंगाच्या कार्टून्समध्ये दाखवेल.
06:40 येल्लो स्पेसफिल डिसप्ले मधील Haem चा भाग रेणूचे 50% टक्के भाग कापून टाकतो.
06:48 4 सेकंदांमध्ये X अक्षावर 360º फिरवा आणि सर्व अणुंना परत संचित करा.
06:56 एंटर दाबून पॅनेलला बघा.
07:07 आता वरील सर्व पायऱ्या पुन्हा करण्यास loop कमांड वापरूया.
07:13 तीच कमांड मिळवण्यासाठी अप एरो की दाबा. कमांडच्या शेवटी loop 2 टाईप करा.
07:20 "loop 2" सूचीत करते की आधीच्या स्क्रिप्ट कमांड्स २ सेकंदानंतर पुन्हा दिसतील. एंटर दाबा.
07:34 एनिमेट करण्यासाठी तुम्ही सर्जनशील आणि अशा अनेक कमांड्स टाईप करू शकता.
07:39 थोडक्यात, ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकलो,
07:44 स्क्रिप्ट कमांड्स जसे move, delay वापरून ethane आणि haemoglobin चे एनिमेशन तयार करणे.
07:54 आम्ही loop आणि slab कमांड्सचा देखील वापर केले आहे.
07:58 capture कमांड वापरून GIF फाईल म्हणून एनिमेशन्स सेव्ह करणे.
08:03 असाइनमेंट साठी तुमच्या आवडीचा रेणू घ्या आणि move आणि delay कमांड्स वापरुन एनिमेशन तयार करा.
08:11 एनिमेशन तयार करण्यास बॉन्ड्सचे प्रदर्शन, रंग आणि आकार बदला.
08:17 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.कृपया डाउनलोड करून पहा.
08:25 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते
08:32 अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
08:36 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
08:43 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:48 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana