Jmol-Application/C2/Overview-of-Jmol-Application/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Jmol ऐप्लीकेशनमधील Overview ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00:09 Jmol ऐप्लीकेशनचे महत्वाचे वैशिष्ट्ये.
00:12 विविध ऑपरेटिंग सिस्टम्सवर डाउनलोड आणि इन्स्टलेशन संबंधित माहिती.
00:18 Jmol ऐप्लीकेशनचे वापर.
00:21 आपल्या वेबसाइटवरील Jmol ऐप्लीकेशनमधील उपलब्ध ट्यूटोरियल्सचे व्हिडिओ क्लिपिंग्स प्ले करणार आहोत.
00:29 ह्या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास तुम्हाला उच्च माध्यमिक शाळेचे रसायनशास्त्र किंवा मूळ सेंद्रिय रसायनशास्त्र ह्याचे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे.
00:37 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे, उबंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 12.10
00:43 Jmol वर्जन 14.1.11 Java वर्जन 7 आणि Mozilla Firefox Browser 35.0
00:53 Jmol ऐप्लीकेशन बद्दल, Jmol हे केमिकल स्ट्रक्चर्सचे 3 डायमेंशनल आणि मॅक्रोमॉलिक्यूल्स साठी मॉलेक्युलर व्यूवर आहे.
01:02 Jmol केमिकल स्ट्रक्चर्सचे 3D मॉडेल्स तयार आणि संपादित करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
01:08 ह्या सॉफ्टवेअरचा वापर रसायनशास्त्र आणि जीवरसायनशास्त्रमध्ये विद्यार्थी, शिक्षक, आणि संशोधक देखील वापरु शकतात.
01:16 येथे Jmol ची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
01:19 हे विनामूल्य आणि खुले स्त्रोत सॉफ्टवेअर आहे.
01:22 हे विंडोज, Mac ऑपरेटिंग सिस्टम, लिनॅक्स आणि android डिव्हाइसेस वर काम करते.
01:30 हे सर्व प्रमुख वेब ब्राउज़र्सना समर्थन करते.
01:33 3D-rendering च्या उच्च गुणवत्तेसाठी कोणत्याही विशिष्ट हार्डवेअरची गरज नाही.
01:38 ईमेजेस विविध फाईल फॉरमॅट्स मध्ये एक्सपोर्ट केले जाऊ शकते: जसे की jpg, png, gif, pdf इत्यादी.
01:47 विविध फाईल फॉरमॅट्सला वाचू शकते जसे की pdb, cif, mol, cml, xyz इत्यादी.
01:56 जर तुम्ही इंटरनेटशी जुडलेले असाल तर, तुम्ही थेट Jmol पॅनल वर मॉडेल्स लोड करू शकता.
02:02 pubchem सारखे डेटाबेसेस मधून केमिकल स्ट्रक्चर्सना घेऊ शकतो.
02:07 proteins आणि macromolecules साठी PDB डेटाबेस.
02:12 ह्या सॉफ्टवेअर बद्दल अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे.
02:18 Jmol चे उपयोग:Jmol रसायनशास्त्रातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शिक्षण साधन म्हणून वापरले जाऊ शकते.
02:26 प्रिंट मीडिया जसे की नियतकालिके, प्रकाशने व पुस्तके मध्ये उच्च दर्जाचे 3D इमेजस, उत्पादन करण्यास वापरले जाऊ शकते:
02:36 वर्ग आणि व्याख्याने मध्ये सादरीकरण करण्यास देखील वापरले जाऊ शकते.
02:41 Jmol मॉलेक्युलर मॉडेलिंग आणि ऐनिमेशन चित्रपटे उत्पादन करण्यास देखील वापरले जाऊ शकते.
02:48 Jmol चे इमेजस पावरपॉइण्ट सादरीकरणामध्ये कसे समाविष्ट करायचे हे माहिती देणारा वेबपेज येथे आहे.
02:56 रसायनशास्त्रातील काही विषय शिकवण्यासाठी Jmol प्रभावीपणे वापरले जाऊ शकते ज्याच्यासाठी 3D व्हिज्युअलायझेशनची गरज आहे.
03:03 मूलभूत पातळीवर, विषय जसे की: स्ट्रक्चर आणि फंक्शनल ग्रूप्स.
03:08 अटॉमिक आणि मॉलेक्युलर ऑर्बिटल्स.
03:11 प्रगत पातळीवर Jmol अशे विषय शिकवण्यासाठी वापरले जाते जसे की Stereochemistry जे एक परमाणूमध्ये अणूचा अवकाशीय व्यवस्थाचा अभ्यास आहे.
03:22 सिमेट्री आणि पॉइण्ट-ग्रूप्स. क्रिस्टल स्ट्रक्चर आणि यूनिट सेल.
03:27 आणि परमाणु साठी प्रोटॉन NMR स्पेक्ट्राचे अंदाज लावणे.
03:31 हे वैशिष्ट्य Jmol 14.0 आणि त्यावरील वर्जन मध्ये उपलब्ध आहे.
03:36 Structure Activity Relationships अभ्यास करण्यासाठी Jmol वापरले जाऊ शकते.
03:41 Jmol डाउनलोड आणि स्थापित कसे करायचे हे पाहू.
03:44 Jmol विंडोज, Mac आणि Linux ऑपरेटिंग सिस्टम्स वर स्थापित केले जाऊ शकते.
03:51 Android डिव्हाइससाठी Jmol चे विशेष वर्जन खालील दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
03:57 लिनॅक्स ऑपरेटिंग सिस्टम्ससाठी, उबंटू सॉफ्टवेअर सेंटर किंवा सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून डाउनलोड करा.
04:04 कृपया आमच्या वेबसाइट वर 'Linux' सिरीजमधील ह्या ट्युटोरियलचे अनुसरण करा.
04:08 विंडोज आणि Mac ऑपरेटिंग सिस्टम्ससाठी: दिलेले लिंक कोणत्याही वेब ब्राउजर मध्ये उघडा.
04:15 मी ही लिंक उघडून त्वरीत वेब-पेज वरील दिलेल्या सामुग्री पूर्णपणे बघेन.
04:20 हे वेब-पेज Jmol बद्दल बरीच सामान्य माहिती देते. पेज खाली स्क्रोल करा.
04:27 हे overview, demonstration pages, features बद्दल माहिती देते.
04:35 Jmol डाउनलोड करण्यास डाउनलोड पेजवर क्‍लिक करा. डाउनलोड करण्यास पेज वरील दिलेल्या सुचनांचे पालन करा.
04:44 ह्या पेज वर Jmol इनस्टॉल आणि रन करण्याबद्दलची माहिती देखील दिली आहे.
04:50 मी ट्यूटोरियल्सचे सिरीस बनवले आहे ज्याच्यात हे सॉफ्टवेअर कसे वापरावे ह्याचे वर्णन आहे.
04:56 पहिला ट्यूटोरियल आहे Introduction to Jmol Application ज्याच्यात Jmol विंडोवरील विविध वैशिष्ट्यांबद्दल माहिती उपलब्ध आहे.
05:04 येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे.
05:07 नमस्कार.Jmol ऐप्लीकेशनच्या प्राथमिक ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
05:13 आण्विक मॉडेल तयार आणि संपादित करण्यास, Create and Edit ट्यूटोरियलचे अनुसरण करा. येथे क्लिपिंग आहे.
05:18 नमस्कार. Jmol ऐप्लीकेशनमधील Create and Edit molecular models वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
05:27 आपण बॉन्ड लेन्थ्स ,बॉन्ड एंगल्स, आणि डायहेडरल एंगल्स मापू शकतो. येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे.
05:34 नमस्कार.Jmol ऐप्लीकेशनमधील Measurements and Labeling वरील ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
05:40 Jmol वापरून पृष्ठभाग दर्शवणे आणि अटॉमिक आणि मॉलेक्युलर ऑर्बिटल्स तयार करू शकतो.येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे.
05:47 Jmol ऐप्लीकेशनमधील Surfaces and Orbitals वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
05:56 हा व्हिडिओ स्पष्ट करते की सममिती आणि बिंदू गटांची प्लेन कसे दर्शवणे.येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे.
06:02 Jmol मधील Symmetry and Point Group वरील पठात आपले स्वागत.
06:09 Jmol वापरून क्रिस्टल स्ट्रक्चर्स आणि युनिट सेलना पाहू शकतो. येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे.
06:17 Jmol मधील Crystal structures and unit cell वरील पठात आपले स्वागत.
06:24 Jmol मध्ये प्रोटिन्स अँड मॅक्रोमॉलिक्यूल्स दाखवण्यासाठी येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे.
06:29 Proteins and Macromolecules वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
06:37 Jmol 14.0 वर्जन पासून सुरू होणारे वर्जन्समध्ये एक सिम्युलेटेड HNMR स्पेक्ट्रम रासायनिक रचना डेटाबेस मधील सूचीबद्ध सर्व रेणू प्रदर्शित आहेत.
06:49 मी Jmol विंडो उघडून हे वैशिष्ट्य दाखवते.
06:54 सिम्युलेटेड प्रोटॉन NMR पाहण्यासाठी: टूल्स मेनू वर जा.
06:59 spectra पर्यन्त स्क्रोल करून spectrum वर क्‍लिक करा.
07:04 Jspecview विंडो उघडेल.
07:08 फाईल मेनू वर स्क्रोल करून, add simulation वर क्‍लिक करा.
07:13 डायलॉग बॉक्स मध्ये परमाणूचे नाव एंटर करा.
07:17 nitrobenzene टाईप करून ok बटणावर क्‍लिक करा.
07:22 पॅनेलवर नायट्रोबेनजीनचा एक प्रोटॉन NMR स्पेक्ट्रम प्रदर्शित आहे.
07:28 स्ट्रक्चर वरील अणू स्पेक्ट्रमच्या सिग्नल्सशी जुडलेले असावे.
07:33 काही ठराविक फाइल्स आण्विक वाइब्रेशन्सची माहिती समाविष्ट करते, जसे की GAMESS .log फाइल्स आणि Spartan output फाइल्स.
07:45 आपण ह्या फाइल्स Jmol मध्ये उघडून वाइब्रेशन्स पाहू शकतो.
07:50 मी एक लॉग फाईल उघडून कार्बन डायऑक्साइड परमाणूचे वाइब्रेशन्स दाखवते.
08:00 येथे एक ऐनिमेशन आहे, जे benzene परमाणू मध्ये वाइब्रेशन्स दाखवते.
08:05 येथे एक ऐनिमेशन आहे, जे cyclohexane परमाणू मध्ये कन्फर्मेशन्स दाखवते.
08:15 थोडक्यात, ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
08:19 Jmol ऐप्लीकेशनचे महत्वाचे वैशिष्ट्ये.
08:22 विविध ऑपरेटिंग सिस्टम्सवर प्रतिष्ठापन संबंधित माहिती.Jmol ऐप्लीकेशनचे वापर.
08:29 तसेच आपण Jmol ऐप्लीकेशनमधील उपलब्ध ट्यूटोरियल्सचे वीडियो क्लिपिंग्स पाहिले आहेत.
08:35 आणि काही ऐनिमेशन videos, जे cyclohexane चे वाइब्रेशन्स आणि कन्फर्मेशन्स दाखवते.
08:42 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
08:48 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
08:59 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:09 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana