Jmol-Application/C2/Create-and-edit-molecular-models/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: Create and Edit Molecular models

Author: Ranjana Bhamble

Keyword: 3D models of chemical structures, molecular visualization, video tutorial.

Time Narration
00:01 नमस्कार Jmol अॅप्लिकेशनमधील Create and Edit molecular models वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:09 आपण शिकणार आहोत,
00:12 आण्विक मॉडेल मध्ये हाइड्रोजन अणूला फंक्शनल गटासह बदलणे.
00:17 बॉण्ड्स अॅड आणि डिलिट करणे.
00:20 अणू अॅड आणि डिलिट करणे.
00:23 आणि कॉन्टॅक्सच्युअल मेनू म्हणून ओळखले जाणारे पॉप-अप मेनूचा वापर कसा करावा हे शिकू.
00:29 हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला,
00:32 Jmol अॅप्लिकेशन विंडो आणि
00:36 Modelkit फंक्शन जे आण्विक मॉडेल्स तयार करण्यासाठी वापरले जाते ह्याची माहिती असली पाहिजे.
00:41 संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:46 हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे
00:49 उबंटू OS वर्जन 12.04
00:53 Jmol वर्जन 12.2.2
00:57 आणि Java वर्जन 7.
01:00 Jmol अॅप्लिकेशन उघडण्यासाठी, Dash home वर क्लिक करा.
01:05 सर्चबॉक्स मध्ये Jmol टाईप करा.
01:08 स्क्रीनवर Jmol आयकॉन दिसेल.
01:11 Jmol अॅप्लिकेशन विंडो उघडण्यासाठी, Jmol आयकॉनवर क्लिक करा.
01:17 आधी तयार केलेल्या प्रोपेन मॉडेलने सुरवात करू.
01:22 फाईल उघडण्यासाठी, टूल बारवर “Open file” वर क्लिक करा.
01:27 स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स दिसतो.
01:30 आवश्यक फाईल जेथे स्थित आहे त्या फोल्डरवर क्लिक करा.
01:34 माझी फाईल डेस्कटॉपवर आहे.
01:37 मी डेस्कटॉप निवडेन आणि ओपन बटणावर क्लिक करेन.
01:43 “File or URL” टेक्स्ट बॉक्समध्ये फाईलचे नाव टाईप करा.
01:48 नंतर ओपन बटणावर क्लिक करा.
01:51 स्क्रीनवर प्रोपेन चे मॉडेल दिसते.
01:55 प्रोपेनमध्ये हाइड्रोजन फंक्शनल गटांसह बदलू शकतो जसे:
01:59 हायड्रॉक्सी, एमिनो, हॅलोजन्स जसे फ्लुरो, क्लोरो, ब्रोमो आणि इत्यादी.
02:07 मला Propanol मध्ये रुपांतरीत करण्यासाठी, प्रोपेन रेणूला हायड्रॉक्सी गटात समाविष्ट करायचे आहे.
02:13 model kit मेनू उघडा. येथे फंक्शनल गटांची सूची उपलब्ध आहे.
02:20 ऑक्सिजन अणू विरोधात बॉक्स तपासा.
02:23 पहिल्या कार्बन अणूला संलग्न असलेल्या हायड्रोजन अणूवर क्लिक करा.
02:28 लक्ष द्या, हायड्रॉक्सी गटाद्वारे हायड्रोजन अणू बदलेला आहे . येथे ऑक्सिजन अणू लाल रंगात दिसत आहे.
02:37 आता प्रोपेन हे 1-Propanol मध्ये रुपांतरीत झाले आहे.
02:41 आता 1-Propanol ला 2-chloro-1-propanol मध्ये रुपांतरीत करण्याचा प्रयत्न करू.
02:47 model kit मेनूमधून Chloro गट निवडा.
02:51 दुसर्‍या कार्बन अणूला संलग्न असलेल्या हायड्रोजन अणूवर क्लिक करा.
02:57 आता आपल्याकडे 2-chloro-1-propanol मॉडेल आहेत. येथे Chlorine हिरव्या रंगात दिसत आहे.
03:04 तुम्ही एनर्जी मिनिमाइज़ेशन करू शकता आणि dot mol फाईल म्हणून इमेज सेव करा.
03:10 असाईनमेंट, खालील रेणूंचे मॉडेल्स तयार करा. 3-bromo-1-butanol आणि 2-amino-4-chloro-pentane.
03:20 एनर्जी मिनिमाइज़ेशन करून इमेज JPEG फॉर्मेटमध्ये सेव करा.
03:25 वेगवेगळ्या फाईल फॉरमॅट्समध्ये इमेज सेव करणे:
03:28 टूलबारमध्ये “Save current view as an image” आयकॉनचा वापर करा.
03:33 तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट खालीलप्रमाणे दिसली पाहिजे.
03:40 Jmol अॅप्लिकेशन विंडोवर परत जाऊ.
03:45 Jmol अॅप्लिकेशनदेखील पॉप-अप मेनू देते.
03:50 दोन वेगवेगळ्या पद्धतीने पॉप-अप मेनू तुम्ही एक्सेस करू शकता.
03:55 model kit उघडा असेल तर ते बंद करा.
03:59 model kit मेनू खाली स्क्रोल करा आणि “Exit model kit mode” वर क्लिक करा .
04:04 पॉप-अप मेनू उघडण्यासाठी, पॅनेलवर माऊस बटणाने उजवा क्लिक करा.
04:09 पॅनेल वर Pop-up मेनू दिसते.
04:12 अणूंच्या प्रदर्शनात बदल करण्यासाठी पॉपअप मेनू अनेक फंक्शन्स देते.
04:18 निवड आणि रेंडरींग पर्यायासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
04:22 ह्या मेनूमधील बहुतेक फंक्शन्सच्या प्रतिकृती मेनू बारमध्ये आहेत.
04:28 पॉप-अप मेनूमध्ये आयटम्स स्वयं – स्पष्टीकरणात्मक आहेत.
04:32 त्यांना सविस्तर वर्णनाची गरज नाही.
04:35 पॉप-अप मेनूच्या बाहेर येण्यासाठी Jmol पॅनलवर क्लिक करा.
04:39 पॉप-अप मेनू एक्सेस करण्यासाठी दुसरा मार्ग आहे, Jmol लोगोवर क्लिक करा.
04:44 हे Jmol पॅनलच्या खाली उजव्या कोपर्‍यात स्थित आहे.
04:49 हे रेणू कसे संपादित करावे आणि ते इथेन रेणूमध्ये कसे रूपांतरीत करावे हे आता पाहू.
04:55 ह्यासाठी आपण, हायड्रॉक्सी गट, क्लोरिन गट, कार्बन आणि दोन हायड्रॉजन अणू डिलिट करू.
05:05 model kit मेनू उघडा.
05:08 “delete atom” च्या विरोधात बॉक्स तपासा.
05:12 जे अणू डिलिट करायचे आहेत त्यावर क्लिक करा.
05:15 ऑक्सिजन, क्लोरिन आणि कार्बन अणू.
05:21 आपल्याला इथेन रेणू तयार करण्यासाठी, रेणूमध्ये हायड्रोजन्स जोडायचे आहे.
05:26 मॉडेल किट मेनूमधून “add hydrogens” पर्यायावर क्लिक करा.
05:32 रेणूला, दोन हायड्रॉजन अणू जोडलेले आहेत.
05:36 आता आपल्याकडे स्क्रीनवर Ethane मॉडेल आहे.
05:40 Alkenes आणि Alkynes कसे तयार करायचे हे शिकू.
05:45 रेणूमध्ये डबल बॉण्डचा परिचय करून देण्यासाठी, model kit मेनू उघडा.
05:50 “double” पर्याय ला लागून तपासा.
05:53 इथेन रेणूमधील, दोन कार्बनअणूंच्या दरम्यान असलेल्या बॉण्डवर कर्सर नेऊन ठेवा.
05:58 लाल रंगांचे रिंग्स कार्बन अणूभोवती दिसतात.
06:01 बॉण्डवर क्लिक करा.
06:05 लक्षद्या सिंगल बॉण्ड, डबल बॉण्डमध्ये रुपांतरीत होते.
06:09 आपल्याकडे पॅनेलवर Ethene मॉडेल आहे.
06:13 आता Ethene ला Ethyne मध्ये रुपांतरीत करू.
06:16 modelkit मेनूवर क्लिक करा आणि “triple” पर्यायला लागून तपासा.
06:21 Ethene रेणूमध्ये डबल बॉण्डवर कर्सर ठेवा आणि त्यावर क्लिक करा.
06:28 डबल बॉण्ड हे ट्रिपल बॉण्डमध्ये रुपांतरीत झाले आहे.
06:31 हा Ethyne चा मॉडेल आहे .
06:34 सर्वात स्थिर कन्फरमेशन मिळवा आणि सेव करण्यासाठी एनर्जी मिनिमाइज़ेशन करा.
06:40 थोडक्यात. या पाठात शिकलो,
06:43 Alkanes मध्ये हायड्रॉजन अणूला फंक्शनल गटासह बदला.
06:48 Alkanes ला Alkenes आणि Alkynes मध्ये रुपांतरीत करण्यास बॉण्ड्स जोडा.
06:52 अणू अॅड आणि डिलिट करणे आणि
06:54 पॉप-अप मेनूचा वापर करणे.
06:58 असाईनमेंटसाठी. 2-fluoro-1,3-butadiene आणि 2-pentyne चे मॉडेल्स तयार करणे.
07:06 मॉडेलचा डिस्प्ले वायरफ्रेममध्ये बदलण्यासाठी पॉप-अप मेनूचा वापर करा.
07:10 Enery minimization करा आणि इमेज पीडीएफ फॉरमेटमध्ये सेव करा.
07:16 तुमचे पूर्ण झालेले असाईनमेंट असे दिसले पाहिजे.
07:24 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:27 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:31 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth (बँडविथ) नसेल तर आपण व्हिडिओ download(डाऊनलोड) करूनही पाहू शकता.
07:36 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:38 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:41 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:45 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:52 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:57 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:04 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:08 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana