Java/C2/Numerical-Datatypes/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Java मधील Numerical Datatypes वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | आपण शिकणार आहोत, |
00:10 | Java मधील विविध Numerical Datatypes, |
00:13 | numerical data संचित करण्यासाठी त्यांचा वापर करणे. |
00:18 | येथे Ubuntu 11.10, JDK 1.6 आणि Eclipse 3.7.0 (3.7) वापरणार आहोत. |
00:27 | यासाठी Eclipse मध्ये java program लिहिता आणि कार्यान्वित करता यायला हवा. |
00:34 | नसल्यास संबंधित ट्युटोरियल आपल्या वेबसाईटवर पहा. |
00:42 | पूर्णांक संख्या संचित करण्यासाटी int data type, |
00:47 | आणि अपूर्णांक संख्येसाठी float data type वापरतात. |
00:52 | प्रथम पूर्णांक संख्या घोषित करून ती वापरू . |
01:02 | Eclipse IDE आणि उर्वरित code साठी आपल्याकडे योग्य आराखडा बनवलेला आहे. |
01:10 | NumericalData हा class बनवून त्यात main method समाविष्ट केली आहे. |
01:15 | संख्या संचित कशी करायची ते पाहू. |
01:20 | int distance equal to 28 |
01:27 | हे statement, distance ह्या नावात पूर्णांक संख्या संचित करेल. |
01:33 | distance नावाचा integer variable आहे. |
01:37 | संचित केलेली व्हॅल्यू print करण्यासाठी distance हे व्हेरिएबल वापरू शकतो. |
01:47 | System dot out dot println कंसात distance |
02:01 | हे statement distance ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू print करेल. |
02:06 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
02:14 | distance मध्ये 28 ही व्हॅल्यू संचित होऊन ती print झाली आहे. |
02:21 | व्हेरिएबलमध्ये संचित केलेली व्हॅल्यू बदलू. |
02:25 | 28 च्या जागी 24 करा. |
02:29 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
02:34 | आऊटपुटमध्ये बदल झालेला दिसेल. |
02:39 | int मध्ये ऋण संख्या ही संचित करता येतात. |
02:42 | 24 च्या जागी वजा 25 करा. |
02:48 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
02:56 | ऋण संख्या int व्हेरिएबलमध्ये संचित करता येतात हे दिसले. |
03:02 | programming साठी int Data type पुरेसा आहे. |
03:06 | परंतु ह्यामध्ये संचित व्हॅल्यूजवर काही मर्यादा आहेत. |
03:10 | ह्यामध्ये मोठी व्हॅल्यू संचित करून काय होते ते पाहू. |
03:25 | ह्या संख्येखाली लाल रेघ दिसत आहे, जी error असल्याचे दाखवते. |
03:34 | The number is out of range for a variable of the type int हा error message मिळेल. |
03:42 | int 32 bits memory घेते. त्यामध्ये वजा 2 घात 31 ते 2 घात '31 मधील व्हॅल्यू संचित करता येते. |
03:49 | ह्यापेक्षा मोठ्या संख्येसाठी Java मध्ये long data type आहे. |
03:54 | मोठ्या संख्येसाठी आपण तो वापरू. |
03:59 | int च्या जागी long करा. |
04:04 | संख्येच्या शेवटी capital L समाविष्ट करा. |
04:11 | Ctrl S दाबून सेव्ह करा. |
04:16 | कुठलीही error दिसणार नाही. |
04:19 | कार्यान्वित करण्यासाठी Ctrl F11 दाबा. value print झालेली दिसेल. |
04:27 | अशाप्रकारे मोठी संख्या long व्हेरिएबलमध्ये संचित करू शकतो. |
04:32 | int व्हेरिएबलमध्ये अपूर्णाक संख्या संचित करून बघू. |
04:37 | long च्या जागी int करा आणि संख्या 23.5 करा. |
04:50 | आपल्याला येथे error दिसेल. कारण int मध्ये केवळ पूर्णाक संचित करता येतात. |
05:00 | अपूर्णाक संख्या संचित करण्यासाठी float वापरावे लागते. |
05:05 | data type बदलून float करा. |
05:10 | व्हॅल्यूच्या शेवटी f समाविष्ट करा. |
05:17 | save करा. |
05:19 | येथे error दिसणार नाही. |
05:22 | कार्यान्वित करण्यासाठी Control F11 दाबा. |
05:29 | अपूर्णाक संख्या संचित करून ती व्हॅल्यू print केली आहे. |
05:37 | आता distance व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलू. |
05:46 | दाखवल्याप्रमाणे दशांश चिन्हानंतर खूप आकडे टाईप करा. |
05:53 | save करून कार्यान्वित करा. |
06:01 | संचित केलेल्या संख्येपेक्षा वेगळे आऊटपुट दिसेल. |
06:06 | कारण दशांश स्थळांच्या संख्येवर काही मर्यादा आहेत. |
06:11 | तो पूर्णपणे अचूक दाखवता येत नसल्यास जवळच्या संख्येला round off केला जातो. |
06:18 | variables ला नाव देण्याचे नियम पाहू. |
06:23 | नावाच्या सुरूवातीला 2 हा अंक समाविष्ट करा. |
06:30 | ही syntax error आहे. |
06:34 | व्हेरिएबलचे नाव alphabet किंवा underscore ने सुरू व्हावे लागते. |
06:40 | साधारणपणे व्हेरिएबलच्या सुरूवातीला underscore वापरत नाहीत. |
06:45 | आता एखादी संख्या व्हेरिएबलच्या नावाच्या शेवटी समाविष्ट करा . |
06:55 | कोणतीही error दिसणार नाही. |
06:59 | व्हेरिएबलच्या नावात अंक असू शकतात पण सुरूवातीला नाही. |
07:04 | आता नावाच्या मध्ये underscore समाविष्ट करा. |
07:15 | कोणतीही error दिसणार नाही. |
07:17 | म्हणजे व्हेरिएबलच्या नावात underscore वापरता येते. |
07:22 | परंतु नावात इतर कोणतीही चिन्हे वापरल्यास syntax किंवा इतर errors मिळतात. |
07:28 | अशाप्रकारे Java मध्ये numerical data संचित करता येतो. |
07:35 | हा पाठ येथे संपला. |
07:38 | ह्यात आपण अनेक numerical datatypes, |
07:44 | numerical data संचित करणे, |
07:46 | आणि व्हेरिएबल्सला नाव देण्याचे नियम शिकलो. |
07:51 | assignment. |
07:53 | इतर numerical data types हे int आणि |
07:56 | float पेक्षा कसे वेगळे आहेत ते बघा. |
08:00 | Java tutorials ह्या link वर उपलब्ध आहेत. |
08:05 | प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:11 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:14 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:20 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:24 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08:35 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:39 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:45 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:51 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.धन्यवाद . |
Contributors and Content Editors
Ashwini, Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana