Java-Business-Application/C2/Issuing-and-Returning-a-book/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: Issuing-and-Returning-a-book

Author: Manali Ranade

Keywords: Java-Business-Application

Time Narration
00:00 Issuing and returning a book वरील पाठात आपले स्वागत.
00:05 या पाठात शिकणार आहोत,
00:08 युजरची सर्व माहिती मिळवणे,
00:11 युजरला पुस्तक देणे,
00:13 पुस्तक परत घेणे,
00:15 आपण वापरणार आहोत,
00:17 उबंटु वर्जन 12.04
00:20 नेटबीन्स IDE 7.3
00:23 JDK 1.7
00:25 फायरफॉक्स वेब ब्राऊजर 21.0
00:29 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:33 ह्या पाठासाठी तुम्हाला,
00:37 Java Servlets, JSPs आणि
00:40 इन्व्हेन्टरीज बनवून ती बघणे या चे प्राथमिक ज्ञान असावे.
00:44 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:48 मागील पाठात Admin सेक्शन कसा कार्य करतो ते पाहिले.
00:53 या पाठात Admin सेक्शनमधे अधिक फंक्शनॅलिटीज समाविष्ट करू.
00:59 ब्राऊजरवर जाऊ.
01:02 admin म्हणून लॉगिन करा.
01:05 येथे Admin सेक्शन पेजमधे List Users आणि Checkout/Return Book हे पर्याय आहेत.
01:14 आता IDE वर जाऊ.
01:18 adminsection.jsp मधे आणखी दोन रेडिओ बटणे बघू शकतो.
01:24 एक List Users साठी आणि दुसरे Checkout/Return Book साठी.
01:30 ब्राऊजरवर जा.
01:33 List Users रेडिओ बटणावर क्लिक करा.
01:38 त्यामधे पहिले नाव, आडनाव, वय, लिंग आणि युजरनेम ही माहिती आहे.
01:48 आधीच्या दोन पर्यायांप्रमाणेच ह्या स्टेप्स आहेत.
01:51 मागील पाठात त्या पाहिल्या आहेत.
01:55 Checkout किंवा Return Book पर्यायावर क्लिक करा.
02:01 आपल्याला एक form मिळेल जो checkout तसेच return book ची परवानगी देतो.
02:06 त्यासाठीचा कोड बघू.
02:09 त्यासाठी IDE वर जा.
02:11 Checkout/Return Book वर क्लिक केले.
02:14 म्हणजेच menuselection = checkoutbook
02:18 List Books साठी केल्याप्रमाणेच या स्टेप्स आहेत.
02:23 परंतु येथे RequestDispatcher द्वारे checkOut.jsp कडे request पाठवत आहोत.
02:29 आता checkOut dot jsp वर जाऊ .
02:33 हे पेज listBooks dot jsp सारखेच आहे.
02:38 फक्त येथे प्रत्येक पुस्तकापुढे रेडिओ बटण आहे.
02:42 त्यामुळे ते पुस्तक Checkout/Return करू शकू.
02:46 आपल्याकडे युजरनेम फिल्ड आहे ज्यात पुस्तक checkout करणा-या युजरचे नाव लिहू शकतो.
02:53 तसेच पुस्तकाची रिटर्न डेट सेट करण्यासाठी Date field आहे.
02:59 चालू तारखेपासून एक आठवड्यानंतरची रिटर्न डेट सेट केली आहे.
03:04 हे Calendar क्लासद्वारे केले आहे.
03:07 ह्या क्लासमधील अॅड फंक्शन दोन पॅरॅमीटर्स घेईल.
03:13 पहिले म्हणजे वर्षाचा चालू दिवस.
03:16 आणि दुसरे म्हणजे चालू दिवसात मिळवायचे एकूण दिवस.
03:21 आपण सात दिवस मिळवत आहोत.
03:23 आता form action = CheckoutServlet आहे.
03:29 ब्राऊजरवर जाऊ .
03:32 BookId 1 वर क्लिक करा.
03:35 arya हे युजरनेम टाईप करा.
03:38 आजच्या तारखेपासून एक आठवड्यानंतरची रिटर्न डेट आहे.
03:43 उपलब्ध प्रती 9 आहेत.
03:48 Checkout Book वर क्लिक करा .
03:51 आपल्याला Checkout सक्सेस पेज मिळेल.
03:55 Admin सेक्शन पेजवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
03:59 पुन्हा Checkout/Return Book वर क्लिक करा.
04:03 उपलब्ध प्रतींची संख्या कमी होऊन 8 झाली आहे.
04:08 त्यासाठीचा कोड पाहू.
04:10 IDE वर जाऊ .
04:13 CheckoutServlet.java वर जा.
04:16 आपण errorMsgs सूची सेट केलेली आहे.
04:19 तसेच request मधे errorMsgs सेट केलेले आहेत.
04:23 आपल्याला request कडून getParameter द्वारे युजरनेम मिळेल.
04:28 तसेच checkout_book, return_book आणि book id मिळेल.
04:34 नंतर Id मधून Integer असलेला BookId पार्स करू.
04:40 आपण युजरनेम आणि book id व्हॅलिडेट करू.
04:44 तसेच Checkout_book आणि Return_Book ह्या दोघांची व्हॅल्यू null आहे का ते तपासू.
04:50 नंतर त्यापैकी एखाद्याची व्हॅल्यू null नसल्यास,
04:55 येथे userExists मेथडद्वारे सिस्टीममधे युजरची उपलब्धता तपासू.
05:01 नंतर मेथडने दिलेली रिटर्न व्हॅल्यू userExists व्हेरिएबलमधे संचित करू.
05:07 आता ही मेथड काय करते ते पाहू.
05:11 प्रथम टेबलमधे युजरनेम उपलब्ध आहे का ते तपासण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू.
05:18 नंतर userExists हे इंटिजर व्हेरिएबल 0 ने इनिशियलाईज करू.
05:23 जरनेम उपलब्ध असेल तर userExists एक वर सेट करू.
05:29 नंतर userExists ची व्हॅल्यू रिटर्न करू.
05:33 मेथडने 0 ही व्हॅल्यू रिटर्न केली म्हणजे सिस्टीममधे युजर उपलब्ध नाही.
05:42 अन्यथा, युजर उपलब्ध असल्यास bookAlreadyIssued मेथड कॉल करू.
05:50 नंतर मेथडची रिटर्न व्हॅल्यू bookIssued मधे संचित करू.
05:55 येथे तेच पुस्तक त्याच युजरने आधी घेतले आहे का ते तपासू.
06:01 आता bookAlreadyIssued मेथडवर जाऊ .
06:05 येथे bookAlreadyIssued हे इंटिजर व्हेरिएबल 0 वर सेट केले आहे.
06:12 तीच BookId असणारे पुस्तक त्याच युजरने घेतले आहे का हे पाहणारी क्वेरी कार्यान्वित करू.
06:18 आपल्याला Checkout टेबलमधून BookId मिळेल.
06:23 BookId उपलब्ध असल्यास bookAlreadyIssued हे व्हेरिएबल1 वर सेट होईल.
06:30 नंतर bookAlreadyIssued ची व्हॅल्यू रिटर्न करू.
06:34 मेथडने 1 ही व्हॅल्यू रिटर्न केली म्हणजे ह्या युजरने आधीच हे पुस्तक घेतले आहे.
06:43 ब्राऊजरवर जाऊ .
06:46 आता त्याच युजर द्वारे तेच पुस्तक checkout करण्याचा प्रयत्न करू.
06:51 arya हे युजरनेम टाईप करा.
06:54 BookId 1 रेडिओ बटणावर क्लिक करा.
06:59 Checkout book वर क्लिक करा.
07:03 आपल्याला the same user has already borrowed this book असा एरर मेसेज मिळेल.
07:10 IDE वर जा.
07:14 सिस्टीममधे युजर उपलब्ध असल्यास आणि checkout_book ची व्हॅल्यू null नसल्यास checkoutमेथड कॉल करू.
07:22 ह्या मेथडमधे काय करणार आहोत ते पाहू.
07:25 येथे संबंधित id साठी उपलब्ध प्रतींची संख्या मिळेल.
07:31 हे आपल्याला Books टेबलमधून मिळेल.
07:35 नंतर उपलब्ध प्रतींची संख्या available copies ह्या व्हेरिएबलमधे संचित करू.
07:41 available copies ची संख्या 0 पेक्षा जास्त आणि bookIssued = 0 आहे का ते तपासू.
07:50 request द्वारे आपल्याला dateofreturn मिळेल जी returndate मधे संचित करू.
07:56 नंतर insertIntoCheckout कॉल करू.
08:00 insertIntoCheckout मेथड काय करते ते बघू.
08:05 येथे book_id, युजरनेम आणि रिटर्न डेट Checkout टेबलमधे संचित करू.
08:12 नंतर decrement available copies ही मेथड कॉल करू.
08:16 ही मेथड काय करते ते पाहू.
08:19 येथे Books टेबलमधून उपलब्ध प्रतींची संख्या 1 ने कमी करण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू.
08:26 नंतर setCheckoutIntoRequest मेथड कॉल करू.
08:29 ह्या मेथडवर जाऊ .
08:32 ह्या मेथडमधे request मधे checkout अॅट्रिब्यूट सेट करू.
08:38 नंतर ही request आपण RequestDispatcher द्वारे successCheckout.jsp कडे पाठवू.
08:45 जर available copies बरोबर 0असेल तर There are no copies of the requested book available असे दाखवू.
08:53 आता successCheckout dot jsp वर जाऊ.
08:58 प्रथम request द्वारे checkout अॅट्रिब्यूट मिळेल.
09:03 नंतर यशस्वीरित्या Checkout केल्याचा मेसेज मिळेल.
09:08 तुम्ही वेगवेगळ्या एरर्ससाठी सराव करून बघा.
09:11 आता पुस्तक परत करू. त्यासाठी ब्राऊजर वर जाऊ.
09:15 bookId 1 वर क्लिक करा. युजरनेम arya टाईप करा.
09:21 Return book वर क्लिक करा.
09:24 पुस्तक यशस्वीरित्या परत केल्याचा मेसेज मिळेल.
09:29 आणखी एक checkout/return साठी येथे क्लिक करा.
09:33 आपण Admin सेक्शन पेज वर जाऊ.
09:36 Checkout/Return Book वर क्लिक करा.
09:39 उपलब्ध प्रतींची संख्या वाढलेली दिसेल.
09:45 ह्याचा कोड पाहू .
09:47 IDE वर जाऊ.
09:49 CheckoutServlet dot java उघडा.
09:53 आपण तपासू, userExists = 1 आणि return_book is not equal to null नसल्यास.
10:00 returnBook मेथड कॉल करू.
10:03 ह्या मेथडवर जाऊ .
10:06 येथे book id साठी Books टेबलमधून totalcopies आणि available copies सिलेक्ट करू.
10:14 totalcopies आणि available copies अनुक्रमे totcopies आणि availcopies मधे संचित करू.
10:21 नंतर उपलब्ध प्रती ह्या एकूण प्रतींपेक्षा जास्त आहेत का हे तपासू.
10:27 ब्राऊजरवर जाऊ .
10:30 आता अशा युजरद्वारे पुस्तक परत करणार आहोत जे त्याने घेतलेच नव्हते.
10:35 Mdhusein हे युजरनेम द्या.
10:39 book id 1 वर क्लिक करा.
10:42 नंतर Return Book वर क्लिक करा.
10:44 The given user has not borrowed this book!! असा एरर मेसेज दिसेल.
10:50 IDE वर जाऊ.
10:53 येथे bookIssued = 1 आहे का ते तपासू.
10:57 नंतर removeFromCheckout मेथड कॉल करू.
11:01 मेथडवर जाऊ .
11:04 येथे Checkout table मधून परत केलेल्या पुस्तकाची नोंद काढून टाकण्यासाठी ही क्वेरी कार्यान्वित करू.
11:14 incrementAvailableCopies ही मेथड कॉल करू.
11:18 ह्या मेथडवर जाऊ .
11:21 येथे उपलब्ध प्रती 1 ने वाढवत आहोत.
11:25 Books table अपडेट करण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू.
11:29 नंतर setReturnIntoRequest मेथड कॉल करू.
11:34 त्या मेथडवर जाऊ.
11:37 येथे request मधे returnBook अॅट्रिब्यूट सेट केले आहे.
11:41 नंतर RequestDispatcher द्वारे successReturn पेज कडे पाठवणार आहोत.
11:48 successReturn पेज हे successCheckout पेजप्रमाणेच आहे.
11:53 आता ब्राऊजरवर जाऊन लॉगिन पेजवर जा .
11:58 येथे Visitor’s Home Page ची लिंक बघू शकतो.
12:03 आपल्याला उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांची यादी मिळालेली आहे.
12:07 आपण शिकलो ते थोडक्यात:
12:10 युजरची सर्व माहिती मिळवणे,
12:12 युजरला पुस्तक देणे, पुस्तक परत घेणे
12:15 प्रॉजेक्टची माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
12:20 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
12:24 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
12:28 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
12:30 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12:32 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
12:36 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
12:41 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
12:44 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:50 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:52 ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे.
12:58 त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे.
13:06 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
13:10 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana