Java-Business-Application/C2/Database-and-validation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: Database-and-validation

Author: Manali Ranade

Keywords: Java-Business-Application


Time Narration
00:01 Database आणि validation वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत,
00:08 डेटाबेसशी संवाद साधणे.
00:10 फिल्डस व्हॅलिडेट करणे.
00:12 आपण वापरणार आहोत,उबंटु वर्जन 12.04
00:15 नेटबीन्स IDE 7.3
00:19 JDK 1.7
00:21 फायरफॉक्स वेब ब्राऊजर 21.0
00:24 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता
00:28 ह्या पाठासाठी तुम्हाला,
00:31 Java Servlets आणि JSPsचे प्राथमिक ज्ञान,
00:35 नेटबीन्स IDE मधून MySQL डेटाबेसला जोडणे,
00:39 डेटाबेस आणि टेबल्स बनवता येणे आवश्यक आहे.
00:42 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:47 आता नेटबीन्स IDE वर जाऊ.
00:52 आपण MySQL सर्व्हर सुरू केला आहे.
00:55 त्यामधे लायब्ररी नावाचा डेटाबेस बनवला आहे.
01:00 त्यामधे युजर्स नावाचे टेबल तयार केले आहे.
01:04 ह्या टेबलमधे आधीच काही व्हॅल्यूज समाविष्ट करून ठेवल्या आहेत.
01:08 आता आपण त्या बघू.
01:10 त्यासाठी युजर्सवर राईट क्लिक करून View Data वर क्लिक करा.
01:15 खालील Output बटणावर क्लिक करा.
01:19 आपण येथे 15 युजर्स बघू शकतो.
01:23 आपण FirstName, Surname, Age, Gender, Email, Username आणि Password बघू शकतो.
01:31 आता Java Database Connectivity Driver म्हणजेच JDBC ड्रायव्हर लोड करू .
01:39 त्यासाठी Projects टॅबवर क्लिक करा .
01:42 Libraries वर राईट क्लिक करून Add Library वर क्लिक करा.
01:46 नंतर MySQL JDBC Driver वर क्लिक करा .
01:50 आणि Add Library वर क्लिक करा.
01:53 हे JDBC ड्रायव्हर लोड करेल.
01:56 आता पूर्वी केल्याप्रमाणे प्रोजेक्ट कार्यान्वित करा.
02:00 आता arya हे युजरनेम आणि arya*123 पासवर्ड टाईप करा.
02:06 Sign In वर क्लिक करा.
02:08 आपण successGreeting पेज बघू शकतो.
02:12 लॉगआऊट करण्यासाठी here वर क्लिक करा.
02:15 आता IDE वर परत जा.
02:17 आपण GreetingServlet dot java वर जाऊ.
02:21 doPost मेथड वर जाऊया.
02:23 getParameter मेथडच्या सहाय्याने requestद्वारे युजरनेम आणि पासवर्ड मिळेल.
02:31 पुढे JDBC कनेक्शन कोड बघणार आहोत.
02:35 आपण Connection , PreparedStatement आणि Resultset ऑब्जेक्टसना null ने इनिशियलाईज केले आहे.
02:44 नंतर प्रोगॅममधे ड्रायव्हर रजिस्टर करू.
02:48 नंतर डेटाबेसचे कनेक्शन करू.
02:52 कनेक्शन ऑब्जेक्टवर prepareStatement मेथड कार्यान्वित करू.
02:58 युजर्स टेबलमधून युजरची माहिती मिळवण्यासाठी क्वेरी देऊ.
03:03 युजरनेम आणि पासवर्ड फॉर्ममधे भरल्याप्रमाणे आहे का ते तपासू.
03:09 येथे, प्रश्नचिन्ह डेटाबेसमधील प्रत्येक फिल्ड दाखवते.
03:15 प्रश्नचिन्हाच्या जागी व्हॅल्यू देण्यासाठी setString मेथड कार्यान्वित करू.
03:22 हे PreparedStatement ऑब्जेक्टद्वारे करू.
03:26 PreparedStatement ऑब्जेक्टवरexecuteQuery मेथड कार्यान्वित करू
03:33 तो रिझल्ट ResultSet ऑब्जेक्टमधे संचित होईल.
03:37 यशस्वीरित्या लॉगिन केल्यावर successGreeting पेज दाखवू.
03:43 त्यासाठी RequestDispatcher इंटरफेस वापरू.
03:48 RequestDispatcher ऑब्जेक्ट मिळवण्यासाठी requestवर getRequestDispatcher मेथड वापरू.
03:56 नंतर RequestDispatcher ऑब्जेक्टवर forward मेथड कार्यान्वित करू.
04:02 अशाप्रकारे successGreeting dot jspकडे पाठवणार आहोत.
04:07 स्लाईडस वर परत जा.
04:10 RequestDispatcher इंटरफेसबद्दल जाणून घेऊ.
04:15 हा इंटरफेस request दुस-या रिसोर्सकडे पाठवण्याची सुविधा देतो.
04:22 हे रिसोर्सेस html, servlet, किंवा jsp असू शकतात.
04:26 आता IDE वर जाऊ.
04:29 आता successGreeting dot jspवर जाऊ.
04:33 You have successfully logged inहा मेसेज दाखवत आहोत.
04:38 ब्राऊजरवर जाऊ.
04:41 डेटाबेस मधे समाविष्ट नसलेले युजरनेम आणि पासवर्ड टाईप करू.
04:47 मी abc हे युजरनेम आणि abc123* हा पासवर्ड टाईप करत आहे.
04:56 नंतर Sign In वर क्लिक करा.
04:59 त्याच पेजवर एरर मेसेज दिसेल.
05:03 Please correct the following error!!! Invalid username or password
05:09 त्यासाठीचा कोड पाहू.
05:12 IDE वर परत जा.
05:14 GreetingServlet dot javaवर जा.
05:17 हे व्हॅलिडेशन अपयशी ठरल्यास एरर मेसेज दाखवेल.
05:22 प्रथम errorMsgsची सूची इनिशियलाईज करू.
05:27 setAttribute मेथडच्या सहाय्याने errorMsgs हे व्हेरिएबल request स्कोपमधे सेट करू.
05:35 येथे errorMsgs हे अॅट्रिब्यूट नेम आहे.
05:39 आपण id हे स्ट्रिंग व्हेरिएबल nullने इनिशियलाईज केले आहे.
05:44 नंतर आपण युजर डेटाबेसमधे उपलब्ध आहे का ते तपासू.
05:48 असल्यास त्याची व्हॅल्यू id ह्या व्हेरिएबलमधे संचित करू.
05:53 अन्यथा Invalid username किंवा password ही एरर errorMsgs च्या सूचीत समाविष्ट करू.
06:00 एरर मेसेजेसची सूची रिकामी नसेल तर index dot jspवर एरर मेसेजेस दाखवू.
06:09 त्यामुळे हे index dot jsp कडे पाठवावे लागेल.
06:13 RequestDispatcherद्वारे दुस-या पेजकडे कसे रिडायरेक्ट करायचे हे आपण आधीच पाहिले आहे.
06:20 लक्षात घ्या आपण हा कोड try catch blockमधे exception हँडलिंगसाठी समाविष्ट केला होता.
06:27 आता errorMsgs हे व्हेरिएबल index dot jspमधून कसे मिळवायचे ते पाहू.
06:34 प्रथम errorMsgsह्या अॅट्रिब्यूटची व्हॅल्यू मिळवू.
06:38 हे requestवर getAttribute मेथडच्या सहाय्याने केले आहे .
06:44 लक्षात घ्या जावा कोड opening tag म्हणजेच less than चिन्ह percentage चिन्ह आणि closing tag म्हणजेच percentage चिन्ह आणि greater than चिन्ह ह्यामधे समाविष्ट केले आहे.
06:57 कोडच्या ह्या ब्लॉकला scriptlet म्हणतात.
07:02 प्रत्येक वेळी JSP कॉल केली असता ह्यातील Java कोड कार्यान्वित केला जातो.
07:08 जर errorMsgsची व्हॅल्यू nullनसेल तर हा मेसेज दाखवू.
07:15 Please correct the following errors.
07:18 नंतर errorMsgsच्या सूचीमधे आयटरेट करू.
07:23 नंतर सूची रूपात एरर मेसेजेस दाखवू.
07:27 अशाप्रकारे index dot jspवर एरर मेसेजेस दाखवू.
07:32 आता डेटाबेसमधे युजर कसा समाविष्ट करायचा ते पाहू.
07:37 डेटाबेसमधे, युजर समाविष्ट करण्यापूर्वी युजर टेबलसाठी मॉडेल बनवणे आवश्यक आहे .
07:44 मॉडेल म्हणजे काय ते पाहू.
07:48 मॉडेल म्हणजेः,सॉफ्टवेअर अॅप्लिकेशमनधील डेटाची लॉजिकल रचना.
07:55 setters आणि getters सह अॅट्रिब्यूटस असलेला जावा क्लास.
08:00 मॉडेलमधे अॅट्रिब्यूटस स्वतंत्र, एक एकटे न मानता त्याच्याकडे एकसंधपणे पाहिले जाते.
08:07 नेटबीन्स IDE वर परत जा.
08:11 मी आधीच User dot javaमॉडेल बनवले आहे.
08:16 आपणpackage org dot spokentutorial dot modelमधे हा Java class बनवला आहे.
08:24 आपल्याकडे firstName, surname, age, gender, email, username, password ही अॅट्रिब्यूट्स आहेत.
08:33 आपण ते emptyव्हॅल्यूजने इनिशियलाईज केले आहे .
08:37 आपल्याकडे parameterized कन्स्ट्रक्टर आहे.
08:41 तसेच default कन्स्ट्रक्टर आहे.
08:44 आपण getFirstName मेथड घोषित केली आहे.
08:47 तसेच setFirstName मेथड घोषित केली आहे.
08:51 अशी प्रत्येक अॅट्रिब्यूटसाठी set आणि get मेथड घोषित केली आहे.
08:57 ब्राऊजरवर जा.
08:59 रजिस्टर करण्यासाठी येथे लिंकवर क्लिक करा.
09:03 रजिस्ट्रेशन पेजमधील सर्व फिल्डस टाईप करा.
09:07 नंतरAdd User वर क्लिक करा.
09:10 आपल्याला Add User सक्सेस पेज मिळेल.
09:14 Your request to add harshita was successful हा मेसेज मिळेल.
09:20 येथे harshita हे आपण दिलेले युजरनेम दिले आहे.
09:24 आता हे कसे केले ते पाहू.
09:28 त्यासाठी IDE वर परत जा.
09:30 AddUserServlet dot javaवर जा.
09:35 ह्या स्टेप्स GreetingServlet dot javaसाठी केल्याप्रमाणेच आहेत.
09:40 प्रथम getParameter मेथडद्वारे फॉर्मचे पॅरामीटर्स मिळतील.
09:46 व्हेरिएबल युजर हा User मॉडेलचा इन्स्टन्स असून त्यातील विविध अॅट्रिब्यूटस इनिशियलाईज करू.
09:53 setAttribute मेथडच्या सहाय्याने user हे व्हेरिएबलrequest स्कोपमधे सेट करू.
10:01 फॉर्म भरताना कुठलीही एरर नसल्यास, युजर टेबलमधे व्हॅल्यूज समाविष्ट करण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू.
10:10 नंतरsuccess User पेजकडे पाठवू.
10:15 आता successUser dot jspवर जा.
10:19 प्रथम User dot java इंपोर्ट केले आहे.
10:24 JSPमधे कोडच्या ओळीला directive म्हणतात.
10:28 JSP डायरेक्टीव्हची सुरूवात opening tag म्हणजेच less than चिन्हpercentage चिन्ह आणि at the rate चिन्ह आणि शेवट closing tagने म्हणजेच percentage चिन्ह आणि greater than चिन्हाने होतो.
10:42 हे पेज डायरेक्टीव्ह आहे.
10:45 पेज डायरेक्टीव्हमधे इंपोर्ट केलेल्या सर्व पॅकेजेसची सूची आहे.
10:50 User ह्या अॅट्रिब्यूटची व्हॅल्यू मिळेल. जी युजर ऑब्जेक्ट म्हणून संचित करू.
10:57 नंतर येथे सक्सेस मेसेज आहे.
11:00 येथे आपण युजरनेम मिळवलेले आहे.
11:04 request ऑब्जेक्टवरgetUsername() मेथड वापरू.
11:09 आपण हे scriptlet टॅग्ज वापरून केले आहे.
11:12 आता ब्राऊजरवर जा .
11:15 डेटाबेसमधे आधीच उपलब्ध असलेला युजर समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू.
11:20 आता मी पुन्हा harshita समाविष्ट करत आहे.
11:24 आपण Please correct the following errors!!1 Duplicate entry 'harshita' for key usernameहा एरर मेसेज बघू शकतो.
11:33 आता पुन्हा एकदा युजर रजिस्टर करू.
11:37 येथे मी आता फॉर्म भरला आहे.
11:40 मी Age फिल्डमधे चूक केली आहे.
11:44 ग्राह्य अंकाऐवजी मी ab टाईप केले आहे .
11:48 आताAdd Userवर क्लिक करा.
11:51 आपल्याला The age must be a positive integer हा एरर मेसेज दिसेल .
11:57 आता हे कसे केले ते पाहू.
12:00 IDEवर परत जा.
12:03 AddUserServlet dot java उघडा.
12:08 येथे errorMsgsची सूची बनवली आहे.
12:11 नंतर setAttribute मेथडच्या सहाय्याने request scopeमधे errorMsgs हे व्हेरिएबल सेट करू.
12:18 नंतर इंटिजर टाईपचे ageUser हे व्हेरिएबल घोषित करून ते -1ने इनिशियलाईज केले आहे.
12:26 try catch block मधे parseInt मेथड वापरली आहे.
12:31 जी संख्येचे अक्षरी रूप घेऊन त्याची इंटिजर व्हॅल्यू परत करेल.
12:37 येथे आपण age फिल्डमधील संचित धन पूर्णांक तपासून घेत आहोत.
12:44 तपसणी अपयशी ठरल्यास errorMsgs च्या सूचीत ही एरर समाविष्ट करू.
12:51 The age must be a positive integer.
12:54 डेटा व्हॅलिडेट करण्यासाठी अशाचप्रकारे सर्व फिल्डस तपासणे आवश्यक आहे.
13:01 errorMsgs सूची रिकामी नसल्यास हे errorMsgs आपण addUser dot jsp वर दाखवू.
13:09 हे RequestDispatcherद्वारे कसे करायचे ते आधीच पाहिले आहे.
13:15 आता addUser dot jspवर जा.
13:19 येथेही प्रथम User dot java इम्पोर्ट केले आहे.
13:24 scriptlet टॅग्जमधे आपण User टाईपचे ऑब्जेक्ट बनवले आहे.
13:31 नंतर getAttribute मेथडद्वारे errorMsgs ह्या अॅट्रिब्यूटची व्हॅल्यू मिळवू.
13:38 ही व्हॅल्यू null आहे का ते तपासू.
13:43 जर ही व्हॅल्यू null नसेल तर index dot jspसाठी केल्याप्रमाणे एरर मेसेज दाखवू.
13:51 अन्यथा User मॉडेलच्या सहाय्याने requestद्वारे User अॅट्रिब्यूटची व्हॅल्यू मिळवू.
13:59 आपल्याकडे फॉर्म आहे.
14:01 फॉर्म टॅगमधे AddUserServlet ही अॅक्शन आणि POST ही मेथड आहे.
14:07 First Nameहे पहिले फिल्ड आहे ज्याचा इनपुट टाईपtext आहे. firstName हे नाव आणि user dot getFirstName ही व्हॅल्यू आहे.
14:18 येथे firstNameला empty स्ट्रिंग ही व्हॅल्यू देऊन इनिशियलाईज करत आहोत.
14:24 आपल्याला हेच इतर फिल्डससाठीही करायचे आहे.
14:28 आपल्याकडे submit बटण आहे ज्याची व्हॅल्यू Add User आहे.
14:33 अशाप्रकारे addUser.jsp मधील फिल्डस व्हॅलिडेट करू.
14:38 तुम्ही Add User पेजवर वेगवेगळ्या एरर्स करून बघू शकता.
14:42 आता डेटाबेसमधे युजर harshita समाविष्ट झाली आहे का ते बघू.
14:49 आता user टेबलवर जा. डेटाबेसमधे युजर harshita समाविष्ट झाल्याचे बघू शकतो.
14:56 पाठात आपण शिकलो:
14:58 डेटाबेस जोडणे आणि
15:00 फिल्ड व्हॅलिडेट करणे.
15:02 प्रॉजेक्टची माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
15:07 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
15:11 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
15:15 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
15:17 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
15:20 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
15:23 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
15:29 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
15:32 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
15:38 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
15:48 ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे.
15:57 त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे.
16:02 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana