JChemPaint/C2/Introduction-to-JChemPaint/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of the tutorial: Introduction-to-JchemPaint Author: Manali Ranade Key words: JChemPaint

Time Narration
00:00 नमस्कार. Introduction to JChemPaint वरील पाठात आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत:
00:08 JChemPaint ची ओळख
00:10 विंडोज OS वर JChemPaint इन्स्टॉल करणे
00:13 उबंटु OS 12.04 वर JChemPaint इन्स्टॉल करणे.
00:18 तसेच,
00:20 JChemPaint च्या इंटरफेसवर मेनूबार, टूलबार्स आणि पॅनेल
00:25 Preferences विंडो
00:27 टूल्सच्या सहाय्याने रचना काढणे आणि
00:30 .mol एक्सटेन्शनच्या सहाय्याने रचना सेव्ह करणे.
00:34 ह्या पाठासाठी वापरणार आहोत, उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04
00:41 विंडोज वर्जन 7
00:43 JChemPaint वर्जन 3.3-1210
00:48 फायरफॉक्स ब्राऊजर 31.0
00:52 Java वर्जन 7
00:55 ह्या पाठासाठी, इंटरनेट कनेक्शन
00:59 आणि सिस्टीमवर सिनॅप्टीक पॅकेज मॅनेजर इन्स्टॉल केलेले असावे.
01:03 उबंटुवरील टर्मिनलचे तसेच,
01:06 विंडोजवरील कमांड प्रॉम्प्टचे ज्ञान तुम्हाला असावे.
01:10 JChemPaint सुरू करण्यासाठी तुमच्या सिस्टीमवर Java इन्स्टॉल केलेले असावे.
01:16 उबंटुवर सिनॅप्टीक मॅनेजरच्या सहाय्याने Java इन्स्टॉल करता येऊ शकते.
01:21 उदाहरणार्थ: openjdk-7-jre
01:27 आता JChemPaint बद्दल जाणून घेऊ.
01:30 JChemPaint हा 2D केमिकल स्ट्रक्चर्सचा एडिटर आणि व्ह्यूअर आहे.
01:35 हे ऍप्लिकेशन मुक्त आणि विनामूल्य असून Java प्लॅटफॉर्म वापरून तयार केलेले आहे.
01:43 साध्या टेक्स्ट फॉरमॅटमधील SMILES, Molfile, CML आणि InChi keys मधील स्ट्रक्चर डेटा यात इंपोर्ट आणि एक्सपोर्ट करता येतो.
01:56 उबंटु 12.04 वर JChemPaint इन्स्टॉल करू.
02:02 फायरफॉक्स वेब ब्राऊजर उघडा.
02:06 उबंटुवर JChemPaint इन्स्टॉल करण्यासाठी ऍड्रेसबारवर ही URL टाईप करा http://jchempaint.github.io/.
02:21 JChemPaint च्या डाऊनलोड पेजवर जाऊ.
02:26 वेबपेजवरील “download a recent jar file from github (current is 3.3-1210):” शोधा.
02:37 the desktop application (6.8 MB) वर क्लिक करा.
02:42 सेव्ह डायलॉग बॉक्स उघडेल. Save File क्लिक करा.
02:48 सेव्ह केलेली फाईल डाऊनलोड्स फोल्डरवरून डेस्कटॉपवर हलवा.
02:53 सेव्ह केलेल्या फाईलवर राईट क्लिक करून Move to Desktop पर्याय निवडा.
03:00 JChemPaint ची नवी विंडो उघडण्यासाठी टर्मिनलची गरज आहे.
03:04 टर्मिनल उघडण्यासाठी CTRl+ALt आणि T एकत्रितपणे दाबा.
03:10 टाईप करा “cd space Desktop” आणि एंटर दाबा.
03:16 टाईप करा java space -jar space ./jchempaint-3.3-1210.jar आणि एंटर दाबा.
03:32 JChemPaint विंडो उघडेल.
03:35 JChemPaint केवळ टर्मिनलद्वारे उघडता येऊ शकते हे लक्षात घ्या.
03:41 आता विंडोजवर इन्स्टॉल करण्याची पध्दत पाहू.
03:45 विंडोज OS वर Java इन्स्टॉल करू.
03:50 तुमच्या विंडोज OS असलेल्या मशीनवर फायरफॉक्स वेब ब्राऊजर उघडा.
03:55 ऍड्रेसबारमधे टाईप करा jre-7-downloads आणि एंटर दाबा.
04:02 नवे वेब पेज उघडेल.
04:06 Java SE Runtime Environment 7 Downloads-Oracle ह्या लिंकवर क्लिक करा.
04:14 डाऊनलोडचे पेज उघडेल.
04:17 वेबपेजवरील License agreement पर्याय निवडा.
04:22 jre-7-windows-i586.exe ही लिंक निवडा.
04:31 Save file डायलॉग बॉक्स उघडेल.
04:35 Save File बटण क्लिक करा.
04:38 फाईल Downloads फोल्डरमधे डाऊनलोड होईल.
04:42 डाऊनलोड केलेल्या फाईलवर क्लिक करा.
04:46 Java इन्स्टॉल करण्यासाठी दिलेल्या प्रक्रियेचे पालन करा.
04:51 Close क्लिक करा.
04:54 Jre-7 तुमच्या मशीनवर इन्स्टॉल केले जाईल.
04:59 आता JChemPaint इन्स्टॉल करू.
05:02 तुमच्या विंडोज मशीनवर फायरफॉक्स वेबब्राऊजर उघडा.
05:06 विंडोजवर JChemPaint इन्स्टॉल करण्यासाठी ऍड्रेसबारमधे ही URL टाईप करा http://jchempaint.github.io/ .
05:21 हे आपल्याला JChemPaint च्या डाऊनलोड पेजवर घेऊन जाईल.
05:26 वेबपेजवर, “download a recent jar file from github (current is 3.3-1210):” शोधा.
05:39 "the desktop application (6.8 MB) " वर क्लिक करा.
05:44 Save file डायलॉग बॉक्स उघडेल.
05:47 Save File बटण क्लिक करा.
05:51 .jar फाईल Downloads फोल्डरमधे डाऊनलोड होईल.
05:57 Downloads फोल्डर उघडून jchempaint-3.3-1210.jar फाईल सिलेक्ट करा.
06:08 तुम्ही उपलब्ध असलेले नवे वर्जन देखील डाऊनलोड करू शकता.
06:13 एक्झीक्युटेबल फाईलवर राईट क्लिक करा.
06:16 JChemPaint उघडण्यासाठी Open पर्याय निवडा.
06:20 किंवा तुम्ही कमांड प्रॉम्प्टच्या सहाय्याने देखील JChemPaint उघडू शकता.
06:26 कमांड प्रॉम्प्ट उघडण्यासाठी कीबोर्डवरील Windows आणि R ही बटणे एकत्रित दाबा.
06:34 Run prompt चा बॉक्स उघडेल.
06:37 Open box मधे टाईप करा “cmd” आणि OK क्लिक करा.
06:43 कमांड प्रॉम्प्ट उघडेल.
06:46 आपण डाऊनलोड केलेली .jar फाईल असलेल्या Downloads फोल्डरवर जाऊ.
06:54 prompt वर cd space Downloads” असे टाईप करून एंटर दाबा.
07:00 java space -jar space jchempaint-3.3-1210.jar असे टाईप करून एंटर दाबा.
07:13 JChemPaint ची विंडो उघडेल.
07:17 कमांड प्रॉम्प्टवर एरर मिळाल्यास,
07:20 Program files वर जा. java फोल्डर शोधून त्यावर क्लिक करा.
07:27 bin फोल्डरवर जाऊन त्यावर राईट क्लिक करा.
07:32 Properties पर्यायावर जा.
07:35 C:\Program Files कंसात (x86)\Java\jre7 हा ऍड्रेस कॉपी करा.
07:48 पाथ सेट करण्यासाठी पुढे दिल्याप्रमाणे करा.
07:51 My Computer वर राईट क्लिक करून Properties पर्याय निवडा.
07:57 Advanced System settings वर क्लिक करून नंतर Environment Variables वर क्लिक करा.
08:04 System Variables मधे Path व्हेरिएबल शोधा.
08:09 Edit वर क्लिक करा.
08:11 Edit system Variable डायलॉग बॉक्स उघडेल.
08:16 C:\Program Files कंसात (x86)\Java\jre7 हा ऍड्रेस पेस्ट करा.
08:28 OK क्लिक करून सर्व विंडो बंद करा.
08:32 JChemPaint विंडो अशी दिसेल.
08:36 हा मेनूबार आहे.
08:38 मेनूबारमधे: File, Edit, View, Atom, Bond, Tools, R-groups, Templates आणि Help असे मेनू आयटम आहेत.
08:54 JChemPaint वर काम करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व टूल्स, टूलबार्समधे उपलब्ध आहेत.
09:02 JChempaint विंडोमधे,
09:04 वरच्या बाजूला Formatting टूल्स,
09:07 डावीकडे Bond टूल्स,
09:09 उजवीकडे Ring टूल्स आणि
09:12 खालच्या बाजूला Element टूल्स आहेत.
09:15 काढलेल्या रचना Panel मधे दाखवल्या जातात.
09:18 आता JChemPaint Preferences विंडोसाठी,
09:22 Draw a chain टूलवर क्लिक करा.
09:24 Panel वर क्लिक करून 6 Carbon atoms पर्यंत साखळी ड्रॅग करा.
09:30 लक्षात घ्या कार्बन साखळीत कुठलेही अणू समाविष्ट नाहीत.
09:35 Edit मेनूवर जाऊन Preferences पर्यायावर क्लिक करा.
09:42 Preferences विंडो उघडेल.
09:45 Preferences विंडोमधे Display Preferences आणि Other Preferences हे दोन टॅब आहेत.
09:54 डिफॉल्ट रूपात Display Preferences टॅब सिलेक्ट केलेला असतो.
10:00 येथे कुठलाही चेकबॉक्स निवडलेला नाही हे लक्षात घ्या.
10:05 आता काही चेकबॉक्सवर क्लिक करून ते कसे उपयुक्त आहेत ते पाहू.
10:12 साखळीवर Methyl ग्रुप दाखवण्यासाठी Show explicit methyl groups वर क्लिक करा.
10:18 हायड्रोजन्स दाखवण्यासाठी Show implicit hydrogens वर क्लिक करा.
10:23 केलेले बदल लागू करण्यासाठी Apply आणि OK वर क्लिक करा.
10:29 उदाहरण म्हणून Phosphoric acid(H3PO4) ची रचना काढू.
10:35 रचना काढण्यासाठी Phosphrous(P) टूलवर क्लिक करून नंतर Panel वर क्लिक करा.
10:42 Phosphine(PH3) दाखवले जाईल.
10:46 Oxygen(O) टूलवर क्लिक करून Single bond टूलवर क्लिक करा.
10:51 P वर कर्सर न्या. त्यावर छोटे निळ्या रंगाचे वर्तुळ आलेले दिसेल.
10:57 P वर क्लिक करा आणि चार Hydroxy bonds काढण्यासाठी ड्रॅग करा.
11:02 Phosphrous atomच्या खाली लाल रंगाची रेघ दिसेल.
11:07 ह्याचा अर्थ valency पूर्ण झालेली नाही.
11:11 ती valency पूर्ण करण्यासाठी वरचा Phosphrous-hydroxy bond हा double bond करू.
11:19 double bond tool वर क्लिक करा.
11:21 वरच्या बाजूच्या Phosphrous-hydroxy bond वर क्लिक करा.
11:26 Phosphoric acid ही रचना मिळेल.
11:30 रचनेतील सर्व अणू काळ्या रंगात दिसत आहेत.
11:36 मूलद्रव्यांचे Rasmol रंग दाखवण्यासाठी,
11:39 Edit मेनूतील Preferences वर जा.
11:44 विंडोमधील Color atoms by element ह्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
11:50 हे मूलद्रव्यांचे Rasmol रंग दाखवेल.
11:55 केलेले बदल लागू करण्यासाठी Apply आणि OK वर क्लिक करा.
12:00 मूलद्रव्ये त्यांच्या Rasmol रंगात दिसत आहेत.
12:05 फाईल सेव्ह करू.
12:07 File menu मधील Save as.... वर क्लिक करा.
12:12 Save as चा डायलॉग बॉक्स उघडेल.
12:15 फाईल सेव्ह करण्यासाठी Desktop फोल्डर निवडा.
12:21 फाईलला Phosphoric acid नाव देऊन Save वर क्लिक करा.
12:27 ही फाईल .mol ह्या एक्सटेन्शनने सेव्ह केली जाईल.
12:31 थोडक्यात,
12:33 आपण शिकलो,
12:36 JChemPaint ची ओळख
12:38 विंडोज OS वर JChemPaint इन्स्टॉल करणे
12:42 उबंटु OS 12.04 वर JChemPaint इन्स्टॉल करणे
12:47 JChemPaint च्या इंटरफेसवरील Menu bar, Tool bars आणि Panel
12:52 Preferences विंडो
12:55 टूल्सच्या सहाय्याने रचना काढणे आणि
12:58 .mol ह्या एक्सटेन्शनच्या सहाय्याने रचना सेव्ह करणे.
13:02 असाईनमेंट म्हणून,
13:04 JChemPaint इन्स्टॉल करा.
13:06 विविध मेनू आयटम वापरून बघा.
13:09 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
13:12 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
13:18 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
13:22 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
13:27 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
13:34 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
13:39 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13:46 यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro
13:52 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana