Inkscape/C3/Design-a-visiting-card/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | Inkscape वापरून “ Visiting card” बनवण्याच्या पाठात आपले स्वागत. |
00:05 | आपण शिकणार आहोत- |
00:08 | व्हिजिटिंग कार्डसाठी आवश्यक सेटींग्ज करणे |
00:10 | त्याची रचना करणे |
00:12 | त्याच्या अनेक प्रतींची प्रिंट काढण्यासाठी आवश्यक सेटींग्ज करणे |
00:16 | या पाठासाठी वापरणार आहोत- उबंटु लिनक्स 12.04 OS, इंकस्केप वर्जन 0.48.4 |
00:26 | इंकस्केप उघडू. |
00:28 | File खालील Document properties वर क्लिक करा. |
00:34 | Default units बदलून ती Inches करा आणि default Orientation, Landscape करा. |
00:41 | आता visiting card ची रचना करण्यास सुरूवात करू. |
00:45 | Rectangle tool च्या सहाय्याने आयत काढा. |
00:49 | Selector tool वर क्लिक करा. |
00:51 | Tool controls bar वरील Width 3.5 आणि Height 2 करा. |
01:00 | आता हे canvas च्या डावीकडे वरच्या बाजूला सरकवू. |
01:05 | त्याचा रंग बदलून गडद हिरवा करा. |
01:08 | आता पॅटर्न बनवू. |
01:10 | Bezier tool सिलेक्ट करून नागमोडी रेषा काढा. |
01:14 | Object मेनूखालील Fill and Stroke वर क्लिक करा. |
01:19 | stroke चा रंग बदलून तो पिवळा करा. |
01:23 | आता नागमोडी रेषेखाली सरळ रेषा काढा. |
01:26 | दोन्ही रेषा सिलेक्ट करून Extensions मेनूवर जा. |
01:30 | Generate from path वर क्लिक करून Interpolate क्लिक करा. |
01:35 | Exponent ची व्हॅल्यू 0 आहे का तपासा. |
01:38 | Interpolation steps ची व्हॅल्यू बदलून ती 30 करा. |
01:42 | Apply वर क्लिक करून Close क्लिक करा. |
01:46 | Interpolation इफेक्ट दिला गेल्याचे दिसेल. |
01:50 | आता Interpolate रचनेला ग्लो इफेक्ट देऊ. डिझाईन सिलेक्ट करा. |
01:55 | Filters मेनूखालील Shadows and Glows वर क्लिक करून Glow क्लिक करा. |
02:02 | रचनेला ग्लो इफेक्ट दिला गेल्याचे दिसेल. |
02:06 | आता Spoken Tutorial लोगो इंपोर्ट करू. |
02:10 | मी तो Documents फोल्डरमधे सेव्ह करून ठेवला आहे. |
02:13 | तुमच्यासाठी हा लोगो Code files या लिंकवर उपलब्ध आहे. |
02:17 | File मेनू खालील Import वर क्लिक करा. |
02:23 | लोगोचा आकार बदलून तो डाव्या बाजूच्या वरील कोप-यात नेऊन ठेवा. |
02:27 | मी लिबर ऑफिस रायटरमधे आधीच सेव्ह केलेला व्हिजिटिंग कार्डाचा मजकूर कॉपी करणार आहे. |
02:34 | तुमच्यासाठी ही फाईल Codes files लिंकवर उपलब्ध आहे. |
02:38 | फाँटचा आकार 12 आणि टेक्स्टचा रंग पांढरा करा. |
02:43 | Spoken Tutorial हे शब्द सिलेक्ट करा. |
02:45 | फाँटचा आकार बदलून 16 करा आणि टेक्स्ट बोल्ड करा. |
02:50 | आता Spoken Tutorial तयार झाले आहे. |
02:55 | पुढे व्हिजिटिंग कार्डाच्या अनेक प्रती बनवायला शिकणार आहोत . |
02:59 | cloning पध्दत वापरून हे करू शकतो. |
03:03 | त्यासाठी प्रथम सर्व घटकांचा ग्रुप करायला हवा. |
03:06 | सर्व घटक सिलेक्ट करण्यासाठी Ctrl + A दाबा आणि Ctrl + G दाबून त्यांचा ग्रुप बनवा. |
03:13 | आता Edit मेनूवर जा. |
03:15 | Clone वर क्लिक करून Create Tiled Clones क्लिक करा. |
03:20 | Create Tiled Clones चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
03:23 | Symmetry टॅबखाली rows ची संख्या 4 आणि कॉलम्सची संख्या 3 करा. |
03:30 | Create वर क्लिक करा. |
03:33 | डायलॉग बॉक्स बंद करा. |
03:35 | व्हिजिटिंग कार्डाच्या अनेक प्रती कॅनव्हासवर तयार झालेल्या दिसतील. |
03:40 | अशाप्रकारे व्हिजिटिंग कार्डाच्या अनेक प्रती प्रिंट करू शकतो. |
03:44 | डाव्या बाजूला वरती दिसत असलेले व्हिजिटिंग कार्ड बघा. |
03:48 | त्यावर क्लिक करून ते दुसरीकडे हलवा. |
03:50 | आता हे कार्ड अतिरिक्त प्रत असल्यामुळे डिलिट करा. |
03:54 | जर यात काही बदल करायचे असतील तर काय? |
03:59 | कार्डाच्या प्रत्येक प्रतीमधे बदल करावे लागतील का ? |
04:02 | अजिबात नाही. आवश्यक ते बदल केवळ मूळ कार्डामधे करावे लागतील. |
04:07 | ते बदल सर्व प्रतींमधे झालेले दिसतील. |
04:10 | हे करून पाहू. मूळ कार्डावर डबल क्लिक करून Spoken Tutorial या शब्दांचा रंग बदलून तो तपकिरी करा. |
04:18 | केलेले बदल सर्व प्रतींमधे झालेले दिसतील. |
04:24 | आता फाईल save करू. |
04:26 | SVG फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl + S दाबा. मी ही फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करणार आहे. |
04:35 | ST-visiting-card असे फाईलनेम देऊन Save वर क्लिक करा. |
04:43 | नंतर ही फाईल PDF फॉरमॅटमधे सेव्ह करू. |
04:48 | पुन्हा File मेनूखालील Save As वर क्लिक करा. |
04:53 | फाईलचे एक्सटेन्शन बदलून ते PDF करा आणि Save वर क्लिक करा. |
04:57 | resolution ची व्हॅल्यू 300 करून OK क्लिक करा. |
05:01 | डेस्कटॉपवर जाऊ. |
05:03 | आपण सेव्ह केलेली फाईल उघडू. |
05:08 | ही आपण तयार केलेली कार्डे आहेत. |
05:11 | थोडक्यात, |
05:13 | आपण शिकलो: व्हिजिटिंग कार्डसाठी आवश्यक सेटिंग्ज करणे, त्याची रचना करणे, त्याच्या अनेक प्रतींची प्रिंट काढण्यासाठी आवश्यक सेटींग्ज करणे. |
05:23 | असाईनमेंट. |
05:26 | तुमचे नाव, तुमच्या संस्थेचे नाव, तुमच्या संस्थेचा लोगो, तुमच्या वेबसाईटचे नाव असलेले व्हिजिटिंग कार्ड बनवा. |
05:38 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल |
05:44 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
05:51 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा |
05:54 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
05:59 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:03 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |