Health-and-Nutrition/C2/Laid-back-hold-for-breastfeeding/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 स्तनपानासाठी Laid-back स्थिती यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत- आई आणि तिच्या बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे.
00:15 स्तनपान करण्यापूर्वी आईची तयारी आणि laid-back स्तिथी कशी करावी.
00:22 आता सुरवात करूया.
00:24 जगभरात, सर्व आई त्यांच्या बाळाला स्तनपान करत असतांना विविध पद्धतीच्या स्थितींचा वापर करतात.
00:31 मागील ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, आई आणि तिच्या बाळासाठी सर्वोत्तम स्तनपानाची स्थिती

ती आहे ज्यामध्ये-

00:39 आई आणि बाळ दोघांसाठीहि स्तनपान पूर्ण होईपर्यंतचा काळ आरामदायक असेल.
00:47 बाळ आईच्या स्तनाशी योग्य पकड करू शकेल. आणि त्याला भरपूर दूध मिळू शकेल.
00:55 आता Laid-back होल्ड ह्या स्थिती बद्दल जाणून घेऊ.
01:00 जेव्हा बाळाची स्तनाशी योग्य पकड करणे अवघड जाते cross cradle किंवा cradle स्तिथी वापरून,
01:10 किंवा आईचे स्तन मोठे असेल,
01:13 किंवा आईला पाठदुखी असेल,
01:16 किंवा आई थकली असेल तेव्हा Laid-back स्तिथीची सल्ला दिली जाते.
01:19 आईने तिच्या बाळाला स्तनपान करण्यापूर्वी स्वतःचे हाथ साबण आणि पाण्याने स्वछ धुवून सुकुवून घ्यावेत.
01:27 मग आईने एक ग्लास उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
01:32 स्तनपान करणाऱ्या आईच्या स्तनांमध्ये सरासरी दररोज 750 ते 850 मिली लिटर दूध बनते.

म्हणून त्यांनी पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे.

01:44 मग आईने ज्या स्तनाने बाळाला स्तनपान करायचे आहे त्या स्तनावरुन कपडे काढावे.
01:50 आईने कपडे काढतांना खात्री करून घ्यावी कि तिच्या ब्लॉउज किंवा ब्रा मुळे स्तनांवर दबाव येऊ नये.
01:55 मग, आईने फरशीवर किंवा पलंगावर आरामशीरपणे झोपावे.
02:01 तिचे डोके, मान आणि पाठीच्या वरच्या भागाला उशीचा चांगल्या प्रकारे आधार असावा.
02:07 आता आई तयार आहे, आपण बाळाला योग्य पद्धतीने कसे पकडले पाहिजे ते शिकूया.
02:13 आईने आपल्या बाळाच्या शरीराला त्याच बाजूच्या हाथाने पकडले पाहिजे ज्या बाजूच्या स्तनातून तिला स्तनपान करावयाचे असेल.
02:20 तिने आपल्या बाळाच्या डोक्याचा खालचा भाग तिच्या दुसर्या हाताच्या अंगठ्या आणि बोटांनी पकडले पाहिजे.
02:27 या चित्रातील आई, तिच्या बाळाला तिच्या उजव्या स्तनातून स्तनपान करेल.
02:32 म्हणून ती बाळाच्या शरीरास धरून ठेवण्यासाठी तिच्या उजव्या हाताचा वापर करीत आहे.
02:38 आपल्या बाळाच्या डोक्याच्या खालील भागाला पकडण्यासाठी आपल्या डाव्या हाताचा अंगठा आणि बोटांचे वापर करीत आहे.
02:46 पुढे आपण बाळाच्या डोक्याला पकडण्यासाठी, आईच्या अंगठ्याची आणि बोटांची योग्य स्थिती पाहूया.
02:54 आईचा अंगठा बाळाच्या एका कानामागे आणि बाकीची बोटे दुसऱ्या कानामागे असावी.
03:02 तिने तिची बोटे व अंगठा बाळाच्या कानामागून हलवून माने पर्यंत आणू नये.
03:08 आईने बाळाच्या डोक्याच्या मागच्या बाजूस हाताने दाबू नये. यामुळे स्तनपान करताना बाळाला आरामदायी वाटेल.
03:20 पुढे आपण शिकू बाळाच्या शरीराला ठेवण्याची योग्य स्थिती.
03:25 बाळाला आईच्या शरीरावर अशा पद्धतीने ठेवावे कि जेणेकरुन बाळाचे पोट आईच्या पोटावर असेल.
03:32 आणि बाळाचे डोके आईच्या स्तनाजवळ असावे.
03:38 जेवढे बाळाच्या आणि स्तनाच्या दरम्यान अंतर कमी असेल तेवढे बाळाला स्तनापर्यंत पोचण्यास मदत होईल.
03:44 आणि बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास सोपे जाईल.
03:49 मग, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाळाच्या पूर्ण शरीराची दिशा.
03:56 आपण हे लक्षात घेतले असेल की - जेव्हा आपण अन्न खातो, आपल डोकं, मान आणि शरीर एका सरळ रेषेत असते.
04:05 त्याच प्रमाणे- स्तनपान करताना बाळाचं डोकं, मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत असावे.
04:14 यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल.
04:19 लक्षात ठेवा, बाळाला कोणत्याही दिशेत आईच्या शरीरावर ठेवू शकतो, जोपर्यंत बाळाच्या शरीराचा समोरील संपूर्ण भाग आईच्या शरीराच्या समोरील संपूर्ण भागावर ठेवला जातो.
04:32 आणि बाळ सहजपणे स्तनाकडे पोहोचू शकतो.
04:38 आता आपण बाळाला ठेवण्याच्या स्थितीमध्ये तिसऱ्या मुद्यावर आलो आहोत.
04:42 आईने बाळाच्या पूर्ण शरीराला आधार द्यावा.
04:47 नाहीतर बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास खूप मेहनत घावी लागेल.
04:54 पुढे आपण बाळाचे नाक आणि हनुवटीची स्थिती पाहू.
04:59 बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत.
05:04 आणि हनुवटी पुढच्या बाजूस आणि स्तनांच्या खूप जवळ असावी.
05:09 यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरीओलाचा खालचा भाग जास्त तोंडात घेईल.
05:16 आणि म्हणून बाळ दूध पिण्यासाठी खालच्या जबड्याचा वापर करेल.
05:21 कृपया लक्षात घ्या- Areola हा निप्पल भोवतीचा गडद भाग आहे.
05:27 आता बाळ laid back स्थिती मध्ये आहे आणि बाळ स्तनपानासाठी स्तन तोंडात घेण्यास तयार आहे.
05:34 या स्तिथीत, बाळ नैसर्गिकरित्या आईच्या स्तनाशी पकड घट्ट करू शकतो.
05:40 'बाळाची स्तनाशी पकड घट्ट' याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये स्पष्ट केली आहेत.
05:49 जसजसे बाळ आईच्या स्तनाशी पकड घट्ट करतो तसेतसे आई बाळाच्या डोक्यावरून आपले हाथ काढू शकते.

आणि बाळाच्या शरीराला आधार देण्यास तिच्या दोन्ही हातांचा ती वापर करू शकते.

06:02 या स्तिथीत, आईने आरामाने झोपून स्तनपान करावे .
06:06 आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:09 आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Debosmita, Ranjana