GIMP/C2/Rotating-And-Cropping-An-Image/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:22 | 'Gimp' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:24 | ही इमेज एडिट करण्यापूर्वी तुमच्या अस्सल फोटोग्रॅफी साठी 'RAW' च्या वापराबद्द्ल मी तुम्हाला संक्षिप्त पणे सांगू इच्छिते. |
00:33 | जर मी ही इमेज 'JPEG' मध्ये काढली असती तर माझ्या कडे त्याच्या एनकोडिंग साठी ब्राइटनेस च्या '256' स्टेप्स असल्या असत्या. |
00:42 | तुम्हाला हे जवळ-जवळ काळे आणि पांढरे, निळसर, हिरवट छटा सारखे दिसत आहे आणि मुळात हे केवळ करडे आहे. |
00:52 | 'JPEG' सहित तुमच्याकडे ग्रे च्या '256' विविध वॅल्यूज आहेत. |
01:00 | काळ्या साठी '0' आणि पांढऱ्या साठी '255'. |
01:05 | परंतु या इमेज मध्ये पांढरे नाही आणि थोडेसे काळे आहे. |
01:11 | या भागाची थोडीशी जागा वापरली आहे. |
01:16 | किती, हे मी तुम्हाला नंतर दाखवेल. |
01:19 | मी ही इमेज 'RAW' मध्ये काढली होती. आणि माझा कॅमरा 'RAW' इमेजस ना 12 bit डेटा फॉरमॅट मध्ये संचित करतो. |
01:27 | वॅल्यूज ची मांडणी केल्या नंतर मला ही इमेज रो कन्वर्टर द्वारे मिळाली आहे. आणि येथे माझ्या कडे ग्रे च्या विविध '256' वॅल्यूज आहेत आणि आता मी इमेज एडिट करण्यास सुरवात करू शकते. |
01:42 | पहिल्याच्या तुलनेने या इमेज मध्ये अधिक तपशिल सेव केलेले आहेत. |
01:47 | मला आठवते ही इमेज पहली आहे आणि दुसरी मला परिवर्तना नंतर मिळाली आहे. |
01:54 | दुसरी इमेज पुढील प्रक्रिया करण्यासाठी एक चांगले आधार आहे. जे चित्रातील निकाल असून पहिल्या इमेज प्रमाणे असेल, परंतु त्या पेक्षा अधिक चांगले. |
02:06 | आता मी 'GIMP' मध्ये दोन इमेजस उघडल्या आहेत. चला आता दोन इमेजस चा आयतालेख पाहु. |
02:14 | 'image dialog', मध्ये आयतालेख दडलेला आहे. |
02:17 | आपल्याला 'image dialog' पर्यंत पोहोचण्यासाठी तीन विविध पद्धती आहेत, पहिली पद्धत टूल बार वर आहे. |
02:33 | दुसरी पद्धत येथे 'Access the Image' मेन्यु वर क्लिक करणे आणि 'dialogs' वर क्लिक करणे. |
02:40 | आणि तिसरी पद्धत इमेज वर राइट क्लिक करून नंतर 'dialog' आणि 'histogram' वर क्लिक करणे. |
02:48 | येथे पहिल्या इमेज चा आयतालेख आहे. |
02:51 | यास थोडेसे मोठे करू आणि तुम्ही इमेज मध्ये विविध कलर्स च्या विविध पिक्सल चे डिस्ट्रिब्यूशन पाहत आहात. |
02:59 | डिजिटल इमेज नंबर द्वारे पेंटिंग च्या समान आहे. |
03:03 | जेव्हा तुम्ही इमेज मध्ये झूम कराल तुम्हाला खूप असे लहान टाइल दिसतील यापैकी इमेज मध्ये प्रत्येक टाइल्स चा कलर वेगळा आहे ज्यास पिक्सल असे म्हणतात. |
03:14 | आणि प्रत्येक कलर वॅल्यू द्वारे व्याख्यात केला आहे आणि मी तुम्हाला कलर पिकर च्या साहाय्याने ही वॅल्यू येथे दाखवू शकते. |
03:26 | जेव्हा मी कलर पिकर वापरते तेव्हा मला लाल, हिरवा आणि निळ्या साठी वॅल्यू मिळते. |
03:32 | या इमेज मध्ये लाल ची वॅल्यू ही हिरव्या आणि निळ्या पेक्षा जरा कमी आहे. |
03:38 | हिरव्या आणि निळ्या ची वॅल्यू अगदी समान आहे. |
03:43 | नंबर द्वारे पेंट करणे ही डिजिटल फोटोग्रफी आहे. |
03:46 | येथे या इमेज मध्ये माइया कडे 0 ते 255 पर्यंत क्रमांक आहे. आपल्याकडे खरोखर येथे अंधारमय भाग आहे, परंतु हे अंतिम इमेज बनवेल असे वाटत नाही. |
04:00 | इमेज चा खरा भाग जवळ-जवळ '80' पासून सुरू होतो आणि इमेज चा उजळ भाग येथे जवळ-जवळ '200' वर सुरू होतो. |
04:10 | तर आपल्याकडे 0 ते 256 पासून जागा आहे परंतु आपण केवळ '120' वापरणार आहोत जे डेटा च्या अर्ध्या पेक्षा कमी असून जे आपण वापरु शकतो. |
04:23 | आणि त्यामुळे येथे इमेज ची खूपच माहिती गमावली जाते. |
04:29 | आता दुसऱ्या इमेज चा आयतालेख पाहु. |
04:33 | जसे की आपण येथे पाहु शकतो, या आयतालेख मध्ये पहिल्या आयतालेख च्या तुलनेने अधिक डेटा आहे परंतु वक्राचा आकार एकसारखा आहे. |
04:45 | या दोन आयतालेखा ची तुलना करा. |
04:51 | दुसऱ्या इमेज मधील काही गोष्टी बाहेर आल्या आहेत तर मला ही समस्या सोडवायची आहे की, दुसऱ्या इमेज ला पहिल्या इमेज प्रमाणे छोटी करायची आहे. |
05:01 | हे पहिल्या इमेज मध्ये असल्या प्रमाणे थोडे अधिक सविस्तर आणि विभिन्न असायला हवे. |
05:11 | या इमेज सोबत कार्य करण्यापूर्वी मला तुम्हाला gimp यूज़र इंटरफेस बदद्ल एक गोष्ट दाखवायची आहे, जी मला शेवटचे ट्यूटोरियल रेकॉर्ड करता वेळी आढळली आहे . |
05:23 | जेव्हा तुम्ही इमेज विंडो मधून टॅब दाबाल तर येथे टूल बॉक्स नाहीसा होईल आणि मला शक्य होईल तेवढी मोठी इमेज मिळविण्यास मदत करेल. आणि मी माइया आवश्यकते नुसार टूल बॉक्स चालू आणि बंद करू शकते. |
05:41 | मी येथे जे करते, हे मी आणि तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे पाहु शकतो. |
05:46 | या इमेज ची एडिटिंग सुरू करण्या पुर्वी मला काही सेट्टिंग्स बदलाव्या लागतील. |
05:52 | तर मी 'file', 'preference' वर जाते आणि मी 'window management' वर जाते आणि येथे पर्याय निवडते. |
06:03 | 'tool box' आणि 'docks' साठी 'keep above' ठेवा आणि उरलेले पर्याय जसे आहे तसे ठेवा. |
06:11 | 'OK' दाबाल्यानंतर 'GIMP' जाहिरातीप्रमाणे कार्य करेल. |
06:17 | मी टूल बॉक्स वरुन टूल निवडू शकते आणि मी निवडलेल्या टूल चे सर्व पर्याय मिळवू शकते. |
06:25 | मी इमेज च्या मागे क्लिक करू शकते आणि टॅब चा वापर टूल बॉक्स बंद आणि चालू करण्यास करू शकते. |
06:33 | सर्वप्रथम, इमेज लेवेल मध्ये आहे का ते तपासा. |
06:37 | या इमेज मध्ये येथे विश्वसनीय मानुषी रचना नाही आहे म्हणून मी इमेज सरळ आहे का ते चेक करण्यासाठी मी ग्रिड मेथड वापरु शकत नाही. |
06:47 | पाण्याचा पृष्टभाग हा एक खूप चांगला दुवा आहे. |
06:50 | परंतु आपल्यास येथे संस्थर दिसत नाही आणि पाण्या वरच्या छटा ही थोड्या चुकीच्या आहेत. |
06:57 | येथे संस्थर नाही परंतु नदी मध्ये केवळ वक्र आहे. |
07:02 | रूलर कुठे सेट करायचा आणि संस्थर कसा तपसायचा याचा माझ्या कडे खरा दुवा नाही आहे. |
07:08 | मला माइया डोळ्यांवर विश्वास ठेवावा लागेल, जे मला वाटत नाही की, फोटोग्राफी मध्ये हे काही वाईट करण्याची पद्धत आहे. |
07:16 | आता मी 'rotate tool' निवडते आणि 'corrective backward' ऐवजी 'normal forward' निवडते आणि 'preview' मध्ये 'grid' ऐवजी 'image' सेट करते. |
07:30 | ठीक आहे 'image' मध्ये क्लिक करा. |
07:38 | येथे मध्यभागी एक बिंदू आहे त्यास रोटेशन चा मध्यगा असे म्हणतात. आणि त्या इमेज च्या भोवती इमेज रोटेट होईल. |
07:46 | इमेज रोटेट करण्याबदद्ल येथे एक 'dialog' आहे जेथे आपण 'angle' सेट करू शकतो. |
07:52 | येथे स्लाइडर आहे जे मला इमेज रोटेट करण्यासाठी साहाय्य करेल, परंतु तुम्ही पाहु शकता हे हाताळण्यास कठीण आहे आणि मला ही इमेज एवढी उतरती करायची नाही. |
08:05 | तर येथे मागे शून्य वर जाऊ आता मी येथे इमेज रोटेट करण्यासाठी स्टाइल वापरेल. |
08:14 | इमेज उजव्या बाजूला उतरती आहे मला इमेज डाव्या बाजूस रोटेट करायला हवी, म्हणजेच त्याच्या विरुद्ध. तर मला येथे नेगेटिव वॅल्यू मिळेल. |
08:29 | मी अचूक आणि सरळ इमेज मिळेपर्यंत एंगल (angel) बदलत राहील. |
08:36 | मी '-0.25°' एंगल सेट करते. |
08:43 | ही विंडो मागे घ्या आणि 'rotate' वर क्लिक करा आणि या कार्याच्या निकाला साठी प्रतीक्षा करा. |
08:50 | पुढील स्टेप आहे क्रॉपिंग. |
08:54 | मला इमेज मध्ये जहाज, पाणी आणि हे पक्षी हवे आहेत. |
09:02 | मला येथे असलेले गवत आणि येथील हा भाग इमेज मध्ये नको. आणि मला निश्चित माहीत नाही कि, मला इमेज मध्ये नदी काठचा भाग हवा आहे का. |
09:16 | मी इमेज चा हा भाग क्रॉप करेल कारण नंतर मला इमेज चा अंधारमय भाग हवा आहे. |
09:24 | म्हणजेच येथील पक्षी, जहाज आणि नंतर वृक्ष, जहाजा मागील किनारा आणि शेवटी पाणी आणि आकाश. |
09:35 | इमेज चा हा भाग खूप अंधारमय आहे. |
09:39 | मला इमेज चा हा भाग झूम करायचा आहे. मला शक्य होईल तेवढा नदीचा भाग समाविष्ट करायचा आहे परंतु काठ नाही. |
09:49 | मी 'hot Z' की दाबून इमेज च्या भागा मध्ये झूम करते. |
10:00 | येथे आणखीन एक उडणारा पक्षी आहे. |
10:02 | तर मी डाव्या बाजूला जाते, मी रूलर नदीच्या काठा जवळ आणते आणि त्यास येथे सोडते. |
10:09 | आणि 'Shift + ctrl + E' दाबा जे मला इमेज वर पुन्हा आणेल. |
10:15 | आता मला क्रॉप टूल निवडून त्या मध्ये काही पर्याय सेट करावे लागतील. |
10:20 | मला एक ठराविक 'aspect ratio' हवा '2:1'. |
10:29 | आणि मी प्रीव्यूव मध्ये थोड्या साहाय्या करिता 'rule of thirds' सेट करते, जे मला काही उपयुक्त लाइन्स पुरवतील. |
10:37 | मी येथे काय समाविष्ट आहे ते पाहते. |
10:41 | येथे पक्षांचा थवा आहे आणि येथे एकच पक्षी आहे. |
10:47 | आता तुम्ही रूलर्स दूर नेऊन क्लिक करू शकता. |
10:51 | इमेज च्या खालच्या भागावर येथे पाणी आहे परंतु, हे पाणी पुरेसे नाही कारण, त्यामध्ये आकाश फारच समाविष्ट आहे. |
11:01 | मी या एका पक्ष्याला गमावू शकते कारण, मला इमेज मध्ये या पक्षांचा थवा हवा आहे. |
11:09 | मी आता हे खाली खेचते. आता हे चांगले दिसत आहे. |
11:14 | माझे कार्य तपासण्याकरिता मी 'rule of thirds' निवडते. |
11:19 | माझे डोळे हे फार खराब नाहीत, कारण मी इमेज ला तीन विविध भागात विभाजित केले आहे, म्हणजेच पाणी, वृक्ष, आणि आकाश. |
11:30 | मला जहाजाची स्थळ अधिक उपयुक्त वाटत आहे. |
11:34 | दुसरे या पक्ष्यांचा थवा ही उपयुक्त वाटत आहे. आणि हा इमेज चा 1/9 चांगला भाग आहे. |
11:42 | हे कार्य करेल असे वाटते मी क्रॉप करण्यासाठी इमेज वर क्लिक करते. |
11:49 | इमेज मोठी करण्यास 'tab' आणि 'shift + ctrl +E' दाबा. |
11:55 | मी इमेज क्रॉपिंग ची सुरूवात अधिक चांगली केली आहे. आणि या इमेज सहित वेगळे काय करू शकतो हे मी तुम्हाला पुढील ट्यूटोरियल मध्ये दाखवेल. |
12:05 | जाण्यापुर्वी मला इमेज सेव करावी लागेल जे मला अगोदर करायला हवे होते. |
12:12 | मी इमेज ' Fog.xcf' रूपात सेव करते आणि ‘xcf’ हे 'GIMP' चे स्वतः चे फाइल फॉरमॅट एक्सटेन्षन आहे. आणि यामध्ये लेयर्स आणि अंडू ची भरपूर माहीत समाविष्ट आहे. |
12:29 | मला तुमच्याकडून ऐकण्यास आवडेल. |
12:32 | मला info@meetthegimp.org या मेल द्वारे सांगा तुम्हाला काय आवडले, मी काय अधिक चांगले बनवू शकले असते. |
12:42 | अधिक माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. http://meetthegimp.org |
12:47 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद. |