GChemPaint/C3/Aromatic-Molecular-Structures/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. GChemPaint मधील Aromatic Molecular Structures वरील पाठात आपले स्वागत.
00:07 यात शिकणार आहोत,
00:10 Cyclohexane चे Cyclohexene मधे रूपांतर करणे.
00:13 Cyclohexene चे Benzene मधे रूपांतर करणे.
00:16 बेंझिन रिंग मधील हायड्रोजनच्या जागी इतर अणू वापरणे.
00:20 बेंझिन रिंगमधील हायड्रोजनच्या जागी अणूंचा ग्रुप वापरणे.
00:24 दोन रेणू एकत्रित करणे.
00:26 आपण,
00:28 उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04 आणि
00:32 GChemPaint वर्जन 0.12.10 वापरू.
00:37 हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला,
00:41 GChemPaint केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी.
00:44 नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:50 मी नवे GChemPaint अॅप्लिकेशन उघडले आहे.
00:54 प्रथम डिस्प्ले एरियामधे six membered cycle समाविष्ट करू.
00:59 Add a six membered cycle टूल वर क्लिक करा.
01:02 डिस्प्ले एरियावर क्लिक करा.
01:04 Add a bond or change the multiplicity of the existing one टूल वर क्लिक करा.
01:10 cycle च्या प्रत्येक कोप-यात दोन बाँडस समाविष्ट करा.
01:14 दोन बाँडस अशाप्रकारे ठेवा की ते एकमेकांना स्पर्श करणार नाहीत.
01:19 हे करण्यासाठी बाँडस वर क्लिक करून तो योग्य जागेवर ड्रॅग करा.
01:24 cycle च्या सर्व कोप-यात कार्बनचे अणू दाखवू.
01:28 कुठल्याही एका कोप-यात राईट क्लिक करा.
01:31 सबमेनू उघडेल.
01:33 Atom सिलेक्ट करा. Display symbol वर क्लिक करा.
01:36 अशाप्रकारे cycle च्या सर्व कोप-यात कार्बन अणू समाविष्ट करू.
01:42 बंधावर हायड्रोजन अणू समाविष्ट करण्यासाठी कीबोर्डवरील H दाबा.
01:47 Add or modify an atom टूल वर क्लिक करा.
01:51 बाँडच्या सर्व जागांवर क्लिक करा.
01:54 पुन्हा दोन हायड्रोजन्स एकमेकांवर overlap होत नाहीत ना ते बघा.
01:59 (C6H12) Cyclohexane ची रचना मिळालेली आहे.
02:04 रचना कॉपी आणि पेस्ट करू.
02:07 रचना सिलेक्ट करण्यासाठी CTRL+A दाबा.
02:10 कॉपी करण्यासाठी CTRL+C दाबा आणि CTRL+V ने पेस्ट करा.
02:15 दुसरी Cyclohexane ची रचना Cyclohexene मधे रूपांतरित करू.
02:19 Eraser टूल वर क्लिक करा.
02:22 प्रत्येक संलग्न कार्बन अणूंमधून एक हायड्रोजन बाँड डिलीट करा.
02:27 Add a bond or change the multiplicity of the existing one टूल वर क्लिक करा.
02:33 नंतर डिलीट केलेल्या हायड्रोजन बंधांमधील बंधावर क्लिक करा.
02:37 डबल बाँड तयार होईल.
02:40 Cyclohexene(C6H10) ही रचना मिळालेली आहे.
02:44 आपण Cyclohexene हे Cyclohexadiene मधे आणि नंतर बेंझिनमधे रूपांतरित करू.
02:51 करंट एलिमेंट कार्बन असल्याची खात्री करा.
02:56 Eraser टूल वर क्लिक करा.
02:58 प्रत्येक संलग्न कार्बन अणूंमधून एक हायड्रोजन बाँड डिलीट करा.
03:03 Add a bond or change the multiplicity of the existing one टूल वर क्लिक करा.
03:09 नंतर डिलीट केलेल्या हायड्रोजन बंधांमधील बंधावर क्लिक करा.
03:13 दुसरा डबल बाँड तयार होईल.
03:16 Cyclohexadiene(C6H8) ची रचना मिळालेली आहे.
03:22 हीच कृती पुन्हा करून तिसरा डबल बाँड तयार होईल.
03:28 बेंझिन(C6H6) ची रचना मिळालेली आहे.
03:33 असाईनमेंट म्हणून,
03:35 Cyclobutane ची रचना काढून Cyclobutadiene मधे रूपांतरित करा.
03:39 Cyclopentane ची रचना काढून Cyclopentadiene मधे रूपांतरित करा.
03:45 तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे.
03:49 पुढे बेंझिन डेरिव्हेटिव्हज बद्दल जाणून घेऊ.
03:53 संयुगे मिळवण्यासाठी बेंझिनमधील हायड्रोजन्सच्या जागी फंक्शनल ग्रुप्स वापरतात.
03:59 हायड्रोजनच्या जागी वापरता येणारे फंक्शनल ग्रुप्स असे आहेतः
04:02 fluoro(F), methyl(CH3)
04:04 nitro(NO2), hydroxy(OH) आणि
04:06 इतर.
04:08 डिस्प्ले एरिया वर बेंझिनची रचना दोन वेळा कॉपी आणि पेस्ट करा.
04:13 बेंझिनची रचना सिलेक्ट करण्यासाठी Select one or more objects टूल वर क्लिक करा.
04:18 रचना कॉपी करण्यासाठी CTRL+C दाबा आणि CTRL+V ने दोन वेळा पेस्ट करा.
04:24 पहिल्या बेंझिन रचनेतील हायड्रोजन च्या जागी Fluorine अणू वापरू.
04:30 कीबोर्डवरील F दाबा.
04:32 Add or modify an atom टूल वर क्लिक करा.
04:35 हायड्रोजनच्या जागी Fluorine वापरण्यासाठी त्यावर क्लिक करा.
04:40 Fluorobenzene ची रचना मिळालेली आहे.
04:44 पुढे दुस-या बेंझिन रचनेतील हायड्रोजनच्या जागी अणूंचा ग्रुप वापरू.
04:50 Add or modify a group of atoms टूल वर क्लिक करा.
04:54 कुठल्याही एका हायड्रोजनवर क्लिक करा.
04:57 आपण हिरव्या रंगाच्या बॉक्समधे हायड्रोजन सहित ब्लिंकींग कर्सर पाहू शकतो.
05:03 हायड्रोजनच्या जागी methyl ग्रुप वापरू.
05:06 हायड्रोजन काढून टाका आणि कॅपिटल C H आणि 3 टाईप करा.
05:12 डिस्प्ले एरिया वर कुठेही क्लिक करा.
05:15 मिळालेली नवीन रचना Methyl benzene ची आहे.
05:19 तिस-या बेंझिन रचनेत हायड्रोजनच्या जागी nitro ग्रुप वापरू.
05:24 कुठल्याही एका हायड्रोजनवर क्लिक करा .
05:27 हायड्रोजन काढून टाका आणि कॅपिटल N O 2 टाईप करा.
05:32 मिळालेली नवीन रचना नायट्रोबेन्झिनची आहे.
05:36 बेंझिन रिंगमधे कार्बनच्या जागा पाहू.
05:40 कार्बनच्या सहा अणूंना बेंझिनमधे 1 ते 6 नंबर दिले आहेत.
05:45 हायड्रोजन अणू बदलेपर्यंत सहाही जागा एकमेकांच्या बरोबरीच्या असतात.
05:51 हायड्रोजनच्या जागी फंक्शनल ग्रुप वापरला गेल्यास रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी बदलते.
05:57 इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही Substituent वर अवलंबून असते.
06:01 बेंझिनचे mono-substituted संयुग पुढील जागी बदलता येते:
06:06 1 आणि 4- असल्यास Para.
06:09 2 आणि 6- असल्यास Ortho.
06:12 3 आणि 5- असल्यास Meta.
06:15 आता Methylbenzene रचना दुस-या methyl ग्रुपने बदलू.
06:20 Add or modify a group of atoms टूल वर क्लिक करा.
06:24 रिंगमधील दुस-या पोझिशनवरील हायड्रोजन वर क्लिक करा.
06:28 हिरव्या रंगाच्या बॉक्समधे हायड्रोजनच्या जागी methyl ग्रुप वापरण्यासाठी,
06:32 कॅपिटल C H 3 टाईप करा.
06:35 मिळालेली नवीन रचना ortho-Xylene ची आहे.
06:39 आता नायट्रोबेन्झिनला कार्बोक्सी ग्रुपने बदलू.
06:44 रिंगमधील चौथ्या पोझिशनवरील हायड्रोजन वर क्लिक करा.
06:48 हिरव्या रंगाच्या बॉक्समधे हायड्रोजनच्या जागी कार्बोक्सी ग्रुप वापरण्यासाठी,
06:52 कॅपिटल C O O H टाईप करा.
06:57 मिळालेली नवीन रचना para-Nitrobenzoic आम्लाची आहे.
07:02 प्रोसेस undo करण्यासाठी CTRL+Z दाबा.
07:05 नायट्रोबेन्झिन मधील हायड्रोजनच्या तिस-या जागी nitro ग्रुप वापरू.
07:11 हायड्रोजन काढून टाका आणि कॅपिटल N O 2 टाईप करा.
07:17 मिळालेली नवीन रचना meta-Dinitrobenzene ची आहे.
07:22 असाईनमेंट म्हणून,
07:24 बेंझिनच्या सात रचना काढा. एका हायड्रोजनच्या जागी हे वापराः
07:28 पहिल्या बेंझिनमधे bromo.
07:30 दुस-या बेंझिनमधे iodo.
07:32 तिस-या बेंझिनमधे hydroxy.
07:34 चौथ्या बेंझिनमधे amino.
07:36 पाचव्या बेंझिनमधे ethyl.
07:39 तसेच सहाव्या बेंझिनमधे दोन हायड्रोजन्सच्या जागी क्लोरिन अणू वापरा.
07:44 सातव्या बेंझिनमधे पहिल्या आणि चौथ्या हायड्रोजनच्या जागी कार्बोक्सी ग्रुप वापरा.
07:51 तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे.
07:55 दोन रचना एकत्र कशा करायच्या ते पाहू.
07:57 नवी विंडो उघडू.
08:00 करंट एलिमेंट कार्बन असल्याची खात्री करा.
08:04 Add a four membered cycle टूल वर क्लिक करा.
08:07 डिस्प्ले एरिया वर दोनदा क्लिक करा.
08:10 Select one or more objects टूल वर क्लिक करा.
08:14 दुस-या रचनेवर क्लिक करा.
08:16 ती ड्रॅग करून पहिल्या रचनेजवळ नेऊन,
08:20 अशी ठेवा ज्यामुळे त्या एकमेकांना स्पर्श करतील.
08:23 रचना सिलेक्ट करण्यासाठी CTRL+A दाबा.
08:26 Merge two molecules टूल अॅक्टिव्ह झालेले दिसेल.
08:30 रेणू एकत्रित करण्यासाठी Merge two molecules टूलवर क्लिक करा.
08:34 दोन रचनांचे एकत्रीकरण बघण्यासाठी त्या ड्रॅग करा.
08:38 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
08:41 शिकलो ते थोडक्यात,
08:43 Cyclohexane हे Cyclohexene मधे रूपांतरित करणे.
08:46 Cyclohexene हे Benzene मधे रूपांतरित करणे.
08:49 बेंझिनच्या हायड्रोजनच्या जागी fluoro, methyl, nitro आणि कार्बोक्सी ग्रुप वापरणे.
08:55 दोन four membered cycles एकत्रित करणे.
08:58 असाईनमेंट म्हणून,
09:00 बेंझिनचे दोन अणू तसेच
09:02 दोन Pentane च्या रचना आणि
09:04 Cyclopentane आणि Cyclohexane चे रेणू एकत्रित करा.
09:08 तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे.
09:12 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:15 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:19 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:23 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:27 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:31 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
09:37 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:41 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:48 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:53 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
09:57 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana