FrontAccounting-2.4.7/C2/Taxes-and-Bank-Account-in-FrontAccounting/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Taxes and Bank Accounts in FrontAccounting वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत:

नवीन Tax समाविष्ट करणे

00:12 Bank Accounts चा सेटअप

Deposits समाविष्ट करणे

00:16 Bank Account मधे रक्कम ट्रान्सफर करणे आणि

अकाउंटचा ताळा (Reconcile) करणे.

00:22 या पाठासाठी मी वापरत आहेः

Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04

00:30 FrontAccounting वर्जन 2.4.7
00:35 या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंग
00:42 तसेच बुककीपींगच्या तत्वांचे ज्ञान असावे.
00:45 आणि तुम्ही आधीच FrontAccounting मधे एक Organisation/Company सेटअप केलेली असावी.
00:51 नसल्यास या वेबसाईटवरील संबंधित FrontAccounting चा पाठ बघा.
00:57 FrontAccounting च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी XAMPP सर्व्हिसेस सुरू करा.
01:03 आता Frontaccounting चा इंटरफेस उघडू.
01:07 ब्राऊजर उघडून localhost slash account टाईप करून Enter दाबा.
01:16 login पेज उघडेल.
01:19 युजरनेम म्हणून admin आणि पासवर्ड टाईप करा.

Login बटणावर क्लिक करा.

01:26 FrontAccounting चा इंटरफेस उघडेल.

Setup टॅबवर क्लिक करा.

01:33 Company Setup पॅनेलमधे Taxes लिंकवर क्लिक करा.

आपल्याला Tax अशी डिफॉल्ट entry दिसेल.

01:42 येथे दर्शवल्याप्रमाणे Percentage, Sales GL Account आणि Purchasing GL Account दिसत आहेत.
01:51 व्यवसायात लागणार्‍या प्रत्येक tax साठी GL accounts आपल्याला द्यावे लागतील.
01:57 विंडोच्या वरच्या बाजूला आपण एक मेसेज पाहू शकतो.
02:00 अशी शिफारस केली जाते की प्रत्येक tax साठी Sale and purchase असे वेगळे GL account असावेत.
02:09 आपल्या company मधे GST आणि Service tax कसा समाविष्ट करायचा ते पाहू.
02:15 डिफॉल्ट entry Tax ओळीवरील Edit आयकॉनवर क्लिक करा.
02:20 आपली company डिफॉल्ट entry Tax वापरत नसल्याने मी Tax ला GST मधे बदलत आहे.
02:28 मी त्याचे विवरण GST आणि टक्केवारी 12 करत आहे.
02:35 मी Sales GL account आणि Purchase GL Account हे Sales tax म्हणून ठेवेन.
02:42 विंडोच्या खाली असलेले Update बटण क्लिक करा.
02:46 आपण डिफॉल्ट एंट्री Tax हा GST मधे यशस्वीरित्या बदलला आहे.
02:52 आता Service tax समाविष्ट करू.

त्यापूर्वी Service tax साठी GL Account तयार करावे लागेल.

03:00 Banking and General Ledger टॅबवर क्लिक करा.
03:04 Maintenance पॅनेलमधील, GL Accounts लिंकवर क्लिक करा.
03:09 दर्शविल्याप्रमाणे व्हॅल्यू टाईप करा

आणि विंडोच्या खाली असलेले Add Account बटण क्लिक करा.

03:17 आता Setup टॅबवर क्लिक करून नंतर Taxes लिंकवर क्लिक करा.
03:22 Tax Types खाली Service tax समाविष्ट करा.
03:27 दर्शविल्याप्रमाणे व्हॅल्यू टाईप करा.
03:30 Sales GL Account ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करा.
03:35 Current Liabilities खालील Service Tax निवडा.
03:39 तसेच Purchase GL Account साठी Service Tax निवडा.
03:46 विंडोच्या खाली असलेले Add new बटण क्लिक करा.
03:50 आपण दोन taxes समाविष्ट झाल्याचे पाहू शकतो.
03:55 FrontAccounting च्या Sales मॉड्युलमधे ह्या taxes ची गणना कशी होते ते पाहू.
04:03 आपण प्रथम company साठी Bank Account चे सेटअप करू.
04:07 Banking and General ledger टॅबवर क्लिक करा.
04:11 Maintenance पॅनेलमधील Bank Accounts लिंकवर क्लिक करा.
04:16 हा पर्याय bank आणि cash accounts सेटअप करण्यासाठी वापरला जातो.
04:22 डिफॉल्ट रूपात तुम्हाला Current account आणि Petty Cash account चे तपशील दिसतील.
04:29 डिफॉल्ट रूपात Currency कॉलम हा US Dollar मधे असतो.

तो Indian currency मधे बदलू.

04:38 Current account च्या ओळीतील Edit आयकॉन क्लिक करा.
04:43 Account type ला Chequing Account मधे बदला.
04:48 Bank account currency ही Indian Rupees मधे बदला.
04:53 त्यानंतर खालील Update बटण क्लिक करून बदल निश्चित करा.
04:59 तसेच Petty Cash account सुध्दा Indian Rupees मधे बदलू

आणि बदल अपडेट करू.

05:11 ST Company Pvt. Ltd. bank account मधे काही रक्कम भरू.
05:17 Banking and General ledger टॅबवर जा.

Transactions पॅनेलमधे Deposits लिंकवर क्लिक करा.

05:25 येथे ग्राहकांची डिपॉझिटस, विविध सेल्स इत्यादींची नोंद येथे करता येईल.
05:31 From हे फिल्ड Miscellaneous असेच ठेवा.

येथे दाखवल्याप्रमाणे डिपॉझिट ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव मी टाईप करत आहे.

05:41 Account description फिल्मधे Cash निवडा.
05:45 Amount फिल्डमधे 3 lakhs टाईप करा.
05:49 Memo फिल्डमधे डिपॉझिटचा उद्देश टाईप करा.
05:54 नंतर, ओळीच्या उजवीकडे Add item बटण क्लिक करा.
05:59 विंडोच्या खाली असलेले Process Deposit बटण क्लिक करा.
06:04 नवीन विंडोमधे deposit भरले गेल्याचा संदेश दिसेल.
06:10 View the GL postings for this Deposit या पुढील लिंकवर क्लिक करा.
06:17 deposited रकमेचे ट्रॅन्झॅक्शन, तपशीलासह पॉपअप विंडोमधे दिसेल.
06:24 विंडोच्या खाली असलेल्या Close लिंकवर क्लिक करा.
06:28 आणखी deposit एंटर करायचे असल्यास “Enter Another Deposit” लिंक क्लिक करा.
06:34 FrontAccounting इंटरफेसवर परत जाण्यासाठी विंडोच्या खालील Back लिंकवर क्लिक करा.
06:41 नंतर bank account मधून cash किंवा इतर account ला रक्क्म ट्रान्सफर करण्याची पध्दत पाहू.
06:49 Transactions पॅनेलमधे Bank Account Transfers लिंकवर क्लिक करा.
06:55 Bank Balance तीन लाख रूपये असल्याचे दिसेल.

ही रक्कम आपण आत्ताच भरल्याचे तुम्हाला आठवत असेल.

07:05 To Account फिल्डमधे Petty Cash account निवडा.
07:10 Amount फिल्डमधे 20,000 एंटर करा.
07:14 Memo फिल्डमधे दाखवल्याप्रमाणे टाईप करा.
07:17 विंडोच्या खाली असलेले Enter Transfer बटण क्लिक करा.
07:22 “Transfer has been entered” हा नवीन संदेश विंडोमधे दिसेल.
07:27 View The GL Journal Entries for this Transfer या पुढील लिंकवर entries पाहण्यासाठी क्लिक करा.
07:35 रक्कम ट्रान्सफर झाल्याचे ट्रॅन्झॅक्शन, तपशीलासह पॉपअप विंडोमधे दिसेल.
07:42 विंडोच्या खाली असलेल्या Close लिंकवर क्लिक करा.
07:46 FrontAccounting इंटरफेसवर परत जाण्यासाठी विंडोच्या खालील Back लिंकवर क्लिक करा.
07:53 पुढे आपण Bank Statements चेक करू.
07:57 Transactions पॅनेलमधे, उजव्या बाजूला Reconcile Bank Account लिंक क्लिक करा.
08:04 हे company accounts मधील deposits चा ताळा Bank statement बरोबर करते.
08:10 Account total, Bank Deposits आणि Fund transfer चा तपशील आपण पाहू शकतो.
08:17 अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

08:22 या पाठात आपण,

नवीन Tax समाविष्ट करणे

08:27 Bank Accounts सेटअप करणे
08:30 Deposits समाविष्ट करणे
08:32 Bank Account मधे रक्कम ट्रान्सफर आणि
08:35 अकाउंटचा ताळा करायला शिकलो.
08:39 असाईनमेंट-

Deposits पर्याय वापरून Petty Cash account मधे Rs.10,000 भरा.

08:48 From फिल्डमधून Miscellaneous निवडा.

Name साठी Mr. Rahul एंटर करा.

08:54 Petty Cash account साठी Reconcile Bank Account चेक करा.
08:59 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

09:07 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

09:18 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
09:22 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:28 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद. -

Contributors and Content Editors

Madhurig, Manali