FrontAccounting-2.4.7/C2/Place-Sales-Order-in-FrontAccounting/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Place Sales Order in FrontAccounting वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात शिकणार आहोत:
Sales Quotation Entry |
00:13 | Sales Order Entry |
00:15 | Make Delivery आणि
Sales Order Inquiry |
00:20 | या पाठासाठी मी वापरत आहेः
Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04 |
00:28 | FrontAccounting वर्जन 2.4.7 |
00:32 | या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंग तसेच बुककीपींगच्या तत्वांचे ज्ञान असावे. |
00:42 | आणि तुम्ही आधीच FrontAccounting मधे एक Organisation/Company सेटअप केलेली असावी. |
00:48 | नसल्यास या वेबसाईटवरील संबंधित FrontAccounting चा पाठ बघा. |
00:54 | FrontAccounting च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी XAMPP सर्व्हिसेस सुरू करा. |
01:00 | आता Frontaccounting चा इंटरफेस उघडू. |
01:04 | ब्राऊजर उघडून localhost slash account टाईप करून Enter दाबा. |
01:13 | login पेज उघडेल. |
01:16 | युजरनेम म्हणून admin आणि पासवर्ड टाईप करा. |
01:21 | Login बटणावर क्लिक करा. |
01:24 | FrontAccounting चा इंटरफेस उघडेल. |
01:27 | आपण विक्रीसाठी आवश्यक असलेल्या सर्व स्टेप्स केल्या आहेत. |
01:31 | आता Sales Quotation Entry बनवण्यासाठी तयार आहोत. |
01:35 | Sales टॅबवर क्लिक करा.
Transactions पॅनेलमधे Sales Quotation Entry लिंक क्लिक करा. |
01:43 | आपण ग्राहकाचे नाव असलेला ड्रॉपडाऊन बॉक्स आणि इतर संबंधित माहिती बघू शकतो. |
01:50 | कारण आपण Add and Manage Customers मधे हा तपशील आधीच अपडेट केला होता. |
01:57 | आपल्या ‘Amit’ या ग्राहकासाठी नवी sales quotation entry बनवू. |
02:03 | लक्षात घ्या, की Reference number हा auto generated आहे. |
02:07 | इतर फिल्डसमधील नोंदी जशा आहेत तशाच ठेवा. |
02:11 | Sales Quotation Items पॅनेलमधे Item Description ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा.
Item म्हणून Dell laptop सिलेक्ट करा. |
02:22 | Dell laptop चा Item Code आणि त्याची sales price येथे दिसेल. |
02:28 | याचे कारण आपण हे आधीच्या पाठात तयार करून ठेवले आहे. |
02:33 | Quantity फिल्डमधे 1 हा आकडा टाईप करत आहे. |
02:38 | तुम्हाला ग्राहकाला सवलत द्यायची असल्यास Discount फिल्डमधे टक्केवारी टाईप करा. |
02:45 | मी माझ्या ग्राहकाला 0.10 % सवलत देत आहे. |
02:51 | ही entry सेव्ह करण्यासाठी या ओळीच्या उजवीकडे शेवटी असलेले Add Item बटण क्लिक करा. |
02:58 | लक्षात घ्या, या Sales Order ची Amount Total ही 12% GST सहित आहे. |
03:06 | Shipping Charge फिल्ड विकलेले items ग्राहकाला पाठवण्याचे शुल्क आहे. |
03:13 | Shipping Charge फिल्डमधे मी Rs.200 टाईप करत आहे. |
03:19 | पॅनेलच्या खालील भागातील Update बटण क्लिक करा. |
03:23 | Subtotal आणि Amount Total मधे झालेले बदल बघू शकतो. |
03:28 | खाली स्क्रॉल करा.
विंडोच्या खालील भागातील Place Quotation बटण क्लिक करा. |
03:35 | quotation यशस्वीरित्या दिले गेले असल्याचा संदेश दिसेल. |
03:40 | आता quotation वर आधारित order प्लेस करायची आहे. |
03:46 | त्यासाठी Make Sales Order Against This Quotation लिंक क्लिक करा. |
03:52 | Sales Order Entry साठी विंडो उघडेल. |
03:56 | item चा तपशील येथे बघता येईल. |
04:00 | खाली स्क्रॉल करा.
विंडोच्या खाली असलेले Place Order बटण क्लिक करा. |
04:06 | order यशस्वीरित्या दिली गेल्याचा संदेश मिळेल.
|
04:12 | आता पुढची पायरी म्हणजे डिलिव्हरी करणे. |
04:15 | त्यासाठी Make Delivery Against This Order लिंक क्लिक करा. |
04:21 | Deliver Items for a Sales Order नावाची विंडो उघडेल. |
04:27 | जे items डिलिव्हर करायचे आहेत त्याचा तपशील हे दाखवेल. |
04:32 | विंडोच्या खाली असलेले Process Dispatch बटण क्लिक करा. |
04:37 | delivery च्या एंट्रीची पुष्टी करणारा संदेश आपल्याला दिसेल. |
04:43 | खालील सर्व पर्यायांचा तुम्ही स्वतः अभ्यास करा. |
04:47 | Sales टॅबवर क्लिक करा. |
04:50 | आता आपण केलेल्या Sales Entry ची सद्यस्थिती पाहू. |
04:55 | Inquiries and Reports पॅनेलखालील Sales Order Inquiry लिंक क्लिक करा. |
05:01 | येथे दिलेल्या टेबलमधे या एंट्रीचा तपशील बघू शकतो. |
05:06 | विंडोच्या खाली असलेल्या Back लिंकवर क्लिक करा. |
05:10 | पुढे customer payment बद्दल जाणून घेऊ. |
05:14 | Transactions पॅनेलच्या उजवीकडील Customer Payments लिंक क्लिक करा. |
05:20 | Amit या ग्राहकाने Rs.53147 द्यायचे आहेत.
Amount फिल्डमधे ही रक्कम भरा. |
05:31 | Amount of Discount फिल्डमधे Rs.2000 भरू. |
05:37 | पुन्हा एकदा Amount फिल्डवर क्लिक करा. |
05:40 | डिस्काउंट नंतर रकमेत झालेला बदल आपण बघू शकतो. |
05:44 | Memo फिल्डमधे तपशील लिहा. |
05:47 | मी “Amount received from Amit for sale of Dell laptop” असे टाईप करत आहे. |
05:53 | विंडोच्या खाली असलेले Add payment बटण क्लिक करा. |
05:58 | “Customer payment has been successfully entered” असा मेसेज दिसेल. |
06:04 | त्याखाली विविध transactions साठी वेगवेगळ्या links दिसतील. |
06:09 | payment चा तपशील बघण्यासाठी View this customer payment लिंक क्लिक करा. |
06:15 | शेवटी, विंडोच्या खाली असलेल्या Close लिंकवर क्लिक करा. |
06:20 | अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
06:26 | या पाठात आपण,
Sales Quotation Entry Sales Order Entry |
06:33 | Make Delivery आणि Sales Order Inquiry करायला शिकलो. |
06:38 | असाईनमेंट म्हणून नवी Sales Quotation Entry करा. |
06:42 | अधिक तपशीलासाठी या पाठाच्या Assignment लिंकचा संदर्भ घ्या. |
06:47 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
06:55 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
07:05 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
|
07:09 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
|
07:15 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेल यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |