FrontAccounting-2.4.7/C2/Items-and-Inventory-in-FrontAccounting/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Items and Inventory in FrontAccounting वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोतः FrontAccounting मधे,

Units of Measure

00:14 Items
00:16 Item Category आणि Sales Pricing समाविष्ट करणे.
00:20 या पाठासाठी मी वापरत आहेः

Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04

00:28 FrontAccounting वर्जन 2.4.7.
00:32 या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंग तसेच बुककीपींगच्या तत्वांचे ज्ञान असावे.
00:42 आणि तुम्ही आधीच FrontAccounting मधे एक Organisation/Company सेटअप केलेली असावी.
00:48 नसल्यास या वेबसाईटवरील संबंधित FrontAccounting चा पाठ बघा.
00:54 FrontAccounting च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी XAMPP सर्व्हिसेस सुरू करा.
01:00 सुरूवात करण्यापूर्वी FrontAccounting मधे Items चा अर्थ समजून घेऊ.
01:06 Items म्हणजे वस्तू ज्यांची आपण व्यवसायात खरेदी विक्री करू शकतो.
01:11 inventory item साठी त्याबद्दलच्या महत्वाच्या माहितीची सूचीबध्द नोंद ठेवावी लागेल.
01:18 Inventory म्हणजे आपल्याकडील मालाची संपूर्ण यादी,
01:23 चालू स्थितीतील काम,

आपल्याकडील कच्चा आणि तयार माल.

01:30 आता Frontaccounting चा इंटरफेस उघडू.
01:34 ब्राऊजर उघडून localhost slash account टाईप करून Enter दाबा.
01:43 login पेज उघडेल.
01:46 युजरनेम म्हणून admin आणि पासवर्ड टाईप करा.


Login बटणावर क्लिक करा.

01:54 FrontAccounting चा इंटरफेस उघडेल.
01:57 Items and Inventory टॅबवर क्लिक करा.
02:01 Maintenance पॅनेलचा उपयोग Items आणि Inventory चा तपशील सेट करण्यासाठी होतो.
02:06 सेटअप करण्यासाठी आपल्याला खालील पर्याय वापरावे लागतील:

Units of Measure

02:13 Items आणि Item Categories.
02:18 Units of Measure कसे सेट करायचे ते पाहू.
02:22 प्रत्येक वस्तूसाठी Units of Measure पर्याय निर्दिष्ट करणे गरजेचे आहे.
02:27 Maintenance पॅनेलमधील Units of Measure लिंकवर क्लिक करा.
02:32 डिफॉल्ट रूपात each आणि hour ही units of measure दिसतील.
02:38 kilograms साठी नवे Units of Measure समाविष्ट करण्याची रीत पाहू.
02:43 येथे दाखवल्याप्रमाणे kilograms या एककाबद्दलची माहिती टाईप करा.
02:48 Decimal places ड्रॉपडाऊन बॉक्समधे शून्य हा पर्याय निवडा.
02:53 हे unit समाविष्ट करण्यासाठी विंडोच्या खालील भागातील Add new बटण क्लिक करा.
02:59 हे नवे unit यशस्वीरित्या समाविष्ट झाल्याचा मेसेज दाखवेल.
03:04 तसेच नव्या एंट्रीसहित टेबल आपण बघू शकतो.
03:08 याप्रकारे कंपनीच्या वस्तूंसाठी आवश्यक असलेली मोजण्याची एकके समाविष्ट करावी लागतील.
03:15 FrontAccounting च्या इंटरफेसवर परत जाण्यासाठी विंडोच्या खालील भागातील Back लिंकवर क्लिक करा.
03:22 आता Item Categories सेट करू ज्यांच्याशी item संबंधित आहेत.
03:28 Item Categories खरेदी-विक्री केलेल्या items चे गट करण्यास मदत करतात.
03:33 Item Categories लिंकवर क्लिक करा.
03:35 येथे Charges, Components, Services आणि Systems या डिफॉल्टरूपातील Item categories बघू शकतो.
03:48 आपण आपली Item category, बनवणार आहोत जी

Item tax type,

03:54 Item Type आणि Units of Measure परिभाषित करेल.
03:58 उदाहरणादाखल आपली कंपनी Laptops सारख्या तयार वस्तूंचा व्यवहार करते.
04:04 म्हणून आपण Finished Goods नावाची नवी

Item category समाविष्ट करणार आहोत.

04:09 येथे दाखवल्याप्रमाणे सर्व माहिती भरा.

Category Name साठी Finished Goods

04:15 Item Tax Type साठी Regular

Item Type साठी Purchased

04:21 Units of Measure साठी Each
04:24 उरलेल्या सर्व फिल्डससाठी आहेत त्याच डिफॉल्ट व्हॅल्यूज ठेवा.
04:28 एंट्री सेव्ह करण्यासाठी विंडोच्या खालील भागातील Add New बटण क्लिक करा.
04:34 नवीन समाविष्ट केलेला तपशील वरील टेबलमधे अपडेट झालेला दिसेल.
04:40 FrontAccounting च्या इंटरफेसवर परत जाण्यासाठी विंडोच्या खालील भागातील Back लिंकवर क्लिक करा.
04:47 पुढे या Item category साठी नवा Item तयार करू.
04:52 Maintenance पॅनेलमधील Items लिंकवर क्लिक करा.
04:57 येथे item ची सर्व आवश्यक माहिती भरण्यासाठी विचारणा केली जाईल.

येथे दाखवल्याप्रमाणे माहिती भरा.

05:06 येथे भरलेल्या प्रत्येक वस्तूसाठी तुम्ही एक युनिक कोड दिला असल्याची खात्री करा.

हे अनिवार्य आहे.

05:13 Category म्हणजे वस्तूंची श्रेणी ज्यांच्याशी वस्तू संबंधित आहे.

आपण Finished Goods निवडले आहे.

05:21 Item type चा उपयोग item कशासाठी वापरला:

उत्पादनाचा उद्देश,

05:28 supplier कडून खरेदी किंवा service देणे.
05:33 खाली स्क्रॉल करा.

नंतर विंडोच्या खालील भागातील Insert New Item बटण क्लिक करा.

05:41 हे एक नवा item यशस्वीरित्या समाविष्ट झाल्याचा मेसेज दाखवेल.
05:47 विंडोच्या वरील भागात असलेल्या ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करा.
05:51 नवीन item समाविष्ट झालेला दिसेल.
05:56 असाईनमेंट म्हणून:

Finished goods या Item category खाली दोन नवे items समाविष्ट करा.

06:02 Components या Item category खाली दोन नवे items समाविष्ट करा.
06:07 अधिक माहितीसाठी या पाठाच्या Assignment लिंकवर क्लिक करा.
06:12 असाईनमेंट पूर्ण झाल्यावर विंडोच्या वरच्या भागातील ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करा.
06:18 आता तुम्हाला Components खाली 2 items आणि Finished goods खाली 3 items दिसले पाहिजेत.
06:26 FrontAccounting च्या इंटरफेसवर परत जाण्यासाठी विंडोच्या खालील भागातील Back लिंकवर क्लिक करा.
06:33 Pricing and Costs पॅनेलचा उपयोग items or inventory ची किंमत पातळी ठरवण्यासाठी होतो.
06:40 या पर्यायाचा उपयोग प्रत्येक Sales item ला sales prices नेमण्यासाठी होतो.

Sales Pricing लिंकवर क्लिक करा.

06:49 Item च्या ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करा.

Dell Laptop हा Item सिलेक्ट करा ज्यासाठी आपल्याला Sales Price ठरवायची आहे.

06:58 आता Currency ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करा.
07:02 currency साठी Indian Rupees निवडा.
07:06 Sales Type ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करा.
07:10 येथे दोन पर्याय आहेत: Retail आणि Wholesale
07:15 येथे Retail पर्याय निवडा.
07:19 पुढे Price फिल्डवर क्लिक करा.

Item च्या Price साठी 53,000 per each असे टाईप करा.

07:28 नंतर विंडोच्या खालील भागातील Add New बटण क्लिक करा.
07:33 हे Dell Laptop या item साठी Sales price यशस्वीरित्या समाविष्ट झाल्याचा मेसेज दाखवेल.
07:41 येथे टेबलमधे ही व्हॅल्यू अपडेट झालेली देखील बघू शकतो.
07:45 FrontAccounting च्या इंटरफेसवर परत जाण्यासाठी विंडोच्या खालील भागातील Back लिंकवर क्लिक करा.
07:52 अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
07:56 थोडक्यात,
07:58 या पाठात आपण,

Units of Measure, Items

08:06 Item Category आणि Sales Pricing तयार करण्याबाबत शिकलो.
08:10 असाईनमेंट म्हणून खाली दिलेल्या items साठी sales price समाविष्ट करा:

Sales Type साठी Retail पर्याय निवडा.

08:20 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

08:27 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

08:35 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
08:39 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali