ExpEYES/C2/Communicating-to-ExpEYES-using-Python/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. Communicating to ExpEYES using Python वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत: पायथनची ओळख, प्लॉट विंडो आणि पायथनच्या सहाय्याने AC विद्युतदाब मोजणे.साइन वेव काढणे. पायथनच्या सहाय्याने बाह्य आणि अंतर्गत विद्युतदाब मोजणे.
00:22 प्लॉट विंडो आणि पायथनच्या सहाय्याने कपॅसिटन्स आणि रेझिस्टन्स मोजणे.स्क्वेअर वेव काढणे.आपल्या प्रयोगांसाठी केलेली जोडणी आणि विद्युत मंडल दाखवणे.
00:34 ह्या पाठासाठी वापरणार आहोत, ExpEYES वर्जन 3.1.0, उबंटु लिनक्स OS वर्जन 14.10
00:43 या पाठासाठी तुम्हाला: ExpEYES Junior च्या इंटरफेसचे आणि बेसिक पायथन प्रोग्रॅमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:52 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:56 प्रथम पायथनचा परिचय करून घेऊ.
01:00 पायथन ही शिकण्यास सोपी आणि प्रभावी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे.ही मुक्त, ओपन सोर्स आणि क्रॉस प्लॅटफॉर्म हाय लेव्हल लँग्वेज आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅम लिहिण्यासाठी ही परिणामकारक आहे.
01:15 आपल्या सिस्टीमवर पायथन इन्स्टॉल केले असल्याची खात्री करून घेऊ.
01:18 टर्मिनल उघडण्यासाठी CTRL+ ALT आणि T एकत्रित दाबा.
01:22 पायथन इंटरप्रीटर सुरू करण्यासाठी टाईप करा: "python" आणि एंटर दाबा. पायथनच्या डिफॉल्ट वर्जनशी संबंधित माहिती टर्मिनलवर दाखवली जाईल.
01:36 येथे दाखवलेले तीन अँगल ब्रॅकेटस पायथनचा प्रॉम्प्ट दाखवतात. आता तुम्ही कमांडस टाईप करू शकता.
01:44 पायथन प्रोग्रॅमिंगबद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
01:49 आता डिव्हाइसच्या वरच्या पॅनेलवरील चॅनेल्सबद्दल जाणून घेऊ.
01:54 वरच्या पॅनेलवरील प्रत्येक टर्मिनल विशिष्ट चॅनेल नंबरला जोडलेले आहे.
02:00 उदाहरणार्थ- चॅनेल 1 हा A1 आणि चॅनेल 2 हा A2 ला प्रदान केला आहे.
02:07 डिव्हाइसला वायर्स कशा जोडायच्या हे पाहू.
02:11 डिव्हाइसला दोन्ही बाजूस स्क्रू टर्मिनल्स आहेत.
02:15 जोडणी करण्यासाठी टर्मिनल्समधे वायर्स घालून स्क्रू घट्ट करा. येथे A2 हे SINE ला जोडलेले आहे.
02:22 हे विद्युत मंडल आहे.
02:28 A2 चा विद्युतदाब मोजणारा प्रयोग करू आणि त्याची साइन वेव बघू.
02:36 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
02:39 प्लॉट विंडोवर A2 चा विद्युतदाब दाखवण्यासाठी A2 वर क्लिक करा. A2 चा विद्युतदाब खाली दिसेल.
02:48 A2 वर क्लिक करा आणि चॅनेल CH1 वर ड्रॅग करा. CH1 वर A2 ड्रॅग केल्यास A2 चा इनपुट डेटा CH1 ला दिला जातो.
02:59 साइन वेव दाखवण्यासाठी msec/div चा स्लायडर हलवा. A2 च्या विद्युतदाबात होणारे बदल बघण्यासाठी A2 वर क्लिक करा.
03:09 CH1 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा. A2 चा विद्युतदाब आणि वारंवारता उजव्या बाजूला दाखवली जाईल.
03:16 आपण हाच प्रयोग करून पायथनच्या सहाय्याने A2 चा विद्युतदाब मोजू.
03:23 पायथन इंटरप्रीटर वरील एरर्स टाळण्यासाठीः डिव्हाइस सिस्टीमला जोडा. प्लॉट विंडो बंद करा.
03:31 ExpEYES मधून eyes ची लायब्ररी इंपोर्ट करण्यासाठी प्रॉम्प्टवर "import expeyes.eyesj" टाईप करून एंटर दाबा.
03:40 टाईप करा: p=expeyes.eyesj.open() आणि एंटर दाबा. हार्डवेअर सापडल्यास open() हे फंक्शन, ऑब्जेक्ट रिटर्न करेल.
03:53 या ओळी ExpEYES ची लायब्ररी लोड करतील आणि डिव्हाइससोबत जोडणी प्रस्थापित होईल.
03:58 A2 चा विद्युतदाब बघण्यासाठी टाईप करा: "print p.get_voltage कंसात 2" आणि एंटर दाबा.
04:08 आऊटपुट A2 चा विद्युतदाब दाखवत आहे. अशाप्रकारे A2 चे विविध विद्युतदाब दाखवू शकतो.
04:15 हा AC विद्युतदाब असल्यामुळे A2 चा विद्युतदाब बदलेल.
04:20 पायथन इंटरप्रीटरच्या सहाय्याने प्लॉटस तयार करण्यासाठी, सिनॅप्टीक पॅकेज मॅनेजरच्या सहाय्याने python-matplotlib ही लायब्ररी इन्स्टॉल करा.
04:30 माझ्या सिस्टीमवर python-matplotlib ही लायब्ररी आधीच इन्स्टॉल केली आहे.
04:36 विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर प्लॉट तयार करण्यासाठी,
04:40 matplotlib वर्जन 1.4.3, numpy चे 1.9 किंवा त्यावरील वर्जन डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.
04:49 इन्स्टॉल केलेल्या ExpEYES च्या फाईल्स आणि ड्रायव्हर्स कॉपी करून C ड्राईव्हमधे पेस्ट करा.
04:55 साइन वेव काढण्यासाठी पायथन प्रॉम्प्टवर टाईप करा: "import expeyes.eyesj" आणि एंटर दाबा.
05:05 पुन्हा टाईप करा p=expeyes.eyesj.open() आणि एंटर दाबा.
05:12 टाईप करा: from pylab import *(ऍस्टेरिस्क). pylab हा matplotlib या लायब्ररीतील प्रोग्रॅम आहे. एंटर दाबा.
05:26 टाईप करा: ion(). ही कमांड pylab इंटरऍक्टीव्ह मोड सेट करेल. एंटर दाबा.
05:35 टाईप करा: t,v=p.capture कंसात 2,200,100. "t", "v" म्हणजे टाईम आणि व्होल्टेज व्हेक्टर्स.
05:50 2 हा A2 चॅनेल नंबर आहे, 200 हे डेटा पॉईंटस आहेत आणि 100 हा पुढील मोजमापांमधील कालावधी आहे.
06:02 एंटर दाबा.
06:04 आऊटपुट बघण्यासाठी टाईप करा: plot कंसात t,v. plot कंसात t,v कमांडद्वारे नव्या विंडोमधे साइन वेव काढली जाईल.
06:15 एंटर दाबा.
06:18 वरील कमांडसच्या सहाय्याने विंडोज कमांड प्रॉम्प्टवर देखील साइन वेव काढता येऊ शकते.
06:26 पुढे बाह्य विद्युतदाबाचा स्त्रोत म्हणून बॅटरीच्या सहाय्याने A1 चा विद्युतदाब मोजू.
06:32 बाह्य विद्युतदाबाचा स्त्रोत मोजण्यासाठी, ग्राउंड (GND) हे A1 ला 3V बॅटरीच्या माध्यमातून जोडले आहे.
06:39 हे विद्युत मंडल आहे. पायथन इंटरप्रीटर च्या सहाय्याने A1 ची व्हॅल्यू दाखवणार आहोत.
06:46 पायथन प्रॉम्प्टवर टाईप करा: "import expeyes.eyesj", एंटर दाबा.
06:53 टाईप करा: p=expeyes.eyesj.open(), आणि एंटर दाबा.
06:59 टाईप करा: print p.get_voltage कंसात 1 आणि एंटर दाबा.
07:07 येथे चॅनेल 1 हा A1 साठी दिलेला आहे. A1 चा विद्युतदाब टर्मिनलवर दाखवला जाईल.
07:14 आता A1 चा विद्युतदाब PVS हा अंतर्गत विद्युतदाबाचा स्त्रोत वापरून मोजू.
07:20 या प्रयोगासाठी, PVS हे A1 ला जोडलेले आहे.
07:24 हे विद्युत मंडल आहे.
07:28 टर्मिनलवर परत जा. टाईप करा: print p.set_voltage कंसात 3 आणि एंटर दाबा.
07:39 येथे PVS चा विद्युतदाब 3 व्होल्टसवर सेट होईल. PVS चा विद्युतदाब दिसत आहे.
07:47 टाईप करा: "print p.get_voltage(1)" आणि एंटर दाबा. A1 चा विद्युतदाब टर्मिनलवर दाखवला जाईल.
07:59 आता कपॅसिटर आणि रेझिस्टरच्या सहाय्याने विद्युतदाबाचे AC आणि DC हे घटक दाखवू आणि स्क्वेअर वेवही काढू.
08:11 या प्रयोगात, A1 हे SQR1 ला जोडले आहे. SQR1 हे कपॅसिटरच्या माध्यमातून A2 ला जोडले आहे.A2 हे 200k रेझिस्टरच्या माध्यमातून ग्राउंड(GND)ला जोडले आहे.
08:25 हे विद्युत मंडल आहे.
08:27 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
08:31 प्लॉट विंडोवरील Measure C on IN1 बटणावर क्लिक करा.
08:36 IN1 कपॅसिटन्स 0.6 pF (पिको फॅराडस) एवढा दिसत आहे.
08:42 Measure R on SEN वर क्लिक करा. SEN चा 560 Ω(ओहम्स) एवढा रेझिस्टन्स दिसत आहे.
08:51 तुम्हाला कपॅसिटन्स आणि रेझिस्टन्सच्या थोड्या वेगळ्या व्हॅल्यू मिळू शकतात.
08:57 SQ1 वर क्लिक करून CH1 वर ड्रॅग करा. SQ1 हे चॅनेल CH1 ला प्रदान केले आहे.
09:04 A2 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा. A2 हे चॅनेल CH2 ला प्रदान केले आहे.
09:12 स्क्वेयर वेव्ज दाखवण्यासाठी SQR1 च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. वेव्जमधे बदल करण्यासाठी msec/div स्लायडर हलवा.
09:23 CH2 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा. A2 चा विद्युतदाब आणि वारंवारता उजवीकडे दाखवली आहे.
09:32 हाच प्रयोग कपॅसिटन्स, रेझिस्टन्स मोजण्यासाठी करणार आहोत आणि पायथन इंटरप्रीटरच्या सहाय्याने स्क्वेअर वेव काढणार आहोत.
09:41 पायथन प्रॉम्प्टवर टाईप करा: "import expeyes.eyesj" आणि एंटर दाबा.
09:50 टाईप करा:p=expeyes.eyesj.open() आणि एंटर दाबा.
09:58 कपॅसिटन्सची व्हॅल्यू दाखवण्यासाठी टाईप करा: p.measure_cap( ) आणि एंटर दाबा.
10:07 कपॅसिटन्सची व्हॅल्यू टर्मिनलवर दाखवली जाईल.
10:11 रेझिस्टन्सची व्हॅल्यू दाखवण्यासाठी टाईप करा: p.measure_res() आणि एंटर दाबा. रेझिस्टन्सची व्हॅल्यू टर्मिनलवर दाखवली जाईल.
10:24 स्क्वेअर वेव काढण्यासाठी टाईप करा: from pylab import *(ऍस्टेरिस्क) आणि एंटर दाबा. टाईप करा: ion() आणि एंटर दाबा.
10:36 टाईप करा: print p.set_sqr1 कंसात 100 आणि एंटर दाबा. येथे 100 ही स्क्वेअर वेवची वारंवारता आहे.
10:49 टाईप करा:t,v=p.capture कंसात 6,400,100 आणि एंटर दाबा.
11:00 टाईप करा:plot कंसात t,v. plot कंसात t,v ही कमांड नव्या विंडोमधे स्क्वेअर वेव काढेल.
11:12 एंटर दाबा.
11:14 थोडक्यात,
11:17 या पाठात आपण शिकलो: पायथनची ओळख, प्लॉट विंडो आणि पायथनच्या सहाय्याने AC विद्युतदाब मोजणे.साइन वेव काढणे. पायथनच्या सहाय्याने बाह्य आणि अंतर्गत विद्युतदाब मोजणे.
11:33 प्लॉट विंडो आणि पायथनच्या सहाय्याने कपॅसिटन्स आणि रेझिस्टन्स मोजणे.स्क्वेअर वेव काढणे. आपल्या प्रयोगांसाठी केलेली जोडणी आणि विद्युत मंडल दाखवणे.
11:45 असाईनमेंट म्हणून, प्लॉट विंडोच्या सहाय्याने तुमच्या बोटाचा रेझिस्टन्स मोजा. पायथनच्या सहाय्याने एकत्रितपणे साइन आणि स्क्वेयर वेव्ज काढा.
11:56 वरील प्रयोगासाठी विद्युत मंडले काढा.
11:59 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
12:07 प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
12:13 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:20 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana