Drupal/C4/RESTful-API-with-a-REST-Client/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 RESTful API with a REST Client वरील स्पोक ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरिअलमध्ये आपण REST client बद्दल शिकणार आहोत.
00:11 यासह, GET method वापरून डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी आपण REST client चा वापर करणे.
00:17 POST method वापरून नवीन नोड तयार करणे.
00:20 PATCH method वापरून अस्तित्वातील नोड(शाखा) मॉडिफाय (बदल) करणे आणि
00:24 DELETE method वापरून अस्तित्वातील नोड(शाखा) रद्द करणे.
00:28 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे Ubuntu Linux 16.04
00:34 Drupal 8
00:36 REST client म्हणून Postman आणि Firefox web browser.
00:41 तुम्ही तुमच्या निवडीनुसार कोणतेही REST client आणि वेब ब्राउजर वापरू शकता.
00:46 या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुम्हाला Drupal चे मूलभूत ज्ञान असावे.
00:52 तुमच्या Drupal वेबसाईटवर RESTful API इम्पलिमेन्ट (अंमलबजावणी) केली गेली पाहिजे.
00:57 नसल्यास, कृपया या वेबसाइटवरील मागील Drupal ट्युटोरिअल्स वर जा.
01:03 तुमच्याकडे कार्यरत इंटरनेट कनेक्शन देखील असावे.
01:08 सर्वप्रथम आपण खात्री करून घेऊ कि आपल्या Drupal8 साईटवर RESTful API इम्पलिमेन्ट (अंमलबजावणी) झाले आहे कि नाही.

असे करण्यासाठी, आपली Drupa8 साईट उघडा.

01:18 त्यानंतर Structure वर जा आणि Views वर जा.
01:23 येथे तुम्ही पाहू शकता कि Events content type मध्ये RESTful API इम्पलिमेन्ट(अंमलबजावणी) झाले आहे.
01:30 लक्षात घ्या कि आपण RESTful API इम्पलिमेन्ट(अंमलबजावणी) करणे हे आधीच शिकलो आहे.
01:35 आता आपण REST client वापरून आपली RESTful API तपासायला शिकू.
01:41 मी REST client म्हणून Postman वापरेल.
01:44 तुम्ही तुमच्या निवडीनुसार कोणतेही REST client वापरू शकता.
01:49 Postman हे web services तपासण्यासाठी एक शक्तिशाली HTTP client आहे.
01:54 Postman client इन्स्टॉल करण्यासाठी, या ट्युटोरिअलचे Additional reading material लिंक पहा.
02:01 Bitnami Drupal Stack वर खालील पायऱ्या लागू आहेत.
02:06 परंतु बहुतांश पायऱ्या इतर कोणत्याही Drupal installation वर देखील लागू असतात.
02:12 आता आपण Postman client उघडू.
02:15 प्रथम आपण GET method वापरून Anonymous users साठी डेटा पुनर्प्राप्त करणे शिकू.
02:21 ड्रॉप-डाउन सूचीमधून GET निवडा.
02:24 लक्षात घ्या की आधी आपण आपल्या Events content type वर RESTful API इम्पलिमेन्ट(अंमलबजावणी) केले होते.
02:31 आपण आपले RESTful API चे पाथ एंटर करू.
02:36 येथे localhost:8080 हे माझ्या server चे नाव आहे.
02:41 जर तुम्ही Bitnami Drupal stack वापरत नाही तर, कृपया localhost:8080 च्या ऐवजी localhost वापरा.
02:50 drupal हे माझ्या Drupal इन्स्टन्सचे फोल्डर आहे.
02:53 events हे content type आहे ज्यावर आपण RESTful API कॉन्फिगर केले आहे.
03:00 आता वर उजव्या कोपऱ्यात Send बटणावर क्लिक करा.
03:03 तुम्ही येथे json format मध्ये आपल्या events content type चे कन्टेन्ट्स पाहू शकता.
03:09 पुढे आपण एकल node पुनर्प्राप्त करण्यास शिकू.
03:13 नवीन टॅब जोडण्यासाठी पॅनलवरील प्लस बटणावर क्लिक करा.
03:18 ड्रॉप डाउन सूचीमधून GET निवडा.
03:21 आपल्याला विशिष्ट node चा अचूक पाथ देणे आवश्यक आहे.
03:25 Send बटणावर क्लिक करा. तुम्ही येथे पाहू शकता की त्या विशिष्ट node ची कन्टेन्ट पुनर्प्राप्त केली आहे.
03:32 पुढे आपण POST method वापरून Authenticated users साठी एक नवीन node तयार करणे शिकू.
03:39 नवीन टॅब जोडण्यासाठी पॅनलवरील प्लस बटणावर क्लिक करा.
03:44 ड्रॉप डाउन सूचीमधून POST निवडा.
03:47 दाखवल्याप्रमाणे पाथ टाईप करा. येथे माझ्या server चे नाव आहे localhost:8080
03:55 drupal हे माझ्या Drupal इन्स्टन्सचे फोल्डर आहे.
03:59 आपल्याला उर्वरित गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत.
04:02 Authorization अंतर्गत, आपण Type बदलून Basic Authentication म्हणून करू.
04:08 आता आपण आपल्या Drupal वेबसाईटचे username आणि password देऊ.
04:13 आपल्या request ला अपडेट करण्यासाठी डाव्या बाजूला स्थित Preview Request बटणावर क्लिक करा.
04:19 Headers टॅबवर क्लिक करा. येथे तुम्ही basic authentication साठी token पाहू शकता.
04:26 आपण Content-Type ला application/hal+json म्हणून सेट करू.
04:32 आता आपण Body टॅबवर जाऊ.
04:34 आपण data format बदलून raw म्हणून करू.
04:38 येथे आपण इच्छित असलेले title आणि type fields घोषित करणे आवश्यक आहे.
04:43 तर खालील कोड टाईप करा.
04:46 या json कोडचा वापर टाईप events च्या नवीन कोडला तयार करण्यासाठी होतो.
04:52 त्यासाठी आपण टायटल (शीर्षक) आणि बॉडी फील्डसाठी व्हॅल्यू निर्दिष्ट करतो.
04:57 या ट्युटोरिअलच्या Code files लिंकमध्ये समान कोड दिलेला आहे.
05:02 कृपया त्याला डाउनलोड करून वापरा.
05:05 वरच्या उजव्या कोपर्यात Send बटणावर क्लिक करा.
05:09 जर कन्टेन्ट यशस्वीरित्या पोस्ट केली गेली असेल तर तुम्ही json चा कोड खाली तळाशी पाहू शकता.
05:16 आपण आपल्या Drupal वेबसाईटमध्ये कन्टेन्ट देखील तपासू शकता.
05:20 आपल्या Drupal साईटवर परत जा.
05:23 येथे तुम्ही event पाहू शकता जे Postman client वरून पोस्ट केलेला आहे.
05:28 लक्षात ठेवा की या पोस्टचे UID 100 आहे.
05:32 आपण या node ला मॉडिफाय करण्यासाठी या UID ला पोस्टमन क्लायंटमध्ये वापरू.
05:38 पुढे आपण PATCH method वापरून Authenticated users साठी node मॉडिफाय करण्यास शिकू.
05:45 आपण Postman client वर परत जाऊ.
05:48 एक नवीन टॅब जोडण्यासाठी वरील पॅनलमध्ये प्लस बटणावर क्लिक करा.
05:52 ड्रॉप-डाउन सूचीमधून PATCH निवडा.
05:55 आपण node चा URL एंटर करू. जो आपण बदलू इच्छितो.
06:00 उदाहरणार्थ, आपण POST method वापरुन तयार केलेली node आपण मॉडिफाय करू.
06:05 या post ची UID 100 आहे. आपण node 100 चा URL एंटर करू.
06:14 Authorization अंतर्गत, आपण Type ला बदलून Basic Authentication म्हणून करू.
06:20 आता आपण आपल्या Drupal वेबसाइटचे username आणि password देऊ.
06:25 डाव्या बाजूच्या Preview Request बटणावर क्लिक करा.
06:28 Headers टॅबवर क्लिक करा. येथे तुम्ही basic authentication साठी token पाहू शकता.
06:35 आपण Content-Type ला application/hal+json म्हणून सेट करू.
06:41 आता आपण Body टॅबवर जाऊ.
06:44 data format ला बदलून raw करा.
06:47 आणि येथे खालील कोड टाइप करा.
06:51 या कोडमध्ये आपण title आणि body fields दोन्हीसाठी व्हॅल्युज मॉडिफाय करतो.
06:57 या ट्युटोरिअलच्या Code files लिंकमध्ये समान कोड दिलेला आहे.

कृपया त्याला डाउनलोड करून वापरा.

07:05 नंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात Send बटणावर क्लिक करा.
07:09 तुम्ही पाहू शकता कि Status हे 200 OK म्हणून आहे ज्याचा अर्थ असा होतो कि कन्टेन्ट मॉडिफाय आहे.
07:16 आता आपण आपल्या Drupal वेबसाईटअधे कन्टेन्ट तपासू.
07:20 आपल्या Drupal वेबसाईटवर परत जा. आपल्या पृष्ठला रिफ्रेश करा.
07:25 येथे PATCH method वापरून event यशस्वीरीत्या मॉडिफाय केले आहे हे तुम्ही पाहू शकता.
07:31 पुढे आपण DELETE method वापरून Authenticated users साठी अस्तित्वातील node रद्ध करण्यास शिकू.
07:38 मी node 100 निवडेन ज्यात एक authenticated user म्हणून तयार केली गेली होती.
07:44 लक्षात ठेवा की आपण authenticated users फक्त त्यांची स्वतःची कन्टेन्ट डिलिट करण्यासाठी परवानगी दिली आहे.
07:50 Postman client वर परत जा. नवीन टॅब जोडण्यासाठी प्लस बटणावर क्लिक करा.
07:57 ड्रॉप-डाउन सूचीमधून DELETE निवडा.
08:00 आपल्याला जे node रद्द करायचे आहे त्याचे URL एंटर करू.
08:04 Authorization अंतर्गत, आपण Type बदलून Basic Authentication म्हणून करू.
08:10 आता आपण आपल्या Drupal वेबसाइटचे username आणि password देऊ.
08:14 डाव्या बाजूच्या Preview Request बटणावर क्लिक करा.
08:18 नंतर Headers टॅबवर क्लिक करा.
08:21 आपण Content-Type ला application/hal+json म्हणून सेट करू.
08:28 वरती उजव्या कोपऱ्यात Send बटणावर क्लिक करा.
08:31 तुम्ही पाहू शकता कि Status हे 204 No content म्हणून आहे याचा अर्थ असा आहे कि कन्टेन्ट रद्द झाला आहे.
08:38 आपल्या Drupal साईटवर परत जा.
08:41 आता पृष्ठ रिफ्रेश करू.
08:43 आपण पाहू शकतो कि node यशस्वीरित्या डिलीट झाला आहे.
08:47 हे सर्व Postman client च्या माध्यमातून कन्टेन्ट व्यवस्थापित करण्याबद्दल आहे.

या सह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

08:55 थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकलो - REST client म्हणून Postman client आणि
09:03 GET, POST, PATCH आणि DELETE methods वापरून Postman client च्या माध्यमातून कन्टेन्ट व्यवस्थापित करणे.
09:10 असाइन्मेंट म्हणून - REST client च्या माध्यमातून काही नवीन articles तयार करा आणि PATCH method वापरून articles मॉडिफाय करा.
09:19 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
09:27 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

09:38 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD आणि NVLI , Ministry of Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:49 या ट्यूटोरियलचे योगदान विशाल जिंदल यांनी केले आहे.

आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana