Digital-India/C2/Use-SBI-pay-app/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 SBI Pay ऍपचा वापर कसा करायचा हे पाहण्याच्या पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात आपण पैशांचे हस्तांतरण आणि
00:12 SBI Pay ऍप वापरून केलेल्या सर्व व्यवहारांची पूर्ण माहिती ठेवणे याबाबत जाणून घेऊ.
00:18 याच वेबसाईटवरील मागील पाठात आपण SBI Pay ऍपवर नोंदणी करण्याबाबत जाणून घेतले.
00:27 तो पाठ नीट समजल्याची आणि तुमच्या फोनवर SBI Pay ऍप इन्स्टॉल केल्याची खात्री करा.
00:35 इन्स्टॉल करून झाल्यावर एकदाच करायची सर्व नोंदणी प्रक्रिया देखील पूर्ण करा.
00:41 म्हणजेच SBI Pay ऍपचा पासवर्ड आणि MPIN तुमच्याकडे आहे.
00:47 आता SBI Pay ऍप कसे वापरायचे ते जाणून घेऊ.
00:52 येथे दाखवल्याप्रमाणे एँड्रॉईड स्मार्ट फोनवर SBI Pay ऍप शोधा.
00:59 येथे दाखवल्याप्रमाणे आयकॉन सिलेक्ट करून आपण ऍप उघडू शकतो.
01:05 नोंदणी करते वेळी तयार केलेला पासवर्ड येथे देण्यास सांगितले जाईल.
01:11 तो देऊन Submit बटणावर क्लिक करा.
01:15 आता ऍप तुम्हाला पुढील स्क्रीनवर घेऊन जाईल जो मुख्य मेनू आहे.
01:21 आता आपण SBI Pay ऍपद्वारे पैशांचे हस्तांतरण कसे करायचे हे जाणून घेऊ.
01:27 Pay हा पर्याय निवडा.
01:30 आता ऍप तुम्हाला या पेजवर घेऊन जाईल.
01:33 येथे तुम्हाला ज्या बँक खात्यातून पैसे द्यायचे आहेत ते निवडायचे आहे.
01:39 आपण आधीच नोंदणी केलेले बँक खाते या सूचीमधे दिसेल.
01:44 ते खाते निवडा.
01:47 पुढे Payee’s Virtual Address मधे संबंधित नोंदी करा.
01:53 लक्षात घ्या- प्राप्तकर्त्याने, त्याच्या फोनवर SBI Pay साठी आधीच नोंदणी केलेली असावी.
01:59 हे ऍप लगेचच तपशील प्रमाणित करेल.
02:03 आणि ज्याला पैसे द्यायचे आहे त्याचे नाव आपोआप दाखवले जाईल.
02:07 Remarks फिल्डमधे भविष्यात उपयोगी पडणा-या संदर्भासाठी काही नोंदी करू शकता.
02:14 नंतर Transaction Amount फिल्डमधे रक्कम लिहा.आणि Pay बटण क्लिक करा.
02:22 आता हे तुमच्याकडे MPIN टाईप करण्यासाठी विचारणा करेल.
02:26 येथे MPIN टाईप करा.
02:30 आणि Submit बटण क्लिक करा.
02:32 बफरिंग होत असल्यास थोडी वाट बघा.
02:36 आता तुम्हाला स्क्रीनवर प्रक्रिया यशस्वी झाल्याचा मेसेज दिसेल.
02:41 तुम्हाला झालेल्या व्यवहाराची माहिती देणारा SMS तुमच्या बँकेकडून देखील मिळेल.
02:48 हे तुमचा व्यवहार पूर्ण झाल्याचे दाखवते.
02:52 प्राप्तकर्त्यास तुम्ही हस्तांतरित केलेली रक्कम मिळाली आहे.
02:56 अशाप्रकारे SBI Pay ऍपच्या सहाय्याने तुम्ही एखाद्याला पैसे देऊ शकता.
03:01 आता मुख्य मेनूवर परत जाऊ.
03:04 मुख्य मेनूमधील My UPI Transactions हा पर्याय निवडून तुम्ही केलेल्या सर्व व्यवहाराचा मागोवा घेऊ शकता.
03:13 ही आपण नुकत्याच केलेल्या व्यवहाराची नोंद आहे.
03:18 त्याचप्रमाणे वापरकर्त्याला त्याच्या बँकेकडून येथे दाखवल्याप्रमाणे SMS देखील मिळेल.
03:25 तसेच त्याला हे मुख्य मेनूमधील My UPI Transactions पर्यायाचा उपयोग करूनही तपासता येईल.
03:33 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
03:38 थोडक्यात,
03:39 या पाठात आपण-

पैशांचे हस्तांतरण आणि SBI Pay ऍप वापरून केलेल्या सर्व व्यवहारांची पूर्ण माहिती ठेवणे याबाबत जाणून घेतले.

03:50 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम जनरल अवेअरनेस विषयांवर विविध माहितीपूर्ण ऑडिओ-व्हिडीओ ट्युटोरियल्स तयार करते, आणि प्रशिक्षण कार्यक्रमही चालवते.
04:03 विषयांच्या पूर्ण सूचीसाठी पुढील साईटला भेट द्या http://spoken-tutorial.org
04:11 अधिक माहितीसाठी कृपया लिहाः contact@spoken-tutorial.org

हे ट्युटोरियल तुम्हाला उपयोगी वाटले असेल अशी आशा आहे.

04:21 या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले आहे. सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

Manali, Nancyvarkey, Pratik kamble