Digital-Divide/D0/First-Aid-on-Fever/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:05 गावात राहणा-या मीनाला शाळेतून येताना लटपटल्यासारखे, शहारल्यासारखे वाटत होते आणि ती थकल्यासारखी दिसत होती.
00:13 तसेच ती अंग आणि डोके दुखत असल्याचे सांगत होती.
00:17 काळजी असलेली आई जेव्हा तिज्या जवळ आली, तर मीनाला खूप ताप आला असल्याचे तिज्या लक्षात आले.
00:24 ताप येणे या बाबतीत प्रथमोपचारा वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.
00:30 येथे तापाची लक्षणे, प्राथमिक काळजी व डॉक्टरांचा सल्ला याबद्दल बोलणार आहोत.
00:37 एखाद्या व्यक्तीचे तापमान सामान्य तापमानाच्या म्हणजेच 96.8-100.4 पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला ताप आहे असे समजावे.
00:51 आता तापाची लक्षणे पाहू.
00:54 तापमानात वाढ होणे,
00:57 अंगदुखी आणि वेदना होणे,
01:00 शहारल्यासारखे, थरथरल्यारखे होणे,
01:02 तीव्र डोकेदुखी आणि
01:04 घसा दुखणे.
01:06 मीनाला थरथरताना पाहून आईने तिला उब देण्यासाठी घोंगडी गुंडाळले.
01:14 ताप आल्यावर काय करावे आणि काय टाळावे ते पाहू.
01:19 कोमट पाण्याने रुग्णाचे अंग पुसून काढा.
01:24 त्याला भरपूर पाणी पिण्यास द्या.
01:27 त्याला घोंगडी किंवा जाड चादरीत गुंडाळू नका.
01:32 स्वतःच्या मनाने औषधे देऊ नका.
01:35 नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच औषधे द्या.
01:40 ताज्या हवेला अडवू नका.
01:43 खरेतर, ताज्या वा - याची झुळूक ताप कमी करण्यास मदत करते.
01:47 रुग्णाची ही लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या.
01:53 अनियमित श्वास,
01:55 मान अवघडणे,
01:57 सतत घसा दुखणे,
01:59 पुरळ उठणे,
02:02 उलटी होणे, लघवीच्या वेळी तीव्र वेदना होणे व जुलाब होणे.
02:07 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
02:11 प्रकल्पाची अधिक माहिती, दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
02:14 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
02:17 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
02:22 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
02:27 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
02:31 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
02:37 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
02:42 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
02:49 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
02:59 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे, यांनी केले असून,
03:05 मी रंजना भांबळे,
03:07 आपला निरोप घेते.
03:11 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana