C-and-C++/C3/Strings/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 C आणि C++ मधील Strings वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00:08 स्ट्रिंग म्हणजे काय?
00:10 स्ट्रिँग ची घोषणा,
00:13 स्ट्रिँग ची सुरवात,
00:15 स्ट्रिंग वरील काही उदाहरणे.
00:17 आपण काही सामान्य एरर्स आणि त्याचे उपाय देखील पाहु.
00:22 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00:25 उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.04
00:29 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.
00:35 strings च्या परिचयासह प्रारंभ करूया.
00:38 स्ट्रिंग हा अक्षरांचा क्रम आहे, ज्यास एक डेटा आइटम म्हणून हाताळले जाते.
00:44 Size of string = length of string + 1
00:49 मी स्ट्रिंग कशी घोषित करायची ते सांगते.
00:52 या साठी सिंटेक्स आहे.
00:55 char, name of string आणि size
00:59 char म्हणजे डेटा टाइप, name of the string म्हणजे स्ट्रिँग चे नाव आणि येथे आपण साइज़ देऊ शकतो.
01:06 उदाहरणार्थ : येथे आपण size 10 सह character string names घोषित केले आहे.
01:13 आता आपण उदाहरण पाहु.
01:15 मी आधीच टाइप केलेला प्रोग्राम उघडते.
01:19 लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव आहे, string.c
01:23 या प्रोग्राम मध्ये इनपुट म्हणून यूज़र कडून एक स्ट्रिंग घेऊ आणि त्यास प्रिंट करू.
01:29 मी आता कोड स्पष्ट करते.
01:32 या आपल्या हेडर फाइल्स आहेत.
01:34 येथे string.h , declarations, functions, string handling utilities चे constants समाविष्ट करते.
01:43 स्ट्रिंग फंक्शन्स वर कार्य करतांना, ही हेडर फाइल समाविष्ट केली पाहिजे.
01:47 हे main फंक्शन आहे .
01:49 येथे आपण स्ट्रिँग strname, 30 साइज़ सह घोषित करत आहोत.
01:55 येथे आपण यूज़र कडून स्ट्रिँग स्वीकारत आहोत.
01:58 स्ट्रिँग रीड करण्यासाठी, आपण format specifier %s सह scanf() फंक्शन चा वापर करू शकतो.
02:05 स्ट्रिँग सह स्पेसस समाविष्ट करण्यासाठी आपण caret sign आणि \n वापरतो.
02:11 नंतर आपण स्ट्रिंग प्रिंट करू.
02:13 आणि हे return statement आहे.
02:16 आता Save वर क्लिक करा.
02:18 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
02:20 कृपया, कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा.
02:30 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space string.c space -o space str
02:37 आणि Enter दाबा.
02:40 कार्यान्वीत, करण्यासाठी टाइप करा, ./str
02:43 आता Enter दाबा.
02:46 येथे हे Enter the string असे दर्शवेल.
02:49 मी टाइप करेल, Talk To A Teacher.
02:56 आता Enter दाबा.
02:58 The string is Talk To A Teacher, असे आउटपुट दिसेल.
03:03 आता आपल्या स्लाइड्स वर जाऊ.
03:06 आता पर्यंत आपण एक स्ट्रिंग च्या घोषणे बद्दल चर्चा केली.
03:10 आता स्ट्रिँग सुरू करण्याबदद्ल चर्चा करू.
03:13 या साठी सिंटेक्स आहे,
03:16 char var_name[size] = “string”;
03:20 उदाहरणार्थ : येथे आपण character string "names" सह साइज़ 10 घोषित केली आहे आणि स्ट्रिँग आहे, "Priya"
03:28 दुसरा सिंटॅक्स आहे,
03:31 char var_name[ ] = सिंगल कोट्स मध्ये String
03:36 eg: char names[10] = सिंगल कोट्स मध्ये , Priya
03:42 पहिला सिंटॅक्स उदाहरणा सह कसा वापरायचा ते मी तुम्हाला सांगते.
03:48 एडिटर वर जा. आपण समान उदाहरण वापरु.
03:52 कीबोर्ड वरील 'Ctr'l,'Alt' आणि 'S' कीज एकत्रित दाबा.
03:58 आता stringinitialize नावाने फाइल सेव करा.
04:03 आता Save वर क्लिक करा.
04:06 आपण स्ट्रिंग सुरू करणार आहोत.
04:08 म्हणून 5 व्या ओळीवर टाइप करा
04:11 = आणि डबल कोट्स मध्ये “Spoken- Tutorial”;
04:20 आता Save वर क्लिक करा.
04:22 आपण फक्त स्ट्रिंग प्रिंट करणार आहोत म्हणून आता, या दोन ओळी काढून टाका.
04:27 Save वर क्लिक करा.
04:30 कार्यान्वीत करू. टर्मिनल वर परत या.
04:33 संकलित करण्यासाठी टाइप करा,
04:35 gcc space stringinitialize.c space -o space str2
04:44 येथे आपल्याकडे str2 आहे कारण, आपल्याला string.c फाइल साठी आउटपुट पॅरमीटर str ला अधिलेखित करायचे नाही.
04:54 आता Enter दाबा.
04:56 कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, ./str2
05:00 "The string is Spoken-Tutorial" असे आउटपुट दर्शविले जाईल.
05:06 आता काही सामान्य एरर्स पाहु, ज्या आपल्यास मिळू शकतात.
05:09 प्रोग्राम वर परत या.
05:11 समजा येथे आपण string ची स्पेलिंग sting अशी टाइप केली,
05:16 आता Save वर क्लिक करा.
05:18 कार्यान्वीत करू,टर्मिनल वर परत या.
05:21 आता अगोदरप्रमाणे संकलित करा.
05:23 आपल्यास fatal error दिसतो,
05:25 sting.h: no such file or directory
05:28 compilation terminated
05:30 प्रोग्राम वर परत या.
05:32 याचे कारण, कंपाइलर sting.h नावाची हेडर फाइल शोधण्यास सक्षम नाही.
05:39 म्हणून हे एरर देत आहे.
05:41 चला, एरर दुरुस्त करू.
05:43 येथे r टाइप करा.
05:45 आता Save वर क्लिक करा. पुन्हा कार्यान्वित करू.
05:47 टर्मिनल वर परत या.
05:50 अगोदरप्रमाणे संकलित करा. अगोदरप्रमाणे कार्यान्वीत करा.
05:54 होय, ते कार्य करीत आहे!
05:56 आता दुसरी एक सामान्य एरर पाहु.
05:59 प्रोग्राम वर परत या.
06:02 समजा येथे मी char च्या जागी int टाइप करेल.
06:06 आता Save वर क्लिक करा. काय होते ते पाहू.
06:09 टर्मिनल वर परत या.
06:11 मी prompt क्लियर करते.
06:15 अगोदरप्रमाणे संकलित करा.
06:17 आपण एक एरर पाहतो,
06:19 Wide character array initialized from non-wide string
06:24 format %s expects argument of type 'char, ' but argument 2 has type 'int'
06:32 प्रोग्राम वर परत या.
06:36 याचे कारण, आपण स्ट्रिँग साठी format specifier म्हणून %s चा वापर केला.
06:42 आणि आपण यास इंटीजर डेटा टाइप सह सुरू करत आहोत.
06:47 चला, एरर दुरुस्त करू.
06:49 येथे char टाइप करा.
06:51 Save वर क्लिक करा.
06:53 कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या.
06:56 अगोदरप्रमाणे संकलित करा. अगोदरप्रमाणे कार्यान्वीत करा.
07:00 होय, ते कार्य करीत आहे!
07:03 आता समान प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु.
07:08 प्रोग्राम वर परत या.
07:11 मी string.c फाइल उघडते.
07:15 आपण येथे कोड संपादित करूया.
07:18 प्रथम, कीबोर्ड वरील shift, ctrl, आणि S किज एकत्रित दाबा.
07:25 आता .cpp extension ने फाइल सेव करा.
07:29 आणि Save वर क्लिक करा.
07:33 आता हेडर फाइल iostream म्हणून बदलू.
07:38 using statement समाविष्ट करा.
07:43 आता Save वर क्लिक करा.
07:47 आता आपण ही घोषणा डिलीट करू.
07:50 आणि आपण स्ट्रिँग वेरीयेबल घोषित करू.
07:53 टाइप करा, string space strname आणि semicolon
07:59 Save वर क्लिक करा.
08:02 printf statement च्या जागी cout statement करा.
08:07 येथे क्लोजिंग ब्रॅकेट डिलीट करा.
08:11 scanf statement डिलीट करा आणि टाइप करा, getline ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट आणि ब्रॅकेट्स मध्ये टाइप करा, cin, strname
08:24 शेवटी, एक semicolon टाइप करा.
08:28 आता पुन्हा, printf statement च्या जागी cout statement करा.
08:36 format specifier आणि \n डिलीट करा.
08:40 आता कॉमा डिलीट करा.
08:42 दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा, येथे ब्रॅकेट डिलीट करा.
08:49 दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा, आणि डबल कोट्स मध्ये टाइप करा, \n
08:54 आणि Save वर क्लिक करा
08:58 येथे आपण स्ट्रिँग वेरीयेबल 'strname' घोषित केला आहे.
09:03 आपण C++ मध्ये format specifier वापरत नसल्यामुळे, कंपाईलर ला strname स्ट्रिंग वेरियेबल आहे, असे माहिती पाहिजे.
09:13 येथे आपण इनपुट क्रमा पासून, कॅरेक्टर्स एक्सट्रॅक्ट करण्यासाठी getline वापरतो.
09:18 तो एक स्ट्रिंग म्हणून त्यास संग्रहीत करतो.
09:22 प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या.
09:27 मी prompt क्लियर करते.
09:30 संकलित करण्यासाठी टाइप करा,
09:32 g++ space string.cpp space -o space str3
09:39 आणि Enter दाबा.
09:41 कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा, ./str3
09:46 Enter दाबा. हे Enter the string असे दर्शवित आहे.
09:50 मी Talk To A Teacher असे प्रविष्ट करेल.
09:55 आता Enter दाबा.
09:57 असे आउटपुट दर्शविले जाईल,
09:59 "The string is Talk To A Teacher"
10:03 आपण पाहु शकतो, आउटपुट आपल्या C कोड च्या समान आहे.
10:07 परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ.
10:10 संक्षिप्त रूपात, या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
10:13 स्ट्रिंग्स , स्ट्रिँग ची घोषणा,
10:16 eg: char strname[30]
10:20 स्ट्रिँग ची सुरवात, eg: char strname[30] = “Talk To A Teacher”
10:26 असाइनमेंट
10:28 दुसरा सिंटॅक्स वापरुन, स्ट्रिँग प्रिंट करण्यासाठी एक प्रोग्राम लिहा.
10:34 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:37 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:40 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:44 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
10:46 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:49 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:54 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
11:01 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:04 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:12 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:16 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
11:20 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble