C-and-C++/C2/Nested-If-And-Switch-Statement/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 C and C++ मधील Nested if आणि Switch statements च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत,
00:09 nested if statement चा वापर आणि,
00:12 switch statement. आपण हे काही उदाहरणाद्वारे जाणून घेऊ.
00:17 ह्यासाठी वापरणार आहोत,
00:20 Ubuntu operating system version 11.10
00:24 आणि उबुंटु वरील gcc and g++ Compiler version 4.6.1
00:30 उदाहरणाद्वारे nested if आणि switch statement कसे लिहायचे ते पाहू.
00:36 मी आधीच प्रोग्रॅम लिहिला आहे.
00:39 चला पाहू. या प्रोग्राम मध्ये आपण integers ची range तपासू.
00:45 nested-if.c हे फाईलचे नाव आहे.
00:50 code समजून घेऊ.
00:52 ही Header file आहे.
00:54 हे main function आहे.
00:56 main function मध्ये x आणि y ही दोन integer variable घोषित केली आहेत.
01:02 येथे आपण यूज़र ला 0 ते 39 दरम्यानच्या एक संखेस प्रविष्ट करण्यास सांगू.
01:08 input म्हणून युजरकडून y ची व्हॅल्यू घेणार आहोत.
01:12 ही if condition आहे.
01:14 y/10=0 आहे का ते तपासू.
01:19 condition true असेल तर, "you have entered a number in the range of 0-9" प्रिंट करू.
01:25 ही else-if condition आहे.
01:28 येथे y/10=1 आहे का तपासू.
01:32 condition true असल्यास,
01:34 you have entered a number in the range of 10-19 असे प्रिंट करू.
01:39 ह्या else if condition मध्ये नंबर 20-29 ह्या गटात आहे का ते तपासू.
01:45 आणि येथे 30 ते 39 ह्या गटात आहे का ते तपासू.
01:51 ही else condition आहे.
01:53 वरील सर्व conditions false असतील,
01:55 तर number not in range असे प्रिंट होईल.
01:58 हे return statement आहे.
02:01 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
02:03 कीबोर्ड वरील Ctrl+Alt+T बटणे एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.
02:12 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा, “gcc” space “nested-if.c” space hyphen “-o” space “nested” . एंटर दाबा.
02:23 टाईप करा, dot slash “nested”. एंटर दाबा.
02:28 तुम्हाला, Enter a number between 0 to 39. असे दिसेल.
02:32 12 टाईप करूया.
02:34 हे आऊटपुट दिसेल, you have entered the number in the range of 10-19.
02:40 दुसरा नंबर टाकू.
02:42 पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी up arrow key दाबून एंटर दाबा.
02:48 यावेळी टाईप करा, 5 .
02:50 हे आऊटपुट दिसेल,
02:52 you have entered the number in the range of 0-9.
02:56 कंडिशन्स कार्यान्वित करण्याची दुसरी पध्दतही आहे.
03:00 switch statement च्या सहाय्याने,
03:02 कसे ते पाहू.
03:05 switch वापरून हाच प्रोग्रॅम पाहू.
03:08 मी प्रोग्रॅम उघडला आहे.
03:10 text editor वर जाऊ.
03:13 हा प्रोग्रॅम आधीच समजावून दिला आहे.
03:16 Switch statements समजून घेऊ.
03:20 input ला म्हणजेच y ला 10 ने भागले जाईल आणि निकाल variable x मध्ये संचित होईल.
03:28 म्हणजेच भागाकार x मध्ये संचित होईल.
03:32 भागाकाराच्याद्वारे आपला नंबर कुठल्या गटात आहे ते ओळखू शकतो.
03:36 switch command ला x हे व्हेरिएबल तपासण्यास सांगू.
03:41 ही case 0 आहे. जर ती पूर्ण झाली,
03:45 तर you have entered the number in the range of 0-9 हे प्रिंट करू.
03:51 जर case पूर्ण झाली असेल तर, लूप च्या बाहेर येण्यास आपण break देऊ.
03:55 प्रत्येक वेळी लूप ला break देणे आवश्यक आहे.
03:58 कारण एकावेळी एकच condition true असू शकते.
04:03 ही case 1 आहे . “case 1” म्हणजे जर x ची व्हॅल्यू 1 असेल,
04:08 तर you have entered a number in the range of 10-19 हे प्रिंट होईल.
04:12 ही case 2 आहे .
04:14 येथे you have entered a number in the range of 20-29 हे प्रिंट होईल.
04:20 आणि ही case 3 आहे. येथे आपली संख्या 30 ते 39 ह्या गटातील आहे का हे तपासले जाईल.
04:26 ही default case आहे. वरीलपैकी कोणतीच केस पूर्ण न झाल्यास काय करायचे, ते default case दाखविते.
04:36 येथे number not in range असे प्रिंट करू.
04:39 हे return statement आहे.
04:41 प्रोग्राम कार्यान्वित करू.
04:43 टर्मिनलवर जाऊ.
04:46 टाईप करा, gcc space switch.c space -o space switch. एंटर दाबा.
04:55 टाईप करा ./switch. एंटर दाबा.
05:00 0 ते 39 दरम्यानची एक संख्या प्रविष्ट करा. मी 35 टाईप केले.
05:06 “you have entered the number in the range of 30 to 39”. हे आऊटपुट मिळेल.
05:10 हा प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू.
05:16 टेक्स्ट एडिटरवर जाऊ.
05:18 आपल्या फाईलचे नाव nested-if.cpp आहे.
05:23 येथे logic आणि implementation सारखेच आहेत .
05:27 येथे काही बदल आहेत जसे,
05:30 header file मध्ये stdio.h च्या जागी iostream लिहा.
05:35 येथे using statement समाविष्ट केले आहे.
05:39 Using namespace std
05:41 printf आणि scanf च्या जागी cout आणि cin function लिहा.
05:46 तुम्ही पाहु शकता, उर्वरित code हा C program प्रमाणेच आहे.
05:51 code कार्यान्वित करू.
05:53 टर्मिनलवर जाऊ.
05:56 टाईप करा, g++ space nested-if.cpp space -o space nested1. एंटर दाबा.
06:07 टाईप करा ./nested1. एंटर दाबा.
06:11 0 ते 39 दरम्यानची एक संख्या प्रविष्ट करा. मी 40 टाईप केले.
06:16 “number not in range” असे आउटपुट दिसेल.
06:20 C++ मध्ये switch program पाहू.
06:24 text editor वर जा.
06:27 येथेही logic आणि implementation सारखेच असेल.
06:31 header file, iostream आहे.
06:34 येथे using statement आहे.
06:37 आणि आपण cout आणि cin function बदललेले आहे.
06:41 उर्वरित code switch.c प्रोग्राम प्रमाणेच आहे.
06:45 कार्यान्वित करू. टर्मिनलवर जाऊ.
06:48 टाईप करा, g++ space switch.cpp space -o space switch1 एंटर दाबा.
06:58 टाईप करा, ./switch1 एंटर दाबा.
07:02 0 ते 39 दरम्यानची एक संख्या प्रविष्ट करा.
07:05 25 टाईप करा.
07:09 हे आऊटपुट दिसेल,
07:11 “you have entered the number in the range of 20-29”
07:15 स्लाईडसवर जाऊ.
07:18 आपण switch आणि nested-if statement मधील फरक पाहु.
07:23 Switch statement चे मूल्यमापन expression च्या निकाला नुसार होते.
07:28 result true असेल तरच Netsed-if statement कार्यान्वित होते.
07:34 switch मध्ये केस म्हणून variable च्या विविध व्हॅल्यूज आपण वापरतो.
07:39 nested-if मध्ये variable च्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी conditional statement लिहावे लागते .
07:45 Switch statement केवळ integer व्हॅल्यूज तपासू शकते.
07:50 Nested if दोन्ही integer आणि fractional values तपासू शकते.
07:55 ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:58 थोडक्यात,
08:00 आपण शिकलो, nested if statement.उदाहरणार्थ else if( y/10 equals to 0)
08:08 switch statement.उदाहरणार्थ Switch(x)
08:12 nested-if आणि switch statements मधील फरक.
08:16 Assignment Employee चे वय 20 ते 60 वयोगटातील आहे का ते तपासणारा प्रोग्रॅम लिहा.
08:23 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:26 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:29 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:33 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:38 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:42 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:49 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:52 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:58 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:04 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana